Sunday, January 31, 2016

देवाचं अस्तित्व!!!!!
---------------------------------

देवाचं अस्तित्व माणसानी निर्माण केलं की माणसाला देवानी निर्माण केलं हा  कदाचित खुप मोठा वादाचा विषय होईल. पण देवाला माणसानी निर्माण केलं  हे माञ सहजतेने स्पष्ट करता येत. हे माझं मत काहींना १००% पटणार नाही. पण ते मान्य केल तर खरा देव दिसल्याशिवाय राहणार नाही.
  मी त्या देवाची संकल्पना आपल्यासमोर मांडतो आहे ज्याचे सर्व व्यवहार मणुष्य निर्मित नियंत्रित आहेत. तो देव ज्याचा आकार, प्रकार,  व्यवहार, उपासना, संरक्षण, अस्तित्व  मणुष्य प्राण्याकडून निर्धारित केले जात असते. त्याच्यावर देवाचा कोणताही आक्षेप नसतो. तो देवाच्या नावावर माणसानी माणसाशी माणसासाठी केलेला व्यवहार असतो.
अतिशय महत्त्वाचे म्हणजे तो व्यवहार केवळ माणसाला वाटत असलेल्या भितीपोटीच  चालू असतो. माणसाच्या मनात असलेल्या भितीवरच मुळात त्या देवाचे अधिष्ठान  असते. ज्या माणसाला विश्वातील घडामोडीची भिती वाटत नाही,  त्याच्या मनात तो देव क्षणभरही थांबू शकत नाही. त्याला तिथे थोडीही जागा मिळू शकत नाही. त्याचे हा मणूष्यनिर्मीत देव काहीही  बिघडवू शकत नाही.

माञ तो, ------- तो देव!!  कोणाच्याही नियंञणात आला नाही.  आणू शकणार पण नाही. तो कधी कोणाच्या म्हणण्याप्रमाणे वागणारा नाही. कोणाचं बिघडवणारा नाही. मग का बरं  घाबरायचं आपल्याच बापाला !!!!! का बरं  सहन करायचा त्याच्या नावावर चाललेला धंदा !!!!!!!

 🙏डाँ प्रभाकर लोंढे 🙏