Sunday, September 25, 2016

*पाटीलकी (प्रवृत्ती )*
------------------------------
काय पाटील तुमची लेकरं
किती निघाली वाह्यात,
तुमचीच खेटरं नाही
आज तुमच्या पायात.

घरी दारी, गावात गल्लीत
तुमचा भलताच होता तोरा,
म्हणाल का कधी तरी लेकराले
सुधरुन जारे पोरा.....

सोडा तुमचा परंपरेचा
पाटीलकीचा बाणा,
घरी खायले नाही दाना
अनं म्हणे मले पाटील म्हणा.

गेली पाटीलकी तुमची
राहीला नुसता माज,
मेलेल्या गाईला आता
कशाला चढवता साज......

समतेच राज्य आलं
आता समतेनच वागा...
गरिबाची लेकरं नाहीतर
दाखविल तुम्हाले जागा...

करा बंद ! वाजविणं
आता पाटीलकीचा वाजा.
होवु द्या! समाजव्यवस्थेला मान्य
सर्वांच्या  समान जागा.... सर्वांच्या  समान जागा......

*मिञानो!! ही माझी कविता भारतीय समाजात समानता प्रस्थापित करण्यात महत्त्वाचा अडसर ठरलेल्या  प्रवृत्ती वर प्रहार आहे. की जी आजही लोकशाही व्यवस्थेत काही प्रमाणात मुळ धरून आहे.*
----------------------------------------
   *डाँ. प्रभाकर आर. लोंढे*
       *गोंदिया --चंद्रपूर*

Saturday, September 17, 2016

सर्वस्व आहे तुझंच आई
काय आहे माझं
साथ तुझी या जीवास
कमी काय आज.....

घडलो बिघडलो आई
जसा चढेल जीवास साज
वागलो तसाच आई
तुला येणार नाही लाज....

शपथ तुला या तुकडयाची
जरी गेला तुझा आवाज
सर्व मिळाले तुझ्या कृपेने
तरी चढणार नाही माज....