*इंदोर संस्थानाच्या संस्थापकाची इंदोरातच उपेक्षा!*
डॉ . प्रभाकर लोंढे, गोंदिया-चंद्रपूर
सर्वानाच माहित आहे की, इतिहास प्रेरणा देतो, एखाद्या कर्तबगार व्यक्तीत्वाचा पुतळा त्याच्या कर्तुत्वाच्या स्मृती जागृत करतो. त्यामुळेच पुतळे उभारण्याची प्रथा पडली. परंतु कोणाचे, कुठे व का पुतळे उभारायचे? हा भारतात खुपच मोठा गहण प्रश्न बनलेला आहे.
एखाद्याच श्रेष्ठत्व नष्ट करण्यासाठी भलत्याचेच पुतळे बसविण्याचा भलताच प्रकार भारतातील रित बनलेली आहे ( उदा. तुकोजीराव होळकर यांनी इंदोरात बांधलेल्या सुंदर अशा लालबाग पँलेसच्या प्रवेशदारात तुकोजीराव ऐवजी पंडित नेहरुंचा पुतळा!!, पुण्यातील संभाजी गार्डन मधील हटविलेले पुतळा प्रकरण ) असो! पण मी म्हणतो,
आपल्या कर्तृत्वाने सर्वत्र प्रभाव व दरारा निर्माण करणाऱ्या थोर सुभेदार मल्हारराव होळकर यांनी आपला कार्यकाल गाजविला. अटक ते कटक पर्यत मराठेशाहीचे झेंडे फडकविले. आपलं इंदोर संस्थान स्थापन केलं, वाढविलं.संस्थानाचा सर्वत्र दरारा निर्माण केला. "इंदोर संस्थान व होळकरशाही" या समिकरणाची सर्वदूर किर्ती पसरली. मराठेशाही वाढविणे, टिकवून ठेवण्यासाठी जिवाच रान केलं. हे सर्व वारसा हक्काने नाही तर कर्तृवाने निर्माण केलं. त्यामुळे त्यांना सर्वत्र सन्मान मिळाला. हे सर्व करीत असतांना आपली राजाधानी इंदोर बनविली. त्यांच्या कर्तुत्वाने इंदोरची ओळख सर्वञ निर्माण झाली. त्यांचा प्रभाव एवढा होता की, प्रत्यक्ष पेशवा त्यांच्याशी अदबीने वागत होता.
राष्ट्रीय पातळीवर सर्वत्र सन्मान व निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान असणाऱ्या व त्यांच्या कार्यामुळेच इंदोर संस्थानाची ओळख सर्वत्र निर्माण करणाऱ्या सुभेदार मल्हाररावांची आज इंदोरातच एवढी उपेक्षा, दयनिय अवस्था प्रत्यक्ष पहायला मिळाली. हा विचित्र पणा इंदोर वाशीयांनीच करणे हे केवढे लाजिरवाणे!!!
इंदोरच्या प्रत्यक्ष भेटीत मिळालेल्या माहीतीनुसार, ज्यांच्या संस्थानाच्या गादीचा वारस मल्हाररावांच्या सल्ल्याने ठरायचा, त्या ग्वाल्हेरच्या माधवराव सिंधीयाचा पुतळा इंदोरात महत्त्वाच्या चौकात स्थापित झाला. परंतु सुभेदार मल्हाररावांचा पुतळा स्थापन करण्यासाठी इंदोरातील एकही महत्त्वाचा चौक सापडला नाही,?..... राजवाड्यात सुद्धा पुतळा अथवा प्रथम दर्शनी मोठा फोटो सुद्धा दिसला नाही.
इंदोरात होळकरांची राजधानी राहिलेल्या राजवाड्यातील संग्रहालयात होळकर साम्राज्याच्या थोड्याफार वस्तुशिवाय काही अनावश्यक इतर वस्तुचा संग्रह हा अनाकलनिय वाटला. म्हणजे इंदोरात होळकरांची ओळख जपण्यासाठी राजवाड्यात वा इतरञ फार मोठे उपक्रम राबविले जात आहे असं कुठेही आढळून आलेले नाही.
काही महत्तविचारी विचारवंत म्हणतील, पुर्ण इंदोरच त्यांच्या स्मृती जागृत करतंय. पुतळ्याची गरजच काय?? होय. ठिक आहे, पण मी म्हणतो ज्यांचा संबंधच नाही अशांचे पुतळे कशासाठी ?? तेही महत्त्वाचे चौक, स्थळे या ठिकाणी ??? खरा इतिहास भ्रष्ट करण्याचा प्रयत्न आहे! असे जर कोणी म्हटले तर चुकीचे म्हणता येणार काय?....
काहींना प्रश्न पडेल, सुभेदाराचा पुतळा इंदोरात नाही काय?---- आहे.. पण कुठे ? त्याची अवस्था काय?
सुभेदारांचा पुतळा आहे इंदोरात !! लालबाग पँलेस ग्राउंडच्या एका कोपऱ्यात.... तोही अशा सोबतच्या चिञातील (बंद कटघर्यामध्ये भोवताली उकीरडँ.व गवत वाढलेलं. दुर्लक्षित असल्याचे कोणी सांगण्याची गरजच नाही) अवस्थेत ..... बघा सहन होते काय तर...???
(गुगल मँपवर सुद्धा इंदोरमध्ये मल्हाररावचा पुतळा दिसत नाही... माधवराव सिधीयाचा माञ पुतळा दिसतो)
इंदोरच्या प्रत्यक्ष दुसऱ्या भेटी नंतर मला खुप मोठे प्रश्न पडलेले आहे. त्यापैकी एक?? अस हे हेतुपुरस्सर तर केलं जात नाही ना???? असं करणारी एखादी छुपी यंञणा तर कार्यरत नाही ना?????
बघा निट!! विचार करा! सटिक....
स्वाभिमानी असाल तर.....बघा! काय वाटते? तर....
माझे विचार चुकीचे वाटल्यास माफी असावी... ही विनंती ...