*महाराजा यशवंतराव होळकर जयंती विशेष... विशेष शुभेच्छा*
🐉🐉🐉🐉🐉🐉🐉🐉
_________________________
*सत्तेत असलेल्यांनाच आंदोलने का करावी लागतात?*
डॉ प्रभाकर लोंढे
भारतीय लोकशाही अशी लोकशाही आहे, कि जिथे सत्ताधारी पक्षातील लोकच अलीकडे आंदोलनाचा पवित्रा घेतांना दिसतात. त्यामुळे कधी संशय येतो की ते सत्ताधारी आहेत की, पुन्हा काही??? मुद्दा राम मंदिराचा असो, की, शेतकऱ्याचा असो की पुन्हा मराठा आरक्षण दिल्यानंतर पेटण्याची शक्यता असलेल्या धनगर आरक्षणाचा असो .. ( सत्तारूढ पक्षाच्या जाहीरनाम्यात असलेल्या व पंधरा दिवसात अंमलबजावणी करणाऱ्या धनगर आरक्षणाचा असो), अशी अनेक उदाहरणे देता येईल. की *सत्तारूढ पक्षात असलेले नेते रस्त्यावर उतरतांना दिसतात. तेव्हा असे का? असे कसे? व कशासाठी* ? असे अनेक महत्वपुर्ण प्रश्न डोक्यात थैमान घालतात.
अलीकडे ऐकलं की धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी बीजेपी च्या जाहीरनाम्याची होळी करणार!!! लय बरं वाटलं. चांगले आहे. पण थोडा उशीर झाला असं वाटतंय. कारण सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर ते संशयास्पद आहे. असे असले तरी लोकशाहीमध्ये सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी आंदोलने आवश्यक आहेच. असतातच पण *"तळ्यातही मीच, आणि मळ्यातही मीच" अशा लोकांची आंदोलने १००% फसवी असतात.* सामान्य माणसाच्या भावनेशी खेळणारी असतात. कारण असे नेते सत्तारूढ पक्षाच्या सोबत राहून, किंवा सरकारच्या आशिर्वादाने एखाद्या राजकीय पदाचा लाभ घेणारे नेते सत्तारूढ पक्षाच्या विरोधात खरा आंदोलनाचा पवित्रा घेऊच शकत नाही. घेत असेल तर ते नक्कीच एक नाटक आहे किंवा ते आंदोलन आरक्षणासंबंधाने असंतोषाची तिव्रता कमी करण्यासाठी किंवा दुसरा कोणी या असंतोषाचा/ जनभावनेचा फायदा घेऊ नये यासाठीच अशी आंदोलने होत असतात. त्यामुळे आंदोलनाची चिकित्सा करणे सामान्य माणसाचा व नेत्यांचा, कार्यकर्ताचा अधिकार असतो. तो अधिकार ते किती चांगल्या प्रकारे वापरतात यावर त्यांचे सर्वांचे भवितव्य अवलंबून असते.
लोकशाहीत सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता हातात घेते. प्रत्येक राजकीय पक्ष बहुमतात येण्यासाठी जनहितार्थ सतत्येवर आधारित जाहीरनामा प्रसिद्ध करते. सत्ता प्राप्त होताच जाहीरनामा अंमलात आणण्यासाठी प्रयत्नात असल्याचे सांगितले जाते. व प्रत्यक्ष काम करते. त्यासाठी ते तसे प्रयत्न सुध्दा करतात? हे खरं असेल तर सरकारशी संबंधित पक्षांची व त्यामधील नेत्यांची सरकारच्या धोरणाच्या समर्थनार्थ काम करण्याची जबाबदारी ठरते.
ते तसे करीत नसेल, सरकार च्या विरोधात रस्त्यावर उतरत असेल तर त्यांचा सरकार सोबत राहण्याचा नैतिक अधिकार संपलेला आहे. परंतु तसे न करता जनतेमध्ये येवून जनभावना भडकविण्यासाठी व जनतेला आपल्या मागे लावण्यासाठी जनभावना भडकविणारे मुद्दे ते शोधतात. जनतेच्या भावना भडकवून सरकार संबंधी रोष व्यक्त करण्याचे केवळ नाटक करीत असतात. यामुळे नेते कायम असतात. जनतेचे प्रश्न जसेच्या तसेच राहतात.
मात्र सरकार संबंधी जनतेमध्ये असलेला रोष नियंत्रित मार्गाने नियोजनबद्ध बाहेर काढला जातो... हा प्रकार सरकारसाठी, प्रस्तापित नेत्यांसाठी उत्तम दर्जेदार व दिर्घकाळ नेतृत्व , सत्ता टिकवून ठेवण्यासाठी पोषक, हितकारक व दिर्घायुष्य देणारा असतो....
*पण यामध्ये मरतो तो कार्यकर्ता!! सामान्य माणूस!! ज्यांच्या पिढ्यान् पिढ्या बरबाद झालेल्या आहे..* कारण सामान्य माणसाच्या प्रश्नावर व कार्यकर्त्यांच्या भावनेवर नेत्यांच्या पिढ्यान् पिढ्या जगत असतात व जगवायच्या असतात...
*तेव्हा विचार करा.!!*
*सरकार मधील किंवा सत्तारूढ पक्षाच्या नेत्यांना रस्त्यावर उतरण्याची गरज का पडते?*
____________________&&____
जय मल्हार
एकच ध्यास --- धनगरांचा राजकीय विकास
___________&________________
*धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*