🇦🇹💰💰💰💰💰💰💰💰🇦🇹
*धनगरां मधील आर्थिक सम्राटानो!!*
*आता सत्तेसाठी थोडे हात मोकळे करा!*
*डॉ. प्रभाकर लोंढे*
लोकशाहीमध्ये सत्ता निवडणुकीच्या माध्यमातून प्राप्त करायची असते, त्यासाठी निवडणुका हे शांततामय मार्गाने सत्तांतर करण्याचे माध्यम आहे. म्हणून दर पाच वर्षांनी निवडणुका घेणे हे प्रत्येक लोकशाहीला आवश्यक असते. ह्या निवडणुका लोकमताच्या आधारे जो बहूमतात येईल, त्यालाच सत्तेचा मार्ग मोकळा करीत असतात. पण भारतीय लोकशाहीचा गेल्या सत्तर वर्षातील निवडणुकांचा अभ्यास केला तर येथील मतसंख्येवर इतर काही बाबींचा प्रभाव पडत असल्याचे दिसून येते. त्यातील *प्रथम महत्त्वाचा घटक म्हणजे जात!!* तिचे चटके आज पर्यंत धनगरांनी सहन केलेले आहे. त्यामुळेच आमचे राजकीय नेते सत्ताधारी बनू शकले नाही.
कायद्याने जात नष्ट केल्याच्या कोरड्या आरोळ्या आम्ही मारत असलो तरी मात्र याच जात फ्याक्टरचा वापर करून येथील लोकशाहीमध्ये येथील अनेक भुरटे राजे, *जाणते राजे* बनले आहे.
*दुसरा घटक म्हणजेच पैसा* की जो निवडणूकांमध्ये अप्रत्यक्षपणे खूप मोठी महत्वाची भूमिका पार पाडत असतो. *पैशाने(MONEY) मत निर्माण करता येत नसले तरी मत परीवर्तीत मात्र करता येतं,* हे भारतीय समाज व्यवस्था व लोकशाहीचे वास्तव आहे.
पैशाच्या बाबतीत असं म्हटलं जातं.
*पैसा, पैसा तू खूदा तो नहीं है,*
*पर यह भी सच है कि,*
*तू खूदा से भी कम नहीं है!*
असं जे पैशाच्या च्या बाबतीत बोललं जात, ते भारतीय सार्वत्रिक निवडणूक काळात तर सिध्दच होत असतं. तो कदाचित सर्वांचाच अनुभव असू शकतो.
भारतीय लोकशाहीमध्ये निवडणूक लढवायची असेल तर *तिसरा घटक मनुष्यबळ/कार्यकर्ता (Musul) (तोही निष्ठावंत)* महत्त्वाचा असतो. *सत्तेतून पैसा, पैशातून कार्यकर्ता व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतसंख्येच्या आधारे राजकीय सत्ता, हा प्रस्थापितांच्या सत्तेचा यशोमार्ग आहे.* त्याच आधारे ते आजही यशस्वी होण्याचा विश्वास व्यक्त करताना दिसतात. ही बाब प्रथम धनगर तरूणांनी समजून घेणे आवश्यक आहे.
आज धनगर तरुण राजकीय सत्तेच्या दृष्टीने मार्गक्रमण करीत आहे. जातिवंत निष्ठावंत धनगर तरुणाईचा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याच्या दृढनिश्चय दिसतो आहे. *लोकसभा असो की विधानसभा आता फक्त पिवळा भंडारा उधळायचाच!!* या विचाराचे धनगर कार्यकर्ते सुध्दा दंड थोपटत आहे. जशा काही यशवंतरावांच्या फौजा आपलं गतवैभव पुनर्स्थापित करण्याचा चंग बांधून आहे. परिणामतः दुसरीकडे शत्रु भांबावलेल्या स्थितीत दिसतो आहे. मात्र *धनगरांचे हे सर्व यशवंतराव व त्यांचे मावळे एकाच गोष्टीत कमी पडण्याची भिती वाटते आहे, तो म्हणजे पैसा!!* त्यामध्ये ते कमी पडणार नाही याची खबरदारी घेण्याची संपूर्ण जबाबदारी आपण सर्व धनगर बांधवांची आहे.
निवडणुकीसाठी पैसा उभारायचा कसा? हा मोठाच प्रश्न आहे. परंतु वास्तविकता ही आहे की, भारतीय निवडणूक *लढविण्यासाठी पैसा उभारणीचे काही प्रकार येथे प्रचलित आहे,*
१) प्रस्थापितांकडून घेणे
२) उद्योगपती कडून घेणे
३) निष्ठावंत कार्यकर्ता, हितचिंतक, नोकरदार व सामान्य मतदार यांचे कडून घेणे.
यामध्ये हे मात्र सत्य की, ज्याच्या कडून पैसे घ्याल, त्याच्यासाठी काम करावे लागणार. आजपर्यंत आपण प्रस्थापितांकडून पैसा घेतला म्हणून त्यांनी आपल्यातील कार्यकर्त्यांचा(त्यांच्या तितरांचा) वापर त्यांच्यासाठी करून घेतला. त्या बदल्यात धनगरांना काय मिळालं/ दिलं. किती प्रश्न सुटले की समस्या वाढल्या? याचा तुम्हीच सर्वांनी विचार करावा. या देशातील उद्योगपतींनी तर धनगरांना कधीच पैसा दिला नाही किंवा धनगरांनी घेतला नाही. *सामान्य धनगर बांधव, कार्यकर्ते, नेते, नोकरदार, मेंढपाळ यांनी मात्र सामाजिक आंदोलनासाठी नेहमीच सढळ हाताने मदत केलेली आहे. परंतु त्यांनी ज्यांना पैसा दिला, ते सत्तेच्या बाहेर असल्याने त्यांच्या कडून धनगरांना आरक्षणासह काहीच मिळू शकले नाही.*
आता मात्र आपली *लढाई राजकीय सत्तेसाठी* आहे. व ती लढाई लढण्याचा यापुर्वी आपण कधीच यशस्वी प्रयत्न केलेला नाही. जर आपण धनगर राजकीय अस्तित्व निर्माण करायला निघालो आहे. तर ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. आजपर्यंत च्या अन्यायाविरुद्ध *लढण्याची तळमळ असलेल्या धनगर उमेदवारांनी राजकीय सत्ता मिळवावी असं जर वाटत असेल तर त्या प्रत्येकांनी त्यांना जमेल तशी आर्थिक मदत करणे अत्यावश्यक आहे .* नाही तर ते (धनगर उमेदवार) येथील प्रस्थापित मस्तवाल राजकीय सांडाच्या विरोधात लढताना टिकू शकणार नाही.
आर्थिक समृध्दी असलेल्या धनगर उद्योगपतींनी तर सढळ हाताने मदत करावी. कारण सत्तेचे लाभ मिळण्यासाठी आपल्या(धनगर) माणसांच्या हातात सत्ता असणे आवश्यक असते. हे अंबानी सारख्या उद्योगपतींनी तत्त्व अंगीकारलं आहे. येथील सरकारवर नेहमीच त्यांचा प्रभावच नाही तर दबाव राहिलेला आहे.
धनगर जमातीमध्ये सुध्दा *आर्थिक समृद्धी असलेले अनेक उद्योगपती, कारखानदार, व्यावसायिक आहेत, सोबतच धनगर रक्ताच्या सर्वांनीच आपल्या धनगर उमेदवारांना सढळ हातानी आर्थिक मदत करावी, उमेदवारांनी सुध्दा आपली सामाजिक बांधिलकी जपावी. ही आग्रहाची नम्र विनंती. मात्र आपल्या मतदारसंघात एकच धनगर उमेदवार उभा राहिल. याची सर्वांनी खबरदारी घ्यावी.*
👬👬👬👬👬👬👬👭👭🇦🇹
जय मल्हार
*एकच ध्यास --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*