Tuesday, April 9, 2019

साहेब! माझा सुध्दा पाठिंबा कसा काय जाहीर केला?

साहेब! माझा सुध्दा पाठिंबा कसा काय जाहीर केला?

             एक सामान्य धनगराचा प्रश्र्न..

   भारतीय लोकशाहीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे.  हे मतदान कोणाला करायचे? निवडणूकीत कोणी कोणाला पाठिंबा द्यायचा?  हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु  "मानिकराव ठाकरे यांना धनगर समाजाचा संपूर्णता पाठिंबा!* या नावाखाली पत्रके पाहून खरंच आश्चर्य वाटले.
 तेव्हा सामान्य धनगर म्हणून काही प्रश्न पडले कि,

१) धनगर समाजाचा सरसकट पाठिंबा कसा काय मिळाला?

२) असं कोणतं काम केलं कि, त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला?

४) यवतमाळ जिल्ह्यातील एकाही धनगर नेत्याला मोठं होवू न देणाऱ्या व्यक्तित्वाला धनगर समाजानी कसा काय पाठींबा दिला?

५) विशिष्ट लोकांनी संपूर्ण समाजाचा निर्णय घेण्याचा अधिकार अजूनही कसा काय संपला नाही?

३) वैयक्तिक फायद्यासाठी समाजाला विकण्याची प्रवृत्ती धनगर जमातीत अजूनही कशी काय जिवंत आहे?

६) अशा प्रकारचा लाचारीचा निर्णय समाजात स्वाभिमान निर्माण करणार आहे काय?

७) अशा प्रकारचा स्वाभिमान गहाण ठेवण्याचा तुमचा निर्णय  सामान्य धनगर लोकांनी का स्विकारावा ?

८) तो उमेदवार ज्या पक्षाचा आहे, त्या पक्षानी धनगर जमाती संबंधीचे कोणते चांगले निर्णय घेतले आहे?

९) त्यांच्या पक्षाने किती धनगरांना उमेदवारी दिली आहे?

१०) त्या उमेदवाराचा धनगर आरक्षणाच्या बाबतीत काय अजेंडा आहे?

११) त्यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न सभागृहात किती वेळ मांडला आहे?

१२) त्यांच्या भोवताल फिरणारे कोण कोण मोठे धनगर नेते? कशासाठी जमा झाले आहेत?

                    आमचा पाठिंबा पाहिजे असेल तर या प्रश्र्नांची उत्तरे आम्हा सामान्य धनगरापर्यंत येवू द्यावे. ही विनंती..

                               आपणचारात घेत नसलेला
                                आपलाच सामान्य धनगर बांधव

Wednesday, April 3, 2019

जयसिंग तात्यांचा त्याग समाजासाठी प्रेरक*

💐💐💐💐💐💐💐💐
*जयसिंग तात्यांचा त्याग समाजासाठी प्रेरक*

            डॉ. प्रभाकर लोंढे
_______________
 समाजसेवेच्या नावावर भोग भोगणारे नेते धनगर समाजामध्ये मागील काळात आणि विशेषतः जागृतीच्या पाच वर्षांमध्ये अनेक पाहिले असतील. प्रस्थापितांच्या शब्दांवर त्यांच्यासाठी आपल्या समाजाची/जमातीची बाजी लावणारे प्रसंगी एकांतात लिलाव करणारे धनगर नेते सुद्धा आपल्या निदर्शनास आले असतील. ते माफ करण्या पलीडचे आहे. *नाव घ्यायचे समाजसेवेचे आणि वैयक्तिक स्वार्थाचे, राजसत्तेचे* असे छुपे अजेंडे बाळगायचे, असे नेते सुद्धा आपण पाहिले असतील. परंतु *सेवा भोगात नाही तर त्यागात आहे व हीच खरी समाजसेवा असते,* याचा आदर्श जमाती समोर घालून देण्याचे कार्य प्रथमता जयसिंग तात्या शेंडगे यांनी केलेले आहे. एक दुसऱ्या साठी त्याग करण्याची  भूमिका आजच्या घडीला भूमिका सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
 जयसिंग तात्यांनी सामाजिक भावना, एकोपा, समाजहित लक्षात घेऊन घेतलेली माघार धनगर नेते, सामाजिक कार्यकर्ते व समस्त धनगर बांधवांसाठी मार्गदर्शक, दिशादर्शक व समाज सेवेच्या दृष्टीने आदर्श नमुना आहे.
एकीकडे धनगर जमातीला कोणी उमेदवारी देत नसताना वंचित बहुजन आघाडीने सामाजिक वातावरण बघून जयसिंग तात्यांना सांगली मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. ही उपलब्धीच जयसिंग तात्यांसाठी खासदारकीचा मार्ग मोकळे करणारी होती.   
                  *एखाद्या वंचित उपेक्षित बहुजनांना उमेदवारी मिळणे हे भारतीय लोकशाहीमध्ये किती दिव्य आहे,* हे संपूर्ण धनगर व उपेक्षित समाजाला कळून चुकले आहे. अशा परिस्थितीत सुद्धा हातात आलेल्या उमेदवारीचा सामाजिक भावनेतून परस्परांशी समन्वय, संगणमत व यशस्वी चर्चा करून सामाजिक दृष्ट्या योग्य तो निर्णय घेवून समाज बांधवासाठी त्याग करणे, हा मनाचा फार मोठेपणा आहे. धनगर समाजासाठी ती एक नवीन अत्याविषयक स्तुत्य बाब आहे. याचा पायंडा जयसिंग तात्यांनी पाडला व तो धनगर जमातीच्या राजकीय अस्तित्व निर्मितीसाठी दिशा देणारा आहे. शेंडगे परिवारातील आतापर्यंत झालेली परवड सुध्दा सुधारणारा आहे.
          *"धनगरी जत्रा आणि कारभारी सतरा"* ही धनगरांच्या बाबतीत असलेली उपहासात्मक सत्य म्हण जयसिंग तात्या शेंडगेनी खोडून काढण्याचा प्रयत्न स्वतः केलेला आहे. यामुळे सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून आवश्यक निर्णय घेण्याची सामाजिक प्रवृत्तीच समोर आलेली आहे. हा प्रयत्न कदाचित धनगरांच्या राजकीय समृद्धीतील  महत्त्वाचे पाऊल ठरु शकते.  अशा सामाजिक सत्प्रवृत्तीचा खऱ्या अर्थाने अंगीकार व पुरस्कार सामाजिक लेवलवर व्हावा हाच या लेखना मागचा कळीचा मुद्दा आहे.
    यापुढे  धनगर जमात आपली राजकीय पावले सूत्रबद्ध टाकण्यासाठी सक्षम झाली आहे. परिस्थितीनुरूप आवश्यक ते निर्णय घेण्यासाठी योग्य आहे ही बाब तो समाज प्रगल्भ झाला आहे, अशा प्रकारचा सामाजिक संदेश प्रस्थापितांपर्यंत पोहोचण्यासाठी जयसिंग तात्यांचा हा निर्णय ही अतिशय वाखाणण्याजोगा आहे. जयसिंग तात्या आपण यापुढे धनगरांच्या राजकीय हृदयासाठी आवश्यक असलेल्या समन्वयाचे मार्गदर्शक व दिशादर्शक असाल हा आपणास विश्वास देऊ इच्छितो.
प्रस्थापितांच्या नादी लागून भाऊ भावाचा काटा काढणारे धनगर नेतृत्व आपण सर्वांनीच पाहिले आहेत. काहींनी तर ते जवळून अनुभवले आहेत. *एक दुसऱ्याची जिरवण यामध्ये धनगरांनी किती सत्यानाश केला आहे* याचे उदाहरणे आपणा प्रत्येकाजवळ आहेत. परंतु स्वतःच्या हातात आलेली उमेदवारी, स्वतःच्या तोंडात आलेला घास आपला बंधू म्हणून गोपीचंद पडळकर सारख्या नवख्या नेतृत्वाला देणे ही जयसिंग तात्यांची भूमिका समस्त धनगर नेतृत्वाला, प्रगल्भ नेतृत्वाची, जमातीच्या पालकत्वाची भूमिका शिकवणारी, निभावणारी व भावी काळातील पिढी साठी आदर्श घालून देणारी आहे.
काहींच्या मते हा त्याग नगण्य असेल, परंतु वर्षानुवर्षांपासून उमेदवारी मिळतच नव्हती त्या जमातीसाठी उमेदवारी मिळणे व स्वत:ला मिळालेली उमेदवारी सामाजिक समीकरणे पाहून आपल्या समाज बांधवाला देणे ही कधी नव्हे ती फार मोठी त्यागाची गोष्ट आहे. आता गोपीचंद पडळकर सांगली मतदार संघातून खासदारकी मिळवून धनगर समाज व जयसिंग तात्यांना किती न्याय देते याकडेच सर्वांचे लक्ष राहणार आहेत. त्यासाठी त्यांना जयसिंग तात्याकडून समस्त धनगर समाज व माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा!! व पुढील सर्व निर्णय सामाजिक हिताच्या दृष्टीने सामाजिक भावना लक्षात घेऊन घेतील ही अपेक्षा

जय मल्हार साहेब

 एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*