प्रा. राम शिंदे व शिलेदार खंडेराव होळकरांचा राजकीय पराभव
सेम ... सेम ... सेम....सेम
डॉ प्रभाकर लोंढे
(याला ऐतिहासिक संदर्भ
प्रथम हा लेख वाचा.
https://sanjaysonwani.blogspot.com/2020/04/blog-post.html )
महाराष्ट्राच्या विधानसभा २०२४ निवडणुकीच्या अनुषंगाने प्रा. राम शिंदे यांचा कर्जत जामखेड मधील पराभव कोणालाही पचनी न पडणारा व महाराष्ट्राच्या भूमीत राहणाऱ्यांना विचार करायला लावणारा आहे.. याशिवाय येथील विकृत प्रवृत्तींना उजाळा देणारा आहे.
महाराष्ट्र विधानसभा २०२४ ची निवडणूक महायुती व महाआघाडी या दोन प्रामुख्याने आघाड्यामध्ये लढली गेली हे सर्वांना माहीत आहे.
प्रा. राम शिंदे महायुतीचा उमेदवार म्हणून कर्जत जामखेड मधून रिंगणात होते. असे असताना त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांचा पक्ष (बीजेपी ) व घटक पक्षांच्या नेत्यांवर होती. याचा अर्थ त्यांच्यासाठी वेळ देणे, प्रचार सभा घेणे, प्रचारासाठी आवश्यक ती मदत करणे हे प्रथम देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांचे परम कर्तव्य होते. परंतु असं झालेलं दिसत नाही.. याची खंत खुद्द राम शिंदे सरांनी व्यक्त केलेली आहे.
त्यांना दिल्ली कार्यालयातून सुद्धा मदत मिळाली नाही. फडणवीस साहेबांनी सुध्दा कर्जत जामखेड मध्ये सभा घेतली नाही. अजित पवारांनी तर राम शिंदे सरांना प्रतिसादच दिला नाही. यविषयी राम शिंदे सरांनी खेदपुर्वक आपबिती सांगितली... त्यामुळे सभा घेण्याचा प्रश्नच नाही. उलट राम शिंदे सरांचे प्रतिस्पर्धी महाआघाडीचे उमेदवार रोहीत पवार यांच्या विजयासाठी अजित पवार प्रयत्नशील होते. हे सिद्ध झालेले आहे. व त्यांनी ते अप्रत्यक्ष कबुल सुद्धा केलेलं आहे.
ही सर्व परिस्थिती पहाता, राम शिंदे यांना स्वबळावरच आपला मतदारसंघ लढावा लागला. ( आधुनिक पेशवा देवेंद्र फडणवीस व मराठा सरदार अजित पवार यांच्या नाटकीय सहकार्याला सांभाळत मतदारांपर्यंत जाणे. आपलं अस्तित्व निर्माण करणे. ते टिकवून ठेवणे, त्याला मतदानात व मतदानानंतर आपल्याला अपेक्षित निकालात परावर्तित करून घेणे, केवळ पवार घराण्यालाच शक्य असलेलं काम राम शिदे साहेबांना शक्य झालं नाही.. आणि राम शिंदे सरांचा पराभव झाला हे त्यांना न पचणारं सत्य स्विकारावं लागलं.
साम-दाम-दंड- नीतीभेद याचा वापर करून राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झालेल्या मतदारसंघात आपला नातू रोहित पवार ला निवडून आणणे, यासाठी कोणत्याही खालच्या पातळीवर जायला तयार असलेल्या सन्माननीय शरद पवारांच्या सुपरीचित नीतीला भेदणे , अहील्याबाईंचा रक्त व तत्वशील वारसा जपणाऱ्या प्रा राम शिंदे यांना शक्य झालेलं दिसत नाही. यात राम शिंदे साहेब कमजोर होते असं कदापिही नाही..
परंतु वयस्कर शरद नितीचा शब्द मोडेल, एवढे राजकीय नैतिक सामर्थ्य आज तरी देवेंद्र फडणवीस कडे आहे, असं मला वाटत नाही.. (मागील लोकसभेत सुप्रियाताई सुळेंच्या विरोधात महादेव जानकर साहेब यांच्या साठी सुद्धा मा्. नरेंद्र मोदी साहेबांनी सुध्दा सभा घेतली नाही ) (यावेळी तर घरातच नाटकीय विरोध तयार करून-सुप्रिया×सुनेत्रा, अजित×युगांत अशी सत्ता घरातच ठेवण्याची नाटकीय कला जर कोणाला जमली असेल तर मा. शरद पवार साहेबांचं नाव प्रथम येतं)
राम शिंदे सर आपलं युद्ध हे कुंभेरीच्या युद्धासारखं होतं. ज्याप्रमाणे या युध्दात पेशवा रघुनाथराव व मराठा सरदार जयाजी शिंदे हे दोघेही सुभेदार मल्हारराव व शिलेदार खंडेराव होळकर यांच्या सोबत असले तरी प्रतिस्पर्धी शत्रू सुरजमल जाटाशी जवळीकता साधून होते, युध्दानंतर सुरजमल जाटाला संरक्षणाची हमी देणारे जयाजी शिंदेच होते. व त्या ठिकाणी बघ्याची भूमिका घेणारे पेशवा रघुनाथराव होते. परिणाम होळकरांना भोगावे लागले. सुभेदार मल्हाररावांचा कर्तबगार वारस गमवावा लागला... त्यांना पचनी न पडणारा दुःख पचवावं लागलं.
तुमच्या कर्जत जामखेडच्या 2024 च्या युद्धात अजित पवार तुमच्या सोबत असले तरी ते तुमचे कधीच नव्हते. देवेंद्र फडणवीस यांनी नक्कीच बघ्याची भूमिका घेतली कारण ते आतून शरद पवारांच्या आज्ञेचा सन्मान राखणार होते.
कुंभेरीच्या लढ्यात पराक्रमी खंडेरावांचा बळी गेला. सुदैव की तुम्ही जिवंत आहात. सत्तेसाठी आम्ही कोणत्याही स्तरावर जाणार .... हा येथील महाराष्ट्रीयन काही प्रवृत्तींचा गुणधर्म आहे.....
यापूर्वी आदरणीय महादेव जानकर साहेबांना सुद्धा अशाच प्रकारे बारामती मध्ये एकाकी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा वारसा तुम्हाला भोगावा लागला.. शिंदे साहेब वाईट वाटण्याची गरज नाही कारण तो तुमचा नाही तर आमच्या अस्तित्वाचा प्रश्न होता....
लोकशाहीमध्ये तुम्ही जिवंत आहात.. जिएंगे तो और भी लडेगे!!!!
आता प्रश्न आहे फक्त ...
भारतीय जनता पक्ष / मा. देवेंद्र फडणवीस साहेब आणि! आपलं राजकीय पुनर्वसन कशाप्रकारे करतय?
खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा
डॉ प्रभाकर लोंढे
(धनगर राजकीय जागृतीचा अभ्यासक)
9673386963