Monday, November 27, 2017

बाप!
"""""""

बाप! बाप!!
सगळ्यांनाच असतो बाप.
वाटतोय कधी जो भला ताप.
कठीण समय येता मात्र
आठवतो प्रत्येकालाच बाप.

माय लेकराच्या सुखासाठी
लागते जेव्हा कधी धाप.
या जगात धाव धावणारा.
कळते तेव्हा सर्वानाच बाप ...

बाप असतो उधानलेल्या
खळाळणाऱ्या नदीचा किनारा.
प्रवाहपतित राहून सदा
प्रवाहाला सांभाळणारा....

असतो तो मृगाच्या अखंड धारा,
धारांनी भिजवी संसार सारा.
तर कधी तो असतो
उधाणलेला बेभान वादळवारा,
रक्त नात्यांना जपत
उंच उंच शिखरावर आदळणारा.
तर कधी पायथ्याशीच राहून
उंच शिखरांनाही रडविणारा....

नसतो तो कधी अगतिक
वा परिस्थितीला हरणारा,
असतो तो प्रसंगावधी.
प्रसंगावधान राखून
प्रसंगांनाच जपणारा.....

खरंच  बाप नसतो,
नुसताच बाप!!
वा हाडामासाचा पसारा.
घरी असो वा नसो,
असतो त्याचाच दरारा.....

तो असतो धिरोदात्त,
अनं सर्वगुणसंपन्न सारा.
खरं-खोटं, बरं - वाईट
सारंच काही पचविणारा...

शेवटी एवढंच सांगतो,
बाप! असतो बाप!
खडकाळ माळरानावर
सदा खळाळणारा.
घामेजलेल्या लेकरांसाठी
असतो तो थंड थंड वारा..
असतो तो थंड थंड वारा.....

-------------------------------

कवी डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर
इंदोर मधील वैभवशाली लालबाग पँलेस.
,"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

 इंदोर, मध्यप्रदेशातील महत्त्वाचं शहर. या शहराचा इतिहास अभ्यासला असता होळकर साम्राज्याने या शहराच्या निर्मिती पासून तर शहराची किर्ती सातासमुद्रापार नेण्यात होळकरशाहीचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. मळवा प्रांताची राजधानी म्हणून होळकरांनी इंदोरचा विकास केला. इंदोरला आपल्या संस्थांनाची राजधानी बनविली. याचाच परिणाम  मराठेशाहीतील निर्णयात होळकरांच्या वर्चस्वामुळे या शहराला अतिशय महत्त्व होते. होळकरशाहीचे संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर नंतर  खंडेराव, मालेराव, अहिल्याबाई होळकर, तुकोजीराव प्रथम, यशवंतराव यांच्या नंतर अनेक वारस होळकरशाहीच्या राजगादीवर आले. प्रत्येकाने आपल्या कारकिर्दित महत्त्वाचे योगदान दिले.  होळकरांच्या कार्यकाळात या शहराचा उद्योग , व्यापार तसेच सर्वांगिण विकास झाला. त्या सर्व बाबींच्या खूणा आजही इंदोर शहरात पाहायला मिळतात.  त्यामुळे या शहरातील प्रत्येक ऐतिहासिक वास्तु पाहणे म्हणजे  इतिहासाची पाने वाचण्यासारखीच वाटतात.  
        यापैकीच एक वास्तू म्हणजे फ्रेंच शैलीने बांधलेला, भारताचे विशेषतः होळकरशाहीचे इतिहासातील परराष्ट्रीय संबध स्पष्ट करणारा, होळकरशाहीच्या वैभवाची साक्ष देणारा पँलेस म्हणजे "इंदोरचा लालबाग पँलेस" ! इंदोर शहराच्या नैऋत्य दिशेला असलेला हा पँलेस खान नदीच्या किनाऱ्यावर बांधलेला आहे. संपूर्ण  बागेचे क्षेत्रफळ  ७१ एकर असून या राजबागेत हा पँलेस कौशल्यपूर्ण बांधला गेलेला आहे. व  इंदोर शहरातील ही सर्वात आकर्षक इमारत आहे.  त्यामुळेच त्याकाळात या पँलेसची भारतातील एकमेव अप्रतिम निवासस्थान (most stylish palace) अशी ओळख होती .

        महाराजा तुकोजीराव होळकर द्वितीय(इ.स १८४४-१८८६)  यांनी या पँलेसचे बांधकाम इ.स.१८८४ मध्ये सुरू केले. व शिवाजीराव होळकर यांच्या (इ.स.१८८९-१९०२) काळात पँलेसचे काम पुर्णत्वास गेले. या अप्रतिम पँलेसची निर्मिती इंग्लंड च्या मार्टीन एण्ड कंपनी व बर्नांड ट्रीग्स या वास्तुकला विशारद (architect) यांनी पाश्चात्त्य कलाशैलीने केलेली आहे. एकूणच हा पँलेस आंतरराष्ट्रीय बांधकाम व कलाशैलीचा तत्कालीन उत्कृष्ट नमुना आहे.

               या पँलेसची प्रमुख विशेषतः म्हणजे त्याचे मुख्यव्दार(gate) आहे.  हे मुख्यद्वार इंग्लंड मधील बँकींगहम पँलेसच्या द्वाराची(gate) आशिया खंडातील एकमेव प्रतिकृती आहे.  तीन मजली असलेल्या या इमारतीत रचना व  प्रत्येक  वस्तू गुणात्मक दृष्ट्या वाखाणण्यासारखी आहे. पँलेसमधील खोल्यांच्या भिंतीवर तसेच छताला असलेले  नक्षीकाम (decoration) आणि रंगरंगोटी (colouring)   अप्रतिम असून इटालियन व भारतीय शैलीचे मिश्रण आहे,  इटालियन संगमवर,  इटालियन पध्दतीची वालपेंटींग, कलात्मक रचना,  दर्जेदार   कार्पेटस,  मजल्यांचा एकदुसऱ्याशी संबंध, चढण्यासाठीचा जिना(stairs)व त्यावर टाकलेले कार्पेटस, जिन्याला असलेले नक्षीदार लोखंडी रेलिंग्स,  संपूर्ण इमारतीच्या उच्च प्रतीच्या लोखंडी खिडक्या तसेच तुकोजीराव ने त्यावर लोखंडाने निर्माण केलेली स्वतःची ओळखचिन्ह (symbol).  या सर्व बाबी कलात्मक दृष्टीने तसेच आर्थिक बाबतीत श्रीमंती स्पष्ट करते.
      पँलेसच्या खिडक्यांवर (इंग्रजी टी.आर.एच) (TRH-TUKOJIRAO HOLKAR) असा अर्थ असलेले  प्रतिक (symbol ) तुकोजीराव होळकर यांच्या कर्तृत्वाची ओळख करून देते. याच प्रतिकाची पेंटींग काचावर सुद्धा केलेली आढळते.  खिडक्यांना असलेला  हा काच बेल्जियम मधून आयात केलेला आहे. यावरून होळकरशाहीच्या वैभवाची कल्पना येते.
        अप्रतिम अशा पाश्चात्त्य शैलीत नटलेल्या या भारतीय पँलेसचे व त्यातील होळकरशाहीच्या वैभवाचे जतन होतांना आज फारसे दिसत नाही. पण  पँलेसची प्रत्येक खोली होळकराच्या वैभवाची व समृद्धीची साक्ष देत अतांनाच संपूर्ण वास्तूच आज राष्ट्रीय संपत्ती घोषित करण्यात आली आहे.  असे असताना  एका खोलीतील राष्ट्रीय,  ऐतिहासिक/ होळकरांचे वैभव हटवून सुरू झालेल्या तारांगण, उपक्रमामुळे  येत्या दहा विस वर्षात होळकरांच्या वैभवाची ओळख नक्की पुसली जाईल अशी शंका पाहणाऱ्याला सहज येते.

     होळकर राजानी बांधलेल्या  या राजवाड्याला आज "नेहरू राजबाग पँलेस" असे नामकरण केले आहे ही बाब व प्रवेशद्वारातच पंडित नेहरूंचा पुतळा ठेवणे हा तेथील मोठा आश्चर्याचा विषय वाटते. नेहरू व लालबाग पँलेस हे समिकरण न पचणारे वाटते. आज या पँलेसचे "तुकोजीराव होळकर राजबाग पँलेस" असे नामकरण झाले असते व प्रवेशव्दारात तुकोजीराव चा पुतळा असता तर त्यातून इतिहास, होळकरशाही व तुकोजीराव यांना आज न्याय मिळाला असता हे सत्य आहे.
             तुकोजीराव होळकर  द्वितीय यांनी निर्माण केलेल्या या अप्रतिम वास्तू मधून होळकरशाहीच वैभव नष्ट करण्याची कोणाला कुबुद्धी  सुचली तरी तुकोजीराव व्दितीय यांच्या दूरदृष्टीतून जागोजागी निर्माण केलेल्या प्रतिकामुळे (TRH) लालबाग मधील होळकरांच्या स्मृती पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना प्रतिक(TRH) माञ नष्ट करणे सहज शक्य होणार नाही एवढे माञ निश्चित !!
             हा पँलेस भारतातील पाश्चात्त्य शैलीचा व आदर्श तसेच सुसज्ज वास्तुचा एक नमुना आहे. या पँलेसची रचना लक्षात घेता, पँलेसमध्ये राजदरबार, विशेष म्हणजे पाश्चात्त्य पध्दतीचे शुशोभित डायनिंग हाल, डायनिंग हालमधील अप्रतिम बैठक व्यवस्था व उच्च प्रतीचे राजेशाही थाटाचे साहित्य हे पाहणाऱ्या व्यक्तीला भूरळ पाडणारे आहे . लागूनच असलेला भारतीय पध्दतीने जेवण करण्याचा हाल भारतीय पध्दतीवरची होळकरांची निष्ठा स्पष्ट करते.  स्वयंपाकघर, स्वयंपाकघरातून  जेवणाचे हालमध्ये जेवण पोहचविण्याचा झुला(lift) कल्पनातित आहे,   ग्रंथालय, कार्यालय,  राजाची सल्लामसलतीसाठी बसावयाची खोली,  नर्तनगृह,  नर्तिकांसाठी सजण्याची ड्रेसींग रूम, खेळण्याची खोली,  महाराजाचे तसेच राणीसाहेबांचे स्वतंत्र शयनगृह, दोन्हीही शयनगृहांना जोडणारा मार्ग , अद्ययावत व  सर्व सोईनी परिपूर्ण अप्रतिम नहाणीगृह (bathroom) हे होळकरशाहीचा पाश्चात्त्य   दृष्टिकोन स्पष्ट करते.
       राजवाड्यात  विशेष आकर्षण पहायला मिळते.  एकूण आठ मोठे वाघ व एक चित्ता यांच्या शिकारीनंतर त्यांच्यामध्ये भुसा भरून त्यांना प्रदर्शनात ठेवलेले आहे. ह्या शिकार केलेल्या वाघांच्या भक्कम शरिरावरून होळकर राजांचे शौर्य  व हिम्मतीची कल्पना येते.  ते संपूर्ण वाघ आजही पँलेसमध्ये पहायला मिळते.

  अशा या वैभवशाली पँलेसमध्ये होळकर वंशज इ.स१९७८ पर्यत राहत होते .  तुकोजीराव तृतीय हे  इ.स १९२६ मध्ये होळकर राजगादी त्यागणारे व मरेपर्यंत या पँलेसमध्ये राहणारे होळकरशाहीचे शेवटचे वंशज ठरले. आज हा पँलेस मध्य प्रदेश सरकारच्या आधिपत्याखाली असल्याचे लक्षात येते .

        या वैभवशाली पँलेसचे तेथील रचनेसह सर्व वैभवाचे रक्षण करणे राष्ट्रीय कर्तव्य आहे. ती वास्तु आज इतर कामासाठी वापरण्यापेक्षा ऐतिहासिक वास्तू व ठेवा म्हणून जतन करणे केंद्र सरकार सह मध्यप्रदेश सरकार, प्रत्येक नागरिक व प्रशासन यांचे प्रथम कर्तव्य ठरते... आमची सर्व वाचकांची कर्तव्यनिष्ठाच आज राजबाग पँलेस व वैभव वाचवू शकते ...हे मात्र निश्चित !!!
-------------------------------------------------

    डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर
9673386963

Wednesday, November 15, 2017

मायेची माया

राञंदिन करीत कष्ट
म्हणे लेकराले, भलं मोठं शिक.
शिकुन सन्या जगामंदी
बन एक्का इसपिक.

शिकत होतं मायपाशी
तवा होतं ठाकठिक..
कळलं नाही कधी गेलं
करपुन सारं पिक..

माय राहिली कष्ट करत
पोट्ट जावू लागलं पिकनिक.
अर्थपोटी कष्ट करून
माय भलतीस झाली विक.

दिवसा मागून दिवस गेले
पोट्ट्याचे शौक नाही ठराविक.
लाजही नाही राहीली त्याले
त्याची माय मागते भिक.

एकेक रुपयासाठी स्टेशनवर
रोज माय मागे भिक.
बिघडलेल्या लेकराले पाहून
म्हणे बापू! आता तरी काही शिक.



डॉ . प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर 

Monday, October 30, 2017

इंदोर संस्थानाच्या संस्थापकाची इंदोरातच उपेक्षा!

*इंदोर संस्थानाच्या संस्थापकाची इंदोरातच उपेक्षा!*
        डॉ . प्रभाकर लोंढे, गोंदिया-चंद्रपूर

               सर्वानाच माहित आहे की, इतिहास प्रेरणा देतो,  एखाद्या कर्तबगार व्यक्तीत्वाचा पुतळा त्याच्या कर्तुत्वाच्या स्मृती जागृत करतो. त्यामुळेच पुतळे उभारण्याची प्रथा पडली.  परंतु कोणाचे, कुठे व का पुतळे उभारायचे? हा भारतात खुपच मोठा गहण प्रश्न बनलेला आहे.
एखाद्याच श्रेष्ठत्व नष्ट करण्यासाठी भलत्याचेच पुतळे बसविण्याचा भलताच प्रकार भारतातील रित बनलेली आहे     ( उदा. तुकोजीराव होळकर यांनी इंदोरात बांधलेल्या सुंदर अशा लालबाग पँलेसच्या प्रवेशदारात तुकोजीराव ऐवजी पंडित नेहरुंचा पुतळा!!,  पुण्यातील संभाजी गार्डन मधील हटविलेले पुतळा प्रकरण ) असो! पण मी म्हणतो,
          आपल्या कर्तृत्वाने सर्वत्र प्रभाव व दरारा निर्माण करणाऱ्या थोर सुभेदार मल्हारराव होळकर यांनी आपला कार्यकाल गाजविला. अटक ते कटक पर्यत मराठेशाहीचे झेंडे फडकविले. आपलं इंदोर संस्थान स्थापन केलं, वाढविलं.संस्थानाचा सर्वत्र दरारा निर्माण केला. "इंदोर संस्थान व होळकरशाही" या समिकरणाची सर्वदूर  किर्ती पसरली. मराठेशाही वाढविणे, टिकवून ठेवण्यासाठी जिवाच रान केलं. हे सर्व वारसा हक्काने नाही तर कर्तृवाने निर्माण केलं. त्यामुळे त्यांना सर्वत्र सन्मान मिळाला. हे सर्व करीत असतांना आपली राजाधानी इंदोर बनविली. त्यांच्या कर्तुत्वाने इंदोरची ओळख सर्वञ निर्माण  झाली.  त्यांचा प्रभाव एवढा होता की, प्रत्यक्ष पेशवा त्यांच्याशी अदबीने वागत होता.
          राष्ट्रीय पातळीवर सर्वत्र सन्मान व निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान असणाऱ्या व त्यांच्या कार्यामुळेच इंदोर संस्थानाची ओळख सर्वत्र निर्माण करणाऱ्या सुभेदार मल्हाररावांची आज इंदोरातच एवढी उपेक्षा, दयनिय अवस्था  प्रत्यक्ष पहायला मिळाली. हा विचित्र पणा इंदोर वाशीयांनीच करणे हे केवढे लाजिरवाणे!!!
           इंदोरच्या प्रत्यक्ष भेटीत मिळालेल्या माहीतीनुसार, ज्यांच्या संस्थानाच्या गादीचा वारस  मल्हाररावांच्या सल्ल्याने ठरायचा, त्या ग्वाल्हेरच्या माधवराव सिंधीयाचा पुतळा इंदोरात महत्त्वाच्या चौकात स्थापित झाला. परंतु  सुभेदार मल्हाररावांचा पुतळा स्थापन करण्यासाठी इंदोरातील एकही महत्त्वाचा चौक सापडला नाही,?.....  राजवाड्यात सुद्धा पुतळा अथवा प्रथम दर्शनी मोठा फोटो सुद्धा दिसला नाही.
          इंदोरात होळकरांची राजधानी राहिलेल्या  राजवाड्यातील संग्रहालयात होळकर साम्राज्याच्या थोड्याफार वस्तुशिवाय काही अनावश्यक इतर वस्तुचा संग्रह हा अनाकलनिय वाटला. म्हणजे इंदोरात होळकरांची ओळख जपण्यासाठी राजवाड्यात वा इतरञ फार मोठे उपक्रम राबविले जात आहे असं कुठेही आढळून आलेले नाही.
    काही महत्तविचारी विचारवंत म्हणतील, पुर्ण इंदोरच त्यांच्या स्मृती जागृत करतंय. पुतळ्याची गरजच काय??  होय. ठिक आहे, पण मी म्हणतो ज्यांचा संबंधच नाही अशांचे पुतळे कशासाठी ?? तेही महत्त्वाचे चौक, स्थळे या ठिकाणी ???  खरा इतिहास भ्रष्ट करण्याचा प्रयत्न आहे! असे जर कोणी म्हटले तर चुकीचे म्हणता येणार काय?....
काहींना प्रश्न पडेल, सुभेदाराचा पुतळा इंदोरात नाही काय?----  आहे.. पण कुठे ? त्याची अवस्था काय?
सुभेदारांचा पुतळा आहे इंदोरात !! लालबाग पँलेस ग्राउंडच्या एका कोपऱ्यात....  तोही अशा सोबतच्या चिञातील (बंद कटघर्यामध्ये भोवताली उकीरडँ.व गवत वाढलेलं. दुर्लक्षित असल्याचे कोणी सांगण्याची गरजच नाही)  अवस्थेत ..... बघा सहन होते काय तर...???
(गुगल मँपवर सुद्धा इंदोरमध्ये मल्हाररावचा पुतळा दिसत नाही... माधवराव सिधीयाचा माञ पुतळा  दिसतो)

इंदोरच्या प्रत्यक्ष दुसऱ्या भेटी नंतर मला खुप मोठे प्रश्न पडलेले आहे.  त्यापैकी एक?? अस हे हेतुपुरस्सर तर केलं जात नाही ना???? असं करणारी एखादी छुपी यंञणा तर कार्यरत नाही ना?????

बघा निट!! विचार करा! सटिक....

स्वाभिमानी असाल तर.....बघा!  काय वाटते? तर....  

माझे विचार चुकीचे वाटल्यास माफी असावी... ही विनंती ...

Tuesday, September 26, 2017

*कचरावाट*

जा गं पोरी शाळेत तू
तू शोध मार्ग दुसरा.
जीवन गेल माझं सारं
उचलता उचलता कचरा..

नको येवु माझ्या माघारी
तुला मिळणार नाही आसरा.
पोट कधी भरत नाही
इथे दिवाळी असो वा दसरा...

या निष्ठूर व्यवस्थेच्या उंबरठ्याशी
मी मारतो आहे चकरा.
जीवन संपलय माझ सारं
आता दिवस उरलेय अकरा..

घे उंच भरारी तू
जसा उडे आकाशी शिकरा.
दाखवून दे एकदा तू
स्त्री जातीचा नखरा..

संपवून टाक कचरा सारा
वाहू दे समृद्धीचा वारा.
कचरा वाटेवरुन चालताना
दिसू दे तुझा दरारा.

जा गं पोरी शाळेत तू
तू शोध मार्ग दुसरा.

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
  *डॉ . प्रभाकर  लोंढे .*
           *गोंदिया* ९६७३३८६९६३

Sunday, July 23, 2017

*जातीविद्वेश*
-------------------


कोण म्हणतयं?
 तुमची जात आता संपवा.
संपविणारेच दिसताय आज
पेटवितांना जातीचा वनवा.

जाती धर्माच्या ठेकेदारानो!!
प्रथम तुमची ठेकेदारी थांबवा..
सर्व काही सोडून तुम्ही
माणूस स्वतःला बनवा.

जातीभेद मिटवायचा तर
खरच समतेनेच सर्वांना नांदवा.
जाती-धर्माच्या अहंकारावर
नको कधी कोणाला भांडवा.

थांबवा सर्वत्र उन्माद जातीचा,
मनुष्य जात सर्वांची नोंदवा.
मनुष्याच्या प्रत्येक पिल्यावर
फक्त मनुष्य प्रेम गोंदवा.

उधळून अथवा विझवुन टाका
येथील जातीभेदाचा वनवा.
मनुष्य वंशाचा अंश आपण
प्रथम मनुष्य स्वतःला बनवा.

शाळा, कॉलेज, विद्यापीठाच्या
दप्तरातील जात प्रकर्षाने हटवा.
कलूषित मनामध्ये दाटलेला
जातीद्वेश प्रथमतः घटवा.

समतेच राज्य हे
त्याला समताधिष्टित घडवा.
या व्यवस्थेतील उपेक्षित जे,
प्रथमतः मनुष्य त्यांना बनवा....

  *डॉ  प्रभाकर लोंढे*
गोंदिया-चंद्रपूर  9673386963

Tuesday, May 30, 2017

राजमाता अहिल्या


अहिल्या नाम की नारी थी,
दुश्मनोको भारी थी.
दुर्जनो का संहार करके
सज्जनोका सम्मान बढाते,
खूब लडी मर्दानी
वो तो इंदोरवाली महाराणी थी !!!

दीन दुःखीतो का दुःख हराती
जन जन का पालन करती
वो तो समग्र क्रांतिकारी थी.
दीन दुःखीयो का मनोबल बढाते
खूब लडी मर्दानी
 वो तो इंदोरवाली महाराणी थी !!!

स्वजन मृत्यू का दुःख सहती.
निराधार और निराश्रीत जीती,
विजयी पताका हात लेकर
होळकर राजवंश चलाते, 
खूब लडी मर्दानी
वो तो इंदोरवाली महाराणी थी !!!

अठ्ठाईस साल राज करती,
पराक्रमो से हिलती थी धरती.
वो तो महेश्वर की महाश्वेता थी,
नारी जाती का सम्मान बढाते 
खूब लडी मर्दानी
वो तो इंदोरवाली महाराणी थी !!!

   डॉ . प्रभाकर लोंढे
         गोंदिया-चंद्रपूर