Wednesday, April 3, 2019

जयसिंग तात्यांचा त्याग समाजासाठी प्रेरक*

💐💐💐💐💐💐💐💐
*जयसिंग तात्यांचा त्याग समाजासाठी प्रेरक*

            डॉ. प्रभाकर लोंढे
_______________
 समाजसेवेच्या नावावर भोग भोगणारे नेते धनगर समाजामध्ये मागील काळात आणि विशेषतः जागृतीच्या पाच वर्षांमध्ये अनेक पाहिले असतील. प्रस्थापितांच्या शब्दांवर त्यांच्यासाठी आपल्या समाजाची/जमातीची बाजी लावणारे प्रसंगी एकांतात लिलाव करणारे धनगर नेते सुद्धा आपल्या निदर्शनास आले असतील. ते माफ करण्या पलीडचे आहे. *नाव घ्यायचे समाजसेवेचे आणि वैयक्तिक स्वार्थाचे, राजसत्तेचे* असे छुपे अजेंडे बाळगायचे, असे नेते सुद्धा आपण पाहिले असतील. परंतु *सेवा भोगात नाही तर त्यागात आहे व हीच खरी समाजसेवा असते,* याचा आदर्श जमाती समोर घालून देण्याचे कार्य प्रथमता जयसिंग तात्या शेंडगे यांनी केलेले आहे. एक दुसऱ्या साठी त्याग करण्याची  भूमिका आजच्या घडीला भूमिका सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
 जयसिंग तात्यांनी सामाजिक भावना, एकोपा, समाजहित लक्षात घेऊन घेतलेली माघार धनगर नेते, सामाजिक कार्यकर्ते व समस्त धनगर बांधवांसाठी मार्गदर्शक, दिशादर्शक व समाज सेवेच्या दृष्टीने आदर्श नमुना आहे.
एकीकडे धनगर जमातीला कोणी उमेदवारी देत नसताना वंचित बहुजन आघाडीने सामाजिक वातावरण बघून जयसिंग तात्यांना सांगली मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. ही उपलब्धीच जयसिंग तात्यांसाठी खासदारकीचा मार्ग मोकळे करणारी होती.   
                  *एखाद्या वंचित उपेक्षित बहुजनांना उमेदवारी मिळणे हे भारतीय लोकशाहीमध्ये किती दिव्य आहे,* हे संपूर्ण धनगर व उपेक्षित समाजाला कळून चुकले आहे. अशा परिस्थितीत सुद्धा हातात आलेल्या उमेदवारीचा सामाजिक भावनेतून परस्परांशी समन्वय, संगणमत व यशस्वी चर्चा करून सामाजिक दृष्ट्या योग्य तो निर्णय घेवून समाज बांधवासाठी त्याग करणे, हा मनाचा फार मोठेपणा आहे. धनगर समाजासाठी ती एक नवीन अत्याविषयक स्तुत्य बाब आहे. याचा पायंडा जयसिंग तात्यांनी पाडला व तो धनगर जमातीच्या राजकीय अस्तित्व निर्मितीसाठी दिशा देणारा आहे. शेंडगे परिवारातील आतापर्यंत झालेली परवड सुध्दा सुधारणारा आहे.
          *"धनगरी जत्रा आणि कारभारी सतरा"* ही धनगरांच्या बाबतीत असलेली उपहासात्मक सत्य म्हण जयसिंग तात्या शेंडगेनी खोडून काढण्याचा प्रयत्न स्वतः केलेला आहे. यामुळे सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून आवश्यक निर्णय घेण्याची सामाजिक प्रवृत्तीच समोर आलेली आहे. हा प्रयत्न कदाचित धनगरांच्या राजकीय समृद्धीतील  महत्त्वाचे पाऊल ठरु शकते.  अशा सामाजिक सत्प्रवृत्तीचा खऱ्या अर्थाने अंगीकार व पुरस्कार सामाजिक लेवलवर व्हावा हाच या लेखना मागचा कळीचा मुद्दा आहे.
    यापुढे  धनगर जमात आपली राजकीय पावले सूत्रबद्ध टाकण्यासाठी सक्षम झाली आहे. परिस्थितीनुरूप आवश्यक ते निर्णय घेण्यासाठी योग्य आहे ही बाब तो समाज प्रगल्भ झाला आहे, अशा प्रकारचा सामाजिक संदेश प्रस्थापितांपर्यंत पोहोचण्यासाठी जयसिंग तात्यांचा हा निर्णय ही अतिशय वाखाणण्याजोगा आहे. जयसिंग तात्या आपण यापुढे धनगरांच्या राजकीय हृदयासाठी आवश्यक असलेल्या समन्वयाचे मार्गदर्शक व दिशादर्शक असाल हा आपणास विश्वास देऊ इच्छितो.
प्रस्थापितांच्या नादी लागून भाऊ भावाचा काटा काढणारे धनगर नेतृत्व आपण सर्वांनीच पाहिले आहेत. काहींनी तर ते जवळून अनुभवले आहेत. *एक दुसऱ्याची जिरवण यामध्ये धनगरांनी किती सत्यानाश केला आहे* याचे उदाहरणे आपणा प्रत्येकाजवळ आहेत. परंतु स्वतःच्या हातात आलेली उमेदवारी, स्वतःच्या तोंडात आलेला घास आपला बंधू म्हणून गोपीचंद पडळकर सारख्या नवख्या नेतृत्वाला देणे ही जयसिंग तात्यांची भूमिका समस्त धनगर नेतृत्वाला, प्रगल्भ नेतृत्वाची, जमातीच्या पालकत्वाची भूमिका शिकवणारी, निभावणारी व भावी काळातील पिढी साठी आदर्श घालून देणारी आहे.
काहींच्या मते हा त्याग नगण्य असेल, परंतु वर्षानुवर्षांपासून उमेदवारी मिळतच नव्हती त्या जमातीसाठी उमेदवारी मिळणे व स्वत:ला मिळालेली उमेदवारी सामाजिक समीकरणे पाहून आपल्या समाज बांधवाला देणे ही कधी नव्हे ती फार मोठी त्यागाची गोष्ट आहे. आता गोपीचंद पडळकर सांगली मतदार संघातून खासदारकी मिळवून धनगर समाज व जयसिंग तात्यांना किती न्याय देते याकडेच सर्वांचे लक्ष राहणार आहेत. त्यासाठी त्यांना जयसिंग तात्याकडून समस्त धनगर समाज व माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा!! व पुढील सर्व निर्णय सामाजिक हिताच्या दृष्टीने सामाजिक भावना लक्षात घेऊन घेतील ही अपेक्षा

जय मल्हार साहेब

 एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

Saturday, March 23, 2019

सु. मल्हाररावांच्या जीवनातील प्रसंग नेत्यांना मार्गदर्शक!!!!*

🇮🇳🇧🇦🇧🇦🇧🇦🇧🇦🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇮🇳
*सु. मल्हाररावांच्या जीवनातील प्रसंग नेत्यांना मार्गदर्शक!!!!*
                 
           *डॉ. प्रभाकर लोंढे*

 भारतातील सर्वांत समृद्ध संस्थान चे संस्थापक व मराठाशाहीचे आधारस्तंभ थोर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जीवनातील प्रसंग आजच्या काळातील धनगर नेत्यांना मार्गदर्शक असून निवडणूक काळात यशस्वी निर्णय घेण्यासाठी अतिशय प्रेरणादायी आहे. असा तो प्रसंग पुढीलप्रमाणे आहे.
            छत्रपतीच्या आज्ञेनुसार बाळाजी विश्वनाथाने १९ जून १७१८ ला दिल्ली मोहीम सुरू केली होती. त्या मोहिम मध्ये मल्हारराव प्रथमच सामिल झाले होते. त्यांना पेंढारी च्या पथकासोबत कोणतीही रसद न देता सामिल करून घेण्यात आले होते. *(धनगरांची सामाजिक दुरावस्था)* त्यामुळे त्यांना स्वत:च्या वाटखर्चासाठी स्वत:च व्यवस्था करावी लागत होती.
      अशा परिस्थितीत फौजा दिल्लीत पोहोचल्या.  एका महालाच्या खंडणीचा ऐवज ठरविला गेला. पण अट फक्त एकच, महालाच्या परिसरातील गवत काडी, किंवा शेते यांची नासधूस करु नये. ही अट तशी मल्हारराव होळकरांकडून पालन होणे कठीण होते. शेवटी मल्हाररावांच्या स्वारांनी शेतातील पिके कापून आणून घोड्यांना खायला दिले. ही बातमी बाळाजी विश्वनाथ पेशवे कडे गेली. तोच त्यांचा सतरा वर्षं वयाचा मुलगा बाजीरावने रागात येवून मल्हाररावांच्या बारगीरास काठी मारली. हा प्रसंग पाहून मल्हाररावांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यावेळी संतापलेल्या मल्हाररावांनी हातात येईल ते *मातीचे ढेकूळ बाजीरावाच्या छाताडात हाणले.*
       याचा परिणाम बाळाजी विश्वनाथाने मल्हाररावांचा गोट दुसरे दिवशी लुटून घेण्याचा विचार केला. ही बातमी मल्हाररावांना कळताच त्यांनी धाडसाने आपले बारगीरांना सांगितले *, जे माझ्या मरणाच्या सोबत असेल त्यांनी राहावे आणि नसेल त्यांनी निघून जावे.* शेवटी फक्त बाविस सहकारी जवळ शिल्लक राहिले. त्या सर्वांना सोबत घेऊन *मल्हारराव सर्व तयारीनिशी टेकडीवर ढाल तलवार घेऊन जावून बसले.*
    या विषयीची माहिती मराठ्यांच्या सैन्यामध्ये असलेल्या  *पांढरे नावाच्या धनगर सरदारास मिळताच तो मल्हाररावांना येऊन भेटला आणि मल्हाररावांना त्यांनी धीर दिला. हिम्मत सोडू नको. हाटकर- खुटेकर धनगराचे बीज ज्याचे असेल तो तुजला सामील आहे, तुझी वाट ती आमची वाट आहे.(पोटजाती विसरा)*
        त्याच वेळी त्यांनी पेशव्याकडे जाऊन झाल्या प्रकाराचा निषेध केला व सांगितले, ठणकावले. सरदारी करू म्हणता आणि शिपायांची बरदास या प्रकारची!
 *तुम्हास ढेकूळ मारले तो तुमचे हरिपाचा(शत्रुचा) प्राण घ्यावयास कसा चुकेल, कदाचित धनगर मात्र त्यास सामील झाल्यास कसे पडेल?*
ही बाब पांढरे सरदाराने पेशव्याच्या निदर्शनास आणून देताच पेशव्यानी मल्हाररावांना लुटण्याचा विचार सोडून दिला. व त्याच्याशी दिलजमाई करण्यासाठी बाजीरावला सोबत घेऊन बाळाजी विश्वनाथ मल्हाररावांकडे पहाडीवर गेले. *तेथे मल्हाररावांना वस्त्रे देऊन 20000 रुपये नगदी पदरी घालून त्यांची घोडे ज्या गोटात गेली होती ती परत स्वाधीन केली. पुढे मल्हाररावानी पंचवीस घोड्यांची सव्वाशे घोडी केली.( स्वकर्तृत्वावर विश्वास)*
     काही दिवसांनी माघारी फिरताना *सिपरी कोल्हारस या ठिकाणी बाजीराव नाल्याच्या पाण्यात स्नान करीत असताना मल्हाररावानी बाजीरावास धडा शिकवण्याच्या दृष्टीने गराडा घातला आणि सरळ छातीला बाण लावला. तुझा वाली कोण? अशा शब्दांमध्ये त्याचा समाचार घेतला. त्यावर बाजीरावाने मल्हाररावांना भोजन करण्याचा आग्रह केला.( अपमानाचा बदला)*
परंतु मल्हाररावांनी नकार दिला. त्यावेळी बाजीराव बोलले. तुमची *आमची या अन्नाची क्रिया तूम्हाकडे स्वारी करणे समयी 5000 फौजेची सरदारी सांगू. (यशस्वी तडजोड)*
   अशाप्रकारे मल्हाररावांच्या *सरदारकी संबंधाने बोलण्याचे वचन बाजीरावाने मल्हाररावांना दिले.*
       हा प्रसंग मल्हाररावांना आदर्श मानणार्‍या प्रत्येक धनगर नेतृत्वाच्या स्वाभिमानी रक्ताला दिशा देणारा आहे. संपूर्ण प्रस्थापित व्यवस्था धनगर विरोधात असताना  धनगर नेत्यांना  राजकीय व्यवस्थेत आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यामधून खरंच खूप काही शिकण्यासारखे आहे. मात्र आम्ही आमच्या इतिहासापासून किती प्रेरणा घेतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
           यापुढे आम्ही इतिहासापासून प्रेरणा घेतली तरच आमचा राजकीय उदय होणार आहे. *युद्ध तलवारीचे असो की मतपेटीचे असो. नीती कौशल्य, विजूगिशी वृत्ती, स्वाभिमानी बाणा, संकट समय एक दुसऱ्याला साथ देण्याची वृत्ती.  एकात्मतेची भावना (पोटजातींचा विसर), शत्रूची अचूक ओळख, प्रसंगावधान, अचूक वेळ लक्षात घेऊन हीत साध्य करण्याची कला यासाठी मल्हाररावांच्या जीवनातील हा प्रसंग अतिशय मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे.*
       धनगर नेत्यांनी या प्रसंगाचा सहसंबंध आजच्या काळातील *लोकशाही व्यवस्थेच्या संदर्भात समजून घेवून पोटजाती विसरून शत्रूच्या विरोधात संघटित होऊन लढण्यासाठी हा प्रसंग सर्वांसमक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला आहे* ...


जय मल्हार साहेब

 एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

Friday, March 8, 2019

धनगरांनो! तुमची कितवी पिढी राजकारणात आहे??*

👨‍👦‍👦👩‍👦‍👦💥👩‍👧‍👧👨‍👦‍👦💥👨‍👧‍👧👩‍👦‍👦💥👩‍👦‍👦👨‍👧‍👦
*धनगरांनो! तुमची कितवी पिढी राजकारणात आहे??*

              *डॉ.प्रभाकर लोंढे*

भारतीय लोकशाहीच्या सत्तर वर्ष यशस्वी कालावधीत सत्तेच्या विकेंद्रीकरणा सोबतच अप्रत्यक्षपणे सत्तेचे केंद्रीकरण झाल्याचे निदर्शनास येते.  जातीय वर्चस्ववाद आणि त्यातून निर्माण झालेली घराणेशाही यामुळे अहंकाराधिष्ठित राजकारण व द्वेशाधिष्ठित प्रवृत्तीमुळे भारतीय लोकशाहीला भयंकर किड लागली आहे.
          ही किड इतकी भयंकर आहे की, त्यामुळे धनगर जमाती सारख्या अनेक जाती जमाती समुह सत्तेपासून कोसो दूर फेकले गेले आहे. तर दुसरीकडे विशिष्ट घराण्यांकडे सत्तेचे केंद्रीकरण  पिढ्यान् पिढ्या चालू आहे. या घराण्यांची दुसरी तिसरी, चवथी पिढी राजकारणात प्रवेश केलेली आहे. त्यांच्याकडे आर्थिक सत्तेचे सुध्दा केंद्रिकरण झालेले आहे. त्यावेळी येथील लोकशाही वर महाभयंकर प्रश्न निर्माण होतो.  येथे समताधिष्ठित लोकशाही, न्यायाधारित समाज केव्हा निर्माण होईल व कायदे सर्वांसाठी समान या मानसिकतेतून राज्यघटनेची संपूर्ण अंमलबजावणी होईल, अशी लोकशाही कधी प्रस्थापित होईल,? हा प्रश्र्न असतांनाच लोकशाही अंतर्गत  पोसली गेलेली घराणेशाही ही सुद्धा मोठी समस्या आहे. त्यापैकी उदाहरणार्थ
१) *नेहरू/गांधी- पंडित- इंदिरा- राजिव/सोनिया- राहूल/प्रियंका)*
२) *पवार - शरद- सुप्रिया/अजित- पार्थ,)*
३) *ठाकरे - बाबासाहेब- उध्दव/ राज- अमित)*
४) *महाजन - प्रमोद - पुनम*
५) *राणे -नारायण- नितेश/निलेश)*
 *६) मुंडे गोपीनाथ-पंकजा/प्रितम/धनंजय)*
७) *तटकरे - सुनील- मुलगा तटकरे)*
ही सर्वपरिचित उदाहरणे मी माहिती साठी घेतली आहे. आपणास माहीत असलेली अशी अनेक उदाहरणे लिहू शकता.
त्याचवेळी धनगर जमात बहुसंख्येने असतांना आपण या धनगर जमातीच्या किती घराण्यांची कोणती पिढी राजकारणात आहे, किती कायम टिकून आहे याचा आपण विचार करू...
१)शेंडगे- शिवाजीराव-प्रकाश/रमेश-????
२) डांगे- अण्णासाहेब- ?????????
३). देवकाते- आनंदराव----?????
४). जानकर- महादेव...??????
५) वडकुते - रामराव---??????
६) रूपनवर- रामहरी...????
७) भदे.- हरीदास----????
८)
९)
१०)
असे आपण आपल्या माहिती प्रमाणे नावे लिहू शकता. या सर्व नावांचा विचार केला तर त्यांची सर्वांची पहीलीच पिढी राजकारणात दिसते. किंवा काही राजकारणाच्या/सत्तेच्या बाहेर फेकल्या गेल्याचेही लक्षात येते. यांच्या पैकी बहूतांश लोकमताच्या आधारे निवडून आलेले नाही तर बहुतेक नेत्यांनी प्रस्थापितांच्या दयेवर म्हणजेच विधानपरिषदेत प्रतिनिधित्व मिळविलेले आहे/ नेतृत्व केलेले आहे. महाराष्ट्रातील घराणेशाही प्रमाणे त्यांची दुसरी पिढी प्रभावीपणे तर सोडा राजकारणात सक्रिय असायला हवी होती. परंतु तसे दिसत नाही. याचा अर्थ सर्व धनगर नेते कार्यकर्ता व सामान्य धनगर लोकांनी ही बाब समजून घेण्यासारखी आहे. मनाला लागण्यासारखी आहे.
परंतु कोण किती मनावर घेणार ही बाब धनगर तरूणांच्या संवेदनशीलतेवर अवलंबून आहे. त्यावरुनच पुढचे भवितव्य निश्चित होणार आहे.
       धनगर तरुणांनो! तुमचे भवितव्य, राजकीय अस्तित्व तुमच्या हातात आहे. तुमचा उज्वल राजकीय, सामाजिक भवितव्यासाठी आपली प्रथम पिढी राजकारणात उतरवा.  तुमच्या दहा पिढ्या सत्ता गाजवतील. ही बाब आपल्या ऐतिहासिक राजकीय वारसा वरून लक्षात येईल. आतापर्यंत आपल्या समस्या सोडविण्यासाठी दुसऱ्यांना विनंती केली. आंदोलने केली, प्रस्थापितांचे झेंडे, खुर्च्या उचलल्या.. परंतु आम्ही खुर्च्या मध्ये बसण्याचा विचारच केला नाही. आता आपण आपली पहिली पिढी सत्तेत बसवून *भारतीय लोकशाहीला धनगर रक्ताच्या राष्ट्रप्रेमाचा, सत्याधारित राजपटाचा वारसा देवू* ....  वारसा घडवू....
 *प्रस्थापितांवर टिका करत बसण्यापेक्षा आपणच प्रस्थापित होऊ....*

जय मल्हार!!!!!

 *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

Saturday, March 2, 2019

होय पवार साहेब!! धनगरांनी मत इतरांनाच दिली....*

⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
*होय पवार साहेब!! धनगरांनी मत इतरांनाच दिली....*

         *डॉ प्रभाकर लोंढे*
-------------------------------------------
      खरंच पवार साहेब।। आपले खूप खूप धन्यवाद.. आपण जीवनाच्या अंतिम टप्प्यात जगातलं सत्य सार्वजनिक रित्या कबुल करीत जगासमोर मांडलं. " *धनगर इतरांना मतदान करतात."* करमाळ्याच्या सभेत आपल्या मुखाग्नीतून तावूनसुलाखून निघालेलं हे सत्यवचन जगाने ऐकलं. आपल्या उतार वयात प्रगल्भ अनुभवातून हे वाक्य आपल्या मुखातुन आम्हाला ऐकायला मिळणं, हे आम्ही सर्व अन्यायग्रस्त धनगर आमचं अहोभाग्यच समजतो. कारण आम्हाला आज पुन्हा एकदा सत्याची जाणीव झाली की, खरंच धनगर इतरांना म्हणजेच(बीजेपी, शिवसेना, रा. कांग्रेस, कांग्रेस पक्ष) यांना व त्यांच्या नेत्यांनाच मतदान करतात, आणि सातत्याने करीत आलेले आहे. तरी सुद्धा गेल्या सत्तर वर्षाच्या कालावधीत हे पक्ष कधीच आमचे धनगरांचे झालेले नाही. या पक्षांनी आम्हाला उमेदवारी सूध्दा दिलेली नाही. आमचा कोणताच नेता मोठा होवू दिला नाही. याचाच अर्थ ते पक्ष व नेते (आपणसुद्धा) आमचे कधीच नव्हते. तरी सुध्दा *आम्ही मतदान मात्र या पक्षांनाच व आपणास करीत आलो आहे,* म्हणजेच जे आमचे कधीच नव्हते, ज्यांनी आम्हाला कधीच उमेदवारी दिली नाही, ज्यांनी आम्हाला कधीच आपल्या पंगतीला येऊ दिले नाही. त्या *इतरांनाच  आम्ही आपले मतदान केले आहे.*
    आपण अगदी बरोबर बोललात, पवार साहेब! आपण स्वतः याची जाणीव ठेवली, असल्या सत्याची आपण आम्हाला जाणीव ऐनवेळेवर निवडणूक काळात करून दिली, आपण तसे जाणीवेचे पक्के!? आपण धनगर जमातच काय, इतर अनेक छोट्या-मोठ्या जमातींच्या सहकार्याची किती मोठ्या प्रमाणात जाणीव  ठेवलेली आहे, असं कोणी म्हटलं तर चुकीचं होणार नाही, त्यामुळेच कदाचित या महाराष्ट्रातील काही अ जाणते लोक आपणास "जाणता राजा" म्हणतात म्हणे. असो साहेब! कोणाला काय म्हणायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.  पण *आपणास धनगरांनी काय म्हणायचं? हा मोठाच प्रश्न उभा राहिलेला आहे.* साहेब! आपण आपली तिसरी पिढी राजकारणात आणली आहे.  धनगर उदार दिलाने स्वागत करणार आहे, यावर काही शंकाच घेवू नका कारण *धनगर नेहमीच इतरांना मतदान करीत आलेले आहे.*
          आदरनिय पवार साहेब! आपण आपले राजकीय अस्तित्व व वाटचाल सुरु केली ती माढा, बारामती मतदारसंघातून !! की जे धनगर बहूल मतदारसंघ आहेत. तरी सुध्दा धनगर इतरांना मतदान करतात असे आपण म्हणणे किती संयुक्तिक आहे हे आपल्या अनुभवी नजरेतून ठरवावे. एखाद्या वेळेस धनगरांनी बीजेपी शिवसेनेला (आपल्याच शिष्यांना)  मतदान केले म्हणून काय झाले, सुप्रियाताईना तर बारामतीत निवडून (जानकर साहेबांना हरवून)आणण्याचे कार्य धनगरांनीच तर केले, यावरून तरी आमची पवार घराण्यासंबधी निष्ठा लक्षात असू द्या साहेब.. आपण मान्य करा नाही तर नका करा, साहेब, तुमची व तुमच्या रक्तनातेवाईकांची तिसरी पिढी राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी या *धनगरांनी निष्ठेने आपणास मतदान केलं आहे* साहेब..  तुमच्या पिढ्यांना सत्तेत पाठविण्यासाठी धनगरांनी, धनगर रक्ताच्या उमेदवारांना कसं मातीत घातलं आहे, याची आपणास चांगली कल्पना आहेच. याचे आपण सदेह साक्षीदार आहात साहेब... *इतरांच्या तिसऱ्या पिढ्या राजकारणात सक्रिय होत असताना अख्या महाराष्ट्रातून धनगरांची अजून पहीली पिढी सुध्दा राजकारणामध्ये प्रवेश केलेला नाही.* अशा परिस्थितीत सुद्धा अलीकडे आपल्या पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारी मध्ये एकाही धनगराला उमेदवारी जाहीर केली नाही. असं का होतं? हे मला अजून कळलं नाही, साहेब! पण असं नेहमीच झालेलं आहे, त्यामुळे आमचे (धनगर) उमेद्वारच नसल्याने आम्ही इतरांनाच मतदान केलेले आहे. म्हणूनच आपण जे बोललात ,ते अगदी खरं बोललात साहेब.  आणि आपण नेहमी अनुभवातूनच बोलत असता. त्यामुळे आपली कोणीही बरोबरी करू शकत नाही.
        आपल्या एवढा अनुभवी नेता महाराष्ट्रात नाही. असा तो आपला अनुभव आज साक्षीदार आहे, धनगर किती निष्ठावंत आहे, हे आपण इतरांना उत्तम प्रकारे उदाहरणांसह  स्पष्ट करून सांगू शकता. *धनगरांनी नेहमीच इतरांना मतदान केले आहे,* याचा आपल्या एवढा जीवंत साक्षीदार कोणीही नाही.
भलेही धनगरांचे हक्क, आरक्षण मिळाले नसतील परंतु आपल्या दुसऱ्या पिढी पर्यंत आम्ही धनगर नेहमीच आपल्या पाठीशी राहिलो आहे.  आपले नातू पार्थचे सुध्दा राजकारणात पदार्पण होत असताना भव्य स्वागत करावे ही कदाचित आपली अंतिम राजकीय इच्छा असेल, आपण म्हणाल तर ती आम्ही धनगर ती पुर्ण करूनही देवू, कारण *आम्ही आता पर्यंत इतरांनाच मतदान करीत आलो आहे.*
         साहेब! आपणास जाणीव आहेच, आपलं राजकीय अस्तित्व धनगरबहूल मतदानातून निर्माण झालेलं आहे. तोपर्यंत कोणीही धनगर नेता मोठा झाल्याचे उदाहरण दिसत नाही. धनगरांनी बीजेपी शिवसेनेला मतदान करायचे असे ठरविले असताना सुध्दा मागील लोकसभेत आपल्या सुकन्या *सुप्रिया ताईंना धनगरांनी निवडून आणलं,*  त्यासाठी धनगरांनी स्वजातीय श्रीमान महादेव जानकर साहेबांना पाडलं. यावरून तर आपलं म्हणणं सिध्दच झाले आहे साहेब, *धनगर इतरांनाच मतदान करतात* . अगदी बरोबर बोललात साहेब..... आपण शक्य तोवर खोटं बोलत नाही साहेब.... आणि जे बोलता ते खरंचं विचार करायला लावणारं बोलता... धनगर विचार करीत नाही,  हा त्यांचा गुणधर्म आहे.
      मागील विधानसभेत अजीत दादांना विययी करण्यासाठी श्रीमान ---- गावडे या धनगर उमेदवारांला पराभूत केले आहे साहेब.. हे सुद्धा आपल्या धनगर बहुल बारामती मध्ये घडले आहे. हा एक आपला अनुभव असल्यानेच तसेच असे अनेक अनुभव आपल्या पाठीशी असल्याने आपण, *धनगर इतरांना मतदान करतात.* असे बोललात ते अगदी खरं बोललात साहेब....
            यापुढे  सुध्दा धनगर इतरांना मतदान करून पार्थ बरोबरच तुमची तिसरी पिढी सुध्दा राजकारणात मजबूत करण्यासाठी मतदान करणारच आहे. यापुढे धनगरांवर शंका घेण्याची गरजच नाही, कारण यांना आपला माणूस चालतच नाही,  म्हणून *ते इतरांनाच मतदान करतात.* आणि आपण हा धनगरांचा दुर्गुण चांगला ओळखता.  म्हणूनच आपण महाराष्ट्रात विश्वासपुर्ण राजनीती करता....  तेवढ्याच विश्वासाने सांगतो साहेब, हे *धनगर नेहमीच इतरांना मतदान करतात. आणि घटनात्मक आरक्षण मागत पिढ्या बरबाद करतात...*

 *जय मल्हार साहेब*

 *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Wednesday, February 13, 2019

धनगरां मधील आर्थिक सम्राटानो!!* *आता सत्तेसाठी थोडे हात मोकळे करा!*

🇦🇹💰💰💰💰💰💰💰💰🇦🇹
 *धनगरां मधील आर्थिक सम्राटानो!!*
*आता सत्तेसाठी थोडे हात मोकळे करा!*

                              *डॉ. प्रभाकर लोंढे*

                  लोकशाहीमध्ये सत्ता निवडणुकीच्या माध्यमातून प्राप्त करायची असते, त्यासाठी निवडणुका हे शांततामय मार्गाने सत्तांतर करण्याचे माध्यम आहे. म्हणून दर पाच वर्षांनी निवडणुका घेणे हे प्रत्येक लोकशाहीला आवश्यक असते. ह्या निवडणुका लोकमताच्या आधारे जो बहूमतात येईल, त्यालाच सत्तेचा मार्ग मोकळा करीत असतात. पण भारतीय लोकशाहीचा गेल्या सत्तर वर्षातील निवडणुकांचा अभ्यास केला तर येथील मतसंख्येवर इतर काही बाबींचा प्रभाव पडत असल्याचे दिसून येते. त्यातील *प्रथम महत्त्वाचा घटक म्हणजे जात!!* तिचे चटके आज पर्यंत धनगरांनी सहन केलेले आहे. त्यामुळेच आमचे राजकीय नेते सत्ताधारी बनू शकले नाही.
कायद्याने जात नष्ट केल्याच्या कोरड्या आरोळ्या आम्ही मारत असलो तरी मात्र याच जात फ्याक्टरचा वापर करून येथील लोकशाहीमध्ये येथील अनेक भुरटे राजे, *जाणते राजे* बनले आहे.
            *दुसरा घटक म्हणजेच पैसा* की जो निवडणूकांमध्ये अप्रत्यक्षपणे खूप मोठी महत्वाची भूमिका पार पाडत असतो. *पैशाने(MONEY) मत निर्माण करता येत नसले तरी मत परीवर्तीत मात्र करता येतं,* हे भारतीय समाज व्यवस्था व लोकशाहीचे वास्तव आहे.
पैशाच्या बाबतीत असं म्हटलं जातं.
         *पैसा, पैसा तू खूदा तो नहीं है,*
                 *पर यह भी सच है कि,*
                 *तू खूदा से भी कम नहीं है!*
                            असं जे पैशाच्या च्या बाबतीत बोललं जात, ते भारतीय सार्वत्रिक निवडणूक काळात तर सिध्दच होत असतं. तो कदाचित सर्वांचाच अनुभव असू शकतो.
             भारतीय लोकशाहीमध्ये निवडणूक लढवायची असेल तर *तिसरा घटक मनुष्यबळ/कार्यकर्ता (Musul) (तोही निष्ठावंत)* महत्त्वाचा असतो. *सत्तेतून पैसा, पैशातून कार्यकर्ता व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतसंख्येच्या आधारे राजकीय सत्ता, हा प्रस्थापितांच्या सत्तेचा यशोमार्ग आहे.* त्याच आधारे ते आजही यशस्वी होण्याचा विश्वास व्यक्त करताना  दिसतात. ही बाब प्रथम धनगर तरूणांनी समजून घेणे आवश्यक आहे.
       आज धनगर तरुण राजकीय सत्तेच्या दृष्टीने मार्गक्रमण करीत आहे. जातिवंत निष्ठावंत धनगर तरुणाईचा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याच्या दृढनिश्चय दिसतो आहे. *लोकसभा असो की विधानसभा आता फक्त पिवळा भंडारा उधळायचाच!!*  या विचाराचे धनगर कार्यकर्ते सुध्दा दंड थोपटत आहे. जशा काही यशवंतरावांच्या फौजा आपलं गतवैभव पुनर्स्थापित करण्याचा चंग बांधून आहे. परिणामतः दुसरीकडे शत्रु भांबावलेल्या स्थितीत दिसतो आहे. मात्र *धनगरांचे हे सर्व यशवंतराव व त्यांचे मावळे एकाच गोष्टीत कमी पडण्याची भिती वाटते आहे, तो म्हणजे पैसा!!*  त्यामध्ये ते कमी पडणार नाही याची खबरदारी घेण्याची संपूर्ण जबाबदारी आपण सर्व धनगर बांधवांची आहे.
           निवडणुकीसाठी पैसा उभारायचा कसा? हा मोठाच प्रश्न आहे. परंतु वास्तविकता ही आहे  की, भारतीय निवडणूक *लढविण्यासाठी पैसा उभारणीचे काही प्रकार येथे प्रचलित आहे,*
१) प्रस्थापितांकडून घेणे
२) उद्योगपती कडून घेणे
३) निष्ठावंत कार्यकर्ता, हितचिंतक, नोकरदार व सामान्य मतदार यांचे कडून घेणे.
       यामध्ये हे मात्र सत्य की, ज्याच्या कडून पैसे घ्याल, त्याच्यासाठी काम करावे लागणार. आजपर्यंत आपण प्रस्थापितांकडून पैसा घेतला म्हणून त्यांनी आपल्यातील कार्यकर्त्यांचा(त्यांच्या तितरांचा) वापर त्यांच्यासाठी करून घेतला. त्या बदल्यात धनगरांना काय मिळालं/ दिलं. किती प्रश्न सुटले की समस्या वाढल्या?  याचा तुम्हीच सर्वांनी विचार करावा. या देशातील उद्योगपतींनी तर धनगरांना कधीच पैसा दिला नाही किंवा धनगरांनी घेतला नाही.  *सामान्य धनगर बांधव, कार्यकर्ते, नेते, नोकरदार, मेंढपाळ यांनी मात्र सामाजिक आंदोलनासाठी नेहमीच सढळ हाताने मदत केलेली आहे. परंतु त्यांनी ज्यांना पैसा दिला, ते सत्तेच्या बाहेर असल्याने त्यांच्या कडून धनगरांना आरक्षणासह काहीच मिळू शकले नाही.*
     आता मात्र आपली *लढाई राजकीय सत्तेसाठी* आहे. व ती लढाई लढण्याचा यापुर्वी आपण कधीच यशस्वी प्रयत्न केलेला नाही. जर आपण धनगर राजकीय अस्तित्व निर्माण करायला निघालो आहे. तर ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. आजपर्यंत च्या अन्यायाविरुद्ध *लढण्याची तळमळ असलेल्या धनगर उमेदवारांनी राजकीय सत्ता मिळवावी असं जर वाटत असेल तर त्या प्रत्येकांनी त्यांना जमेल तशी आर्थिक मदत करणे अत्यावश्यक आहे ‌.* नाही तर ते (धनगर उमेदवार) येथील प्रस्थापित मस्तवाल राजकीय सांडाच्या विरोधात लढताना टिकू शकणार नाही.
             आर्थिक समृध्दी असलेल्या धनगर उद्योगपतींनी तर सढळ हाताने मदत करावी. कारण सत्तेचे लाभ मिळण्यासाठी आपल्या(धनगर) माणसांच्या हातात सत्ता असणे आवश्यक असते. हे अंबानी सारख्या उद्योगपतींनी तत्त्व अंगीकारलं आहे. येथील सरकारवर नेहमीच त्यांचा प्रभावच नाही तर दबाव राहिलेला आहे. 
        धनगर जमातीमध्ये सुध्दा *आर्थिक समृद्धी असलेले अनेक उद्योगपती, कारखानदार, व्यावसायिक आहेत, सोबतच धनगर रक्ताच्या सर्वांनीच  आपल्या धनगर उमेदवारांना सढळ हातानी आर्थिक मदत करावी, उमेदवारांनी सुध्दा  आपली सामाजिक बांधिलकी जपावी. ही आग्रहाची नम्र विनंती. मात्र आपल्या मतदारसंघात एकच धनगर उमेदवार उभा राहिल. याची सर्वांनी खबरदारी घ्यावी.*
👬👬👬👬👬👬👬👭👭🇦🇹
                          जय मल्हार

 *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
 *डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

Thursday, January 31, 2019

रा. नेतृत्व विकासाची क्षमता होळकरशाहीच्या इतिहासातच

🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹
*रा. नेतृत्व विकासाची क्षमता होळकरशाहीच्या इतिहासातच!*   

                 डॉ प्रभाकर लोंढे

         भारतातील धनगर जमातीसह सर्वच बहूजन समाजाची अवस्था पाहीली तर या समाजाला *राजकीय क्रांतीची गरज आहे* . त्याशिवाय त्यांची प्रगती होणे शक्य नाही, हे सुर्यप्रकाशा इतके सत्य आहे. असे असले तरी ही *क्रांती रक्तविहीन क्रांती होणे* आवश्यक आहे. कारण भारतात लोकशाही आहे. लोकशाही मध्ये राजकीय क्रांती ही केवळ निवडणूकीच्या माध्यमातून शक्य आहे. येथे प्रत्येक निवडणूक जनमताच्या आधारे जिंकली जात असते, असं म्हटलं जातं, त्यामुळे येथील *धनगर सह बहूजन उमेदवारांपासून तर कार्यकर्ते व मतदारांना एका व्हिजन (दृष्टी)ची गरज आहे.* त्यांना एका कल्याणकारी विचारसरणीची आवश्यकता आहे. अशी ही *समाजोपयोगी, सर्वकल्याणकारी दृष्टी विकसित करण्याची ताकद मात्र फक्त होळकरशाही, तिचा इतिहास व तिच्या त्या नऊ रत्नांमध्ये आहे.* याची ग्वाही होळकरांचा इतिहास व तत्कालीन समाजव्यवस्था आपणा सर्वांना देते. त्यासाठी सर्वांनी तो इतिहास वाचनाची आवश्यकता आहे.
            भारतीय समाजातील धनगर सह बहूजनांपैकी आजच्या प्रत्येक नेत्यांना त्यांचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने आपल्या राजकीय अस्मिता जपायच्या असेल तर *स्वबळावर शून्यातून विश्व निर्माण करणारे थोर सुभेदार मल्हारराव होळकर डोक्यात ठेवावे लागेल..... त्यांचा स्वबळावर स्वअस्तित्व निर्माण करण्याचा संकल्प  समजून  घ्यावा लागेल.  त्यांच्या सारखी पराक्रमाची  शर्थ लावावीे लागेल. त्यांचा गनिमी कावा लक्षात घेऊन तो तलवारीच्या नाही तर मतसंख्येच्या भरोशावर वास्तवात उतरवावा लागेल. मल्हाररावांचा बानेदारपणा, कठोर परिश्रम करण्याची तयारी, समय सुचकता, ध्येयाप्रती निष्ठा व निष्ठेपोटी असलेली कटीबध्दता* समजून घेणे आवश्यक आहे.
         आज धनगर सह बहुजन समाजामध्ये समाजहित केद्रित नेत्यांची कमतरता आहे, असं म्हटलं तर चुकीचे होणार नाही कारण नेतृत्वाच्या कर्तुत्वाचा परिणाम दिसत नाही. व वास्तविकता ही आहे की, हा बहुजन समाज राजकीय सत्तेपासून व त्याच्या लाभापासून आजही वंचित आहे. त्याला केवळ नेतेच जबाबदार नाही तर येथील परिस्थिती सुद्धा कारणीभूत आहे. मात्र या परिस्थितीवर मात करूनच बहूजन समाजाचा विकास शक्य आहे. त्यासाठी आत्मविश्वासाने संघटित प्रयत्न होणे आवश्यक आहे. असे प्रयत्न करण्याची ताकद देण्याची क्षमता फक्त होळकरशाहीच्या इतिहासात आहे.  विपरीत व प्रतिगामी सामाजिक, राजकीय परिस्थिती असताना खाजगी जीवनातील दुःखाचे भांडवल न करता राजकीय सत्ता  हातात घेऊन *बहुजन नेत्यांना स्वबळावर लोकाभिमुख, लोकहितवादी  राज्यकारभार करायचा असेल व लोकांच्या गळ्यातील ताईत बनायचे असेल तर महाराणी अहिल्याबाई होळकरांचा आदर्श पुरेसा आहे...*
                   होळरशाहीतील महापराक्रमी *यशवंतराव होळकरांचा इतिहास तर आजच्या सर्वच प्रश्र्नांचे उत्तर देणारा आहे* . सोबतच लढण्याची ताकद निर्माण करणारा आहे. स्वराज्यातील संकटांच्या मालिकांमुळे स्वराज्याची घडी विस्कळीत झालेली असताना स्वबळावर स्वराज्य पुनर्गठित  करण्याचे कार्य पराक्रमी यशवंतराव होळकरांनी केले. राष्ट्रीय भावना जपत समान दुखितांना संघटित करून  शत्रुवर वार करण्याचे कार्य केले. हे सर्व समजून घेण्यासाठी  मात्र शूरवीर यशवंतराव वाचावा लागेल.
       स्वजनांच्या उद्धारासाठी काही करायची खरी इच्छा असेल, धनगरांच्या घरातील दुरावस्थे बरोबरच जमात व राष्ट्रावर आलेली संकटे ओळखून राष्ट्र वाचवायचे असेल सोबतच *आजच्या संकटसमयी एकत्र येऊन शत्रूवर जरब निर्माण कराविशी वाटत असेल तर  मन, मनगट व मस्तकात महाराजा यशवंतराव होळकर व त्यांचा पराक्रम, दुर्दम्य आशावाद, प्रचंड इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे.*
              थोडक्यात सांगायचे झाले तर धनगर जमातीच्या नेते, कार्यकर्ता यांनी होळकरशाहीच्या संस्थापकाची दूरदृष्टी व पराक्रम, मातोश्री अहिल्यामातेची लोकाभिमुखता व कल्याणकारी दृष्टीकोन, यशवंतरावांचे प्रसंगावधान व धडाडी सोबतच राष्ट्रीय भावना समजून घेतले तर *धनगर सोबतच सर्वच बहूजन जमातीतून सक्षम नेतृत्व विकसित होऊ शकते.* ..... *प्रस्थापितांची मुजोरी खतम होवू शकते...*

                त्यासाठी खूप खूप शुभेच्छा!!

           जय मल्हार
 एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Friday, January 11, 2019

धनगराना आता राजकीय क्रांतीशिवाय पर्याय नाही!*

*धनगराना आता राजकीय क्रांतीशिवाय पर्याय नाही!*

    *डॉ प्रभाकर लोंढे*

     धनगर जमातीच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख लक्षात घेता या जमातीच्या सर्व प्रश्‍नांचे मूळ जमातीच्या राजकीय सत्तेपासून दूर असण्यामध्ये आहे. सोबतच जमात नेतृत्वाच्या राजकीय आकांक्षेच्या अभावात आहे. त्यामुळे जमातीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राजकीय सत्ता अत्यावश्यक असताना या जमातीने स्वतःला राजकीय सत्तेपासून अनपेक्षित अनभिज्ञ ठेवलेले आहे.  परिणामतः भारतीय लोकशाहीमध्ये बहुसंख्येने असलेली धनगर जमात एक राजकीय उपेक्षित जमात असल्याचे आजही लक्षात येते *. "धनगर जमात वेडी" की "प्रस्थापितांची खेळी" असो काहीही, मात्र आज धनगर जमात व्यवस्थेच्या नेहमीच गेली बळी....* 
          अलीकडे धनगर जमात वेडी तर राहीलेलीच नाही शिवाय त्यांनी आज प्रस्थापितांची खेळी ओळखली आहे. त्यामुळे आता बळी जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
              धनगर तरुणाईचा ध्यास व भारतीय राजकारणाचा अभ्यास या दोन गोष्टी मुळे धनगर जमाती मध्ये राजकीय नवचैतन्य निर्माण होताना दिसत आहे. धनगर जमातीने अभ्यासातून आज महाराष्ट्रीयन राजकारणाची नस ओळखली आहे. धनगर जमातीच्या सर्वच प्रश्नाचे आकलन व कारणमिमांसा या पर्यंत धनगर जमातीचे अभ्यासक जावून पोहचलेले आहे.  त्यांच्या अध्ययन, संशोधन, विश्लेषण व लेखन यातून धनगर जमातीला विकासाचा एक सूर गवसलेला आहे. व यापुढे राजकीय सत्तेशिवाय धनगर जमातीला पर्याय नाही, हा निष्कर्ष धनगर नेतृत्वापासून सामान्य धनगर माणसांपर्यंत जावून पोहोचला आहे.  सोबतच सर्वांनी तो सहजपणे स्विकारलेला आहे. आता पर्यंत झालेल्या चुका, अन्याय, अत्याचार, नुकसान या सर्व बाबींची खंत वाटायला लागली आहे. त्यांनी धनगर जमातीचे नुकसान करणारे जंत ओळखलेले आहे. त्या जंताच्या अंतातूनच धनगराचा  राजकीय उदय आहे, ही बाब त्यांच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळे धनगर जमातीमध्ये राजकीय क्रांती शिवाय दुसरा पर्याय नाही, हा आत्मविश्वास धनगर जमातीमध्ये अलीकडे सातत्याने पहायला मिळतो आहे.
            तरुण धनगर नेतृत्वांची राजकीय सत्तेच्या दृष्टीने लोकशाहीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुध्दा झालेली आहे. यापुढे महाराष्ट्राच्या राजकारणात धनगरांचा मोठा राजकीय प्रलय निर्माण होणार हे निश्चित आहे. यामध्ये प्रस्थापित धनगर नेत्यांसह अनेक बड्या गैर धनगर नेत्यांचे राजकीय गणित कोलमडणार हे नक्की आहे. धनगरांचे प्रस्थापित नेतृत्व व नवोदित नेतृत्व यांच्या मधील समन्वयातून धनगर राजकीय क्रांती शक्य आहे.
     एवढं मात्र निश्चित की, यापुढे धनगरांच्या राजकीय क्रांती शिवाय पर्याय नाही, ही बाब सर्वमान्य झालेली आहे. त्यामुळेच धनगर समाजानी आता केवळ राजकीय सत्तेसाठी आपली नीती आखावी. आरक्षणासह सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न करीत असतांनाच राजकीय सत्तेसाठी आपले तन, मन, धन संघटितपणे खर्च करणे आवश्यक आहे. परस्पर सामंजस्य व सहकार्य या तत्त्वावर आधारित समाजाचा राजकीय जाहीरनामा प्रसिद्ध करून जमातीच्या  योजनाबध्द वाटचालीतून धनगरांची ही राजकीय क्रांती शक्य आहे..

                     *जय मल्हार*

 *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*