Monday, March 14, 2016

शूरवीर मल्हारराव

🗡🗡तलवार त्याचे हाती🗡🗡
---------+++++++++---------

मल्हार आया मल्हार आया
ऐसी ज्याची ख्याती
स्वराज्य निर्माण करण्या
सदैव तलवार त्याचे हाती........

घोडा - लगाम , ढाल- तलवार
निधडी ज्याची छाती
शूरवीर मल्हारराव तो
सदैव तलवार त्याचे हाती..........

वीर,पराक्रमी ,धोरणी, मुत्सद्दी
सदा मेहरबान असे छञपती
स्वराज्याचा आधारस्तंभ तो
सदैव तलवार त्याचे हाती..........

रनभूमी असो वा रननिती
ज्याची लाखात एक गणती
रनांगणातील रनवीर तो
सदैव तलवार त्याचे हाती........

राजा रंक थोर भिकारी
गाती जयाची महती
ऐसा कर्तबगार सुभेदार तो
सदैव तलवार त्याचे हाती.......

इंदोर संस्थान, माळवा प्रांती
राजसत्ता मिळवुनी घेती
स्वअस्तित्व निर्मितीच्या प्रयत्नात तो
सदैव तलवार त्याचे हाती......


थोर सुभेदार श्रीमंत राजे
धनगर त्याची जाती
मल्हारराव होळकर नाव त्यांचे
सदैव तलवार त्याचे हाती.......

🙏🏻डॉ .प्रभाकर लोंढे 🙏🏻
  ☝🏽गोंदिया-चंद्रपूर ☝🏽


समस्त बांधवांना

श्रीमंत राजे मल्हारराव होळकर  जयंतीच्या
डॉ  प्रभाकर लोंढे
    सीमाताई लोंढे
शाश्वत लोंढे
मृगांक्षी लोंढे
आणि  समस्त लोंढे परीवाराकडून  हार्दीक शुभेच्छा

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


समस्त

Thursday, February 4, 2016

नारी पुराण


वारे दुनियाकी नारी
हो गयी सबसे भारी.
रह गयी कन्या कुवारी
तो बिघाड गयी दुनिया सारी.

सच है की नारी के बिना
दुनिया है अधुरी
कोण बोल सकता है
नारी चिज है बहोत बुरी........

जन्म देनेवाली माँ है नारी
पती की अर्धांगिनी है नारी
संसार का केंद्र है नारी
यह सब कब समझेगी बदचाल नारी.

जिस्म को परोसने वाली नारी
तेरी  जिँदगी है  सदा अधुरी
भलेही है तू स्वर्ग की परी
क्यु परसोगी माया सारी...

तू तो मायाजाल है नारी
तेरी माहीमा है न्यारी
असली अहमियत जान के
दुनिया को बरबाद मत कर नारी.

मंदिरोमे सजाया था
तुझे एक देवी बनाकर.
भलेही न दिया होगा
अधिकार छुने का
तुझको अस्पृश्य बनाकर.
न दिया था अधिकार जिने का
भोग्य वस्तू समझकर.
तोड दे अब तू बंधन सारे
सच्चाई को जानकर.
दुनिया को संभाल ले नारी
खुद को विरांगना मानकर.

तू ही है अहिल्या
तू ही तो है सावित्री
तू ही है भिमाबाई
तू ही तो है जीजाई
तू ही तो है दुनिया मे
पराक्रमो की खान हमारी.
तू ही तो है जान हमारी.
शिर्फ अपनी सच्चाई जानकर सारी
दुनिया को संभाल ले नारी...........

तूने घरो को बसाया
सपनो को सजाया
संसार को महकाया
दुनिया का इतिहास रचाया
कर्तबगार नारी बनकर.
एकबार इतिहास रचा दे नारी
सलाम करेगी तुझे यह दुनिया सारी......



 डाँ  प्रभाकर  लोंढे  गोंदिया

Sunday, January 31, 2016

देवाचं अस्तित्व!!!!!
---------------------------------

देवाचं अस्तित्व माणसानी निर्माण केलं की माणसाला देवानी निर्माण केलं हा  कदाचित खुप मोठा वादाचा विषय होईल. पण देवाला माणसानी निर्माण केलं  हे माञ सहजतेने स्पष्ट करता येत. हे माझं मत काहींना १००% पटणार नाही. पण ते मान्य केल तर खरा देव दिसल्याशिवाय राहणार नाही.
  मी त्या देवाची संकल्पना आपल्यासमोर मांडतो आहे ज्याचे सर्व व्यवहार मणुष्य निर्मित नियंत्रित आहेत. तो देव ज्याचा आकार, प्रकार,  व्यवहार, उपासना, संरक्षण, अस्तित्व  मणुष्य प्राण्याकडून निर्धारित केले जात असते. त्याच्यावर देवाचा कोणताही आक्षेप नसतो. तो देवाच्या नावावर माणसानी माणसाशी माणसासाठी केलेला व्यवहार असतो.
अतिशय महत्त्वाचे म्हणजे तो व्यवहार केवळ माणसाला वाटत असलेल्या भितीपोटीच  चालू असतो. माणसाच्या मनात असलेल्या भितीवरच मुळात त्या देवाचे अधिष्ठान  असते. ज्या माणसाला विश्वातील घडामोडीची भिती वाटत नाही,  त्याच्या मनात तो देव क्षणभरही थांबू शकत नाही. त्याला तिथे थोडीही जागा मिळू शकत नाही. त्याचे हा मणूष्यनिर्मीत देव काहीही  बिघडवू शकत नाही.

माञ तो, ------- तो देव!!  कोणाच्याही नियंञणात आला नाही.  आणू शकणार पण नाही. तो कधी कोणाच्या म्हणण्याप्रमाणे वागणारा नाही. कोणाचं बिघडवणारा नाही. मग का बरं  घाबरायचं आपल्याच बापाला !!!!! का बरं  सहन करायचा त्याच्या नावावर चाललेला धंदा !!!!!!!

 🙏डाँ प्रभाकर लोंढे 🙏

Wednesday, December 30, 2015

🌴🌴नववर्ष🌴🌴
...................................
नवीन वर्ष , नवीन जिव्हाळा
तोच दिवस, तोच उन्हाळा
तोच हिवाळा, तोच पावसाळा
प्रत्येक जीवास फक्त आभास निराळा .

नवीन वर्ष , नवीन आशा
प्रत्येक जीवाची नवीच अभिलाषा.
भूतकाळाच्या कठीण लहरींवर
वसावी उमेदीचीच भाषा.

क्षण येती, क्षण जाती
क्षणा क्षणानी दिवस भरती
दिवसा मागून दिवस जाती
अशास मानव वर्ष म्हणती...

वर्षा मागून वर्षे जाती
मानव तयाची करतो गणती
वर्षाकाठी हिशोब करुनी
आशा निराशेने निरोप देती.....
---------------------------------
💐💐💐💐💐 💐💐
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!!!
---------------------------------

डाँ  प्रभाकर लोंढे  गोंदिया-चंद्रपूर

Saturday, December 12, 2015

दोन मोर्चा चे आयोजन करणाऱ्या धनगर  कार्यकर्ते  अन नेत्यांनो!!!!!! 🚶🏿🚶🏿🚶🏿🚶🏿🚶🏿 यांना काय देणार आहात?????

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
८ व १० डिसेंबर  २०१५ ला आपण आयोजित केलेल्या मोर्चा मध्ये हजारो लोक आपण जमा केले.   थोडे फार विचार करु शकणाऱ्या, आपल्या नजेरेतील बुध्दुजीवी बांधवांच्या एकच मोर्चाच्या कल्पनेलाच लाथा मारीत  आपल्या इच्छा तसेच ध्येयासाठी आपण दोन मोर्चे काढले. सामान्य धनगरांच्या  मनातील आरक्षण शब्दाचे आकर्षणाला भांडवल करुन त्याला  आपण प्रदर्शित केले. त्याबद्दल आपणा सर्वांचे अभिनंदन !!!!!!

मोर्चा पुर्वी आपणा पैकी काही नेते/ कार्यकर्त्यांशी संपर्कात आलो होतो, तेव्हा मोर्चाचे काय फलित होणार आहे याची आपणा सर्वानाच कल्पना होती. हे मला समजले होते.  मनात पुन्हा एकदा निराशा आली.  असे स्वातःञ्योत्तर भारतात असत्याचे प्रयोग धनगरासाठी काही नविन नाही.  हे २००३ पासून चालु असलेल्या अभ्यासातून आलेल्या अनुभवानी मनाला समजविलं. दुसरीकडे अनेकांनी मोर्चाच्या समर्थनार्थ लिहीण्याचा व उपस्थित राहण्याचा आग्रह  धरला होता....  दोन्ही  मोर्चाना मुक संमती देण्याशिवाय मन काहीच करु शकल नाही. कारण असत्याचा विरोध करण्याची क्षमता नसेल तेव्हा चुप राहणे हाच एक शहाणपणा असतो. अस मनानी मनाला समजविल..... पण डोळे कान  माञ  सदासर्वकाळ आपल्या मोर्चा व आयोजन तसेच प्रयत्नाकडे होते...............


आपण सर्वानी मोर्चाच्या आयोजनासाठी फार मोठे कष्ट घेतले त्याबद्दल आपले पुन्हश्च अभिनंदन !!!!!  .  

आम्ही कष्टकर्याची अवलाद आहोत हे पुन्हा सिद्ध केले .  नियोजित तारखांच्या पूर्वी आपल्या प्रचार सभांमधील आपले  आवेश डोळ्यांनी पाहीले. परस्परांवरची चिखलफेक पाहीली. धनगर नेते/कार्यकर्त्याची परास्परांवरची खालच्या पातळीवरची भाषा वाचली.  प्रसंगी ऐकली.....  मी किंवा माझा नेता किती चांगला आहे हे सांगण्याची स्पर्धा  उघड्या डोळ्यांनी पाहीली व कानानी ऐकली............आरक्षण ध्येय न राहता साधन बनत चालल्याची चाहुल तसेच प्रचिती येत होती.... पण  व्यर्थ !!!!!!!

 तेव्हा आपणास काय करायच आहे.  किवा काय हव आहे ? हा प्रश्न पडला. तो अजुनही अनुत्तरीत आहे......

शेवटी भावनेच्या भरात आपल्या आवेशावर भरभरून टाळ्या वाजविणारा धनगर पाहीला. तोच धनगर  मोलमजुरी करुन मिळविलेले पैसै मोर्चा मध्ये येण्यासाठी खर्च करणारा धनगर तुमच्या मोर्चा मध्ये सुध्दा दिसला............


 बिचारे केविलवाणे चेहरे !!!!!!!!!! संपुर्ण महाराष्ट्रातून नागपूर मध्ये  आलेले सामान्य धनगर बांधव आपल्या आवाजाला प्रतिसाद देत होते. तहान भुक घर- दार -लेकरं . बायको घरी ठेवुन त्यांची व रोजीरोटीची  तमा न बाळगता आपल्या हाकेवर येवुन आपणास नकळत प्रतिसाद देत होते .    मेंढपाळ धनगराच्या मागे मेंढ्यांनी जावे तसा कळप आपल्या मागे न चुकता चालताना  दिसला. 


निरागस बांधवांचे चेहरे पाहुन दया आली.  तेव्हापासून अनेकृ प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.   


सर्वच आज विचारणार नाही पण एका प्रश्नाच उत्तर अवश्य द्यावे..ही विनंती 

आपण सामान्य धनगराला काय देणार आहात?



 डाँ  प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर

Thursday, December 3, 2015

माझा दैनिक देशोन्नती ला पाठविलेला लेख



🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

अखेरचा सार्वभौम राजा ; राष्ट्रीय स्वातंत्र्याचे प्रणेते-- महाराज यशवंतराव होळकर ..

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात शिवरायानंतर आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवून इंग्रजा विरूद्ध राष्ट्रीय प्रेरणा जागृत कराणारा महाराजा यशवंतराव होळकर भारतीय  इतिहासात शेवटचा सार्वभौम राजा ठरला. पराकोटीची नेतृत्व क्षमता असणाऱ्या या महायोध्दा व राज्यकर्त्याची ३ डिसेंबर ला जयंती पार पडली. त्यानिमित्य त्यांच्या कार्यकर्तुत्वास कोटी कोटी.प्रणाम .......

महाराजा यशवंतरावाना त्याच्या युद्ध कौशल्य व धाडसी वृत्ती तसेच सैनिकांच्या खाःद्याला खांदा लावुन मैदानात लढण्याच्या वृत्तीमुळेच त्यांना भारताचा नेपोलियन असे इतिहासकार म्हणतात . स्वतःमध्ये असलेल्या अद्भुत चैतन्याच्या जोरावर पेशवे व भोसले यांनी गिळकृत केलेले होळकर प्रदेश यशवंतरावानी परत मिळवून होळकर साम्राज्याला पुनर्जीवित केले. स्वबळावर स्वराज्य मिळवून शेवटपर्यत स्वतंत्र राहणारा, स्वतः हून एकही तह कोणाशीही न करणारा हा भारताच्या इतिहासातील एकमेव महायोध्दा होता. म्हणून त्याच्या पराक्रमाने प्रभावित होवून पातशाहाने त्यांना महाधिराज राजराजेश्वर अलिजा बहाद्दूर पदवीने सन्मानित केले होते.
 यशवंतरावांचा ३डिसे १७७६ ते २८ आक्टोबर १८११ हा अत्यल्प जीवनकाळ असला तरी इंग्रजांच्या असूरी आकांक्षेचा अंदाज घेवून हाडवैर असलेल्या शिंदे , भोसले , पेशवे यांना राष्ट्रीय आकांक्षे पोटी एकत्र आणण्याचा प्रयत्न यशवंतरावानी केला . परंतु शिंदे ,भोसले पेशवे यांनी त्यांना प्रातिसाद न देता त्यांच्या विरोधात कटकारस्थान रचून अडचणीत आणण्याचा प्रायत्न केला . त्यांनी यशवंतरावाप्रमाणे दुरदृष्टीकोन ठेवून यशवंतरावाना साथ दिली असती तर भारताच्या इतिहासात इंग्रज राजवटीची नोंद सुध्दा होवू शकली नसती.  हे इतिहासातील पानावरुन सिध्द होते.

यशवंतरावांच्या कर्तुत्व व युद्धनिती पुढे इंग्रज सुध्दा हतबल झाले होते. भरतपूरच्या युद्धात यशवंतरानी अत्यंत अनुभवी व कडवा इंग्रज सेनापती  जेरार्ड लेकचा पराभव केला. त्यानंतर जनरल स्मिथ, कर्नल, मोन्सन, मरे , फोसेट सारख्या दिग्गज इंग्रज आधिकार्याचा पराभव केला. याला कारण यशवंतरावाचे युद्ध तंत्र होते. शिवरायानंतर गनिमी काव्याचा यशस्वीपणे वापर यशवंतरावानी केला .. डोंगर दर्यामध्ये वापरला जाणारा गनिमी कावा यशवंतरावानी सखल व सपाट भागातही यशस्वी करून दाखविला. यातच यशवंतरावाच्या कर्तुत्वाची यशस्वीता लक्षात येते.

यशवंतरावांचे शिवरायांनःतर महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी जानेवारी १७९७ मध्ये करुन घेतलेला वैदिक राज्याभिषेक होय, की ज्याची चर्चा कधीही होत नाही . तो एका बहुजन धनगर शासकाचा आधुनिक भारतातील एकमेव वैदिक राज्याभिषेक होता. त्याचे ऐतिहासिक अद्याप आपल्याला समजले नाही ही मोठी शोकांतिका आहे. ही अनास्था असली तरी भारतीय इतिहासातील शेवटच्या सार्वभौम कर्तबगार , स्वाभिमानी लढावु वृत्तीच्या राष्ट्रीय भावना जोपासणार्या बहुजन शासकाच्या राज्याभिषेकाचे मोल समजून घेतल्या शिवाय सामाजिक क्रांतीचा विचार वास्तवात येवुच शकत नाही..

यशवंतरावानी इ.स.१७९७ ते १८११ अशा अत्यल्प १४ वर्षाच्या काळात आपल्या धैर्य  व तलवारीची धार कधीच बोथट होवू दिली नाही. एकट्याच्या भरोशावर कलकत्त्यावर आक्रमण भारतृ स्वतंत्र करण्याची त्यांची उमे शेवटपर्यत अभंग  होती. यशवंतरावाना जिंकता येत नाही म्हणून इंग्रजांना त्यांची धोरणे बदलावी लागली . वेलस्ली सारख्या गव्हर्नर जनरल ची हकालपट्टी करावी लागली . असा तो सदासर्वकाळ यशवंत राहाणारा, स्फुर्तिदायी जीवन जगणारा महाराजा यशवंतराव आम्हा  बहुजनांमध्ये होवून गेला, हे आमचे अहोभाग्य असले तरी त्यांचा जाज्वाल्य इतिहास आमच्या पर्यत पोहचू शकला नाही. हे आमचे दुर्भाग्य म्हणावे लागेल..


जेम्स व्हिलर नावाचा इतिहासकार यशवंतरावा बद्दल लिहीतो. " The life  of Yashwantrao Holkar was one of the unceasing struggle  and peril, endured with  the abounding high sprits for which he was renowned "

परंतु भारतीय इतिहासकारांच्या लेखनीतून यशवंतरावांचा पराक्रम न्याय भूमिकेतून  उतरु शकला नाही.  अशा महान योध्द्याच्या पराक्रमास माझ्या व सर्व वाचकांच्या वतीने विनम्र अभिवादन......,🙏🙏🙏🙏

डाँ  प्रभाकर लोंढे . गोंदिया-चंद्रपूर

Monday, November 30, 2015

जेव्हा शनि देवा वर शनि येते ---------?


शनि शिंगणापूर च्या मंदिरात महीलेने दर्शन घेऊन  नियमभंग केला आणि हा मोठा? प्रश्न   राष्ट्रीय पातळीवर पोहचविण्याचे कार्य भारतीय प्रसार माध्यमानी  केले ...
तेल,दुध, यांचे अभिषेक सुरु झाले

तेव्हा अनेक प्रश्न मनात उत्पन्न झाले...


१) असा काय गुन्हा केला त्या महीलेने?

२) ऐकलं होत की शिंगणापूर मधल्या घराना दार नाही . त्यांचे रक्षण शनि देव करतो, तर या महीलेच्या कृतिला देव का रोकू शकला नाही?

३) सुरक्षा रक्षकाना तिच्या क्रुत्यासंबंधी आज्ञा का दिली नाही?

४) नेहमीच लोक त्याच्या चरणी तेल वाहत असतांना कदाचित तेल डोळ्यात सुध्दा जात असेल , तेव्हा डोळ्यांत तेल टाकून सुध्दा देवाच्या कस लक्षात आल नाही?

५) देवानी आपली आचारसंहीता अशि स्ञी पुरुष भेदभाव करणारी का बनवली?

६) असं काय दोष आहे महीलांकडे की देवाच दर्शन घेवु शकत नाही?

७) असे दोष असतील ते देव काढून का टाकत नाही?

८) किंवा त्याच्या कर्त्या धार्त्याना तशी आज्ञा देत नाही?

९) शनि देवाला पुरुष एकाधिकारशाही  पसरवाची आहे काय? किंवा ती त्याला मान्य आहे काय?

१०)  तो ज्या मानव जाती वरचा शनि हटवितो. तिला जन्म घालणारी आई ती स्ञीच असतेना. आणी प्रत्येक पुरुषाला तिच दुध पाजतेना..... ती देवाचच काम करतेना...,    तरी तिचा एवढा विटाळ कसा रे देवा तुला?


देवा! माफ कर !! उत्तर देरे देवा  तुझं खरं  असेल तर...

देवा ! वेळ नसल्याने आता केवळ १० प्रश्न विचारतो.

बाकी नंतर ..,..नक्की विचारतौ पण....

डाँ प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर