Wednesday, April 26, 2017

श्रमपुञ ....

पिढ्या गेल्या कष्ट करता
या काळ्याश्यार मातीत.
म्हणून आम्हा अभिमान तयांचा
आम्ही जगतोय तयांच्या छातीत.

उधळू जीवन, जावू मातीत.
जगू तयांच्याच पंगतीत.
अभिमान आम्हा, याजन्मीचा
जन्मलोय कष्टकऱ्यांच्या जातीत.

घेवु शिक्षण ,घडवु जीवन,
प्रसंगी शोधू मोती मातीत,
प्रियजनांच्या भल्यासाठी
करू कष्ट दिवस राञीत.....

कष्ट हाच  देव आम्हा
सुसंस्कारलो याच रितीत
घडलोय, बिघडलोय जरी आम्ही
जगलोय सत्याच्याच संगतीत.

कष्टकरी हा धर्म आमचा.
कधी न विभागू कोण्या जातीत.
निर्धनांच्या घरातील कुबेर आम्ही ,
वाढलोय कष्टकऱ्यांच्याच प्रितीत..

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
डॉ . प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

Friday, April 21, 2017

वेदना शेतकरी विधवेची

काय धनी तुम्ही बी
किती केलं हलक मन.
भरल्या आयुष्यामंदी तुम्ही
संपविलं आपलं जीवन..

तुमचा जिव माझ्यासाठी
होतं मोठं माझं धन.
असला उभा शेतामंधी तरी
वाटत होत समृद्ध जीवन.

तुमच्या सोबत जगली बाप्पा
घेवुन आशेचा किरण.
आज जरी झोपली उपाशी
उद्या पूर्ण पोट भरणं..

वाटलं नव्हतं धनी
तुम्ही असं कधी करणं.
गळ्याला फास लावुन
मध्येच पत्कारालं मरण.

असा कसा हरालाय धनी
तुम्ही पहाताय का माझा पण?
मी आहे रणरागीनी
सोडणार नाही रण..

वावर, वखर, बैलजोडी
जपलयं तुम्ही धन,
तुमच्या वाचून राहवत नाही
जळतयं सुकलेलं तन...

पोरं तुमची तुकड्याभराची
करतात चिमणीवाणी मन.
बाबाशिवाय त्यांना बी
नकोसं झालयं जीवन.

कसं सांभाळू स्वतःला आता
वेदना होत नाही सहन.
कधी वाटतयं मुलांसह
रचावं आपलं सरण....


डॉ . प्रभाकर लोढे गोंदिया-चंद्रपूर

Thursday, April 13, 2017

बाबा तुम्हारी याद मे

बाबा तुम्हारी याद मे
हम तो दिवाने हो गये,
दिलसे तो छोडो पर
दिमाख से पुरे सो गये!!

शिखाया था बाबा आपने
हमको तरिका जिनेका,
ओ जिना तो शिखा हमने पर
आपका तरिका ही भुल गये,
अपने माँ बापको ही भुल गये!

बाबा हम तो जी रहे आज
मनुवादियोकी चपेट मे,
उनकाही जहर निगल रहे
हर एक घोट मे,
नकारा था जिन्होने हमको,
नमक उनकाही आज
ले रहे हम पेट मे !

कैसे बताऊ बाबा आपको
शरम आती है बतानेमे,
हम आपके विचारो को छोडकर
नामके ही  दिवाने हो गये.
विचारो के अनुयायी के जगह
नामके ही भक्त बन गये!!

आपनेही कहा था बाबा
मट्टीपर नही खुर्चीपर बैठो,
खुर्ची तो ले ली बाबा हमने,
पर खुर्ची का मतलब ही नही समझे.
खुर्चीपर बैठकर खुलेआम
आपनेही लोगोंको लुट रहे!

समझायी थी बाबा आपने
जनतंञ मे किम्मत ओट की,
एकही चिज है बडे काम की.
उसको मजबुत बनाने को
हक्कसे बोला था आपने,
अहमियत जानो ओट की,
समझ तो गये बाबा आपका,
पर उसकोही बेच के  हम
कमाने लगे रोजीरोटी रोजकी..!!

उध्दार करने बहुजनो का बाबा,
एक ही तो था आपका नारा.
जनतंञ ही है मंञ हमारा.
जनतंञ ने घेर लिया देश सारा
पर नही पा सके हम अधिकार हमारा...
-----------------------------------

डॉ .प्रभाकर लोंढे  गोंदिया-चंद्रपूर

Monday, April 10, 2017

मुक्तीदाता

मुक्तीदाता

तूच सत्यशोधक
तुच  मुक्तीदाता.
आम्हा बहुजनांचा
खरा तुच विधाता,

सत्य हाच परमेश्वर.
मानले तु भगवंता.
सत्यानेच वागावे
हाच तुझा नियंता.

तूच राष्ट्रपिता
तुच विद्यादाता
आम्हा बहुजनांचा
तुच खरा परम् पिता.

मानव विकासाठी शिक्षण
माणले तू आत्मा.
शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा
तुच खरा महात्मा .

डॉ . प्रभाकर लोंढे   गोंदिया-चंद्रपूर

Tuesday, February 28, 2017

जय महाराष्ट्र

माय मराठी

दऱ्या खोऱ्यातून गुंजे मराठी
सह्याद्रीच्या काठी.
मराठीचा महाराष्ट्र तो,
आता ओलांडेल  साठी..

मराठमोळा बाना अन
स्वाभिमान ज्याचे ओठी.
मराठी बोलेल जो,
जागेल महाराष्ट्रासाठी.

'म' मराठीचा सांगेल जो,
त्याची नसेल गोष्ट छोटी.
मराठी बाण्याचा माणूस तो,
जगेल मराठीसाठी.

प्रमाण मराठीच्या आसऱ्यात
बोली बदलतेय छोटी छोटी,
वऱ्हाडी, अहीराणी, कोकणी
अनं झाडीबोली नाही त्यात खोटी

शान, बान, मान मराठी
समृद्ध ती महाराष्ट्राची माती
भारतभूच्या कुशीत वाढतेय
शान महाराष्ट्राची मोठी ...

डॉ . प्रभाकर लोंढे, गोंदिया-चंद्रपूर

Monday, February 27, 2017

*बिघडली म्हणे पोरं....*
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

कानामध्ये हेडफोन दिसे
 जसा गळ्यामध्ये  दोरं...
दोरामध्ये अडकून बसला.
कसा राहीन त्यात जोरं.....
काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

गळ्यामंधी गळा घाले
रस्त्यावरं पोरी- पोरं .
समजत नाही काय खाव,
आंबट आंबा की बोर..
उडवून देवु म्हणे आता,
तंग जवानीचा बारं.....
काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

मोबाईल साठी पोरगं रडे,
सोडलं त्यानी सारं...
बाप म्हणे गेलं वाया,
बिघडून गेलं पुरं...
आता कसं होईन बाप्पा
सापडे ना त्याला सुरं....

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

मोठं स्वप्न पाहीलं होतं,
त्याला धाडीन  नागपूर .
माय म्हणे डोंगा डुबला,
राहीलं  स्वप्न अधुरं.
असं बोलताच मायेच्या
डोळ्यांत आला पूरं.....

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

मोबाईल मध्ये गुंग झाले
माय बाप अनं थोरं.
कुटूंबातलं सुञ संपल,
आँनलाईन झाल सारं.
कसे राहीन दूर आता
मोबाईलपासून पोरं.

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

नवरा म्हणे तुझं आता
हॉटस्पाट सुरु करं.
लाजून सन्या बायको म्हणे
तुम्ही राहू नका दूर.
जुळलं नाही तुमचं तं
कराल नक्की  कुरबुर...

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

मायबापाचं मायाजाल पाहून
पोर झाले ढोरं.
आदर भावना संपल्यानं
भासतात जनावर.
बाप झाला चिंतीत आता
म्हणे पाप झालं घोरं..
काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

उशीरा का होईना बापाची
आली अक्कल  ठिकाणावर.
जमणार नाही आता म्हणे
पोरं सोडून वाऱ्यावरं..
बायको म्हणे आपल्यामुळेच
वाया गेलं सारं.

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

आता सोडा सगळं तुम्ही
डेटा, इंटरनेट, सर्वर.
बिघडलेली पोरं पाहून
भरुन आला माहा उर...
रक्ताच्या नात्याला देवु
माया-प्रेम भरपूर ..

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

बायको म्हणे धनी,
मी आली भानावर.
वेळ नाही गेली अजून,
घडवू आपली पोरं .
पोरांच्या अधोगतीला,
आहोत आपणच जिम्मेदार...

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .

पोरांना पाहीजे अन्नपाणी,
माया अनं प्रेम भरपूर
मोहापायी मोबाईलच्या तू
सोडली पोरं वाऱ्या वर...
कळलं नाही काळजं आपली
गेली कधी दूरवर ...

काय जमाना आला भाऊ
बिघडले म्हणे पोरं .



Friday, February 24, 2017

*अव्यक्त प्रेम*
💞💞💞💞💞💞💞
स्पर्श होताच तुझ्या नयनाचा
कळले मज तुझे प्रतिबिंब .
राहील कसा अनभिज्ञ मी,
जाहलो हृदयातुनी ओलाचिंब.

अंतरीचा जखमी भाव माझा
जरी झालाय तुझ्यात बेधुंद,
विवेकाचा जिवंतपणा सांगे,
आता बरा नव्हे हा सुगंध .

झाला उशीर आता,
व्यक्त करण्या तुझे प्रेमबंध.
जग तू निवांत आता.
नको लिहू  खोटा प्रबंध .

दिवस गेले निघून सारे
कधी न कळला प्रेमाचा गंध  .
तु तुझ्यात, मी माझ्यात
स्वतःतच होवु दंग.