Thursday, May 17, 2018

महाराष्ट्रातील​ तिसरी आघाडी :: प्रस्थापित विरुद्ध विस्थापित..
-------------------------
डॉ. प्रभाकर लोंढे
-----------------------

महाराष्ट्रातील सत्ताकारणामध्ये​ संयुक्त पुरोगामी आघाडी व राष्ट्रीय लोकशाही आघाडी ला पर्याय म्हणून अलीकडे तिसरी आघाडी निर्माण होताना व जोरदार पाठिंबा मिळतांना दिसून येत आहे. आतापर्यत महाराष्ट्रातील संपूर्ण सत्ता पहिल्या दोन आघाड्यांमध्ये प्रमुख​ पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी शिवसेना या पक्षानींच उपभोगलेली आहे. या सर्व पक्षांची विचारधारा यापेक्षा कृती कार्यक्रम येथील विशिष्ट प्रस्थापितांना प्रस्थापित करणारा आहे.  त्यामुळे महाराष्ट्रात गेल्या सत्तर वर्षात प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी मोठी सामाजिक दरी निर्माण झालेली आहे.
         अशा  या परिस्थितीत असलेल्या महाराष्ट्रीयन लोकसमुदायाचे/ समाजाचे, कार्ल मार्क्स च्या मते "आहे रे (have's)"  आणि "नाही रे(have's not)" असे स्पष्ट वर्गीकरण करता येते. यातील "आहे रे" हा वर्ग नेहमीच सत्ताधीश तर "नाही रे" वर्ग नेहमीच सत्ताहीन राहिलेला आहे. त्यामुळे तो महाराष्ट्रात पॅकेज, मदतीच्या,  दयेवर, आशेवर उपेक्षित जगत आला व  जगताना दिसून येतो आहे. महाराष्ट्रातील​ कष्टकरी वर्ग, छोट्या-मोठ्या जातीं जमातीं या रूपाने  जगत  आहे.  हे वर्ग देशात लोकशाही व लोकशाही संविधान असतांना सुध्दा संविधानिक अधिकारांसाठी, सत्ताधारी (आहे रे) वर्गाकडून अपेक्षा  करीत उपेक्षित जगत आहेत. राजकीय सत्तेत प्रस्थापित असलेला आहे रे,  हा वर्ग संख्येने फार थोडा असून बहुसंख्य असलेला विस्थापित/नाही रे, हा वर्ग सर्वच बाबतीत वंचित राहिलेला आहे. ही स्थिती वरवर पाहता लक्षात येत नसली तरी लोकशाहीच्या तळाशी याचे भयान अस्तित्व लक्षात येते.  त्यामुळेच या महाराष्ट्रा पुरता विचार करता, महाराष्ट्रात लोकशाही पूर्णता रुजली आहे असे म्हणता येत नाही. हा विस्तापित वर्ग सत्ताहीन असल्याने विचारांने संघटित नसला तरी आज त्याला आपल्या शोषणा विषयी संपूर्ण जाणीव निर्माण झालेली आहे.
     असा तो महाराष्ट्रातील "आहे रे" वर्ग हा बीजेपी, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या माध्यमातून आतापर्यत नेहमीच सत्तेमध्ये राहिलेला आहे.  सत्ता प्राप्तीच्या दृष्टीने हा वर्ग या पक्षांच्या माध्यमातून नेहमी विकासाचा आशावाद, धार्मिक भावना, धार्मिक प्रश्न, वाद, जातीयवाद, दंगली, संप्रदायवाद, प्रादेशिकवाद, अंधश्रद्धा, अशा मुद्दांचा आधार घेतात, असे दिसून येते. या सर्व मुद्यांवर महाराष्ट्रातील संपूर्ण उपेक्षित/ नाही रे वर्ग भावनिक होवून या सर्व पक्षांच्या माध्यमातून प्रस्थापित/आहे रे वर्गानी आपल्या पाठीशी लावून ठेवलेला आहे. यांचे मतदान या चार पक्षांपेक्षा इतरांना जाणार नाही,  किंवा तसा इतर पर्याय निर्माण होणार नाही, याची वेळोवेळी​ प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काळजी त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आज पर्यंत यांच्या व्यतिरिक्त सत्ता इतरत्र गेलेली​ नाही.
                   राजकीय सत्तेचा वापर करून या वर्गाने स्वतःची केवळ सत्ताकेंद्र काबीजच नाही तर मजबूत केली आहे. या सर्वच पक्षांनी येथील सत्ता हस्तगत करून येथील, आहे रे वर्गाला त्यांनी संगनमताने प्रस्थापित केले आहे.
           यासाठी या पक्षांनी, विस्थापित, नाही रे वर्गातील काही तितरं (आपल्या उपेक्षित वर्गाचं/उपेक्षित जाती-जमातींच प्रतिनिधित्व करण्याचं सोंग करण्यात पटाईत असलेले, प्रसंगी प्रस्थापित वर्गाशीच बांधीलकी जपणारे) आपल्या हाताशी पकडलेले आहे. व त्यांच्या माध्यमातून हे पक्ष, नाही रे वर्गाला आपल्याशी बांधून ठेवण्याचा/ बांधीलकी जपण्याचा यशस्वी प्रयत्न करीत असतात. ही बाब विस्थापित/नाही रे वर्गातील जाणकारांना अलीकडच्या काळात लक्षात आलेली आहे.
        याच जाणिवेतून महाराष्ट्रात या वर्गात अस्मितेचे वारे वाहू लागले आहे. त्यातूनच तिसरी आघाडी जन्माला येण्याची पार्श्वभूमी तयार झाली.  यामुळे बारा बलुतेदारांची, उपेक्षित, वंचित, भटक्या-विमुक्त, दलित-आदिवासी, मुस्लीम, इतर मागासवर्गीय घटकांची राजकीय सत्तेसाठी महत्त्वाकांक्षा वाढली. त्यातूनच महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडी ची संकल्पना वास्तविक रूप धारण करू लागली. सामाजिक-राजकीय आराखडे, खलबते आखण्यास सुरुवात झाली. अनेक मतप्रवाह विचारप्रवाह असलेल्या विविध सामाजिक राजकीय संघटना या आघाडीमध्ये समाविष्ट होताना दिसू लागल्या. हा तिसऱ्या आघाडीचा प्रवाह नक्कीच प्रलयात रूपांतरित होईल, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. येणाऱ्या काळात ही आघाडी प्रस्थापित बीजेपी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या अनीतीमत्तेवर नक्कीच विजय मिळवेल, हा विश्वास  महाराष्ट्रातील एकूण वातावरण बघता लक्षात येते.
              येत्या 2019 च्या महाराष्ट्रातील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये  महाराष्ट्रात ही आघाडी सत्ताधारी बनेलच हे सांगता येत नसले तरी ती येथील राजकीय समीकरणे बदलविण्यास ती नक्कीच समर्थ ठरणार आहे. पिढ्यान् पिढ्यां गारद झाल्यानंतर उपेक्षितांमध्ये राजकीय सत्तेच्या आकांक्षा निर्माणच नाही तर वास्तवामध्ये स्वप्न साकार करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. उपेक्षितांच्या विकासाचे सोंग​ करणाऱ्या, स्ववर्गाच्या हितासाठी उपेक्षितांना त्यांच्या संविधानिक हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या, मुजोर अल्पसंख्यांक​ प्रस्थापित,आहे रे वर्गाला (ज्यांच्याकडे सर्वच आहे) हे समस्त उपेक्षित, नाही रे वर्ग(ज्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीही नाही ) लोकशाहीतील मतदान या शास्त्राच्या माध्यमातून आपल्या मतसंख्येच्या आधारे मोठा धक्का देणार आहे.

उपेक्षित एकता-- उपेक्षित भाग्यविधाता !!!

एकच ध्यास  --- उपेक्षितांचा राजकीय विकास
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

सत्ता अभंग

अवघे गरजे पंढरपुर
चालला मल्हार चा गजर!धृ!
सत्तेची आस घेऊन येती.
त्यात अहिल्येची मूर्ती.
पंढरपुरी जाहला हो.
ऐक्याचा गजर.

अवघे गरजे पंढरपुर
चालला मल्हारचा गजर.!धृ!

यशवंत-भीम घोष
कानी येती.
त्यात विठ्ठलाची मूर्ती.
स्वाभिमानी रंगले हो
चंद्रभागा तीर..

अवघे गरजे पंढरपुर
चालला मल्हारचा गजर.!धृ!

नैराश्य  हे
गळूनी जाती,
धनगराला या
प्रेरणा मिळती.
पंढरपुरी आले हो
स्वाभिमानी धनगर.

अवघे गरजे पंढरपुर
चालला मल्हारचा गजर!धृ!

-----------------------------------------
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर
९६७३३८६९६३
कर्तव्यदक्ष जवान

मी राष्ट्रसेवक
मीच खरा देशभक्त
राष्ट्रसेवेच्या अग्नीकुंडात
सदा अर्पितो माझं रक्त.

देश असो वा परदेश
सदा शत्रू कडेच लक्ष.
राष्ट्र कार्यातच दक्ष मी.
मात्र संसारातच दुर्लक्ष​.

राष्ट्रच माझं कुटुंब,
तेच जीवनाचे मर्म.
माणूसकीला जपणारे
सदा करतो मी कर्म.

राष्ट्रसेवा-जनसेवा
हाच मी मानतो स्वधर्म
सीमेवर लढतांना
फक्त जानतो राष्ट्रधर्म.

_________________________
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर
__________________________

Monday, May 7, 2018

*डॉ. महात्मे साहेब, एकदा खासदारकीच्या राजिनाम्याचा विचार करूनच पहा!*
-------------------------------------------
-------------------------------------------
(वाचकाने, ही माझी मागणी नाही विचारार्थ सुचना आहे.हे गंभीरपणे समजून घेवूनच वाचण्यास सुरूवात करावी. ही विनंती )

 समस्त धनगर बांधवानो! हे वाचून डॉ. साहेबांचे भक्त नाराज होतील. अनूयायी विचार करायला लागतील, विरोधक आनंदी होतील. तो त्यांचा प्रश्न आहे, पण एवढं नक्की  सांगतो,

१) या महाराष्ट्रातील व्यवस्था हालल्या शिवाय राहणार नाही. 

२) पंचवार्षिक मध्ये धनगराना काय दिलं याचा विचार सरकार व तुमचा बीजेपी पक्ष केल्या शिवाय राहणार नाही.

३) बीजेपीला जो आपल्या माध्यमातून धनगरांना मार्गाने लावल्याचा/  लावण्याचा विश्वास वाटतो आहे,  तो खंडित झाल्याशिवाय राहणार नाही.

४) आपण स्थापन केलेल्या  धनगर आरक्षण संघर्ष समीतीचे  बीजेपीशी काहीही देणेघेणे लागत नाही हे सिध्द होईल.

५) धनगर आरक्षण अंमलबजावणी साठी आपणास खासदार बनविलं की बी.जे पी पक्षासाठी हे सुद्धा स्पष्ट होईल.

६) खासदारकीचा राजिनामा दिल्याने धनगर समाजाचं किंवा डॉ. साहेबांचं  खूप काही खाजगी  नुकसान होईल असं वाटत नाही. पण आपण स्विकारलेला पक्ष, सरकार, व ही व्यवस्था यांच्यावर धनगर जमातीचा नक्कीच दबाव निर्माण होईल.

७)  धनगर आरक्षण अंमलबजावणी साठी धनगरानी ठरविलेला समाजनेता ही आपली मूळ भूमिका कायम राहील. व त्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे सिध्द होईल.

८) आपण खासदारकी सोडल्याने आपल्या कार्यशैली तसेच  कार्यक्षमतेत कमी होईल असे नक्कीच वाटत नाही.

९) आपण समाजासाठी विशेष नेञतज्ञ पद्मश्री डॉ विकास महात्मे  म्हणून सन्माननिय आहात व नेहमीच असाल. त्यापेक्षा मोठ काम आपल्या हातून खासदार म्हणून ही व्यवस्था किंवा सरकार किंवा बीजेपी पक्ष होवू देईल असं आजतरी  मला वाटत नाही.

१०) विदर्भात महाराष्ट्राचं सत्ताकेंद्र असतांना व सोबतच धनगरांनी बीजेपीला मते दिल्याने सरकार स्थापन झाल्यानंतर, विदर्भात धनगर खासदार असतांना आपल्या बीजेपी पक्षाकडून धनगरांचा खूप मोठा राजकीय  फायदा झाला आहे. असे वाटत नाही,

११) विदर्भातील एकाही महानगरपालिकेत (विशेषतः नागपूर/चंद्रपूर) आपल्या  बीजेपी पक्षाने एकही उमेदवार धनगर दिला नाही. (नागपूर म. पालिका स्विकृत सदस्यत्वासाठी काय झालं हे आपल्यालाच माहित आहे)

 १२) जिल्हा परिषद /पंचायत समिती साठी इच्छुक धनगर नेत्यांनी उभे राहू नये  यासाठी आपणावर किती दबाव आला होता, हे मी आपणास सांगण्याची गरज आहे असे मला वाटत नाही.

१३) आपल्या शब्दाचा/ खासदारकीचा मान राखून बीजेपी पक्षाने धनगर नेत्यांना उमेदवारी दिली, असं कधी लक्षात आलं नाही.

१४) आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या आमच्या  (डॉ. तात्या साहेब लहाने यांच्या तोडीचा)  नेञतज्ञाला आदर्श मेंढीफार्म स्थापन करायला लावण्यास (धनगरांनी मेंढ्याच राखल्या पाहीजे) हे सरकार यशस्वी झाले , ही या सरकारने धनगरांना दिलेली सर्वात मोठी देणगी मला वाटायला लागली आहे. याचा सुद्धा विचार करावा.

१५) माझ्या या सुचना विचारात घेतल्याच पाहीजे ही बळजबरी नाही. माञ न पटल्यास क्षमा असावी.

१६) अशा सुचना करण्याचा मला व्यक्तीगत काहीही अधिकार नाही. पण धनगरांची ताकद पाहून बीजेपी ने आपणास खासदार बनविलं, याची आपणास जाणीव असल्याने व मी केवळ धनगर जमातीचा राजकीय अभ्यासक एवढाच माझा अधिकार वापरून मी या सुचना केलेल्या आहे.

ही माझी सुचना केवळ धनगर जमाती संबंधाने त्यांच्या पक्षापुरती जबाबदारी डॉ साहेबांवर, डॉ. साहेबांचा दबाव आता केवळ बीजेपी पक्षावर निर्माण व्हावा. दबावातून संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर विदर्भातील तरी धनगर नेत्यांचा राजकीय विकास व्हावा. (विदर्भातील धनगर राजकीय सत्तेत नगन्य आहे)  एवढाच माझा निष्कलंकित हेतू आहे....

*जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!*

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
*आपलाच*
*धनगर बांधवांचा शुभचिंतक*
डॉ. प्रभाकर लोंढे
गोंदिया-चंद्रपूर
९६७३३८६९६३
एक धनगर -लाख धनगर

धनगर  बांधवांनो! (नेते,कार्यकर्ते)

१)काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी, शिवसेना हे राजकीय पक्ष धनगरांना उमेदवारीच देत नाही तर धनगरांनी या पक्षांमध्ये का रहावं.???

२) धनगरांनी या पक्षाना साथ का द्यावी? धनगर नेत्यांच्या शब्दाला मान देऊन सामान्य धनगरांनी या पक्ष्यांच्या नेत्यांना मतदान का करावे???

३) ज्यांनी गेल्या पासष्ट सत्तर वर्षात तुमचे घटनात्मक आरक्षण मिळू दिला नाही त्यांच्यासोबत राहून तुम्ही काय साध्य केलं???

४) या पक्षांमध्ये काम करणाऱ्या धनगर नेत्यांना कार्यकर्त्यांना तुमच्या माध्यमातून धनगरांचं राजकीय शोषण या पक्ष्यांनी केलं यापुढेही असेच होणार असेल तर तुम्ही त्यामध्ये का काम करावं????

५) धनगर नेत्यांनो तुमच्या या पक्षांनी तुमच्या असलेल्या निष्ठेमुळेच भूतकाळात धनगरांची राजकीय बरबादी झाली ती यापुढेही आपण सहन करणार आहात काय? आणि किती दिवस होऊ देणार आहात???

६) या पक्ष्यांमधील काही राजकीय नेते तुमच्या बाबतीत विरोधी भूमिका घेऊन मजुरी करतात त्यांना कधी तुम्ही धडा शिकवणार आहात काय???

७) तुम्ही स्वाभिमानी धनगर आहात ही बाब त्यांना कधी    लक्षात आणून देणार आहात???

८) ह्यापुढे आपल्या भूमिका स्पष्ट करून आपल्या पक्षात काम करणार आहात की नेहमीप्रमाणे use & through???

९) आपल्या अस्तित्वाची जाणीव पक्षांना करून देण्यासाठी आपण अजेंडे आखले आहेत काय??????

१०) यापुढे तरी आपल्या पक्षातून धनगरांना उमेदवारी मिळण्यासाठी यशस्वी प्रयत्न होणार आहेत का????

 (या प्रश्नांची उत्तरे स्वतःच स्वतःशी द्यावी ही विनंती)

धनगर राजकीय नेतृत्व आणि राजकीय जाणिवा जागृती चांगला अभ्यासक

                           डॉ.प्रभाकर लोंढे.
धनगर जमातीला योग्य राजकीय पर्यायाची प्रतिक्षा...

         महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाचा विचार केला असता जातीय राजकारण हा येथील राजकारणाला लागलेला अतिशय मोठा कलंक आहे. या कलंकाचे अनेक दुष्परिणाम आज महाराष्ट्रात दिसायला लागले आहे. त्यातीलच एक म्हणजे येथील धनगर सारख्या बहुसंख्य जमातीवर अनन्वित अत्याचार झाले आहे. राजकारणात निर्णायक मतसंख्या असलेल्या या जमातीला ना राजकीय सत्तेत वाटा वा शैक्षणिक सामाजिक प्रगतीसाठी अपेक्षित वातावरण मिळाले आहे. अज्ञान, अंधश्रद्धा, सदैव रानोमाळ भटकंती, परिणामतः वंचित घटक म्हणून जीवनात आलेली उपेक्षा. या बाबींमुळे येथील व्यवस्थेला त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज भासली नाही. प्रस्थापितांनी मात्र त्यांच्या  मतसंख्येच्या भरोशावर आपली सत्ताकेंद्र मजबूत केली. या  सत्ताधार्‍यांनी सत्तेचा अतिरेक एवढा केला की त्या आधारे धनगरांचे घटनात्मक अधिकार सुद्धा त्यांना मिळू दिले नाही.

     भारतीय संविधानाने  धनगरांना दिलेले घटनात्मक अनुसूचित जमातीचे आरक्षण महाराष्ट्रातील राजकारणाची समीकरणे बदलू शकते. प्रस्थापितांच्या अस्तित्वावर धोका निर्माण होऊ शकते. या भीतीपोटी या जमातीला राजकारणापासून हेतुपुरस्सर अलिप्त ठेवण्यात आले. याचा परिणाम ही जमात विकासापासून वंचित आहे, ही बाब लक्षात येताच या महाराष्ट्रात राज्यघटनेची कितपत अंमलबजावणी झाली यावरच प्रश्नचिन्ह उभे राहते.

      मात्र गेल्या पाच वर्षाचा विचार केला तर या जमाती मधील राजकीय अस्मिता प्रचंड जागृत झाल्याने त्यांच्यामधून आज अधिकाराची भाषा केली जात आहे हे उघडपणे लक्षात येते. इतिहासात राजकीय सत्ता गाजवणाऱ्या या जमातीला स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वांगीन​ शोषण तसेच सत्तेच्या विरहाने त्यांचे अनेक प्रश्न निर्माण झाल्याची तिव्र जाणीव या लोकांना आज झालेली आहे.

          महाराष्ट्राच्या तत्त्वहीन राजकारणात अपेक्षा ठेवत हक्काच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी या जमातीने अनेक आंदोलने केली परंतु हेतुपुरस्सर त्यापासून त्यांना वंचित ठेवण्याचे षडयंत्र या महाराष्ट्रात घडताना त्याना स्पष्टपणे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास केला असता लक्षात येते की बरेच वर्ष या महाराष्ट्रात राजकीय सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी या जमातीचा केवळ मतदानासाठी वापर करून घेतला यामुळे या जमातीमध्ये संतापाची लाट पसरली. त्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची चिड व 2014 च्या निवडणुकी प्रसंगी भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांसारख्या पक्षांनी या धनगर जमातीला दिलेली आश्वासने यावर विश्वास ठेवुन महाराष्ट्रात सत्तांतरामध्ये महत्वाची भूमिका या जमातीने बजावली.
            आजचे माझे बीजेपी प्रणित  सरकार धनगरांमुळे प्रस्थापित झाले आहे ही बाब मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः कबूल केली. मात्र ज्या आश्वासनाच्या आधारे हे सर्व घडलं, ती आश्वासने मात्र या सरकारने हेतुपुरस्सर कूटनीती तून मार्गाला लावली. मात्र या बाबीची प्रचंड चीड आज या धनगर जमातीतील तरुण व जागृत धनगर बांधवांमध्ये दिसून येते. ही चीड  उत्पन्न होणे सहाजिक आहे कारण ज्या आशेवर व लेखी आश्वासनांवर त्यांनी विश्वास ठेवला. त्यांनीच विश्वासघात केला. कुणाशी दगाबाजी न करणारी ही जमात या दगाबाजी ची बळी पडली. त्यामुळे आज महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह बीजेपी शिवसेना या महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची पण इभ्रत वेशीवर टांगल्या गेली .

    येत्या 2019 च्या निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले. प्रत्येकानी आपापले अंदाज बांधणे सुरू केले. रणनीती आखण्यास सुरुवात झाली. धनगर जमातीच्या ओटबँक संबंधाने विशेष योजना आखताना आता राज्य सरकार दिसत आहे. या जमातीचे कोणतेही प्रश्न न सोडवता हे राजकीय पक्ष या जमातीकडून मतदान घेता येईल यासाठी आपापल्या स्तरावर प्रयत्न करू लागले आहे. प्रत्येक पक्षामध्ये असलेल्या या जमातीचे नेते-कार्यकर्ते त्यासाठी काम करू लागले. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी, शिवसेना या पक्षाचे नेते, कार्यकर्ते या जमातीचा जखमी विश्वास संपादन करण्यात यशस्वी होईल असे वाटत नाही. कारण कारण संपूर्ण जमात यापेक्षा वेगळ्या पर्यायाच्या शोधात असल्याचे लक्षात येते.

आश्वासनावर विश्वास ठेवत जमातीची अख्खी पंचवार्षिक गेली.  (अपेक्षा, आश्‍वासनावर विश्‍वास, प्रतिक्षा व आपल्या माणसांचा मानसन्मान करण्यात....... ) ना सुटला आरक्षणाचा प्रश्न! ना सुटला नामांतराचा प्रश्न! वेळ मारून नेण्यासाठी केलेल्या हरकती, नेत्यांनी दिलेले स्टेटमेंट, प्रत्येक प्रश्नाला दिलेला राजकारण्याचा रंग, या सर्व बीजेपी सरकारच्या उपक्रमांमुळे जरी धनगर जमात आश्वस्थ असली तरी अंधविश्वास मात्र ठेवणारी राहीलेली नाही. राजकीय समीक्षा व सरकारी अजेंड्यांची सत्यता समजून घेण्याइतपत आज या जमातींमध्ये राजकीय जागृती निर्माण झालेली आहे. त्यामुळे समीक्षणात्मक दृष्टिकोनातून पावले टाकणे, हा या जमातीतील  जाणकार लोकांचा मनोदय दिसून येतो आहे.

अशा परिस्थितीत यात धनगर जमातीला जर वेगळा सक्षम असा राजकीय पर्याय मिळाल्यास ही जमात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय क्रान्तिकारी बदल घडवून आणू शकते. तशा प्रकारची मानसिक तयारी व मनोबल या जमातींमध्ये विकसित झालेले असून अशा सक्षम पर्यायांच्या शोधात ही जमात दिसून येत आहे. मात्र असा पर्याय उभारणे हा महाराष्ट्रात अशक्य जरी नसला तरी फार कठीण परिस्थितीतून तो उभा  राहू शकतो. त्यादिवशी महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे ही धनगर जमातीच्या हातून फिरल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असेल यात कोणीही शंका घेऊ शकणार नाही. त्यादृष्टीने विचार, नियोजन व अंमलबजावणी साठी शुभेच्छा!!!

--------------------------------------------------------
धनगर राजकीय नेतृत्व आणि जाणीव जागृतीचा अभ्यासक

डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर
9673386963