Sunday, May 19, 2019

सावधान! वंचित बहुजन आघाडीमध्ये घुसखोरी होत आहे.*

🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓
*(वंचित बहूजन दिन विशेष)*

 *सावधान! वंचित बहुजन आघाडीमध्ये घुसखोरी होत आहे.*

                        *डॉ प्रभाकर लोंढे*

              20 मे 2018 महाराष्ट्राच्या ऐतिहासिक राजकीय पटलावर एक महत्वपूर्ण दिवस म्हणून ओळखला जाणार याची चिन्हे दिसू लागली आहे. या दिवसाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. महाराष्ट्रातील स्वातंत्र्योत्तर काळात प्रस्थापित झालेली घराणेशाही व प्रस्थापितांच्या राजकीय षडयंत्राचा परिणाम म्हणून येथील अनेक जाती जमाती राजकीय प्रवाहापासून दूर फेकल्या गेल्या. आपल्या अधिकारापासून वंचित राहिल्या. सत्यता ही आहे की, काहींना तर हेतुपुरस्सर वंचित ठेवले गेले आहे. परिणामतः या महाराष्ट्रातील फार मोठा वर्ग अन्यायग्रस्त भावनेतून या दिवशी एकत्र आला. *यापैकी एक मोठा वर्ग म्हणजेच धनगर जमात* .
           या दिवशी महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर या सांस्कृतिक वारसा लाभलेल्या धार्मिक स्थळी अन्यायग्रस्त धनगर जमातीच्या पुढाकाराने बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्रातील राजकीय दृष्ट्या वंचित उपेक्षित जमातींचे अनेक नेते कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आले. विचार मंथनातून *राजकीय सत्ता संपादनाची भाषा आम्ही सुद्धा करू शकतो,* अशा प्रकारचा आत्मविश्वास व संदेश घेऊन घरी परत गेले. तिथून त्यांच्या अंतर्मनात निर्माण झालेली राजकीय सत्तेची आस येथील प्रस्थापितांचे आराखडे व झोप उडवणारे ठरले. वंचित बहुजनांवरील वर्षानुवर्षाच्या अन्यायग्रस्त भावनेला वाचा फोडणारी हक्काची राजकीय आघाडी व नेतृत्व लाभल्याचे समाधान अख्या महाराष्ट्रात व्यक्त होवू लागले. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी च्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. परिणामतः अख्ख्या महाराष्ट्रात या वंचित बहुजन आघाडीचीच चर्चा होऊ लागली. प्रसारमाध्यमांना सुद्धा अपेक्षित नसताना अपरिहार्यपणे यांना चर्चेत घ्यावं लागलं. जशी की सत्तेची समीकरणे बदलविण्यामध्ये ही आघाडी नक्कीच आपला प्रभाव दाखवणार. त्यामुळे प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना सुद्धा वंचित बहुजन आघाडी ला गृहित धरून आपली समीकरणे बदलावी लागली.
           महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती एवढी बदलली की, एकेकाळी टीका करणारे सुद्धा या वंचित बहुजन आघाडी कडे वळू लागले आहे.  बीजेपी-शिवसेने मधून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये किंवा रा.का- काँग्रेस मधून बीजेपी शिवसेनेमध्ये सत्तेसाठी पक्षांतर करणारे (गीरगीट) हे महाराष्ट्रासाठी नवीन नाही. परंतु या पक्षांमध्ये स्थान न मिळाल्यामुळे वंचित बहुजन आघाडी ला आपली आघाडी म्हणून मानणारे व विचारांसाठी नाही तर केवळ उमेदवारीसाठी वंचित बहुजन आघाडीमध्ये येणारे अनेक नेते आज वंचित बहुजन आघाडी च्या दारावर पादत्राणे झिजवितांना दिसत आहे.
               दिवसेंदिवस वाढतं वलय व राजकीय हालचाली पाहून काहींनी तर *बाळासाहेब आंबेडकर, हरिभाऊ भदे व अन्य धनगर नेते, असरउद्दिन ओवेसी* यांच्यावर अनेकांनी चांगलंच तोंडसुख घेतलेलं आहे. असो काहीही परंतु *वंचित बहुजन आघाडी ला फालतूपणा (माझ्याशी फोनवर बोलताना) म्हणणारे सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडी च्या तिकिटावर उभे राहिलेले मी पाहिले आहे.* त्यामुळे शिव्या खात का असेना निर्माण झालेली वंचित बहुजन आघाडी ही ताकदवान आहे. हे सिद्ध होते.
        *वंचित बहुजन आघाडी साठी सोशल मीडिया च्या माध्यमातून लिखाण करणाऱ्या लेखकांना सुद्धा काही महाभागांनी काही वेळा टारगेट केलेलं आहे.* वाईट याचं वाटतं की, यामध्ये पिढ्यानपिढ्या राजकीय दृष्ट्या पिचल्या गेलेल्या धनगर जमातीचे बीजेपी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी आपली वफादारी जपणारे *अनेक धनगर नेते, कार्यकर्ते आहेत* . परंतु त्यांना सुद्धा सत्य स्वीकारण्याची वेळ आलेली आहे.
           लवकरच तीन दिवसानी २३ मे ला लोकसभा निवडणुकीचे निकाल घोषित केले जाते. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येणारच असे जरी म्हणता येत नसले तरी एवढं मात्र नक्की की या आघाडीच्या उमेदवारांनी एकूण महाराष्ट्रात घेतलेली मतसंख्या ही विक्रमी राहणार आहे. त्यामुळे ही मतसंख्या लोकसभा निवडणुकी पेक्षा येत्या भावी काळात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आपला प्रभाव नक्कीच दाखवेल. याचे चित्र मात्र  लोकसभेचा निकाल स्पष्ट करणार आहे.
         याशिवाय हे वेगळे सांगण्याची गरज नाही कारण  अनेक संधीसाधू या वंचित आघाडी कडून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नांमध्ये दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडी मध्ये त्यांनी येऊ नये, असं कधीच कोणी म्हणणार नाही. कारण ही आघाडीच वंचितांची आहे, ज्यांना कुठेच राजकीय सत्तेसाठी थारा मिळाला नाही, उमेदवारी मिळाली नाही,  ज्यांचा नेहमीच प्रस्थापितांकडून वापर केला गेला आहे. अशां सर्वानाच या आघाडीमध्ये येता येईल. ( *येतांना मात्र केवळ स्वार्थाने नाही तर विचाराने या आघाडीमध्ये सामील व्हावे)* परंतु यांच्या येण्यामुळे वंचित बहुजन आघाडी चे *खरे आधारस्तंभ ज्यांच्या विचारातून, ज्यांच्या कृतीतून, ज्यांच्या सत्यवादी धोरणातून तन-मन-धनाने ही वंचित बहुजन आघाडी उभी राहिली, ते मात्र या आघाडीपासून वंचित होणार नाही,* याची काळजी फक्त घेतली जावी हीच या ठिकाणी अपेक्षा !!
      भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!

जय मल्हार

 *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Tuesday, May 14, 2019

धनगरानो ! खरंच .......दम असेल तर प्रस्थापितांविरुध्द लढा.*

🤺🤺🤺🤺🤺🤺🤺🤺🤺
*धनगरानो ! खरंच .......दम असेल तर प्रस्थापितांविरुध्द लढा.*             
                       
 *डॉ प्रभाकर लोंढे*

          *ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य असतं तोच स्वबळावर लोकाभिमुख राजा बनू शकतो.* असा संदेश आपल्या दैनंदिन जगण्यातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कर्तुत्वाचा नाही पण रक्ताचा वारसा सांगणारी जमात म्हणून धनगर जमात सर्वत्र ओळखली जाते. परंतु महापुरुषांना किंवा कर्तुत्वान पराक्रमी योद्ध्यांना कधीच कोणती जात नसते ना धर्म असतो. केवळ कर्माच्या भरोशावर ते लोकाभिमुख जगत असतात. त्यापैकी एक म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. त्यांनी आपल्याकडे असलेल्या सत्तेचा वापर जनकल्याणासाठी केला. परंतु अशा या लोककल्याणकारी सत्ताधिश राणीचा वारसा सांगणारी धनगर जमात आज मात्र सत्ताहीन झालेली आहे.
          आज लोकशाही असली तरी घराणेशाही प्रस्थापित झालेली आहे. धनगरांचे छोटे मोठे नेते संपवण्याच्या मागे प्रस्थापित लागले आहे. धनगरांमध्ये नवीन नेता निर्माण होणार नाही, याची काळजी सर्वत्र घेतली जात आहे. नवखा रोहित पवार असो की सुप्रिया सुळे असो किंवा पुन्हा कोणी यांना मात्र धनगर नेतृत्व संपवूनच मोठे व्हायचे आहे असं वाटायला लागले आहे. प्रस्थापित पक्ष कोणताही असो मात्र त्यांना धनगर नेतृत्व उभंच राहू द्यायचं नाही आहे. त्या पक्षांमधून वास करणारी एक अदृश्य शक्ती हे धनगरांच्या जीवावर उठले आहे, आणि ते सत्य आहे. ही बाब प्रत्येक धनगर नेता, कार्यकर्ता व सर्वांनी ओळखणे आवश्यक आहे.
            असं असताना धनगर नेते कार्यकर्ते यांना ते कसं काय कळत नाही हाच मोठा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. कदाचित ते कळत असलं तरी आचरणातून दिसत नाही हा त्यापेक्षाही मोठा प्रश्न आहे.  काही धनगर आपल्याच माणसांना ब्लॅकमेल करून खंडणी जमा करण्यात गुंग आहे. काही प्रस्थापितांची दलाली करताना दिसत आहे. काहींना तर धनगर नेतृत्वामध्ये आपले परस्पर शत्रुत्व दिसत आहे. काही आपल्याच धनगर नेतृत्वाची जिरवण्याची संधी शोधत आहे.. माझ्यापेक्षा तू कसा मोठा होणार नाही यासाठी प्रयत्न सुरू आहे. काही तर पोटजातीचे विष कालविण्यात मस्त आहे. काहीतर खाऊन पिऊन मस्त सुस्त झालेले आहे. या कामात धनगरांची खर्च होणारी शक्ती जर वाचली व संघटितपणे काम करून एकत्र आली तर हा धनगर या व्यवस्थेवर राज करू शकतो याची जाणीव येथील प्रस्थापितांना असल्यामुळेच ते या धनगरांच्या भांडणाच्या आगीत पुन्हा तेल टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत.
                अशा परिस्थितीत हे सर्व समजून न घेण्याइतपत येडी असलेली धनगर जमात आज कोणालाच अपेक्षित नाही, कोणालाच मान्य नाही, असं असताना हे असं का घडतं? याचा विचार करतांनाही फारसा कोणी दिसत नाही. आज योग्य संकेत आहे की धनगरांमध्ये नवीन स्वाभिमानी नेतृत्वाचा उदय होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. असे असताना जुन्या परस्परांमध्ये आपसात लढण्याच्या प्रवृत्ती धनगरानी सोडल्या नाही तर नवीन नेतृत्व सुद्धा निर्माण होण्याच्या आधीच ते संपल्या शिवाय राहणार नाही.
              आज धनगरांना आपसात नाही तर प्रस्थापितांशी लढण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संघटित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रस्थापितांचे मनसुबे ओळखून वाटचाल करण्याची गरज आहे. *महादेव जाणकार साहेब, राम शिंदे साहेब, दत्तामामा भरणे* अशा धनगर नेत्यांना संपवण्यासाठी प्रस्थापितांचे चाललेले षडयंत्र ओळखण्याची व एकत्र येऊन लढण्याची ही वेळ आहे. तेथे या नेत्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही तर तो धनगरांच्या अस्मितेचा प्रश्न आहे.  म्हणून तेथे पोटजाती आड येणार नाही, कोणाचा दुराभिमान आड येणार नाही, मात्र जातीय अस्मिता जपण्याच्या प्रयत्नांमध्ये परस्परांना सहकार्य करणे हेच आज प्रत्येक नेत्याचे व कार्यकर्त्याचे आद्य कर्तव्य आहे. धनगरांच्या एका नेत्यावर आलेलं संकट  परस्पर सहकार्याने सोडवण्याचे प्रयत्न करण्याची ही वेळ आहे. प्रस्थापित व्यवस्थेतील धनगरांचे असलेले विरोधक हेरून त्यांच्याविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आहे. राजकीय सत्ता हस्तगत करण्याची अपरिहार्यता आहे.
         तेव्हा खरंच धनगरांनो ! मनगटात दम असेल व स्वतःला सुभेदार मल्हारराव, पराक्रमी यशवंतराव व सर्वगुणसंपन्न अहिल्याई चे वारस मानत असाल तर प्रथमतः प्रस्थापितांशी लढण्यासाठी दंड थोपटा *. "अपने गली मे तो कोई भी शेर बनता है!* " म्हणून आप आपसांत विरोधक निर्माण न करता, परस्पर सहकार्याने प्रस्थापितांना आपला दम दाखवा. की ज्यांनी पिढ्यानपिढ्या तुमच्याशी वैरत्व करून तुमच्या पिढ्या बरबाद केल्या आहेत. लोकशाहीतील तुमचे घटनात्मक अधिकार/ हक्क यापासून तुम्हाला वंचित ठेवलेले आहे. एक वंचित उपेक्षित जमात म्हणून तुमचं अस्तित्वच धोक्‍यात आणलं आहे. हे सर्व त्यांना यासाठी शक्य झाले आहे, कारण आपण आपसात लढलो. आपण आपल्या माणसाला शत्रु समजत आलो. त्यामुळे खरा शत्रु आपण ओळखू शकलो नाही. आज आपण सर्वांना आपल्या शत्रुची ओळख पटलेली आहे. तेव्हा *आपल्याला पावले उचलायची आहे ती, केवळ सत्तेसाठी!*
*तर उठा!  लढण्यासाठी! परस्परांच्या हक्कासाठी!! भावी पिढ्यांच्या रक्षणासाठी!!*

जय मल्हार

 *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

दुसरा लेखसंग्रह

दुसरा लेखसंग्रह

Tuesday, April 9, 2019

साहेब! माझा सुध्दा पाठिंबा कसा काय जाहीर केला?

साहेब! माझा सुध्दा पाठिंबा कसा काय जाहीर केला?

             एक सामान्य धनगराचा प्रश्र्न..

   भारतीय लोकशाहीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे.  हे मतदान कोणाला करायचे? निवडणूकीत कोणी कोणाला पाठिंबा द्यायचा?  हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु  "मानिकराव ठाकरे यांना धनगर समाजाचा संपूर्णता पाठिंबा!* या नावाखाली पत्रके पाहून खरंच आश्चर्य वाटले.
 तेव्हा सामान्य धनगर म्हणून काही प्रश्न पडले कि,

१) धनगर समाजाचा सरसकट पाठिंबा कसा काय मिळाला?

२) असं कोणतं काम केलं कि, त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला?

४) यवतमाळ जिल्ह्यातील एकाही धनगर नेत्याला मोठं होवू न देणाऱ्या व्यक्तित्वाला धनगर समाजानी कसा काय पाठींबा दिला?

५) विशिष्ट लोकांनी संपूर्ण समाजाचा निर्णय घेण्याचा अधिकार अजूनही कसा काय संपला नाही?

३) वैयक्तिक फायद्यासाठी समाजाला विकण्याची प्रवृत्ती धनगर जमातीत अजूनही कशी काय जिवंत आहे?

६) अशा प्रकारचा लाचारीचा निर्णय समाजात स्वाभिमान निर्माण करणार आहे काय?

७) अशा प्रकारचा स्वाभिमान गहाण ठेवण्याचा तुमचा निर्णय  सामान्य धनगर लोकांनी का स्विकारावा ?

८) तो उमेदवार ज्या पक्षाचा आहे, त्या पक्षानी धनगर जमाती संबंधीचे कोणते चांगले निर्णय घेतले आहे?

९) त्यांच्या पक्षाने किती धनगरांना उमेदवारी दिली आहे?

१०) त्या उमेदवाराचा धनगर आरक्षणाच्या बाबतीत काय अजेंडा आहे?

११) त्यांनी धनगर आरक्षणाचा प्रश्न सभागृहात किती वेळ मांडला आहे?

१२) त्यांच्या भोवताल फिरणारे कोण कोण मोठे धनगर नेते? कशासाठी जमा झाले आहेत?

                    आमचा पाठिंबा पाहिजे असेल तर या प्रश्र्नांची उत्तरे आम्हा सामान्य धनगरापर्यंत येवू द्यावे. ही विनंती..

                               आपणचारात घेत नसलेला
                                आपलाच सामान्य धनगर बांधव

Wednesday, April 3, 2019

जयसिंग तात्यांचा त्याग समाजासाठी प्रेरक*

💐💐💐💐💐💐💐💐
*जयसिंग तात्यांचा त्याग समाजासाठी प्रेरक*

            डॉ. प्रभाकर लोंढे
_______________
 समाजसेवेच्या नावावर भोग भोगणारे नेते धनगर समाजामध्ये मागील काळात आणि विशेषतः जागृतीच्या पाच वर्षांमध्ये अनेक पाहिले असतील. प्रस्थापितांच्या शब्दांवर त्यांच्यासाठी आपल्या समाजाची/जमातीची बाजी लावणारे प्रसंगी एकांतात लिलाव करणारे धनगर नेते सुद्धा आपल्या निदर्शनास आले असतील. ते माफ करण्या पलीडचे आहे. *नाव घ्यायचे समाजसेवेचे आणि वैयक्तिक स्वार्थाचे, राजसत्तेचे* असे छुपे अजेंडे बाळगायचे, असे नेते सुद्धा आपण पाहिले असतील. परंतु *सेवा भोगात नाही तर त्यागात आहे व हीच खरी समाजसेवा असते,* याचा आदर्श जमाती समोर घालून देण्याचे कार्य प्रथमता जयसिंग तात्या शेंडगे यांनी केलेले आहे. एक दुसऱ्या साठी त्याग करण्याची  भूमिका आजच्या घडीला भूमिका सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
 जयसिंग तात्यांनी सामाजिक भावना, एकोपा, समाजहित लक्षात घेऊन घेतलेली माघार धनगर नेते, सामाजिक कार्यकर्ते व समस्त धनगर बांधवांसाठी मार्गदर्शक, दिशादर्शक व समाज सेवेच्या दृष्टीने आदर्श नमुना आहे.
एकीकडे धनगर जमातीला कोणी उमेदवारी देत नसताना वंचित बहुजन आघाडीने सामाजिक वातावरण बघून जयसिंग तात्यांना सांगली मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. ही उपलब्धीच जयसिंग तात्यांसाठी खासदारकीचा मार्ग मोकळे करणारी होती.   
                  *एखाद्या वंचित उपेक्षित बहुजनांना उमेदवारी मिळणे हे भारतीय लोकशाहीमध्ये किती दिव्य आहे,* हे संपूर्ण धनगर व उपेक्षित समाजाला कळून चुकले आहे. अशा परिस्थितीत सुद्धा हातात आलेल्या उमेदवारीचा सामाजिक भावनेतून परस्परांशी समन्वय, संगणमत व यशस्वी चर्चा करून सामाजिक दृष्ट्या योग्य तो निर्णय घेवून समाज बांधवासाठी त्याग करणे, हा मनाचा फार मोठेपणा आहे. धनगर समाजासाठी ती एक नवीन अत्याविषयक स्तुत्य बाब आहे. याचा पायंडा जयसिंग तात्यांनी पाडला व तो धनगर जमातीच्या राजकीय अस्तित्व निर्मितीसाठी दिशा देणारा आहे. शेंडगे परिवारातील आतापर्यंत झालेली परवड सुध्दा सुधारणारा आहे.
          *"धनगरी जत्रा आणि कारभारी सतरा"* ही धनगरांच्या बाबतीत असलेली उपहासात्मक सत्य म्हण जयसिंग तात्या शेंडगेनी खोडून काढण्याचा प्रयत्न स्वतः केलेला आहे. यामुळे सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून आवश्यक निर्णय घेण्याची सामाजिक प्रवृत्तीच समोर आलेली आहे. हा प्रयत्न कदाचित धनगरांच्या राजकीय समृद्धीतील  महत्त्वाचे पाऊल ठरु शकते.  अशा सामाजिक सत्प्रवृत्तीचा खऱ्या अर्थाने अंगीकार व पुरस्कार सामाजिक लेवलवर व्हावा हाच या लेखना मागचा कळीचा मुद्दा आहे.
    यापुढे  धनगर जमात आपली राजकीय पावले सूत्रबद्ध टाकण्यासाठी सक्षम झाली आहे. परिस्थितीनुरूप आवश्यक ते निर्णय घेण्यासाठी योग्य आहे ही बाब तो समाज प्रगल्भ झाला आहे, अशा प्रकारचा सामाजिक संदेश प्रस्थापितांपर्यंत पोहोचण्यासाठी जयसिंग तात्यांचा हा निर्णय ही अतिशय वाखाणण्याजोगा आहे. जयसिंग तात्या आपण यापुढे धनगरांच्या राजकीय हृदयासाठी आवश्यक असलेल्या समन्वयाचे मार्गदर्शक व दिशादर्शक असाल हा आपणास विश्वास देऊ इच्छितो.
प्रस्थापितांच्या नादी लागून भाऊ भावाचा काटा काढणारे धनगर नेतृत्व आपण सर्वांनीच पाहिले आहेत. काहींनी तर ते जवळून अनुभवले आहेत. *एक दुसऱ्याची जिरवण यामध्ये धनगरांनी किती सत्यानाश केला आहे* याचे उदाहरणे आपणा प्रत्येकाजवळ आहेत. परंतु स्वतःच्या हातात आलेली उमेदवारी, स्वतःच्या तोंडात आलेला घास आपला बंधू म्हणून गोपीचंद पडळकर सारख्या नवख्या नेतृत्वाला देणे ही जयसिंग तात्यांची भूमिका समस्त धनगर नेतृत्वाला, प्रगल्भ नेतृत्वाची, जमातीच्या पालकत्वाची भूमिका शिकवणारी, निभावणारी व भावी काळातील पिढी साठी आदर्श घालून देणारी आहे.
काहींच्या मते हा त्याग नगण्य असेल, परंतु वर्षानुवर्षांपासून उमेदवारी मिळतच नव्हती त्या जमातीसाठी उमेदवारी मिळणे व स्वत:ला मिळालेली उमेदवारी सामाजिक समीकरणे पाहून आपल्या समाज बांधवाला देणे ही कधी नव्हे ती फार मोठी त्यागाची गोष्ट आहे. आता गोपीचंद पडळकर सांगली मतदार संघातून खासदारकी मिळवून धनगर समाज व जयसिंग तात्यांना किती न्याय देते याकडेच सर्वांचे लक्ष राहणार आहेत. त्यासाठी त्यांना जयसिंग तात्याकडून समस्त धनगर समाज व माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा!! व पुढील सर्व निर्णय सामाजिक हिताच्या दृष्टीने सामाजिक भावना लक्षात घेऊन घेतील ही अपेक्षा

जय मल्हार साहेब

 एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

Saturday, March 23, 2019

सु. मल्हाररावांच्या जीवनातील प्रसंग नेत्यांना मार्गदर्शक!!!!*

🇮🇳🇧🇦🇧🇦🇧🇦🇧🇦🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇮🇳
*सु. मल्हाररावांच्या जीवनातील प्रसंग नेत्यांना मार्गदर्शक!!!!*
                 
           *डॉ. प्रभाकर लोंढे*

 भारतातील सर्वांत समृद्ध संस्थान चे संस्थापक व मराठाशाहीचे आधारस्तंभ थोर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जीवनातील प्रसंग आजच्या काळातील धनगर नेत्यांना मार्गदर्शक असून निवडणूक काळात यशस्वी निर्णय घेण्यासाठी अतिशय प्रेरणादायी आहे. असा तो प्रसंग पुढीलप्रमाणे आहे.
            छत्रपतीच्या आज्ञेनुसार बाळाजी विश्वनाथाने १९ जून १७१८ ला दिल्ली मोहीम सुरू केली होती. त्या मोहिम मध्ये मल्हारराव प्रथमच सामिल झाले होते. त्यांना पेंढारी च्या पथकासोबत कोणतीही रसद न देता सामिल करून घेण्यात आले होते. *(धनगरांची सामाजिक दुरावस्था)* त्यामुळे त्यांना स्वत:च्या वाटखर्चासाठी स्वत:च व्यवस्था करावी लागत होती.
      अशा परिस्थितीत फौजा दिल्लीत पोहोचल्या.  एका महालाच्या खंडणीचा ऐवज ठरविला गेला. पण अट फक्त एकच, महालाच्या परिसरातील गवत काडी, किंवा शेते यांची नासधूस करु नये. ही अट तशी मल्हारराव होळकरांकडून पालन होणे कठीण होते. शेवटी मल्हाररावांच्या स्वारांनी शेतातील पिके कापून आणून घोड्यांना खायला दिले. ही बातमी बाळाजी विश्वनाथ पेशवे कडे गेली. तोच त्यांचा सतरा वर्षं वयाचा मुलगा बाजीरावने रागात येवून मल्हाररावांच्या बारगीरास काठी मारली. हा प्रसंग पाहून मल्हाररावांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यावेळी संतापलेल्या मल्हाररावांनी हातात येईल ते *मातीचे ढेकूळ बाजीरावाच्या छाताडात हाणले.*
       याचा परिणाम बाळाजी विश्वनाथाने मल्हाररावांचा गोट दुसरे दिवशी लुटून घेण्याचा विचार केला. ही बातमी मल्हाररावांना कळताच त्यांनी धाडसाने आपले बारगीरांना सांगितले *, जे माझ्या मरणाच्या सोबत असेल त्यांनी राहावे आणि नसेल त्यांनी निघून जावे.* शेवटी फक्त बाविस सहकारी जवळ शिल्लक राहिले. त्या सर्वांना सोबत घेऊन *मल्हारराव सर्व तयारीनिशी टेकडीवर ढाल तलवार घेऊन जावून बसले.*
    या विषयीची माहिती मराठ्यांच्या सैन्यामध्ये असलेल्या  *पांढरे नावाच्या धनगर सरदारास मिळताच तो मल्हाररावांना येऊन भेटला आणि मल्हाररावांना त्यांनी धीर दिला. हिम्मत सोडू नको. हाटकर- खुटेकर धनगराचे बीज ज्याचे असेल तो तुजला सामील आहे, तुझी वाट ती आमची वाट आहे.(पोटजाती विसरा)*
        त्याच वेळी त्यांनी पेशव्याकडे जाऊन झाल्या प्रकाराचा निषेध केला व सांगितले, ठणकावले. सरदारी करू म्हणता आणि शिपायांची बरदास या प्रकारची!
 *तुम्हास ढेकूळ मारले तो तुमचे हरिपाचा(शत्रुचा) प्राण घ्यावयास कसा चुकेल, कदाचित धनगर मात्र त्यास सामील झाल्यास कसे पडेल?*
ही बाब पांढरे सरदाराने पेशव्याच्या निदर्शनास आणून देताच पेशव्यानी मल्हाररावांना लुटण्याचा विचार सोडून दिला. व त्याच्याशी दिलजमाई करण्यासाठी बाजीरावला सोबत घेऊन बाळाजी विश्वनाथ मल्हाररावांकडे पहाडीवर गेले. *तेथे मल्हाररावांना वस्त्रे देऊन 20000 रुपये नगदी पदरी घालून त्यांची घोडे ज्या गोटात गेली होती ती परत स्वाधीन केली. पुढे मल्हाररावानी पंचवीस घोड्यांची सव्वाशे घोडी केली.( स्वकर्तृत्वावर विश्वास)*
     काही दिवसांनी माघारी फिरताना *सिपरी कोल्हारस या ठिकाणी बाजीराव नाल्याच्या पाण्यात स्नान करीत असताना मल्हाररावानी बाजीरावास धडा शिकवण्याच्या दृष्टीने गराडा घातला आणि सरळ छातीला बाण लावला. तुझा वाली कोण? अशा शब्दांमध्ये त्याचा समाचार घेतला. त्यावर बाजीरावाने मल्हाररावांना भोजन करण्याचा आग्रह केला.( अपमानाचा बदला)*
परंतु मल्हाररावांनी नकार दिला. त्यावेळी बाजीराव बोलले. तुमची *आमची या अन्नाची क्रिया तूम्हाकडे स्वारी करणे समयी 5000 फौजेची सरदारी सांगू. (यशस्वी तडजोड)*
   अशाप्रकारे मल्हाररावांच्या *सरदारकी संबंधाने बोलण्याचे वचन बाजीरावाने मल्हाररावांना दिले.*
       हा प्रसंग मल्हाररावांना आदर्श मानणार्‍या प्रत्येक धनगर नेतृत्वाच्या स्वाभिमानी रक्ताला दिशा देणारा आहे. संपूर्ण प्रस्थापित व्यवस्था धनगर विरोधात असताना  धनगर नेत्यांना  राजकीय व्यवस्थेत आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यामधून खरंच खूप काही शिकण्यासारखे आहे. मात्र आम्ही आमच्या इतिहासापासून किती प्रेरणा घेतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
           यापुढे आम्ही इतिहासापासून प्रेरणा घेतली तरच आमचा राजकीय उदय होणार आहे. *युद्ध तलवारीचे असो की मतपेटीचे असो. नीती कौशल्य, विजूगिशी वृत्ती, स्वाभिमानी बाणा, संकट समय एक दुसऱ्याला साथ देण्याची वृत्ती.  एकात्मतेची भावना (पोटजातींचा विसर), शत्रूची अचूक ओळख, प्रसंगावधान, अचूक वेळ लक्षात घेऊन हीत साध्य करण्याची कला यासाठी मल्हाररावांच्या जीवनातील हा प्रसंग अतिशय मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे.*
       धनगर नेत्यांनी या प्रसंगाचा सहसंबंध आजच्या काळातील *लोकशाही व्यवस्थेच्या संदर्भात समजून घेवून पोटजाती विसरून शत्रूच्या विरोधात संघटित होऊन लढण्यासाठी हा प्रसंग सर्वांसमक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला आहे* ...


जय मल्हार साहेब

 एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

Friday, March 8, 2019

धनगरांनो! तुमची कितवी पिढी राजकारणात आहे??*

👨‍👦‍👦👩‍👦‍👦💥👩‍👧‍👧👨‍👦‍👦💥👨‍👧‍👧👩‍👦‍👦💥👩‍👦‍👦👨‍👧‍👦
*धनगरांनो! तुमची कितवी पिढी राजकारणात आहे??*

              *डॉ.प्रभाकर लोंढे*

भारतीय लोकशाहीच्या सत्तर वर्ष यशस्वी कालावधीत सत्तेच्या विकेंद्रीकरणा सोबतच अप्रत्यक्षपणे सत्तेचे केंद्रीकरण झाल्याचे निदर्शनास येते.  जातीय वर्चस्ववाद आणि त्यातून निर्माण झालेली घराणेशाही यामुळे अहंकाराधिष्ठित राजकारण व द्वेशाधिष्ठित प्रवृत्तीमुळे भारतीय लोकशाहीला भयंकर किड लागली आहे.
          ही किड इतकी भयंकर आहे की, त्यामुळे धनगर जमाती सारख्या अनेक जाती जमाती समुह सत्तेपासून कोसो दूर फेकले गेले आहे. तर दुसरीकडे विशिष्ट घराण्यांकडे सत्तेचे केंद्रीकरण  पिढ्यान् पिढ्या चालू आहे. या घराण्यांची दुसरी तिसरी, चवथी पिढी राजकारणात प्रवेश केलेली आहे. त्यांच्याकडे आर्थिक सत्तेचे सुध्दा केंद्रिकरण झालेले आहे. त्यावेळी येथील लोकशाही वर महाभयंकर प्रश्न निर्माण होतो.  येथे समताधिष्ठित लोकशाही, न्यायाधारित समाज केव्हा निर्माण होईल व कायदे सर्वांसाठी समान या मानसिकतेतून राज्यघटनेची संपूर्ण अंमलबजावणी होईल, अशी लोकशाही कधी प्रस्थापित होईल,? हा प्रश्र्न असतांनाच लोकशाही अंतर्गत  पोसली गेलेली घराणेशाही ही सुद्धा मोठी समस्या आहे. त्यापैकी उदाहरणार्थ
१) *नेहरू/गांधी- पंडित- इंदिरा- राजिव/सोनिया- राहूल/प्रियंका)*
२) *पवार - शरद- सुप्रिया/अजित- पार्थ,)*
३) *ठाकरे - बाबासाहेब- उध्दव/ राज- अमित)*
४) *महाजन - प्रमोद - पुनम*
५) *राणे -नारायण- नितेश/निलेश)*
 *६) मुंडे गोपीनाथ-पंकजा/प्रितम/धनंजय)*
७) *तटकरे - सुनील- मुलगा तटकरे)*
ही सर्वपरिचित उदाहरणे मी माहिती साठी घेतली आहे. आपणास माहीत असलेली अशी अनेक उदाहरणे लिहू शकता.
त्याचवेळी धनगर जमात बहुसंख्येने असतांना आपण या धनगर जमातीच्या किती घराण्यांची कोणती पिढी राजकारणात आहे, किती कायम टिकून आहे याचा आपण विचार करू...
१)शेंडगे- शिवाजीराव-प्रकाश/रमेश-????
२) डांगे- अण्णासाहेब- ?????????
३). देवकाते- आनंदराव----?????
४). जानकर- महादेव...??????
५) वडकुते - रामराव---??????
६) रूपनवर- रामहरी...????
७) भदे.- हरीदास----????
८)
९)
१०)
असे आपण आपल्या माहिती प्रमाणे नावे लिहू शकता. या सर्व नावांचा विचार केला तर त्यांची सर्वांची पहीलीच पिढी राजकारणात दिसते. किंवा काही राजकारणाच्या/सत्तेच्या बाहेर फेकल्या गेल्याचेही लक्षात येते. यांच्या पैकी बहूतांश लोकमताच्या आधारे निवडून आलेले नाही तर बहुतेक नेत्यांनी प्रस्थापितांच्या दयेवर म्हणजेच विधानपरिषदेत प्रतिनिधित्व मिळविलेले आहे/ नेतृत्व केलेले आहे. महाराष्ट्रातील घराणेशाही प्रमाणे त्यांची दुसरी पिढी प्रभावीपणे तर सोडा राजकारणात सक्रिय असायला हवी होती. परंतु तसे दिसत नाही. याचा अर्थ सर्व धनगर नेते कार्यकर्ता व सामान्य धनगर लोकांनी ही बाब समजून घेण्यासारखी आहे. मनाला लागण्यासारखी आहे.
परंतु कोण किती मनावर घेणार ही बाब धनगर तरूणांच्या संवेदनशीलतेवर अवलंबून आहे. त्यावरुनच पुढचे भवितव्य निश्चित होणार आहे.
       धनगर तरुणांनो! तुमचे भवितव्य, राजकीय अस्तित्व तुमच्या हातात आहे. तुमचा उज्वल राजकीय, सामाजिक भवितव्यासाठी आपली प्रथम पिढी राजकारणात उतरवा.  तुमच्या दहा पिढ्या सत्ता गाजवतील. ही बाब आपल्या ऐतिहासिक राजकीय वारसा वरून लक्षात येईल. आतापर्यंत आपल्या समस्या सोडविण्यासाठी दुसऱ्यांना विनंती केली. आंदोलने केली, प्रस्थापितांचे झेंडे, खुर्च्या उचलल्या.. परंतु आम्ही खुर्च्या मध्ये बसण्याचा विचारच केला नाही. आता आपण आपली पहिली पिढी सत्तेत बसवून *भारतीय लोकशाहीला धनगर रक्ताच्या राष्ट्रप्रेमाचा, सत्याधारित राजपटाचा वारसा देवू* ....  वारसा घडवू....
 *प्रस्थापितांवर टिका करत बसण्यापेक्षा आपणच प्रस्थापित होऊ....*

जय मल्हार!!!!!

 *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*