Saturday, August 24, 2019

निर्धार

निर्धार


समजून घ्या!
भा. ड. खावूनो!
तुमच्या दलाली ने
तुमच्या हजार पिढ्या
पोसल्या जाणार असल्या तरी,
अनेकांच्या जगण्याचे वांदे
निर्माण होणार असेल तर
तुमचा व आमचा धर्म वेगळा.
कारण गेचूडाच्या जगण्यात आता
गाईला कुठेच स्वारस्य राहिलेले नाही.

डॉ प्रभाकर लोंढे


लक्षवेध

लक्षवेध

पाजळ तुझी शस्त्रास्त्र
अन् येऊ दे त्यास धार.
एकवटून सारं बळ
नेम धरून अचूक कर वार.
होवू दे आर या पार.
चालेल एकदाची व्यवस्था
झालेली थंडगार.
पुन्हा एकदा सांगतो,
असेल तुझ्यात हिम्मत
तर न चुकता
तो कोथळा बाहेर काढ.
येथील विकारग्रस्त व्यवस्थेचा.
जिथे अनेक मुखवटे
पोसले आहेत खाण्यासाठी भाड.
मात्र हे करताना
एकच लक्षात ठेव,
तुला ते करायचं आहे
तर ते केवळ
निर्विकार समाज अन्
निष्कलंकित मानवी मनासाठी.

   डॉ प्रभाकर लोंढे

Thursday, August 15, 2019

धनगरांनो, असीरगड हिंदुस्थानचाच नाही धनगरांचा जिब्राल्टर

धनगरांनो, असीरगड हिंदुस्थानचाच नाही धनगरांचा जिब्राल्टर
                                   
                  डॉ प्रभाकर लोंढे

    "असीरगड" नावाचा किल्ला अनेकांना माहित असेल किंवा नसेल, काहींनी तो प्रत्यक्ष पाहिला असेल किंवा नसेल, परंतु या किल्ल्यापासून काय घ्यावं? हा अनेकांचा  मोठा प्रश्न असेल. काहींना तो महत्त्वाचा सुद्धा वाटत नसेल, तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र मी जेव्हा नुकतीच प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा एवढं नक्की लक्षात आलं की "असीरगड" धनगरांच्या कर्तुत्व, स्वाभीमान आणि गौरवशाली ऐतिहासिक परंपरांचा अप्रतिम वारसा आहे.
           "असीरगड" महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील रावेर पासून सीमेलगत मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथून वीस किलोमीटर अंतरावर आहे.  प्रचंड तटबंदी आणि समुद्रसपाटीपासून २५० फुट उंचीवर सह्याद्री पर्वत रांगांवर असलेला हा किल्ला "हिंदुस्थानचा जिब्राल्टर" म्हणून ओळखला जातो.
प्रचंड दरवाजा, तटबंदी तसेच तेथील पाण्याचे व्यवस्थापन व शत्रूपासून सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आलेली काळजी या सर्व गोष्टी ने परिपूर्ण असलेला हा किल्ला "आसा अहिर" नावाच्या पशुपालकांने बांधला होता असा उल्लेख ऐतिहासिक पुरावे तसेच भारतीय पुरातत्व विभागाच्या दस्तऐवजावरून लक्षात येते.
     कोण होता हा आसा अहिर? तो असा व्यक्ती होता ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणात पशुधन होते, त्या पशुधनाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने पंधराव्या शतकामध्ये त्याने या गडावर तटबंदी केली. तो तिथे राहू लागला. याशिवाय आसा अहिर हा धनगर होता हे सिद्ध होते कारण धनगरांमध्ये अहिर नावाची पोटजमात आहे. (आज प्रत्येक पोटजमात विसरली पाहिजे व केवळ धनगर म्हणून आपली ओळख जपली पाहिजे) आणि ती महाराष्ट्रातील जळगाव तसेच मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर या भागामध्ये प्रामुख्याने आढळून येते. पूर्वी भारतात प्रत्येकाला जातीच्या नावाने ओळखले जात होते. यावरून असीरगड चा निर्माता आसा आहिर व धनगर जमातीचा अगदी जवळचा संबंध आहे. त्यामुळे आशिरगड धनगरांच्या स्वाभिमानाचा व आत्मीयतेचा प्रश्न आहे.
          आसा अहिरच्या काळात या गडाचा विकास झाला. त्यामुळेच त्या गडाची कीर्ती सर्वदूर पसरली होती. त्यामुळेच त्याच्या नावावरून पुढे (आसा + आहिर + गड = असीरगड)  अशा प्रकारे हा गड पुढे असीरगड नावाने ओळखला जावू लागला.  किल्ल्याच्या विकासामुळे तो इतका नावारूपास आला की, सर्वांच्या आकर्षणाचा विषय बनला. त्याचे भौगोलिक स्थान सुद्धा एक महत्त्वपूर्ण असून त्याच्यामुळे उत्तर भारतातून दक्षिण भारतात राज करण्यास सोईस्कर होते.
          अतिशय मजबूत आणि विशालकाय म्हणून ओळख असलेला हा असीरगड किल्ला जगातील निवडक सुप्रसिध्द किल्ल्यांपैकी एक म्हणून ओळखला जात होता. हा किल्ला सहजपणे जिंकणे खूप कठीण होते. त्यामुळेच या किल्ल्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कोणत्याही कर्तबगार व्यक्तीने स्वबळावर जिंकलेला नाही.  ज्यांनी ज्यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्यांनी त्यांनी फंद फितुरी, पैसा, धोकेबाजी अशा मार्गानेच ताब्यात घेतलेला आहे. एवढा अपराजित कठीण गड "आसा अहिर" नावाच्या एका धनगराने बांधला. व नावारूपास आणला.
           पुढे या किल्ल्याचे महत्व एवढे वाढले की, हा किल्ला ताब्यात घेतल्या शिवाय कोणालाही दक्षिणेवर राज्य करता येणे शक्य नव्हते. म्हणून इतिहासकार या किल्ल्याला "बाब ए दख्खन" (दक्षिण द्वार) आणि "कलोदर ए दख्खन" (दक्षिण ची किल्ली) असा उल्लेख करतात.
              पुढे या गडाची कीर्ती इतकी पसरली की तो किल्ला म्हणजेच सर्वांच्या आकर्षणाचा व अधिपत्याखाली आणण्याची लालसा निर्माण करणारा ठरला. त्यातूनच सर्वप्रथम फिरोजशहा तुघलकाचा शिपाई मलिकचा पुत्र नासिर खा फारुकी ने आसा अहिर शी धोकाधडी करून हा किल्ला ताब्यात घेतला. त्यासाठी त्याने आसा अहिरच्या स्वभावाचा गैरफायदा उचलला कारण आसा अहिर उदार व्यक्तिमत्त्वाचा पराक्रमी पुरुष होता. दयाभाव हा त्याचा स्थायीभाव होता. ही बाब लक्षात घेऊन नासीर खा फारुकी ने कट रचला. व आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगून मला व माझ्या कुटुंबाला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून किल्ल्यामध्ये आश्रय द्यावा, अशी विनंती आसा अहिरला केली.  या विनंतीस आसा अहिर ने आपल्या स्वभाव गुणांनुसार परवानगी दिली. मात्र जेव्हा तो किल्ल्यामध्ये राहण्यास आला तेव्हा आसा आहिर व त्याची मुले नासीर खा फारुकीच्या स्वागतासाठी आली असता नासिर खा फारुकी च्या सहकाऱ्यांनी आसा अहीर व त्याच्या मुलांवर जोरदार हमला केला व मारून टाकले. अशाप्रकारे नसीर खा फारुकी ने फंदफितुरी व धोकाधडीने किल्ला आपल्या ताब्यात घेतला. त्याच्यानंतर आदिलशहा फारूखीने आपला कब्जा कायम ठेवला परंतु त्याच्या मृत्यूनंतर किल्ला निष्क्रीय अशा बहादूरशहा च्या ताब्यात गेला.
               तोपर्यंत मोगल सम्राट अकबराला सुद्धा या किल्ल्यासंबंधी आस निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी या किल्ल्याला सैन्यानिशी संपूर्णता वेढा दिला. सर्वत्र नाकेबंदी केली. परंतु सतत दहा वर्षे वेढा देऊन सुद्धा त्याला स्वतःच्या ताकदीवर तो किल्ला जिंकता आला नाही. तर दुसरीकडे त्या दहा वर्षात गडावर कोणतीही बाबीची कमतरता भासली नाही. यावरून आपल्याला गडाच्या समृद्धतेची कल्पना येते. शेवटी अकबराला सुद्धा हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी शूराला अशोभनीय बाबींचाच सहारा घ्यावा लागला व धोका धडी करून अकबराने बहादूरशहाला जखमी केले. त्याच्या मुलांसह त्याला बंदी बनवले व १७ जानेवारी १६०१ ला किल्ला आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर तो मराठ्यांच्या ताब्यात राहिला. नंतर इंग्रज व आता भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असल्याचे लक्षात येते.
           मराठेशाहीच्या काळामध्ये या किल्ल्यावर होळकरांचा ताबा असण्याची दाट शक्यता आहे. कारण येथे जे शिवमंदिर आहे त्या शिव मंदिराचे बांधकाम हे मराठेशाहीच्या काळातील वाटते. आणि होळकर हे शिव भक्त असल्याने या शिव मंदिराची स्थापना/ निर्माण होळकरशाहीच्या काळात झाली असावी असे त्या मंदिराचा कळस व एकूण बांधकामावरून मला वाटते. त्यासाठी पुन्हा संशोधन होण्याची गरज असून तोपर्यंत असीरगड किल्ला धनगर व्यक्तीला प्रेरणादायी असून प्रत्येक हरहुन्नरी व्यक्तिला कार्य करण्यास प्रवृत्त करणारा आहे. असतो पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली असला तरी त्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने कातून प्रयत्न करणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य ठरते.

(बाकी पुढील भागात)


जय मल्हार!!

एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Monday, August 5, 2019

दोस्ती

दोस्ती

उन दोस्तो की मैफिल मे
मै जिता जागता रहा हर दिन.
ऐसे भी मिले दोस्त
जो जी न सके मेरे बिन.
फिर भी एक दिन ऐसा आया
जो न था मेरा और न किसी का.
दोस्तो से होकर भी घेरा,
मै पड गया था अकेला.
मौत ने छिन लिया इसे,
ऐसा कह रहा था हर दोस्त मेरा.
पर कुछ नहीं कर पाया
बन गया था वो बेचारा.
मौन हो कर देख रहा था मै
वह मेरे दोस्त कि हालात.
सिर्फ मौत से ही बचा न सका था,
मुझे वो जिगरवाला दोस्त मेरा.


उन मेरे दोस्तो को सलाम
जो मेरे व्यवहार को नही
मेरी सोच को मानते है!
मेरी वाणी को नही
जीवन का बदलना जानते है!

Saturday, August 3, 2019

धनगरांनो! हे घ्या स्पष्ट दिशानिर्देश..*

🔜🔜🔜🔜🔜🔜🔜🔜🔜
*धनगरांनो! हे घ्या स्पष्ट दिशानिर्देश..*
                 *डॉ प्रभाकर लोंढे*

                नुकताच माझा *"धनगरांच्या दुर्गतीचे कर्तेधार्ते धनगरच!"* हा लेख प्रसिद्ध झाला. त्यामध्ये मूल्यमापनात्मक दृष्टिकोनातून विद्यमान धनगर सामाजिक - राजकीय परिस्थितीचे विवेचन करण्याचा प्रयत्न केला.  त्या लेखात भुतकाळासह वर्तमान परिस्थितीचे विवेचन करीत असतांनाच धनगरानी यापुढे काय केलं पाहिजे याचे अप्रत्यक्ष स्पष्टपणे दिशानिर्देश करण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी सामान्यातील सामान्य धनगराला ते समजावे यासाठी माझे मित्र *सोमनाथ गायकवाड (नाशिक)* यांनी त्यामध्ये सरळसरळ अधिक स्पष्टता आणण्याच्या प्रयत्न  करावा हा आग्रह केला त्यावरून हा लेखन प्रपंच करतो आहे.
              महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांच्या निर्णय प्रक्रियेत कोणताही धनगर नेता दिसत नाही. तसा नेता झाला नाही किंवा होऊ दिला गेला नाही असा सातत्याने आरोप आहे व तो सत्य आहे. याचा अर्थ आमच्या नेत्यांची *या पक्षांमध्ये केवळ वाहक हीच भूमिका राहिलेली दिसून येते.* हे वाहक नेते केवळ धनगर मतसंख्या या पक्षाकडे वळवण्याचे काम सतत करीत आलेले आहे. *त्याबदल्यात छोटे मोठे पद, आर्थिक लाभ मिळत गेले,* यामध्ये जमातीचे दिवस वाया गेले.  आज धनगर जमातीचं यापेक्षा वेगळं चित्र आहे, असे दिसत नाही. खोटी आश्वासने, फसव्या योजना,  यांच्या माध्यमातून धनगरांना खुष करण्याचा प्रयत्न सुरू आहे. व त्यातून सदा लाचार धनगर निर्माण करण्याचे कार्य केले जात आहे. व या प्रस्थापित पक्षांना हेच अपेक्षित आहे.
        त्या ऐवजी या प्रस्थापित पक्षांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. सत्तेचे मार्ग  चोखाळण्याचे प्रयत्न दिसत नाही. प्रस्थापित पक्षांपैकी कोणताही राजकीय पक्ष धनगराना २५ उमेदवार देतो, ५० देतो किंवा ७५ धनगर उमेदवार देतो, असं म्हणतानाही दिसत नाही.  *या पक्षांकडून जे धनगर नेते उमेदवारीची अपेक्षा करीत आहेत. त्यांना तरी उमेदवारी भेटेल की नाही ही शंका आहे. असो....  *हे प्रस्थापित पक्ष राजकीय सत्ता व सत्तेचे मार्ग(आरक्षण) सोडून तुम्हा धनगरांना सर्वच (सवलती, पैसा, हायमास्ट लाईट, समाज मंदिर) द्यायला तयार आहेत..  पुढे तशी परिस्थिती निर्माण झालीच तर ते आरक्षण(सवलती) (राजकीय सोडून) सुद्धा लागू करतील . पण सत्ता आपल्याकडेच ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करतील.* आणि वास्तविकता आहे की ही खरी बिमारी प्रस्थापित पक्षातील धनगर नेता समजून घ्यायला व सामान्य धनगरांना सांगायला तयार नाही. आणि सर्वांना हे माझं मत पटत असेल, खरं वाटत असेल तर कशाला आपण आपला वापर होवू देता?.  _*स्वर्गातल्या कोतवाला पेक्षा नर्कातला का होईना, राजा कधीही महानच असतो.*_
           वंचित बहुजन आघाडीने जशा १०० धनगरांना उमेद्वारी देण्याचे घोषित केले. _तशी घोषणा बि जे पी ने करावी. शिवसेनेने करावी, राष्ट्रवादीने, काँग्रेस ने करावी. त्यासाठी त्या पक्षातील धनगर नेतृत्वाने प्रयत्न करावे._ पण या राजकीय पक्षांमधून असं कधीही होणार नाही. झालं तर ते उत्तम व धनगरांच खूप मोठ यश राहणार आहे.  *धनगर कोणत्याही पक्षाकडून का असेना सत्तेत गेला पाहिजे. राजकीय  सत्तेचे मार्ग त्याला खुले झाले पाहिजे. त्याचे हक्क त्याला मिळाले पाहिजे. सामान्य धनगरांचे जगण्याचे प्रश्न सुटले पाहिजे,  धनगरांवरील अन्याय  थांबले पाहिजे.* आणि त्याआधी ``` ``` *आपल्याच माणसांकडून जमातीशी धोकाधडी थांबली पाहिजे.* एवढीच माझ्या सारख्याची अपेक्षा... *माझ्या सारख्या धनगरांच्या अपेक्षेप्रमाणे योग्य दिशानिर्देश....* ते तुम्हाला किती पटतात तो तुमचा प्रश्र्न..
?????????????????????

 *घ्या ना तिसरा पर्याय..... (वंचित - बहुजन)*

 *_जेणेकरून_*

१) धनगरांचा स्वाभिमान टिकून राहील.

२) प्रस्थापितांना तुम्हा धनगरांची जाणीव पण होईल

३) तुमच्याशी धोकाधडी करणारा सुध्दा आवश्यक ते  समजून जाईल.

४) हक्काची उमेदवारी पण मिळेल.... त्यासाठी मागत बसण्याची गरज नाही.

५) धनगर वेगळा राजकीय पर्याय निर्माण करू शकतो, अशी धनगरांची ताकद व्यवस्थेला समजून येईल.....

६) धनगर समाजाला इतरांचे नेतृत्व करता येईल.( मोठी जमात म्हणून)

७)  महाराष्ट्रातील अप्रत्यक्ष असलेल्या जातीय बेस राजकीय समिकरणात धनगर जमातीला दखलपात्र बनविण्यासाठी.

८) धनगर सारख्या राजकीय दारिद्र्य असलेल्या वंचित उपेक्षित जमातीची मोट बांधून सत्तेमध्ये त्यांचे नेतृत्व करण्याच्या संधी चा लाभ घेण्यासाठी.

९) धनगरांमधील तरूण नेतृत्व विकास व त्यांना तशाप्रकारची संधी उपलब्ध करून देण्यासाठी.

१०) बहूसंख्य असलेल्या धनगर जमातीला बहूसंख्य उमेदवारी मिळवून आपली बहूसंख्या सिद्ध करणे. त्याआधारे सत्तेत जाणे, सत्तेत जावून जमातीचे प्रश्र्न सोडविणे, आरक्षण अंमलबजावणी संबंधात न्यायालयीन लढाईत सरकारचे सकारात्मक सहकार्य मिळावे, सरकारवर धनगर जमातीचा दबाव राहतील, या करीता महाराष्ट्रातील सरकार निर्मिती प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणे.....

             उपरोक्त सर्व मुद्दे हे धनगर जमातीच्या राजकीय उध्दारासाठी माझा दृष्टिकोन व  सोमनाथ गायकवाड यांच्या अपेक्षेप्रमाणे स्पष्ट दिशानिर्देश करण्यासाठी आहे....  ते कोणावर बंधनकारक आहे असं कोणीही समजू नये.  इतरांचे यापेक्षा वेगळे दृष्टिकोन व दिशानिर्देश असू शकतात....  *_मात्र सर्वोत्तम दृष्टिकोनातून धनगर जमातीने आपली राजकीय वाटचाल करावी, राजकीय दरिद्रता संपुष्टात आणावी , एवढीच अपेक्षा.....*_


जय मल्हार!!

 *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
 ~डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३~

Wednesday, July 31, 2019

धनगरांच्या दुर्गतीचे कर्तेधार्ते धनगरच!

धनगरांच्या दुर्गतीचे कर्तेधार्ते धनगरच!

               डॉ प्रभाकर लोंढे

          वर्तमानात धनगरांची जेवढी राजकीय दुर्गती झाली आहे अशी दुर्गती इतिहासामध्ये कदाचित प्रथम झाली असेल. या दुर्गतीचे, आतापर्यंत झालेल्या अन्यायाचे दोषारोप ही जमात जरी इतर धूर्त माणसावर करीत असली तरी या आरोपात तथ्य नसल्याचे आज धनगरांनीच सिद्ध करून दाखवले आहे. "2014 मध्ये आरक्षणाच्या नावावर धनगरांची मते घेतली"  "विश्र्वासघात केला," असा आरोप माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला जातो आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस ने धनगरांना सत्तेपासून वंचित ठेवून धनगरांच्या सवलती मिळू दिल्या नाही.  किंवा धनगरांचा राजकीय नेता निर्माण होऊ दिला नाही, अशा प्रकारचा आरोप शरद पवार साहेबांवर केला जातो.( ते कदाचित खरे असावे) परंतु त्यामध्ये सुद्धा तथ्य नाही असे आज वाटायला लागले आहे. कारण धनगरांच्या नसा नसा त्यांनी ओळखल्या आहे.
                 हिंदी मध्ये एक म्हण आहे, "जब तक मुर्ख जिंदा है, तब तक अकलमंद मरता नहीं!" धनगरांवर अन्याय करून या धुर्त लोकांनी आपला राजकीय जिवंतपणा टिकवून ठेवला, यांचा अर्थ ते अकलमंद आहे. धनगरांवर त्यांनी राज केलं, अन्याय केला तेव्हा मी धनगरांना "मुर्ख" ठरवणार नाही पण त्यांचं त्यांनी ठरवावं. ते अकलमंद की मुर्ख...???  पण ते आज शाहण्या सारखे वागतांना सुध्दा दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या वरील अन्याय भविष्यात संपुष्टात येईल, असे म्हणता येत नाही.
           अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो. समूहातील एखादा फितूर झाल्याशिवाय समुहावर अट्याक करता येत नसतो. धनगरांमध्ये फितूरांची संख्या तर काही कमी नाही. इकडे त्याने अन्याय केला म्हणून बोंबलायचं आणि पुन्हा ज्याच्या बोंबाबोंब केल्या, त्याचेच भांडे चाटायचे. ही धनगर विचित्र प्रवृत्ती येथील धुर्तांनी ओळखली. म्हणून चाटू धोरणाचे पायिक धनगर त्यांनी ओळखले व आपल्या पाठीशी लावले. निसर्ग नियम आपणांस माहीत आहेच, भांडे चाटणारं जनावर मालकावर कधीच गुर्रावत नसतं. कारण ते खावून तृप्त झालेल असतं आणि त्याच्या एवढं दुसरं लाचार नसतं.
         शिवसेना-बीजेपी प्रणित फडणवीस साहेबांचं सरकार गठित झाल्यानंतर अनेक धनगरांनी निर्णायक मेळावे घेतले. अक्षरशः या सरकारवर अनेकांनी तोंडसुख घेतले. आरक्षण अंमलबजावणी केली नाही तर या सरकारला जगू देणार नाही. अशा प्रकारच्या घोषणा सुद्धा दिल्या. "या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय!" अशा प्रकारच्या महापराक्रमी निर्णायक घोषणा सुध्दा देण्यात आल्या. परंतु त्याच सरकारने धनगरांपैकीच आपल्या शुभचिंतकाच्या सहकार्याने पाच वर्ष बिंधास्त काढून घेतले. हे सरकार पुन्हा स्थापन व्हावे हे म्हणणारा एकही धनगर मिळणार नाही असं वाटत होते. परंतु तसं दिसत नाही.
             या सरकारच्या आशीर्वादाने जगणारी काही धनगर मंडळी उघड उघड जरी काम करीत नसले तरी शिवसेना- बीजेपी सरकार पुन्हा प्रस्थापित व्हावे, या भावनेतून धनगर मतसंख्या बीजेपी शिवसेना पक्षाकडे जावी, यासाठी अतोनात प्रयत्न करीत आहे. आरक्षण सोडले तर धनगरांना खूप काही या सरकारने दिलं, हे धनगर जनमानसामध्ये बिंबवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहे. "आदिवासी प्रमाणे कोणत्या? सवलती" हा मोठाच प्रश्न असतांना त्या निवडणूक काळात?? कशाप्रकारे?? या सर्व बाबी बाजूला सारून बीजेपी सरकारच्या
दातृत्वाच्या कहाण्या.. सामान्य धनगर माणसांना ऐकविल्या जात आहे. मात्र  आरक्षण अंमलबजावणीची मुळ मागणी संबंधी यांची वाचा बंद पडलेली आहे.
          धनगर जमातीला राजकीय दृष्ट्या सक्षम करण्यासाठी बीजेपीकडून राजकीय दृष्ट्या उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्नात आहे असे धनगर नेते लक्षात आले नाही. जे प्रयत्न करीत आहेत, त्यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत पण दिसत नाही. याचे कारण धनगरांमधून जनपाठींब्यावर नेता विकसित होणे कोणत्याही प्रस्थापित पक्षाला न आवडणारी सत्य बाब आहे.
        आरक्षणासह सामान्य धनगरांना काय काय मिळालं? हा खूप मोठा प्रश्न असला तरी काही विशिष्ट धनगर लोकांना कदाचित खूप काही मिळालं असेल, म्हणून ते पक्षानिष्ठेशी इतके बांधील आहेत की, त्यांना त्यांचे शब्द सुद्धा आठवत नाही. समाज गेला खड्ड्यात, आरक्षण जाऊ दे गड्ड्यात पण कसाही करून धनगर मत हे बीजेपी शिवसेनेला मिळालेच पाहिजे, याचा काहींनी चंगच बांधलेला दिसतो आहे. अशी भिष्म प्रतिज्ञा घेणारे कार्यकर्ते धनगर जमाती मध्येच मिळू शकतात. हे या पाच वर्षांत सरकारने ओळखलं आहे. हे झालं मागील पाच वर्षातील अन्यायाचं धनगर जमातीच फलित.
           दुसरीकडे शरद पवार साहेब व प्रियंका गांधी धनगर मेळाव्याला मार्गदर्शन करायला येणार आहे म्हणे. तेही धनगर नेत्यांच्या बोलावण्यावरून !! वाह, पराक्रमी धनगर नेत्यांनो.. जेवढं तुमचं ......  करावं  तेवढं कमीच आहे.
कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व त्यांच्या नेत्यांना शिव्या देत देत बीजेपी शिवसेनेला सत्तेत बसवलं. आणि आता हा "मार्गदर्शन सोहळा" लय अजब वाटला बा..
पवार साहेबांचे कोणते मार्ग अन् कुठले दर्शन घ्यायचं राहीलं राव!!  आयोजक धनगर नेते कोणती गुरुदक्षिणा देणार आहे की गुरूदिक्षा घेणार आहे हे अजून समलेलं नाही. एखाद्या हिंस्त्र प्राण्यांनी धनगरांच्या पिढ्या खावून फस्त केल्या, त्यांचं मार्गदर्शन या देशात केवळ धनगरच घेवू शकतात. त्यामुळेच कदाचित धनगरांना "येडे धनगर" म्हणत असावे.
          प्रियंका गांधी वड्राचं मार्गदर्शन ज्या धनगर नेत्यांना महत्त्वाचे वाटते, त्यांनी आपला राजकारणाचा व वयाचा अनुभव, महाराष्ट्रातील सत्ताकारण तपासून पाहिलं तर खूप बरं होईल. काही चूका होत असेल तर दुरूस्त करता येईल. असो काहीही पण या सर्व प्रकरणांनी काही धनगर नेत्यांचे छुपे अजेंड्यावर सर्वांचे लक्ष वेधले आहे हे नक्की.‌ काहींना तर या महाराष्ट्रात धनगरांवर एवढे अन्याय का होतात. याचे उत्तर सापडले.  "घर का भेदी लंका ढाये" ही हिंदी मध्ये म्हण आहे..... अशा घरभेद्यांनीच धनगरावर अन्यायासाठी प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष पोषक परिस्थिती निर्माण करण्याचे कार्य वेळोवेळी केलेले आहे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, धनगरांवरील अन्यायाचे कर्तेधार्ते केवळ धनगरच आहेत..... हे समजून घेत नाही तोपर्यंत बाकीच्यांना दोष देणे निरर्थक आहे.


जय मल्हार!!

एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Monday, July 29, 2019

ऱ्हास माणूसकीचा

ऱ्हास माणूसकीचा

जा माणसा जा,
तू 🌒 चंद्रावर जा.
मंगळावर जा.
पुन्हा जिथे जिथे जाता येईल,
तिथे तिथे अवश्य तू जा.
आलेली एकही संधी गमावू नको.
विश्वाच्या प्रत्येक कोपऱ्यात
तुझाचं झेंडा गाड.
आणि हिम्मत असेल तर
त्या सुर्यावर सुध्दा जावून पहा.
मात्र जिथे कुठे जाशील,
तिथे माणूस म्हणूनच रहा......