Wednesday, April 26, 2017

श्रमपुञ ....

पिढ्या गेल्या कष्ट करता
या काळ्याश्यार मातीत.
म्हणून आम्हा अभिमान तयांचा
आम्ही जगतोय तयांच्या छातीत.

उधळू जीवन, जावू मातीत.
जगू तयांच्याच पंगतीत.
अभिमान आम्हा, याजन्मीचा
जन्मलोय कष्टकऱ्यांच्या जातीत.

घेवु शिक्षण ,घडवु जीवन,
प्रसंगी शोधू मोती मातीत,
प्रियजनांच्या भल्यासाठी
करू कष्ट दिवस राञीत.....

कष्ट हाच  देव आम्हा
सुसंस्कारलो याच रितीत
घडलोय, बिघडलोय जरी आम्ही
जगलोय सत्याच्याच संगतीत.

कष्टकरी हा धर्म आमचा.
कधी न विभागू कोण्या जातीत.
निर्धनांच्या घरातील कुबेर आम्ही ,
वाढलोय कष्टकऱ्यांच्याच प्रितीत..

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
डॉ . प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

Friday, April 21, 2017

वेदना शेतकरी विधवेची

काय धनी तुम्ही बी
किती केलं हलक मन.
भरल्या आयुष्यामंदी तुम्ही
संपविलं आपलं जीवन..

तुमचा जिव माझ्यासाठी
होतं मोठं माझं धन.
असला उभा शेतामंधी तरी
वाटत होत समृद्ध जीवन.

तुमच्या सोबत जगली बाप्पा
घेवुन आशेचा किरण.
आज जरी झोपली उपाशी
उद्या पूर्ण पोट भरणं..

वाटलं नव्हतं धनी
तुम्ही असं कधी करणं.
गळ्याला फास लावुन
मध्येच पत्कारालं मरण.

असा कसा हरालाय धनी
तुम्ही पहाताय का माझा पण?
मी आहे रणरागीनी
सोडणार नाही रण..

वावर, वखर, बैलजोडी
जपलयं तुम्ही धन,
तुमच्या वाचून राहवत नाही
जळतयं सुकलेलं तन...

पोरं तुमची तुकड्याभराची
करतात चिमणीवाणी मन.
बाबाशिवाय त्यांना बी
नकोसं झालयं जीवन.

कसं सांभाळू स्वतःला आता
वेदना होत नाही सहन.
कधी वाटतयं मुलांसह
रचावं आपलं सरण....


डॉ . प्रभाकर लोढे गोंदिया-चंद्रपूर

Thursday, April 13, 2017

बाबा तुम्हारी याद मे

बाबा तुम्हारी याद मे
हम तो दिवाने हो गये,
दिलसे तो छोडो पर
दिमाख से पुरे सो गये!!

शिखाया था बाबा आपने
हमको तरिका जिनेका,
ओ जिना तो शिखा हमने पर
आपका तरिका ही भुल गये,
अपने माँ बापको ही भुल गये!

बाबा हम तो जी रहे आज
मनुवादियोकी चपेट मे,
उनकाही जहर निगल रहे
हर एक घोट मे,
नकारा था जिन्होने हमको,
नमक उनकाही आज
ले रहे हम पेट मे !

कैसे बताऊ बाबा आपको
शरम आती है बतानेमे,
हम आपके विचारो को छोडकर
नामके ही  दिवाने हो गये.
विचारो के अनुयायी के जगह
नामके ही भक्त बन गये!!

आपनेही कहा था बाबा
मट्टीपर नही खुर्चीपर बैठो,
खुर्ची तो ले ली बाबा हमने,
पर खुर्ची का मतलब ही नही समझे.
खुर्चीपर बैठकर खुलेआम
आपनेही लोगोंको लुट रहे!

समझायी थी बाबा आपने
जनतंञ मे किम्मत ओट की,
एकही चिज है बडे काम की.
उसको मजबुत बनाने को
हक्कसे बोला था आपने,
अहमियत जानो ओट की,
समझ तो गये बाबा आपका,
पर उसकोही बेच के  हम
कमाने लगे रोजीरोटी रोजकी..!!

उध्दार करने बहुजनो का बाबा,
एक ही तो था आपका नारा.
जनतंञ ही है मंञ हमारा.
जनतंञ ने घेर लिया देश सारा
पर नही पा सके हम अधिकार हमारा...
-----------------------------------

डॉ .प्रभाकर लोंढे  गोंदिया-चंद्रपूर

Monday, April 10, 2017

मुक्तीदाता

मुक्तीदाता

तूच सत्यशोधक
तुच  मुक्तीदाता.
आम्हा बहुजनांचा
खरा तुच विधाता,

सत्य हाच परमेश्वर.
मानले तु भगवंता.
सत्यानेच वागावे
हाच तुझा नियंता.

तूच राष्ट्रपिता
तुच विद्यादाता
आम्हा बहुजनांचा
तुच खरा परम् पिता.

मानव विकासाठी शिक्षण
माणले तू आत्मा.
शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा
तुच खरा महात्मा .

डॉ . प्रभाकर लोंढे   गोंदिया-चंद्रपूर