🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓
*(वंचित बहूजन दिन विशेष)*
*सावधान! वंचित बहुजन आघाडीमध्ये घुसखोरी होत आहे.*
*डॉ प्रभाकर लोंढे*
20 मे 2018 महाराष्ट्राच्या ऐतिहासिक राजकीय पटलावर एक महत्वपूर्ण दिवस म्हणून ओळखला जाणार याची चिन्हे दिसू लागली आहे. या दिवसाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. महाराष्ट्रातील स्वातंत्र्योत्तर काळात प्रस्थापित झालेली घराणेशाही व प्रस्थापितांच्या राजकीय षडयंत्राचा परिणाम म्हणून येथील अनेक जाती जमाती राजकीय प्रवाहापासून दूर फेकल्या गेल्या. आपल्या अधिकारापासून वंचित राहिल्या. सत्यता ही आहे की, काहींना तर हेतुपुरस्सर वंचित ठेवले गेले आहे. परिणामतः या महाराष्ट्रातील फार मोठा वर्ग अन्यायग्रस्त भावनेतून या दिवशी एकत्र आला. *यापैकी एक मोठा वर्ग म्हणजेच धनगर जमात* .
या दिवशी महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर या सांस्कृतिक वारसा लाभलेल्या धार्मिक स्थळी अन्यायग्रस्त धनगर जमातीच्या पुढाकाराने बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्रातील राजकीय दृष्ट्या वंचित उपेक्षित जमातींचे अनेक नेते कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आले. विचार मंथनातून *राजकीय सत्ता संपादनाची भाषा आम्ही सुद्धा करू शकतो,* अशा प्रकारचा आत्मविश्वास व संदेश घेऊन घरी परत गेले. तिथून त्यांच्या अंतर्मनात निर्माण झालेली राजकीय सत्तेची आस येथील प्रस्थापितांचे आराखडे व झोप उडवणारे ठरले. वंचित बहुजनांवरील वर्षानुवर्षाच्या अन्यायग्रस्त भावनेला वाचा फोडणारी हक्काची राजकीय आघाडी व नेतृत्व लाभल्याचे समाधान अख्या महाराष्ट्रात व्यक्त होवू लागले. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी च्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. परिणामतः अख्ख्या महाराष्ट्रात या वंचित बहुजन आघाडीचीच चर्चा होऊ लागली. प्रसारमाध्यमांना सुद्धा अपेक्षित नसताना अपरिहार्यपणे यांना चर्चेत घ्यावं लागलं. जशी की सत्तेची समीकरणे बदलविण्यामध्ये ही आघाडी नक्कीच आपला प्रभाव दाखवणार. त्यामुळे प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना सुद्धा वंचित बहुजन आघाडी ला गृहित धरून आपली समीकरणे बदलावी लागली.
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती एवढी बदलली की, एकेकाळी टीका करणारे सुद्धा या वंचित बहुजन आघाडी कडे वळू लागले आहे. बीजेपी-शिवसेने मधून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये किंवा रा.का- काँग्रेस मधून बीजेपी शिवसेनेमध्ये सत्तेसाठी पक्षांतर करणारे (गीरगीट) हे महाराष्ट्रासाठी नवीन नाही. परंतु या पक्षांमध्ये स्थान न मिळाल्यामुळे वंचित बहुजन आघाडी ला आपली आघाडी म्हणून मानणारे व विचारांसाठी नाही तर केवळ उमेदवारीसाठी वंचित बहुजन आघाडीमध्ये येणारे अनेक नेते आज वंचित बहुजन आघाडी च्या दारावर पादत्राणे झिजवितांना दिसत आहे.
दिवसेंदिवस वाढतं वलय व राजकीय हालचाली पाहून काहींनी तर *बाळासाहेब आंबेडकर, हरिभाऊ भदे व अन्य धनगर नेते, असरउद्दिन ओवेसी* यांच्यावर अनेकांनी चांगलंच तोंडसुख घेतलेलं आहे. असो काहीही परंतु *वंचित बहुजन आघाडी ला फालतूपणा (माझ्याशी फोनवर बोलताना) म्हणणारे सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडी च्या तिकिटावर उभे राहिलेले मी पाहिले आहे.* त्यामुळे शिव्या खात का असेना निर्माण झालेली वंचित बहुजन आघाडी ही ताकदवान आहे. हे सिद्ध होते.
*वंचित बहुजन आघाडी साठी सोशल मीडिया च्या माध्यमातून लिखाण करणाऱ्या लेखकांना सुद्धा काही महाभागांनी काही वेळा टारगेट केलेलं आहे.* वाईट याचं वाटतं की, यामध्ये पिढ्यानपिढ्या राजकीय दृष्ट्या पिचल्या गेलेल्या धनगर जमातीचे बीजेपी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी आपली वफादारी जपणारे *अनेक धनगर नेते, कार्यकर्ते आहेत* . परंतु त्यांना सुद्धा सत्य स्वीकारण्याची वेळ आलेली आहे.
लवकरच तीन दिवसानी २३ मे ला लोकसभा निवडणुकीचे निकाल घोषित केले जाते. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येणारच असे जरी म्हणता येत नसले तरी एवढं मात्र नक्की की या आघाडीच्या उमेदवारांनी एकूण महाराष्ट्रात घेतलेली मतसंख्या ही विक्रमी राहणार आहे. त्यामुळे ही मतसंख्या लोकसभा निवडणुकी पेक्षा येत्या भावी काळात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आपला प्रभाव नक्कीच दाखवेल. याचे चित्र मात्र लोकसभेचा निकाल स्पष्ट करणार आहे.
याशिवाय हे वेगळे सांगण्याची गरज नाही कारण अनेक संधीसाधू या वंचित आघाडी कडून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नांमध्ये दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडी मध्ये त्यांनी येऊ नये, असं कधीच कोणी म्हणणार नाही. कारण ही आघाडीच वंचितांची आहे, ज्यांना कुठेच राजकीय सत्तेसाठी थारा मिळाला नाही, उमेदवारी मिळाली नाही, ज्यांचा नेहमीच प्रस्थापितांकडून वापर केला गेला आहे. अशां सर्वानाच या आघाडीमध्ये येता येईल. ( *येतांना मात्र केवळ स्वार्थाने नाही तर विचाराने या आघाडीमध्ये सामील व्हावे)* परंतु यांच्या येण्यामुळे वंचित बहुजन आघाडी चे *खरे आधारस्तंभ ज्यांच्या विचारातून, ज्यांच्या कृतीतून, ज्यांच्या सत्यवादी धोरणातून तन-मन-धनाने ही वंचित बहुजन आघाडी उभी राहिली, ते मात्र या आघाडीपासून वंचित होणार नाही,* याची काळजी फक्त घेतली जावी हीच या ठिकाणी अपेक्षा !!
भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!
जय मल्हार
*एकच ध्यास --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
*धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३