🤺🤺🤺🤺🤺🤺🤺🤺🤺
*धनगरानो ! खरंच .......दम असेल तर प्रस्थापितांविरुध्द लढा.*
*डॉ प्रभाकर लोंढे*
*ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य असतं तोच स्वबळावर लोकाभिमुख राजा बनू शकतो.* असा संदेश आपल्या दैनंदिन जगण्यातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कर्तुत्वाचा नाही पण रक्ताचा वारसा सांगणारी जमात म्हणून धनगर जमात सर्वत्र ओळखली जाते. परंतु महापुरुषांना किंवा कर्तुत्वान पराक्रमी योद्ध्यांना कधीच कोणती जात नसते ना धर्म असतो. केवळ कर्माच्या भरोशावर ते लोकाभिमुख जगत असतात. त्यापैकी एक म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. त्यांनी आपल्याकडे असलेल्या सत्तेचा वापर जनकल्याणासाठी केला. परंतु अशा या लोककल्याणकारी सत्ताधिश राणीचा वारसा सांगणारी धनगर जमात आज मात्र सत्ताहीन झालेली आहे.
आज लोकशाही असली तरी घराणेशाही प्रस्थापित झालेली आहे. धनगरांचे छोटे मोठे नेते संपवण्याच्या मागे प्रस्थापित लागले आहे. धनगरांमध्ये नवीन नेता निर्माण होणार नाही, याची काळजी सर्वत्र घेतली जात आहे. नवखा रोहित पवार असो की सुप्रिया सुळे असो किंवा पुन्हा कोणी यांना मात्र धनगर नेतृत्व संपवूनच मोठे व्हायचे आहे असं वाटायला लागले आहे. प्रस्थापित पक्ष कोणताही असो मात्र त्यांना धनगर नेतृत्व उभंच राहू द्यायचं नाही आहे. त्या पक्षांमधून वास करणारी एक अदृश्य शक्ती हे धनगरांच्या जीवावर उठले आहे, आणि ते सत्य आहे. ही बाब प्रत्येक धनगर नेता, कार्यकर्ता व सर्वांनी ओळखणे आवश्यक आहे.
असं असताना धनगर नेते कार्यकर्ते यांना ते कसं काय कळत नाही हाच मोठा प्रश्न आज निर्माण झालेला आहे. कदाचित ते कळत असलं तरी आचरणातून दिसत नाही हा त्यापेक्षाही मोठा प्रश्न आहे. काही धनगर आपल्याच माणसांना ब्लॅकमेल करून खंडणी जमा करण्यात गुंग आहे. काही प्रस्थापितांची दलाली करताना दिसत आहे. काहींना तर धनगर नेतृत्वामध्ये आपले परस्पर शत्रुत्व दिसत आहे. काही आपल्याच धनगर नेतृत्वाची जिरवण्याची संधी शोधत आहे.. माझ्यापेक्षा तू कसा मोठा होणार नाही यासाठी प्रयत्न सुरू आहे. काही तर पोटजातीचे विष कालविण्यात मस्त आहे. काहीतर खाऊन पिऊन मस्त सुस्त झालेले आहे. या कामात धनगरांची खर्च होणारी शक्ती जर वाचली व संघटितपणे काम करून एकत्र आली तर हा धनगर या व्यवस्थेवर राज करू शकतो याची जाणीव येथील प्रस्थापितांना असल्यामुळेच ते या धनगरांच्या भांडणाच्या आगीत पुन्हा तेल टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अशा परिस्थितीत हे सर्व समजून न घेण्याइतपत येडी असलेली धनगर जमात आज कोणालाच अपेक्षित नाही, कोणालाच मान्य नाही, असं असताना हे असं का घडतं? याचा विचार करतांनाही फारसा कोणी दिसत नाही. आज योग्य संकेत आहे की धनगरांमध्ये नवीन स्वाभिमानी नेतृत्वाचा उदय होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. असे असताना जुन्या परस्परांमध्ये आपसात लढण्याच्या प्रवृत्ती धनगरानी सोडल्या नाही तर नवीन नेतृत्व सुद्धा निर्माण होण्याच्या आधीच ते संपल्या शिवाय राहणार नाही.
आज धनगरांना आपसात नाही तर प्रस्थापितांशी लढण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संघटित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रस्थापितांचे मनसुबे ओळखून वाटचाल करण्याची गरज आहे. *महादेव जाणकार साहेब, राम शिंदे साहेब, दत्तामामा भरणे* अशा धनगर नेत्यांना संपवण्यासाठी प्रस्थापितांचे चाललेले षडयंत्र ओळखण्याची व एकत्र येऊन लढण्याची ही वेळ आहे. तेथे या नेत्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न नाही तर तो धनगरांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. म्हणून तेथे पोटजाती आड येणार नाही, कोणाचा दुराभिमान आड येणार नाही, मात्र जातीय अस्मिता जपण्याच्या प्रयत्नांमध्ये परस्परांना सहकार्य करणे हेच आज प्रत्येक नेत्याचे व कार्यकर्त्याचे आद्य कर्तव्य आहे. धनगरांच्या एका नेत्यावर आलेलं संकट परस्पर सहकार्याने सोडवण्याचे प्रयत्न करण्याची ही वेळ आहे. प्रस्थापित व्यवस्थेतील धनगरांचे असलेले विरोधक हेरून त्यांच्याविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आहे. राजकीय सत्ता हस्तगत करण्याची अपरिहार्यता आहे.
तेव्हा खरंच धनगरांनो ! मनगटात दम असेल व स्वतःला सुभेदार मल्हारराव, पराक्रमी यशवंतराव व सर्वगुणसंपन्न अहिल्याई चे वारस मानत असाल तर प्रथमतः प्रस्थापितांशी लढण्यासाठी दंड थोपटा *. "अपने गली मे तो कोई भी शेर बनता है!* " म्हणून आप आपसांत विरोधक निर्माण न करता, परस्पर सहकार्याने प्रस्थापितांना आपला दम दाखवा. की ज्यांनी पिढ्यानपिढ्या तुमच्याशी वैरत्व करून तुमच्या पिढ्या बरबाद केल्या आहेत. लोकशाहीतील तुमचे घटनात्मक अधिकार/ हक्क यापासून तुम्हाला वंचित ठेवलेले आहे. एक वंचित उपेक्षित जमात म्हणून तुमचं अस्तित्वच धोक्यात आणलं आहे. हे सर्व त्यांना यासाठी शक्य झाले आहे, कारण आपण आपसात लढलो. आपण आपल्या माणसाला शत्रु समजत आलो. त्यामुळे खरा शत्रु आपण ओळखू शकलो नाही. आज आपण सर्वांना आपल्या शत्रुची ओळख पटलेली आहे. तेव्हा *आपल्याला पावले उचलायची आहे ती, केवळ सत्तेसाठी!*
*तर उठा! लढण्यासाठी! परस्परांच्या हक्कासाठी!! भावी पिढ्यांच्या रक्षणासाठी!!*
जय मल्हार
*एकच ध्यास --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
*धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

No comments:
Post a Comment