Saturday, October 26, 2019

धनगर जमातीत आता कोण यशवंतराव जन्माला येतो एवढेच बाकी..*

‌🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇
 *धनगर जमातीत आता कोण यशवंतराव जन्माला येतो एवढेच बाकी..*
  (हडपसर युद्ध दिनविशेष)

                    *डॉ प्रभाकर लोंढे*

                     महाराष्ट्र विधानसभा निवडणूकाचा निकाल, त्यापूर्वीचे प्रचार, त्यापूर्वीच्या जागावाटप, त्यापूर्वीच्या धनगर नेते- लोकांच्या सभा,  त्यापूर्वीचे धनगर नेतृत्वाचे स्वतःचे निर्णय, कदाचित कोणी त्यांना ...... सुद्धा म्हणतील. निर्णय कुठलेही असो त्या निर्णयाची यथार्थता निकालानंतरच कळत असते. कधी नव्हे तेवढे धनगर उमेदवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उभे राहिले. पण *निकाल काय तर .... सर्वांना माहीतच आहे.... लज्जास्पद!?*
          शेवटी धनगर बड्या नेत्यांचा पराभव, अख्या महाराष्ट्रातून एकमेव धनगर उमेदवार निवडून येणे, आ. महादेव जानकर साहेबांशी झालेली धोकाधडी, अशाही परिस्थितीमध्ये त्यांच्या पक्षाचा एक उमेदवार निवडून येणे.
             धनगरांच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या महत्वाच्या पदावर असलेले धनगर नेतृत्व, शंभर उमेदवारी देण्याची घोषणा करणाऱ्या वंचित बहुजन आघाडी ने धनगरांना २0 उमेदवारी देणे, ऐनवेळी वंचित बहूजन आघाडीकडून महत्त्वाच्या धनगरांना तिकीट नाकारणे, वंचित बहूजन आघाडीचे काही धनगर मातब्बर  रणांगणातच न उतरणे, वंचित बहुजन आघाडीने ऐन वेळेवर आपली संशयास्पद रननिती बदलविणे,  आ. *आ. हरिदासजी भदे* सारख्या प्रगल्भ राजकीय नेतृत्वाचा पराभव होणे व त्यासाठी समस्त प्रस्थापित एक होणे, धनगरांचा बुलंद आवाज व स्वबळावर किल्ला लढवितांना निसटता पराभव पत्करावा लागला असे ते *आ. अनिल अण्णा गोटे* बीजेपी व प्रस्थापितांना पुरून उरले नसले तरी जिगरबाज लढले. संपते की काय अशा परिस्थितीत गेले.
         *नारायण आबा पाटील* यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारणे, अपक्ष लढले असता थोड्याफार फरकाने पराभव पत्करावा लागणे, *आदरनीय राम शिंदे* साहेबांच्या विरोधात पवार घराण्याने उमेदवार टाकणे व राम शिंदे सारखा बीजेपी मधील मजबूत धनगर चेहरा असलेल्या धनगर नेतृत्वाला पराभव पत्करावा लागणे. धनगर आरक्षणाच्या नावाखाली खासदार झालेल्या *डॉ महात्मे* साहेबांच्या भावाला सुध्दा बीजेपीने उमेदवारी नाकारणे. धनगरांच्या मतांवर मजबूत झालेल्या बीजेपीने अख्या धनगर जमातीलाच कमजोर बनविणे.
        सलग अकरा वेळा आमदारकीचा विक्रम करणाऱ्या *आ. गणपत आबा देशमुख* यांचा वारसा संपुष्टात येणे,
धनगरांच्या पन्नास पोरांना आमदार करण्याची वल्गना करणाऱ्या *गोपीचंद पडळकरांनी* बीजेपीला शंभर दिवसात बेजार करून धनगरांना एसटी प्रमाणपत्र मिळवून देण्याचे नावावर धनगरांना मागे फिरवणे, शेवटी *बीजेपी व्हाया वंचित बहुजन आघाडीतून -बीजेपी मध्ये लोटांगण घेणे व बीजेपी म्हणेल तिथे म्हणजेच बारामती मध्ये उमेदवारी घेतल्याने स्वत:च डिपॉझिट जप्त होण्यापर्यंत धनगरांच्या इज्जतीची लत्करे वेशीवर टांगणे.*
          धनगरांना उमेदवारी मिळवून देण्याच्या नावाखाली वंचित बहूजन आघाडी धनगरांच्या पुढाकाराने सुरू झालेली असताना,  धनगर नेतृत्व निर्णय प्रक्रियेत असतांनाच २० धनगर उमेदवारांपैकी एकही उमेदवार निवडून न येणे.
           कोट्यावधी धनगरांचं विधानसभेत एकमेव प्रतिनिधित्व करणारे *आ्. दत्ता मामा भरणे* आमदार निवडून येणे, यामागे दत्ता मामांचं स्वतःचं वलय, स्वतःची कार्यशैली यासोबतच दौंड इंदापूर मध्ये *जानकर साहेबांचे* कार्यकर्ते बीजेपीवर नाराज असण्याचे परिणाम असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

     *या सर्व गोष्टींचा विचार करता पुढीलप्रमाणे बाबी समोर येते*

१) प्रस्थापितांनी धनगरांच्या राजकीय सत्यानाशाचा सुनियोजित कट केला होता.
२)धनगर उमेदवार व नेते सक्षम होणार नाही याची पुर्णतः दक्षता घेतली गेली होती.
३) धनगरांमध्ये असलेल्या -------आमिषाला बळी पडणाऱ्यांचा पुरेपूर वापर केला गेला आहे.
४) यापुढे धनगरांचा राजकीय लढा येथील धनगर विरोधी प्रवृत्तीशी लढणे आवश्यक आहे.
५) धनगर नेतृत्वाची ताकद भक्कम आहे. पण  नियोजन तसेच परस्पर समन्वय यांचा अभाव यामुळे ती नेहमी प्रमाणेच विभाजित झालेली आहे.
६) धनगरांच्या मतविभाजनाची काळजी सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे. त्यात वं. ब. आघाडीची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथ मिळाली आहे.
७) एकूण विचार करता धनगरांचा राजकीय खून केला गेला  आहे.
८) या निवडणुकीनंतर धनगर राजकीय अस्मिता धोक्यात आली आहे
९) धनगर अस्मितेवर गंभीर होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे
१०) आतातरी रडणं बंद करून लढाईला सुरुवात करण्याची वेळ आली आहे
११) खऱ्या अर्थाने यशवंतराव समजून घेवून पराक्रम गाजविण्याची वेळ आली आहे
          *_आजच्या (२५ आक्टोबर) दिनी थोर पराक्रमी यशवंतरावांनी हडपसर मध्ये आपला भाऊ विठोजीराव यांच्या खूनाचा व होळकरशाहीवर वाकडी नजर ठेवणाऱ्या पेशवे व शिंदेचा बदला घेतला.  (२४ आक्टोबर २०१९ ला आधुनिक पेशवे आणि मराठे यांनी यशवंतरावाच्या वंशजाचा सत्यानाश केला) आज भारतीय लोकशाहीच्या आखाड्यात धनगर नेतृत्वांचा खून केला गेला आहे.  हा यशवंतराव होळकरांच्या रक्ताचा अपमान आहे. म्हणून ही निवडणूक धनगर अस्मितेवर प्रश्न निर्माण करणारी आहे._*
              *यावर लोकशाही मार्गाने बदला घेणारा स्वाभिमानी यशवंतराव व स्वाभिमानी धनगर मावळ्यांचीच गरज आहे. त्यासाठी कर्मप्रधान स्वाभिमानी राष्ट्रप्रेमी यशवंतराव वाचणे, समजून घेणे अत्यंत आवश्यक व प्रेरणादायी असणार आहे.*

एकच ध्यास  --- धनगरांच्या मेंदूवर प्रकाश.
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

No comments:

Post a Comment