📚🖊️🖊️📚📖🖊️🖊️📚📚🖊️🖊️🖊️📚
*धनगरांनो! तुमच्या महापुरुषांना संकुचित/बदनाम का केलं गेलं?*
*डॉ प्रभाकर लोंढे.*
या महाराष्ट्राच्याच नाही तर संपूर्ण भारताच्या जडणघडणीत सर्वाधिक पराक्रमी सर्वगुणसंपन्न म्हणून नावलौकिक असलेले राजे/ राजकीय वंशांचा विचार केल्यास त्यापैकी बहुतांश धनगर वंशाचे आहेत असा उल्लेख करावा लागतो. हे *मी जातीय अस्मिता म्हणून नाही तर वास्तविकतेच्या आधारे बोलतो आहे.* (ज्यांना कुणाला यावर आक्षेप असेल त्यांनी थोडे इतिहासात डोकावून पाहावं ही विनंती) असे असले तरी मी येथे सर्व वंशांचा उल्लेख करणार नाही. परंतु याच शृंखलेतील *मराठा साम्राज्याचा आधारस्तंभ असलेले संस्थापक, सुभेदार मल्हारराव होळकर व त्यांच्यापासून सुरु झालेल्या होळकर वंशातील राजपुत्र खंडेराव, मालेराव, अहिल्याबाई होळकर, शूरवीर महाराजा यशवंतराव यांना इतिहासकारांनी शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा वारंवार बदनाम/संकुचित करण्याचाच प्रयत्न केलेला आहे* असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही.
*तेव्हा प्रश्न निर्माण होतं की असं का झालं???*
याचे उत्तर आपल्याला प्रथमतः
🖊️१) राजमाता अहिल्याबाई होळकर यांनीच दिलेलं आहे. " *आम्हा कडील लोकांची कामे यथास्थित होतात. परंतु उजेडात आणणार कोणी नाही. न होत्याचे उजेडात येते. असो दिवस असेच आहेत"* (महेश्वर दरबारची बातमीपत्रे पान-१९) याचा अर्थ तेव्हापासून असं चालत होतं आणि आजही ते बंद झालं आहे, असं म्हणता येत नाही.
*🖊️२) "होळकरांची कैफियत"* म्हणजे होळकर यांच्या पराक्रमाचा आलेख आहे. ती *भाऊसाहेबांच्या बखरीच्या तोडीची आहे, परंतु ती मागे पडण्याची दोन कारणे ये. ना. खेडकर यांनी आपल्या प्रस्तावना मध्ये दिलेली आहेत.*
*अ) मराठी इतिहासकारांनी शिंदे* होळकर घराण्याची वारंवार तुलना करून होळकरांची कृती सारी स्वार्थ मुलक तर शिंद्यांची कृती तेवढी सारी उदात्त, असे रंगवण्याचा प्रघात पाडला. यामुळे होळकर बदनाम झाले.
*ब) "भाऊसाहेबांची बखर" अप्रत्यक्षपणे पेशव्यांची बखर म्हणून प्रसिद्ध झाली, याला कारण लेखन कलेवर त्यांचे असलेले प्रभुत्व. ही बखर भाऊसाहेबांची बखर नावाने ओळखली जात असली तरी त्यामधून शिंद्यांचा उदोउदो करण्यात आलेला आहे.* (हे असं का झालं? याचा सर्वांनी विचार करावा). तुलनेने होळकरांच्या पराक्रमाच्या इतिहासाला, शिंदे व पेशव्यांच्या उदात्तीकरणाच्या दृष्टीने दडपण्याचाच किंवा बदनाम करण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो. *यामध्ये होळकरांचा इतिहास किंवा पराक्रम कमजोर होता हे कदाचित त्यांना सुद्धा मान्य होणार नाही. पण त्यादृष्टीने त्यांची लेखणी मात्र चालली नाही. याला कारण इतिहासामध्ये शिंद्यांपेक्षा होळकरांना श्रेष्ठ दाखवण्याची त्यांच्यामध्ये तेवढी हिम्मत नव्हती. यापुढे जाऊन त्यांची तशी नियत नव्हती असं जर कोणी म्हटलं तर चुकीचं होणार नाही. एकूणच मराठा साम्राज्यातील इतिहासाचे हिरो असलेले होळकर हे खलनायकाच्या भूमिकेत दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न झाला आहे.* त्यामुळे येथे आपल्याला संशोधनासाठी खूप मोठा वाव आहे ही बाब समजून घेतल्याशिवाय पुढचं कार्य करता येणार नाही.
🖊️ *३) माझ्या मते, साधारणता* समाजात जेव्हा एखाद्याची गुणवत्ता आपल्या लक्षात येते, तेव्हा त्याच्याशी स्वतःची तुलना करता आपण त्याची बरोबरी करू शकत नाही हे तो मान्य करतो,पण ते त्याला सहन होत नाही. तिथूनच तो त्या व्यक्तीच्या बदनामीला सुरुवात करतो. यामध्ये समोरच्याला बदनाम करणे हा त्याचा मुख्य उद्देश नसतो तर आपण त्यापेक्षा कमजोर दिसू नये एवढीच तो दक्षता घेत असतो.व त्याच्यासाठी त्याचा सर्व खटाटोप चाललेला असतो. हेच होळकरांच्या इतिहासाच्या बाबतीत झालेलं नाकारता येत नाही.
🖊️ ४) " *बोलक्याचे बोंड खपते, मुक्याचे मोती लपते"* ही एक म्हण आहे. ती होळकरांच्या इतिहासाला समर्पकपणे लागू होते. मराठी इतिहासकारांना वगळून इतर संदर्भ लक्षात घेता मराठी इतिहासकारांच्या इतिहास लेखनावर संशय निर्माण होतो. त्यामुळे होळकरांच्या इतिहासलेखनासंबंधी ची आत्मियता असणाऱ्या *इतिहासकारांची संख्या मोठ्या प्रमाणात असती तर कदाचित होळकरांच्या इतिहासाला न्याय मिळाला असता. होळकरांच्या इतिहासाला बदनाम होण्याची वेळ आली नसती.*
🖊️ *५) या चार बाबींबरोबरच ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की समाजातील जागृत लोकांचाच समाजावर, संस्कृतीवर, राजकीय व्यवस्था व अर्थव्यवस्थेवर नेहमी प्रभाव राहिलेला आहे. त्यामुळे लेखन सुद्धा त्याच अंगाने झालेल्या आहेत. तेव्हा प्रश्न निर्माण होतो कि, धनगर जमातीचे किती लोक इतिहास लेखनाच्या बाबतीत जागृत होते व आहे ??*
🖊️ *६) दैनंदिन जीवनात व्यक्ती म्हणून एखाद्या व्यक्तीच्या चुका होणे, ही बाब स्वाभाविक आहे. आणि जो कर्तुत्वप्रधान जगत असतो, त्यांच्याकडून तर चुका नक्कीच होतं असतात. त्यामुळे होळकर राजांकडून चुका झाल्या असेल तर ते नक्कीच कर्तुत्व प्रधान होते. म्हणून त्याच्या चुका दाखवत असताना त्यांच्या कर्तुत्वाची सुद्धा तेवढ्याच प्रगल्भ नजरेने मांडणी होणे आवश्यक आहे. पण ती होता ना किंवा झालेली दिसत नाही*
🖊️७) *इतिहास लेखन करताना आपण ज्याप्रमाणे होळकरांच्या इतिहासाविषयीची जे आत्मीयता दाखवतात* त्याप्रमाणे तत्कालीन मराठी इतिहासकारांना होळकरी इतिहासा पेक्षा पेशवे आणि शिंदे यांच्या इतिहासाशी जवळीकता वाटली असेल आणि त्यातून जर ते इतिहास लेखन झाले असेल तर त्यांना गुन्हेगार म्हणता येणार नाही. तर *तो आत्मियता असणाऱ्यांच्या निष्क्रियतेचा परिणाम असल्याचे मान्य व स्वीकार केल्याशिवाय गत्यंतर राहणार नाही.*
ही बाब सत्य असताना एखाद्याच्या नकळत झालेल्या चुकांचा अतिरंजितपणा किंवा राईचा पर्वत करून त्या व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची बाजू , व्यक्तिमत्वाचे विविधांगी समाजोपयोगी व कर्तबगार पैलू याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जाते तेव्हा *ऐतिहासिक दृष्ट्या त्या व्यक्तीत्वावर नक्कीच अन्याय होत असतो. आणि होळकर राजवंशाचे बाबतीत हे नक्कीच झालं आहे,* असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही.
आणि याची आपणास उशिरा का होईना *जाणीव झाली असेल तर इतिहास संशोधना बरोबरच इतिहास लेखन शिवाय तुमच्याकडे पर्याय नाही....*
*धन्यवाद*
------------------------------------
*धनगर राजकीय नेतृत्व आणि राजकीय जाणीव जागृतीचा अभ्यासक*
🖊️ *डॉ. प्रभाकर लोंढे*🖊️
९६७३३८६९६३