🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇
*राजपुत्र खंडेरावाचा मृत्यू संशयास्पद!*
*डॉ प्रभाकर लोंढे*
मराठेशाहीच्या इतिहासामध्ये होळकर संस्थान बलाढ्य संस्थान म्हणून सर्वपरिचित होतं. होळकरशाहीचे संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर यांचा खुद्द पेशवे तसेच इतर सरदार यांचेवर तसेच अखंड भारतामध्ये सर्वत्र दबदबा होता. मल्हाररावांना विश्वासात घेतल्याशिवाय पेशवाईतील कोणताही निर्णय होत नव्हता. अशा या महान सुभेदारांचा एकुलता एक मुलगा खंडेराव यांना इतिहासामध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो. त्या इतिहासाची वास्तविकता सत्तेच्या आधारे पुढच्या काळामध्ये सार्वत्रिक करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तत्पूर्वी *खंडेरावांचा कुंभेरीच्या युद्धामध्ये मृत्यू झाला तो काही संदर्भांवरून संशयास्पद वाटतो.*
सुरजमल जाट कुंभेरीचा किल्ला बळकावून बसला होता. त्यावेळी पेशवा रघुनाथराव, जयाजी शिंदे व मल्हारराव होळकर यांनी कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला. तसा हा किल्ला जिंकण्याचा आग्रह सुभेदार मल्हाररावांचाच होता. त्यावेळी *रघुनाथराव व जयाजी शिंदे होळकरांच्या सोबत असले तरी आतून ते जाटांसोबत मिळाले होते.* त्यामुळे ते होळकरांना मदत करीत नव्हते. व ते स्पष्ट दिसत होते.
तत्पूर्वी मल्हारराव होळकर यांचा पुत्र *खंडेराव होळकर चारशे स्वरांच्या पथकासोबत दिल्ली स्वारी आटोपून जानेवारी १७५४ च्या आरंभी होडाळ येथे आपला तळ ठोकून बसला होता.* जाट वाड्यातील जाटांची त्यांच्या केंद्रापासून दूर असलेली ठाणी उठवून लावण्याचे कामावर तो होता. (कदाचित हा मल्हाररावांचा युद्धनीतीचा भाग असावा) असे असताना या पथकाने आता कुंभेरी च्या वेढ्यात येऊन सामिल व्हावे, असा पिताश्री मल्हारराव कडून त्याला आदेश मिळाला. त्याप्रमाणे खंडेराव होळकर कुंभेरीच्या वाटेने निघाला. वाटेत मेवातचे ठाणे लुटून तो कुभेरीला पोहोचला.(इथे प्रश्न निर्माण होतात की,
*१) मल्हाररावांना कुभेरीच्या वेढ्यात खंडेरावांना का बोलावावं लागलं?*
*२) जयाजी शिंदे व रघुनाथराव पेशवे त्यावेळी काय करीत होते?*
एकाकी लढा देत असताना कुंभेरी चा प्रदेश रेताळ असल्याने लांब पल्ल्यांच्या तोफांची आवश्यकता मल्हाररावांना वाटली. त्याची पूर्तता व्हावी म्हणून दिल्ली दरबार कडे *तोफांची मागणी केली परंतु दिल्ली दरबारने ती नाकारली. (दिल्ली दरबारातील गोंधळ शांत करण्यासाठी आपल्या मुलाच्या(खंडेराव) नेतृत्वात सेना पाठवणाऱ्या मल्हाररावांना दिल्ली दरबार/ बादशाहाने ही मदत का नाकारली? हा येथे मोठा प्रश्न निर्माण होतो)*
त्यावेळी जाटां विरुद्ध लढण्यासाठी इमाद उल- मुल्क तसेच अकितब यांना मल्हाररावानी बोलावून घेतले. बोलण्यावरून ते लढ्यात सामील झाले. *खंडेराव सुद्धा नेटाने लढत होते. अतिशय बिकट परिस्थिती असताना खंडेरावांनी किल्ल्याच्या तटा पर्यंत झाकलेल्या भुयारा सारख्या खंदकातून जाणाऱ्या निरुंद वाटा तयार केल्या होत्या व तो किल्ल्याच्या तटा पर्यंत जाऊन पोहोचला होता.* हा खंडेरावाचा इतिहास खंडेरावांवर आक्षेप घेणाऱ्यांसाठी अतिशय चपराक देणारा आहे.
सुरजमल जाट कुंभेरीच्या किल्ल्यात दबा मारून बसला होता. पेशवा रघुनाथराव व जयाजी शिंदे वेढयात उपस्थित असले तरी त्यांचे सहकार्य मिळत नव्हते. ते दोन्ही आतून सुरजमल जाटाशी जवळीक साधून होते. (नंतरच्या काळात रघुनाथराव पेशवा जाटाशी तह करून २२ मे १७५४ ला कुंभेरीची छावणी मोडून निघून गेला.) त्यामुळे कुभेरीचा संपूर्ण लढा होळकरांना लढावा लागला.
*मल्हारराव आणि खंडेराव यांचेकडून सर्वतोपरीने लढा सुरू असताना त्यांना जाटा सह अंतर्गत विरोधाचा सुद्धा सामना करावा लागत होता. अन्नाशिवाय पोट भरणे व शस्त्राशिवाय युद्ध जिंकणे कठीण जाते. कुंभेरीच्या रेताळ प्रदेशावर लढण्यासाठी होळकर पिता-पुत्रांना लांब पल्ल्याच्या तोफा जर बादशहा किंवा कुठून मिळाल्या असत्या तर कदाचित कोणत्याही परिस्थितीत होळकर मराठा साम्राज्याचा झेंडा कुभेरीवर फडकला असता.*
होळकर पिता पुत्राचे जिकरीचे प्रयत्न सुरू असतानाच *१५ मार्च १७५४ ला खंडेराव जेवणानंतर खंदकाची पाहणी करण्यासाठी गेले असता अचानकपणे किल्ल्यावरून तोफांचा मारा सुरु झाला.* जंबरुकचा एक गोळा लागून *खंडेराव मारला गेला* .... एकुलता एक खंडेराव मृतप्राय झाला याची माहिती कळताच मल्हारराव देहभान विसरले. या सर्व प्रकारात कुंभेरीचा लढा अर्धमेला झाला खरा. तरी त्याठिकाणी अनेक प्रश्न निर्माण होतात. १. *) खंडेराव खंदकाची पाहणी करण्यासाठी गेले असता किल्ल्यावरून अचानक तोफांचा मारा कसा काय झाला?*
*२) सुरजमल जाटाशी संबंध जोडून असलेल्या जयाजी शिंदे व खुद्द रघुनाथराव पेशवे यांनी मल्हाररावांचा काटा काढण्यासाठी सुरजमलला माहिती पुरवून खंडेरावांचा मृत्यू घडवून तर आणला नाही ना?*
परिस्थिती काहीही असो, खंडेरावाच्या मृत्यूने मल्हारराव पुर्णतः खचून गेले होते. अशाही परिस्थितीत *रघुनाथराव व जयाजी शिंदे पातशहाचा दबाव दाखवून जाटांशी मेळ घालण्यासाठी मल्हाररावांना बोलू लागले. दबाव टाकू लागले.* परिस्थितीने अगतिक असलेले मल्हारराव एकीकडे मुलाच्या मृत्यूच्या दुःखाने व्याकुळ होते. तेव्हा मल्हारराव उदास होऊन *जयाजी शिंदे व रघुनाथराव पेशवे यांना बोलले "आपण धनी व शिंदे मुखत्यार सरदार, सांगाल ती चाकरी करू!* असे उद्विग्न होवून मल्हारराव बोलले व कोणतीही पूर्वसूचना न देता खंडेरावाच्या मृत्यूचे उत्तरकार्य निमित्त मथुरेला निघून गेले..
*मुलाच्या मृत्यूचे दुःख पचवून बाहेर येणार नाही तो सुभेदार मल्हारराव कसला?* खंडेरावाचे उत्तर कार्य आटोपून मल्हाररावांनी मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्याची प्रतिज्ञा घेतली." _*सूरजमल जाट याचे शिरच्छेद करीन व कुंभेरीची माती यमुनेत टाकीन. तरीस जन्मास आल्याचे सार्थक, नाही तर प्राण त्याग करिन."*_
यावरून आपल्याला मल्हाररावांना पुत्रमृत्यूचं किती दुःख झालं होतं, हे लक्षात येईल. *यावेळी मल्हाररावांचं दुःख एकट्या मल्हाररावांचं न राहता सर्व मराठा सरदारांचं व ज्यांचं अस्तित्व मल्हाररावाच्या तलवार व भरोशावर निर्माण झालं होतं त्या पेशव्यांना व्हायला पाहिजे होतं. परंतु तसं झालेलं दिसत नाही.* (याचा अर्थ खंडेरावाच्या मृत्यू संबंधाने संशयास जागा आहे) *सर्व मराठा सरदार व पेशवे यांनी एकत्र येऊन मल्हाररावांवर आलेला प्रसंगाचा बदला घेण्यासाठी त्यांना साथ द्यायला पाहिजे होती. सर्वांनी मिळून सुरजमलला धडा शिकवायला पाहिजे होता. परंतु तसं झालेलं दिसत नाही.*
मात्र मल्हाररावांच्या प्रतिज्ञेने तिकडे सुरजमल जाट पूरता घाबरून गेला होता. त्याने *जयाजी शिंदे कडे आपल्या वकिलामार्फत पगडी व पत्र पाठवून, माहिती मिळेल त्या मार्गाने बचाव करावा, अशी विनंती केली. त्यावर जयाजी शिंदेनी जाटाना बेलभंडार व अभयपत्र पाठवले. दोघेही पगडी बंधू बनले. जयाजी शिंदेनी जाटाची बाजू घेतली व संरक्षणाची हमी दिली.*
यावेळी प्रश्न निर्माण होतो
१) सुरजमल जाटानी जयाप्पा शिंदेनाच संरक्षण का मागितले?
२) जयप्पा शिंदेना खंडेरावाच्या मृत्यूचं दुःख झालं नव्हतं काय?
३) मल्हाररावांच्या दुःखाशी जयप्पा मराठा सरदार म्हणून त्यांच काही नातं नव्हतं काय?
४) खंडेरावाचा मृत्यू संगनमताने तर झाला नव्हता ना?
५) रघुनाथरावानी "पेशवा" या नात्याने मल्हारराव च्या बाजूने उभे न राहता जाटाशी तह करण्याचा आग्रह का धरला?
६) या दोघांना मल्हाररावांपेक्षा जाट जवळचे का वाटले?
*असे अनेक प्रश्न निर्माण करून*
*कुंभारीचा लढा संपला.*
खंडेराव मारला गेला.
पराक्रमी मल्हारराव काही अंशी खचला.
*पण हा सर्व प्रकार मला संशय निर्माण करून गेला, की, खंडेरावाच्या मृत्यूमागे येथील प्रवृत्तीचा तर हात नव्हता ना??*
(सत्यता तपासणीच्या दृष्टीने लेख आपणास पाठवित आहे)
------------------------------------
*डॉ. प्रभाकर लोंढे*
*९६७३३८६९६३*

No comments:
Post a Comment