Thursday, December 3, 2015

माझा दैनिक देशोन्नती ला पाठविलेला लेख



🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

अखेरचा सार्वभौम राजा ; राष्ट्रीय स्वातंत्र्याचे प्रणेते-- महाराज यशवंतराव होळकर ..

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात शिवरायानंतर आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवून इंग्रजा विरूद्ध राष्ट्रीय प्रेरणा जागृत कराणारा महाराजा यशवंतराव होळकर भारतीय  इतिहासात शेवटचा सार्वभौम राजा ठरला. पराकोटीची नेतृत्व क्षमता असणाऱ्या या महायोध्दा व राज्यकर्त्याची ३ डिसेंबर ला जयंती पार पडली. त्यानिमित्य त्यांच्या कार्यकर्तुत्वास कोटी कोटी.प्रणाम .......

महाराजा यशवंतरावाना त्याच्या युद्ध कौशल्य व धाडसी वृत्ती तसेच सैनिकांच्या खाःद्याला खांदा लावुन मैदानात लढण्याच्या वृत्तीमुळेच त्यांना भारताचा नेपोलियन असे इतिहासकार म्हणतात . स्वतःमध्ये असलेल्या अद्भुत चैतन्याच्या जोरावर पेशवे व भोसले यांनी गिळकृत केलेले होळकर प्रदेश यशवंतरावानी परत मिळवून होळकर साम्राज्याला पुनर्जीवित केले. स्वबळावर स्वराज्य मिळवून शेवटपर्यत स्वतंत्र राहणारा, स्वतः हून एकही तह कोणाशीही न करणारा हा भारताच्या इतिहासातील एकमेव महायोध्दा होता. म्हणून त्याच्या पराक्रमाने प्रभावित होवून पातशाहाने त्यांना महाधिराज राजराजेश्वर अलिजा बहाद्दूर पदवीने सन्मानित केले होते.
 यशवंतरावांचा ३डिसे १७७६ ते २८ आक्टोबर १८११ हा अत्यल्प जीवनकाळ असला तरी इंग्रजांच्या असूरी आकांक्षेचा अंदाज घेवून हाडवैर असलेल्या शिंदे , भोसले , पेशवे यांना राष्ट्रीय आकांक्षे पोटी एकत्र आणण्याचा प्रयत्न यशवंतरावानी केला . परंतु शिंदे ,भोसले पेशवे यांनी त्यांना प्रातिसाद न देता त्यांच्या विरोधात कटकारस्थान रचून अडचणीत आणण्याचा प्रायत्न केला . त्यांनी यशवंतरावाप्रमाणे दुरदृष्टीकोन ठेवून यशवंतरावाना साथ दिली असती तर भारताच्या इतिहासात इंग्रज राजवटीची नोंद सुध्दा होवू शकली नसती.  हे इतिहासातील पानावरुन सिध्द होते.

यशवंतरावांच्या कर्तुत्व व युद्धनिती पुढे इंग्रज सुध्दा हतबल झाले होते. भरतपूरच्या युद्धात यशवंतरानी अत्यंत अनुभवी व कडवा इंग्रज सेनापती  जेरार्ड लेकचा पराभव केला. त्यानंतर जनरल स्मिथ, कर्नल, मोन्सन, मरे , फोसेट सारख्या दिग्गज इंग्रज आधिकार्याचा पराभव केला. याला कारण यशवंतरावाचे युद्ध तंत्र होते. शिवरायानंतर गनिमी काव्याचा यशस्वीपणे वापर यशवंतरावानी केला .. डोंगर दर्यामध्ये वापरला जाणारा गनिमी कावा यशवंतरावानी सखल व सपाट भागातही यशस्वी करून दाखविला. यातच यशवंतरावाच्या कर्तुत्वाची यशस्वीता लक्षात येते.

यशवंतरावांचे शिवरायांनःतर महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी जानेवारी १७९७ मध्ये करुन घेतलेला वैदिक राज्याभिषेक होय, की ज्याची चर्चा कधीही होत नाही . तो एका बहुजन धनगर शासकाचा आधुनिक भारतातील एकमेव वैदिक राज्याभिषेक होता. त्याचे ऐतिहासिक अद्याप आपल्याला समजले नाही ही मोठी शोकांतिका आहे. ही अनास्था असली तरी भारतीय इतिहासातील शेवटच्या सार्वभौम कर्तबगार , स्वाभिमानी लढावु वृत्तीच्या राष्ट्रीय भावना जोपासणार्या बहुजन शासकाच्या राज्याभिषेकाचे मोल समजून घेतल्या शिवाय सामाजिक क्रांतीचा विचार वास्तवात येवुच शकत नाही..

यशवंतरावानी इ.स.१७९७ ते १८११ अशा अत्यल्प १४ वर्षाच्या काळात आपल्या धैर्य  व तलवारीची धार कधीच बोथट होवू दिली नाही. एकट्याच्या भरोशावर कलकत्त्यावर आक्रमण भारतृ स्वतंत्र करण्याची त्यांची उमे शेवटपर्यत अभंग  होती. यशवंतरावाना जिंकता येत नाही म्हणून इंग्रजांना त्यांची धोरणे बदलावी लागली . वेलस्ली सारख्या गव्हर्नर जनरल ची हकालपट्टी करावी लागली . असा तो सदासर्वकाळ यशवंत राहाणारा, स्फुर्तिदायी जीवन जगणारा महाराजा यशवंतराव आम्हा  बहुजनांमध्ये होवून गेला, हे आमचे अहोभाग्य असले तरी त्यांचा जाज्वाल्य इतिहास आमच्या पर्यत पोहचू शकला नाही. हे आमचे दुर्भाग्य म्हणावे लागेल..


जेम्स व्हिलर नावाचा इतिहासकार यशवंतरावा बद्दल लिहीतो. " The life  of Yashwantrao Holkar was one of the unceasing struggle  and peril, endured with  the abounding high sprits for which he was renowned "

परंतु भारतीय इतिहासकारांच्या लेखनीतून यशवंतरावांचा पराक्रम न्याय भूमिकेतून  उतरु शकला नाही.  अशा महान योध्द्याच्या पराक्रमास माझ्या व सर्व वाचकांच्या वतीने विनम्र अभिवादन......,🙏🙏🙏🙏

डाँ  प्रभाकर लोंढे . गोंदिया-चंद्रपूर

No comments:

Post a Comment