दोन मोर्चा चे आयोजन करणाऱ्या धनगर कार्यकर्ते अन नेत्यांनो!!!!!! 🚶🏿🚶🏿🚶🏿🚶🏿🚶🏿 यांना काय देणार आहात?????
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
८ व १० डिसेंबर २०१५ ला आपण आयोजित केलेल्या मोर्चा मध्ये हजारो लोक आपण जमा केले. थोडे फार विचार करु शकणाऱ्या, आपल्या नजेरेतील बुध्दुजीवी बांधवांच्या एकच मोर्चाच्या कल्पनेलाच लाथा मारीत आपल्या इच्छा तसेच ध्येयासाठी आपण दोन मोर्चे काढले. सामान्य धनगरांच्या मनातील आरक्षण शब्दाचे आकर्षणाला भांडवल करुन त्याला आपण प्रदर्शित केले. त्याबद्दल आपणा सर्वांचे अभिनंदन !!!!!!
मोर्चा पुर्वी आपणा पैकी काही नेते/ कार्यकर्त्यांशी संपर्कात आलो होतो, तेव्हा मोर्चाचे काय फलित होणार आहे याची आपणा सर्वानाच कल्पना होती. हे मला समजले होते. मनात पुन्हा एकदा निराशा आली. असे स्वातःञ्योत्तर भारतात असत्याचे प्रयोग धनगरासाठी काही नविन नाही. हे २००३ पासून चालु असलेल्या अभ्यासातून आलेल्या अनुभवानी मनाला समजविलं. दुसरीकडे अनेकांनी मोर्चाच्या समर्थनार्थ लिहीण्याचा व उपस्थित राहण्याचा आग्रह धरला होता.... दोन्ही मोर्चाना मुक संमती देण्याशिवाय मन काहीच करु शकल नाही. कारण असत्याचा विरोध करण्याची क्षमता नसेल तेव्हा चुप राहणे हाच एक शहाणपणा असतो. अस मनानी मनाला समजविल..... पण डोळे कान माञ सदासर्वकाळ आपल्या मोर्चा व आयोजन तसेच प्रयत्नाकडे होते...............
आपण सर्वानी मोर्चाच्या आयोजनासाठी फार मोठे कष्ट घेतले त्याबद्दल आपले पुन्हश्च अभिनंदन !!!!! .
आम्ही कष्टकर्याची अवलाद आहोत हे पुन्हा सिद्ध केले . नियोजित तारखांच्या पूर्वी आपल्या प्रचार सभांमधील आपले आवेश डोळ्यांनी पाहीले. परस्परांवरची चिखलफेक पाहीली. धनगर नेते/कार्यकर्त्याची परास्परांवरची खालच्या पातळीवरची भाषा वाचली. प्रसंगी ऐकली..... मी किंवा माझा नेता किती चांगला आहे हे सांगण्याची स्पर्धा उघड्या डोळ्यांनी पाहीली व कानानी ऐकली............आरक्षण ध्येय न राहता साधन बनत चालल्याची चाहुल तसेच प्रचिती येत होती.... पण व्यर्थ !!!!!!!
तेव्हा आपणास काय करायच आहे. किवा काय हव आहे ? हा प्रश्न पडला. तो अजुनही अनुत्तरीत आहे......
शेवटी भावनेच्या भरात आपल्या आवेशावर भरभरून टाळ्या वाजविणारा धनगर पाहीला. तोच धनगर मोलमजुरी करुन मिळविलेले पैसै मोर्चा मध्ये येण्यासाठी खर्च करणारा धनगर तुमच्या मोर्चा मध्ये सुध्दा दिसला............
बिचारे केविलवाणे चेहरे !!!!!!!!!! संपुर्ण महाराष्ट्रातून नागपूर मध्ये आलेले सामान्य धनगर बांधव आपल्या आवाजाला प्रतिसाद देत होते. तहान भुक घर- दार -लेकरं . बायको घरी ठेवुन त्यांची व रोजीरोटीची तमा न बाळगता आपल्या हाकेवर येवुन आपणास नकळत प्रतिसाद देत होते . मेंढपाळ धनगराच्या मागे मेंढ्यांनी जावे तसा कळप आपल्या मागे न चुकता चालताना दिसला.
निरागस बांधवांचे चेहरे पाहुन दया आली. तेव्हापासून अनेकृ प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.
सर्वच आज विचारणार नाही पण एका प्रश्नाच उत्तर अवश्य द्यावे..ही विनंती
आपण सामान्य धनगराला काय देणार आहात?
डाँ प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर
No comments:
Post a Comment