रक्षाबंधन
-------------
पुढ कर रे हात दादा
बांधते तुला राखी
रक्षाबंधनाच्या सणाची मी
वाट बघत होती सारखी........
साक्ष आहे या नात्याची
साथ माञ जन्माची
या राखीच्या धाग्यानेच
रक्षिली रे लाज बहीणीची......
समजू नकोस याला तू
एक अर्थहीन धागा.
सांगी हृदयात या बहीणीच्या
प्रथम तुलाच रे जागा......
तुटला जरी हा धागा
मखमली रेशमाचा.....
जपून ठेव ठेवा
या बहीणीच्या अतुट प्रेमाचा....
सर्वच दिलं दादा तू
पुन्हा काही नाही बाकी....
पुढं कर रे हात दादा
बांधते तुला राखी....... बांधते तुला राखी.....
डाँ. प्रभाकर लोंढे ... गोंदिया-चंद्रपूर
-------------
पुढ कर रे हात दादा
बांधते तुला राखी
रक्षाबंधनाच्या सणाची मी
वाट बघत होती सारखी........
साक्ष आहे या नात्याची
साथ माञ जन्माची
या राखीच्या धाग्यानेच
रक्षिली रे लाज बहीणीची......
समजू नकोस याला तू
एक अर्थहीन धागा.
सांगी हृदयात या बहीणीच्या
प्रथम तुलाच रे जागा......
तुटला जरी हा धागा
मखमली रेशमाचा.....
जपून ठेव ठेवा
या बहीणीच्या अतुट प्रेमाचा....
सर्वच दिलं दादा तू
पुन्हा काही नाही बाकी....
पुढं कर रे हात दादा
बांधते तुला राखी....... बांधते तुला राखी.....
डाँ. प्रभाकर लोंढे ... गोंदिया-चंद्रपूर
No comments:
Post a Comment