Monday, July 25, 2016

*नवाकाळ* *वृत्तपत्रांञातील बोधकथा. संबंधाने...........*                                 .          

          प्रथमतः या घटनेचा जाहीर निषेध... तो करावा तेवढा कमीच आहे..  त्यावर धनगर तरुणानी फोन करुन संपादका ला दिलेली समज ही अभिनंदनीय फार मोठी बाब आहे.  त्याचवेळी ती अशा प्रवृत्तीच्या संपादक , लेखक तसेच धनगराना वाईट नजरेन बघणार्या सर्वच घटकांना धडकी भरविणारी धडक आहे.....   धनगर किंवा त्यांचे कर्तबगार पुरुष यांना बदनाम करणे. ही बाब त्यांच्यासाठी नवीन नाही .. आपण इतिहासातून अभ्यासलच असेल.. या किंवा अशा बदनामीकारक लिखाणाशिवाय असे असे संपादक , लेखक  त्यांच्या महापुरुषांची????? महानता सिद्ध करुच शकत नाही.... धनगरांच कर्तृत्व एवढं महान आहे कि त्यापेक्षा अधिकच कर्तुत्व हे करुच शकत नाही... अशा परिस्थितीत स्वतःच्या खुज्या कर्तृत्वाला श्रेष्ठ दाखविण्यासाठी तुम्हाला बदनाम करणार नाही तर काय? करतील..  प्रश्न तो तुमच्या बदनामीचा नाही तर तो त्यांच्या अस्तित्वाचा आहे.           

          थोडे ईतिहासात जा . यांनी आपल्या कर्तबगारांना एकतर देव बनवून संपविल. दुसरं त्यांना बदनाम करुन संपविल. त्यासाठी खोटे आरोप लावले, खोटया बोधकथा लिहिल्या. पुराण लिहीली.  ते त्यांचे त्यांच्या साठी महान काम त्यांनी आपल्या पध्दतीने आपल्या माणसांना मोठ करण्यासाठी केलं. भलेही ते आपला अपमान करणार असेल.  त्याचं काय  देण घेण त्यांना??? तो त्यांच्या प्रवृत्तीचा भाग आहे...... या  प्रवृत्तीचा प्रभाव भारताच्या   इतिहासावर दिसून येतो हे अभ्यासकाना लक्षात येत असेलच.  आम्ही लढायच ठरविलं तर आम्हाला अशा प्रवृत्ती विरुध्द लढाव लागणार आहे. त्यासाठी आम्हाला त्यांनी वापरलेल्या साधानांचा वापर करीत लढाव लागणार आहे.. *"साहित्य संस्कृती वर अधिराज्य "*हाच अंतिम इलाज आहे.  तोपर्यंत अशा प्रकारची दहशत निर्माण करणे व टिकवून ठेवणे हा उत्तम इलाज आहे... हा प्रयत्न करणाऱ्या सर्वच धनगर बांधवांच अभिनंदन !!!!!!!! सलाम त्यांच्या सैनिकी वृत्ती ला                                                             ---------------------------------------------    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏                *डाँ. प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर*

No comments:

Post a Comment