Sunday, July 10, 2016

" धनगरांचा राजकीय अरुणोदय  "
  ------------------------------------------
        वर्षानुवर्षापासून उपाशी असलेल्या  माणसाला एकदम पंचपक्वानाचं जेवण मिळाव... आणि तो बेचैन होवुन  त्याला अनेक प्रश्न पडावे. अशा अवस्थेत आज धनगर जमातीचा जागृत माणूस असल्याचा मला भास होतो आहे.      
            वर्षानुवर्षापासून  राजकीय सत्ता , घटनादत्त अधिकार  यांच्या पासून वंचित असलेल्या लोकांना एकदम राज्यसभेत खासदार, राज्य मंञिमंडळात राज्यमंञी असलेल्या बांधवाला कँबीनेट मंञी,  स्वतःच्या खाजगी  जीवनाला डावावर लावून समाज बांधवांमध्ये राजकीय अस्मिता निर्माण करणाऱ्या माणसाला अपरिहार्यपणे कँबीनेट मंञी पद मिळण. हा प्रकार  व काळ नक्कीच या जमातीसाठी विचार करायला लावणारा , अनेक प्रश्न निर्माण करणारा व समर्पक असे उत्तर शोधून  भावी नितीनिर्धारणासाठी पोषक काळ आहे.
                   यापरिस्थितीचे अनेकांनी अनेक अन्वयार्थ काढले असतील यात शंका नाही.....  पण प्रत्येक कार्यात प्रवेश जेवढा महत्त्वाचा तेवढ्यात प्रमाणात पुढील विकासात्मक पावले महत्त्वाची असतात.आजपर्यंतच्या महाराष्ट्रात  माञ राजकीय स्थैर्याच्या दृष्टीने स्वाभिमाना सोबतच तडजोड आवश्यक असते ही बाब महत्त्वाची.. धनगराँनी आतापर्यंत स्वाभिमानापेक्षा तडतोडीलाच  अधिक महत्त्व दिले.. परीणामतः इतरांच्या ओंजळीनेच पाणी पित राहीले. यात धनगरांचा सतत वापर झाला. आज त्यांच्या  स्वअस्तित्वाच्या, स्वाभिमानाच्या गोष्टी चालु  झाल्या.  धनगरांनी आ.महादेव  जानकरांपासून स्वाभिमान तर आ. राम शिंदे साहेबांकडून तडजोड शिकली पाहीजे तसेच दोघानाही तेवढयाच बरोबरीने सोबत ठेवल पाहीजे. आमचा हा स्वाभिमान  बी.जे.पी ला जोडून ठेवण्याच्या प्रयत्नात बीजेपीने आ. राम शिंदे साहेबांना राज्यमंञी पद दिले. आ. महादेव जानकर साहेबामुळे सत्ता आली अस मान्य करणाऱ्या सरकारने इतके दिवसांनंतर  अपरीहार्यपणे कँबीनेट मंत्री पद दिलं. उशीरा मंञीपद देण हेच त्यांच प्रस्थापितांमधील वजन सिद्ध करते. सोबतच शिंदे साहेबांना सुध्दा बढती देत मंञिमंडळात फेरबदल केले....    या सर्व उपक्रमात शिंदे साहेब सातत्याने जानकर साहेबांपेक्षा धनगरापुढे कमजोर ठरु नये यासाठी बी.जेपी सर्व काही करायला तयार आहे असा निष्कर्ष काढल्यास कोणत्याही पातळीवर चुकीचा ठरु शकणार नाही.... अस मला वाटत आहे.                                            
           यापुढे धनगरांची निती निर्धारण यशस्वी झाल्यास आणि धनगर नेते सामाजिक कार्यकर्ते यांनी एक दुसऱ्या च्या सहकार्याने कार्य केल्यास हे दोन्हीही नेते महाराष्ट्रातच काय संपुर्ण भारताच नेतृत्व करू शकतील .. हा माझा विश्वास  आहे.... तशी दोघांचीही क्षमता आहे......    फक्त सर्वांचा आशीर्वाद तसेच सोबत अपेक्षित आहे.....    
  +------------------------------------------+
धनगर राजकीय नेतृत्व आणि जाणिव जागृतीचा अभ्यासक....       " डाँ . प्रभाकर लोंढे. चंद्रपूर-गोंदिया"

No comments:

Post a Comment