Friday, January 12, 2018

माँ जिजाऊ...


शिवरायास दिला जन्म तू
लावूनी कपाळास टिळा.
शहाजींचा पुञ तो
असेल कसा दुधखुळा.

स्वराज्याची शपथ घेवून
त्याने फुलविला रयतेचा मळा.
शिवरायांसोबत लढला जो
होता मातीचा मर्द मावळा.

स्वराज्य निर्मिले त्याने
घोटून जुलमी सत्तांचा गळा.
स्वराज्य होते तेच खरे
ज्याला जनकल्याणाचा कळवळा.

माँ जिजाऊ ऊपकार केले तू
राजे शिवराय घडविले  बाळा.
ज्याला नमन करण्या आज
.इथे सर्व झाले गोळा....

डॉ. प्रभाकर लोंढे. गोंदिया चंद्रपूर

No comments:

Post a Comment