*धनगराना आता राजकीय क्रांतीशिवाय पर्याय नाही!*
*डॉ प्रभाकर लोंढे*
धनगर जमातीच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख लक्षात घेता या जमातीच्या सर्व प्रश्नांचे मूळ जमातीच्या राजकीय सत्तेपासून दूर असण्यामध्ये आहे. सोबतच जमात नेतृत्वाच्या राजकीय आकांक्षेच्या अभावात आहे. त्यामुळे जमातीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राजकीय सत्ता अत्यावश्यक असताना या जमातीने स्वतःला राजकीय सत्तेपासून अनपेक्षित अनभिज्ञ ठेवलेले आहे. परिणामतः भारतीय लोकशाहीमध्ये बहुसंख्येने असलेली धनगर जमात एक राजकीय उपेक्षित जमात असल्याचे आजही लक्षात येते *. "धनगर जमात वेडी" की "प्रस्थापितांची खेळी" असो काहीही, मात्र आज धनगर जमात व्यवस्थेच्या नेहमीच गेली बळी....*
अलीकडे धनगर जमात वेडी तर राहीलेलीच नाही शिवाय त्यांनी आज प्रस्थापितांची खेळी ओळखली आहे. त्यामुळे आता बळी जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
धनगर तरुणाईचा ध्यास व भारतीय राजकारणाचा अभ्यास या दोन गोष्टी मुळे धनगर जमाती मध्ये राजकीय नवचैतन्य निर्माण होताना दिसत आहे. धनगर जमातीने अभ्यासातून आज महाराष्ट्रीयन राजकारणाची नस ओळखली आहे. धनगर जमातीच्या सर्वच प्रश्नाचे आकलन व कारणमिमांसा या पर्यंत धनगर जमातीचे अभ्यासक जावून पोहचलेले आहे. त्यांच्या अध्ययन, संशोधन, विश्लेषण व लेखन यातून धनगर जमातीला विकासाचा एक सूर गवसलेला आहे. व यापुढे राजकीय सत्तेशिवाय धनगर जमातीला पर्याय नाही, हा निष्कर्ष धनगर नेतृत्वापासून सामान्य धनगर माणसांपर्यंत जावून पोहोचला आहे. सोबतच सर्वांनी तो सहजपणे स्विकारलेला आहे. आता पर्यंत झालेल्या चुका, अन्याय, अत्याचार, नुकसान या सर्व बाबींची खंत वाटायला लागली आहे. त्यांनी धनगर जमातीचे नुकसान करणारे जंत ओळखलेले आहे. त्या जंताच्या अंतातूनच धनगराचा राजकीय उदय आहे, ही बाब त्यांच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळे धनगर जमातीमध्ये राजकीय क्रांती शिवाय दुसरा पर्याय नाही, हा आत्मविश्वास धनगर जमातीमध्ये अलीकडे सातत्याने पहायला मिळतो आहे.
तरुण धनगर नेतृत्वांची राजकीय सत्तेच्या दृष्टीने लोकशाहीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुध्दा झालेली आहे. यापुढे महाराष्ट्राच्या राजकारणात धनगरांचा मोठा राजकीय प्रलय निर्माण होणार हे निश्चित आहे. यामध्ये प्रस्थापित धनगर नेत्यांसह अनेक बड्या गैर धनगर नेत्यांचे राजकीय गणित कोलमडणार हे नक्की आहे. धनगरांचे प्रस्थापित नेतृत्व व नवोदित नेतृत्व यांच्या मधील समन्वयातून धनगर राजकीय क्रांती शक्य आहे.
एवढं मात्र निश्चित की, यापुढे धनगरांच्या राजकीय क्रांती शिवाय पर्याय नाही, ही बाब सर्वमान्य झालेली आहे. त्यामुळेच धनगर समाजानी आता केवळ राजकीय सत्तेसाठी आपली नीती आखावी. आरक्षणासह सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न करीत असतांनाच राजकीय सत्तेसाठी आपले तन, मन, धन संघटितपणे खर्च करणे आवश्यक आहे. परस्पर सामंजस्य व सहकार्य या तत्त्वावर आधारित समाजाचा राजकीय जाहीरनामा प्रसिद्ध करून जमातीच्या योजनाबध्द वाटचालीतून धनगरांची ही राजकीय क्रांती शक्य आहे..
*जय मल्हार*
*एकच ध्यास --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
*धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

No comments:
Post a Comment