पुरोगामी विचाराचा महामेरू: डॉ. गजानन हुले
डॉ प्रभाकर लोंढे
महाराष्ट्र संतांची भूमी. विचारवंतांची भूमी. या भूमीमध्ये संत तुकाराम पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले छत्रपती शाहू, क्रांतीज्योती सावित्री, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा अशा विचारवंताचा जन्म या महाराष्ट्राच्या भूमीत झाला. या सर्व विचारवंतांनी येथील वाईट सामाजिक रूढी, प्रथा, परंपरांवर आपल्या विचार प्रक्रियेतून सडेतोड उत्तर देऊन सामाजिक प्रश्नांवर तोडगा काढला. आपल्या प्रगल्भ विचारांचा वारसा समाजामध्ये पसरविला. आपल्या विचारातून समाजामध्ये सर्वांगीण क्रांती होईल व या समाजव्यवस्थेतील दलित, पीडित, शोषित, वंचित, उपेक्षित या सर्वांचा उद्धार होईल यादृष्टीने आपला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविला. अशा या विचार परंपरेमध्ये आपला महाराष्ट्र घडला. येथील अनेक राजे-महाराजे सुद्धा या विचारांनी प्रभावित होऊन समाज क्रांती साठी प्रेरित झाले. राजकीय सत्तेचा वापर सामाजिक समतेसाठी, समाज कल्याणासाठी केला जावा अशा प्रकारच्या विचारातून महाराष्ट्रात विश्ववंदनिय डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा महामानव घडला. ती विचार परंपरा समाजपरिवर्तनाची, मानवी जनकल्याणाची, समतेवर आधारित समाज निर्मितीची कल्पना वास्तवात उतरविणारी संजीवनी ठरली. कृतीयुक्त विचारांची एक परंपरा या महाराष्ट्राला लाभली.
या संत परंपरेचा, विचार पुरुषांच्या कार्याचा व विचारांचा प्रभाव आजही महाराष्ट्रावर दिसून येतो. महाराष्ट्रातील अनेक तरुण महापुरुषांच्या विचारांचे पाईक म्हणून जीवन जगताना दिसून येतात. या विचार परंपरेतील एक छोटासा विचार बिंदू म्हणजे डॉ.. गजानन हुले
विचार काय करता? प्रत्यक्ष कृती करा. असा संदेश शब्दा शब्दाला, क्षणा क्षणाला देऊन या भारतीय शासन व्यवस्थेतील वर्षानुवर्षाच्या शोषित, वंचित घटकाला, राजकीय सत्तेशिवाय त्यांच्या उद्धाराचा मार्ग नाही हे पटवून देणारा डॉ. गजानन हूले नावाचा तरुण आज महाराष्ट्राच्या मातीत जगताना दिसतोय. विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील एका छोट्याशा गोभणी गावामध्ये जन्माला आलेला महाराष्ट्रातील शोषीत पिडीतांचे दुःख जाणणारा, येथील राजकीय व्यवस्थेला पूर्णपणे समजून घेऊन व्यवस्थेची चिरफाड करणारा हा तरुण वंचितांच्या दुःखाचं कारण पटवून देतो. या महाराष्ट्रातील वंचित घटकांचा राजकीय सत्तेमध्ये जाण्याचा राजमार्ग सांगतो. प्रस्थापित व्यवस्थेला न घाबरता प्रस्थापितांनी राबविलेल्या कूटनीतीचा, दुष्ट प्रवृत्तींचा सामना करण्याचे बळ आपल्या विचारातून वंचित, उपेक्षित घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी धडपडतो. त्यांच्या या कार्यातून महाराष्ट्रात वंचितांची राजकीय क्रांती होईल की माहित नाही. परंतु अशा व्यक्ती त्यामुळे महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचतील एवढं मात्र नक्की. त्यातून
परिवर्तनाची लाट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
महाराष्ट्रातील समाज व्यवस्थेमध्ये अनेक जाती-जमाती आजही राजकीय दृष्ट्या वंचित उपेक्षित राहिलेल्या आहे. अनेकांना त्यांचे घटनात्मक अधिकार/ हक्क मिळालेले नाही, ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. तरीसुद्धा हा महाराष्ट्र पुरोगामी आहे. तो कदाचित येथील स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या घरांदाज सत्तापिपासू राजकारण्यांचा तो पुरोगामी महाराष्ट्र असेल. परंतु ज्या महाराष्ट्रामध्ये बहुतांश जनता शोषित उपेक्षित वंचित म्हणून जगत आहेत. तिथेच विशिष्ट घराणे या महाराष्ट्रात राज्य करीत आहे. असं असताना हा महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या विशिष्ट घराण्यां पुरता मर्यादित न राहता सामान्यातील सामान्य माणसापर्यंत प्रत्येकाला सत्तेचा लाभ घेता यावा. प्रत्येक सामान्य माणसालाही राजकीय व्यवस्था स्वतःची वाटावी, लोकशाहीमध्ये माझ्या मताला सुद्धा किंमत आहे. माझे मत म्हणजे शासनव्यवस्थेचा श्वास आहे. सामान्य जनतेच्या मतानुसार येथील सरकारे बदलली पाहिजे. सरकार हे सर्वसामान्यांच्या इच्छाशक्तीवर चालले पाहिजे, या भूमीतील सामान्य माणूस हा स्वतः राजा बनला पाहिजे. हा त्यांचा विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा, यासाठी विशेष तळमळ डॉ. हूले यांच्या मध्ये दिसून येते.
वैद्यकीय पेशा असला तरी आर्थिक विवंचने मध्ये जगणारा वैचारिक समृद्धी असलेला हा तरुण महाराष्ट्राच्या पुरोगामी विचार परंपरेला शोभून दिसतो. येथील प्रजा समाजाला राजा बनविण्याचा विचार सामान्य माणसाच्या डोक्यात बिंबवण्यासाठी प्रत्येक क्षण घालवितो. खऱ्या अर्थाने येथील पुरोगामी विचार परंपरेचा तो वारस वाटतो.
परिवर्तन कुठलेही असो त्याचा आधारस्तंभ हा विचार असतो, विचार रुजला की त्यानुसार सामाजिक पार्श्वभूमी तयार होते व त्यातून विचाराला अपेक्षित असलेला समाज निर्माण होत असतो. विचारांच्या प्रक्रियेमध्ये सातत्य आवश्यक असते. आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या विचार परंपरेतील पुरोगामी विचार चक्र सातत्याने सुरू ठेवणार व्यक्तित्व म्हणजे डॉ. गजानन हूले असं म्हटलं तर याला कोणीही अतिशयोक्ती म्हणणार नाही असे मला वाटते..
राजकीय अभ्यासक

No comments:
Post a Comment