🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आ. *गोपीचंद साहेबांना मल्हारराव घडणे शक्य..*
(कोणीही भावनात्मक होवून वाचू नये)
*डॉ. प्रभाकर लोंढे*
इतिहासात महाराष्ट्रातील पेशवाईचा काळ सर्वांना अभिमानाची बाब आहे. म्हणून तो समजून घेण्याची गरज आहे. कारण भूतकाळ लक्षात घेऊन वर्तमानाची पावलं भविष्याकडे टाकत असताना आजची व्यवस्था तशी समजून घेतली तर पेशवाईची पूनर्स्थापना होत आहे. *मराठे सरदार पहीलेच मजबूत बनले आहे. ते पेशव्यांना हातात घेऊन प्रसंगी त्यांची मुंडी मुरगाळून सत्ता उपभोगत आहेत.* याबाबीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
फडणवीस साहेबांनी यापूर्वी मागील पाच वर्षे जी सत्ता उपभोगली तेव्हा *त्यांनी धनगरांना इतकं महत्व दिलं नसलं तरी धनगरांचा साथ मात्र घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.* धनगरांचा आधार घेऊन मराठा सरदारांना शह दिला जाऊ शकतो असा विश्वास त्यांना वाटला आहे म्हणून खोटे का असेना आरक्षणाचे आश्वासन देऊन जानकर साहेब व शिंदे साहेब यांना मंत्री पदापर्यंत सोबत घेऊन आपली पेशवाई मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा त्यांनी हा विचार केला की येथील मराठा सरदारांना शह देण्यासाठी धनगर हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. याचा अर्थ *त्यांनी पेशवाई व मल्हारराव यांचा पुरेपूर अभ्यास केला आहे.* तेव्हा त्यांनी ही सुद्धा दक्षता घेतलेली आहे की या *धरगरांमधून पेशवाईवर प्रभाव, दबाव आणि वर्चस्व असलेला नवीन मल्हारराव घडणार नाही.* आणि म्हणूनच त्यांनी पुढचं पाऊल टाकत (माजी मंत्री शिंदे साहेब व इतरांना टाळून) गोपीचंद पडळकर नावाच्या तरुण, उत्साही व्यक्तीला, *धनगरांना भावनात्मक करू शकेल, तरुणांमध्ये उत्साह भरू शकेल अशा धनगर उमेदवाराला विधान परिषद दिलेली आहे.*
ही विधान परिषद केवळ आणि केवळ धनगर म्हणून दिलेली आहे असं जर कोणी म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण ज्याप्रमाणे राजश्री *मल्हाररावांशिवाय येथील मराठीशाही किंवा पेशवाईचा झेंडा मातीमोल होता.* (मल्हाररावांनी एकट्याच्या भरोसावर नाही तर आपल्या विविध धनगर सरदारांच्या भरोशावर एवढा वचक निर्माण केला होता. जागोजागी त्यांनी आपली माणसं पेरली होती.) त्याप्रमाणे आजच्या बीजेपीचा झेंडा धनगरांशिवाय उभा राहू शकत नाही. म्हणून ते मल्हाररावांप्रमाणे धनगरांच्या काही उमेदवारांना हाताशी बाळगत असतात. त्यांना आजच्या लोकशाहीत धनगर मजुरांकडून मल्हाररावांचा पराक्रम अपेक्षित आहे पण वर्चस्व मात्र नक्कीच नाही. *त्यामुळेच ते वारंवार सरदार बदलत असतात.*
आज धनगरांना सरदारकी देत असताना आजच्या लोकशाहीतील लोकमताचा भावी काळासाठी विचार करून ते धनगरातील सरदार निवडत असतात. आज त्यांच्या दृष्टीने असा उपयोगी सरदार आमदार गोपीचंद पडळकर साहेब आहेत. ते *वकृत्वाच्या भरोशावर धनगर तरुणांना आपल्या कहेत नक्कीच घेऊ शकतात. तेवढी त्यांची क्षमता सुद्धा आहेत, असं म्हटलं तर चुकीचं आहे असं सिद्ध होऊ शकत नाही. परंतु ते सर्व गोपीचंद पडळकर साहेबांच्या पुढील धोरण व महत्वाकांक्षा यावर अवलंबून आहे.*
थोर सुभेदार राजश्री मल्हारराव उदयास आले, तेव्हा त्यांनी तत्कालीन *धनगर सरदारांचा साथ घेतला होता. त्यांनी बुळे, वाघमोडे, पांढरे, धायगुडे, ....... अशा अनेक धनगर सरदारांना मोठं केलं होतं.* एवढेच नाही तर अनेकांचं सत्तेत बस्तान बसविलं होतं. अनेकांना आपल्या साम्राज्यात प्रस्थापित केलं होतं. त्यामुळेच मल्हारराव आपल्या राज्यकारभारात व पेशवाईत यशस्वी झाले होते. त्याच भरोश्यावर त्यानी अटकेपार झेंडे फडकावले होते. ते *त्यांना एकट्याच्या भरोशावर करता आलं नसतं.*
आज गोपीचंद पडळकर साहेबांना मल्हाररावांच्या भूमिकेत हाताशी पकडलं असलं तरी शिंदे साहेब, गणेश हाके साहेब यासह अनेक जुने सरदार बीजेपी मध्ये विद्यमान कार्यरत आहेत. आ. महादेव जानकर साहेब तर गोपीचंद पडळकर साहेबांचे गुरु आहेत. मंत्री दत्ता मामा भरणे राष्ट्रवादीत असले तरी ते राष्ट्रवादीतील धनगरांचा प्रमुख सरदार आहे. त्यांच्या नेतृत्वात सुध्दा एक महत्त्वाची फळी उभी आहे. याशिवाय गोपीचंद पडळकर साहेबांची ४९ भावी आमदारांची तरुण तुर्क फौज सुध्दा सोबत तयार आहे.
सर्वांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्याने व स्वतःच्या धोरण निर्धारण व अचूक पावले टाकून गोपीचंद पडळकर साहेबांना आधुनिक पेशवाई मधील सुभेदार राजश्री मल्हारराव बनणे सहज शक्य आहे. त्यासाठी प्रथमता आपला सर्वांचा शत्रू असलेली मानसिकता ओळखून त्याविरोधात लढण्याची सांघिक नीती निर्धारित होणे आवश्यक आहे तरच *गोपीचंद पडळकर साहेबांना मल्हाररावांच्या सरदारकीचा सन्मान व स्वराज्याचे वैभव नक्कीच प्राप्त होणार आहे. नाही तर आमदार गोपीचंद साहेबांमधून, शेंडगे, डांगे, महात्मे मात्र नक्कीच घडणार आहे.*
*त्यादृष्टीने त्यांना धनगर जमातीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!!!*
*डॉ. प्रभाकर लोंढे*
*धनगर राजकीय नेतृत्व आणि जाणीव-जागृतीचे अभ्यासक*
९६७३३८६९६३