Tuesday, February 28, 2017

जय महाराष्ट्र

माय मराठी

दऱ्या खोऱ्यातून गुंजे मराठी
सह्याद्रीच्या काठी.
मराठीचा महाराष्ट्र तो,
आता ओलांडेल  साठी..

मराठमोळा बाना अन
स्वाभिमान ज्याचे ओठी.
मराठी बोलेल जो,
जागेल महाराष्ट्रासाठी.

'म' मराठीचा सांगेल जो,
त्याची नसेल गोष्ट छोटी.
मराठी बाण्याचा माणूस तो,
जगेल मराठीसाठी.

प्रमाण मराठीच्या आसऱ्यात
बोली बदलतेय छोटी छोटी,
वऱ्हाडी, अहीराणी, कोकणी
अनं झाडीबोली नाही त्यात खोटी

शान, बान, मान मराठी
समृद्ध ती महाराष्ट्राची माती
भारतभूच्या कुशीत वाढतेय
शान महाराष्ट्राची मोठी ...

डॉ . प्रभाकर लोंढे, गोंदिया-चंद्रपूर

No comments:

Post a Comment