धनगरांनो! राजकीय पर्याय उभारा
----------------------------------------------------------------
"यदा यदाही धनगरश्य ग्लानिर्भवती भारतमं, मा अभ्युत्थानमं धनगरश्य पराक्रममं"
---------------------------------------------------------------
बांधवांनो! काही दिवसांपूर्वी "धनगर जमात राजकीय पर्यायांच्या प्रतीक्षेत." अशा शिर्षकाचा लेख लिहिला, त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी फोन करून विविधांगी विचार व्यक्त केले. बहुतेकांनी राजकीय पर्याय विचारला. त्यावेळेस मला राजकीय पर्याय सुचवणे अशक्य नसले तरी संयुक्तिक वाटले नाही. योग्य पर्याय माझ्यासारख्या एकट्याने ठरवून चालणार नाही, जोपर्यंत उपलब्ध परिस्थिती सार्वजनिक स्तरावर लक्षात घेऊन विचार विनिमयातून एक सार्वजनिक अजेंडा सर्वसंमतीने निर्माण होत नाही, तोपर्यंत व्यक्तीच्या वैयक्तिक मताला काही किंमत नाही व नसावी. एकट्याने हा पर्याय सुचविणे मला संंयुक्तिक वाटले नाही. मात्र महाराष्ट्रातील धनगरांच्या राजकीय दुरावस्थेत राजकीय पर्याय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी, शिवसेना या पक्षात असूच शकत नाही.
काही बांधवांना, नेत्यांना प्रश्न पडतील, मला मुर्खात काढतील व ते विश्वासाने सांगतील. याशिवाय महाराष्ट्रात दुसरा कोणताही पर्याय निर्माण होऊच शकत नाही. कदाचित ते सत्यही असेल. यावर विश्वास ठेवायला ही कोणाची हरकत नसावी. महाराष्ट्रातील उपलब्ध परिस्थिती वर्षानुवर्षांच्या सत्ताभोगामुळे याच राजकीय पक्षांना पोषक असेल. त्यामुळे इतर राजकीय पर्याय तग धरू शकेल की नाही हा एक मोठाच प्रश्न आहे. असे असले तरी हेही मात्र सत्यच आहे की, या प्रश्नाचे उत्तर शोधल्या शिवाय धनगराचा राजकीय जिर्णोद्धार शक्य नाही. ही बाब त्याच वेळी स्विकारल्या शिवाय गत्यंतर नाही.
एखादी जूनी इमारत( कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बीजे पी, शिवसेना ) खूप सुंदर व मजबूत असेल,
तुम्हाला- मला त्याचं खूप आकर्षण ही असेल पण त्या इमारतीत तुम्हाला उभं राहण्यासाठी जागाच (उमेदवारी) दिली जात नसेल, तर दारात उभं राहून कशाला त्यांची रखवाली करायची? मला माहित आहे आमचे नेते अशातले नाही, ते रखवाली करणारे नसले तरी तेथे आमच्या नेत्यांना तशी वागणूक दिली जात असेल (या पक्षात दबदबा असलेल्या धनगर नेत्यांचं विशेष स्वागत) तर नेत्यांनी अशा पक्षात रहायचं असेल तर नक्कीच रहावं. पण सामान्य धनगर बांधवांनी अशा धनगर नेत्यांच्या मागे का रहावं? हा प्रश्न सहज उत्पन्न होतो व ते साहजिकच आहे.
धनगर बांधवांनो! खरच आपल्या रक्तावर विश्वास असेल आणि आपल्या पराक्रमी इतिहासाची ख़रोखर जाण असेल तर विपरीत परिस्थितीमध्ये अपेक्षित परिणाम घडवून आणल्याचे तुमच्या रक्ताचे असंख्य ऐतिहासिक दाखले आहेत. व ते आपण नेहमीच छाती फुगवून सांगत असतो. अशा परिस्थितीत स्वतःच्या कर्मावर, क्षमतेवर विश्वास ठेवायला काय हरकत आहे. त्यासाठी फक्त आपल्या क्षमता ओळखण शिकावं लागेल. हा आपला पहिला प्रयोग असला तरी तो महाराष्ट्राला कर्नाटक प्रमाणे धनगरमय करण्यासाठी पुरकच नाही तर प्रभावी ठरेल. हे मात्र नक्की!!
"यदा यदाही धनगरश्य ग्लानिर्भवती भारतमं, मा अभ्युत्थानमं धनगरश्य पराक्रममं"
इतिहास काय देतं? हा खूप मोठा गहन प्रश्न आहे. असं असलं तरी जो जे मागेल ते देण्याची क्षमता मात्र इतिहासात असते व ती तुमच्या इतिहासात भरलेली आहे. इतिहासावर तुम्ही जशी नजर टाकाल तशा प्रकारची अस्मिता जागृत होणे स्वाभाविक आहे.
बांधवानो!! तुमच्या इतिहासावर तुमची स्वाभिमानी नजर रोखा, तुमचा इतिहास तुमचा स्वाभिमान जागृत केल्याशिवाय राहणार नाही. की जे आजपर्यंत आपण कधीच केलेले नाही. लक्षात ठेवा! आजपर्यंत न मिळालेलं मिळवायच असेल तर आजपर्यंत न केलेलं करावच लागेल.
या भारत भूमीतील इतिहास सर्वाधिक पराक्रमी जर कोणाचा असेल तर धनगर वंशाचा आहे. प्रत्येक परिवर्तन, विकास प्रक्रियेचा साक्षीदार हा धनगर आहे. मग धर्म प्रसार असो वा धर्मपरिवर्तन, किंवा राजकीय अराजकता संपवून व्यवस्था सुरळीत करण्याचे कार्य असो, यामध्ये महत्वपुर्ण कार्य धनगर पराक्रमी महापुरुषानीच केलेले आहे. तुमच्या त्या पराक्रमी रक्ताचा आलेख म्हणजे भारताचा जवळपास प्राचीन, मध्ययुगीन भारतीय इतिहास आहे.. आधुनिक (भारतीय लोकशाही तील) इतिहासास आपलं काय योगदान आहे हे सर्वानाच अलिकडे समजून चुकलेलं आहे.
म्हणूनच म्हणावेसे वाटते....
"यदा यदाही धनगरश्य ग्लानिर्भवती भारतमं, मा अभ्युत्थानमं धनगरश्य पराक्रममं"
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
धनगर राजकीय नेत्रुत्व व राजकीय जाग्रुती चा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर
९६७३३८६९६३
No comments:
Post a Comment