Thursday, April 5, 2018

*राष्ट्रवादी काँग्रेस,  कांग्रेस, बीजेपी शिवसेना  या पक्षामधील माझ्या बांधवानो!!* ☝🏻☝🏻☝🏻☝🏻☝🏻☝🏻☝🏻☝🏻☝🏻☝🏻
*फक्त असू द्या.. आत्मभान!! आत्मविश्वास!! अन् करा आत्मरक्षण... मग पहा..*
----------------------------------------
            *डॉ. प्रभाकर लोंढे*
--------------------------------------
संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय सत्ता व कारकीर्द याचा विचार केला असता सातत्याने येथील राजसत्ता  महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी व शिवसेना याच पक्षांच्या हातात राहिलेली आहे. या पक्षांनी  राजकीय सत्तेचा वापर विकासाभिमुख केला असला तरी तो सार्वत्रिक पातळीवर समाजाभिमुख केला आहे,असं म्हणता येत नाही.  या राजकीय कारकिर्दीमध्ये बहुतांश उपेक्षित समाज राजकीय प्रवाहाबाहेर फेकल्या गेला,हे या यशस्वी कारकिर्दीचे अप्रत्यक्ष फलित आहे. मात्र ही बाब लोकशाहीच्या दृष्टिने फार मोठी घातक आहे. जेव्हा अशा प्रकारचा बहुसंख्य वर्ग राजकीय प्रवाहापासून दूर फेकला जातो, तेव्हा ते लोकशाहीचे अपयश तर असतेच शिवाय भविष्यकाळाच्या दृष्टिने ते घातक असते.
       या प्रस्थापित राजकीय पक्षांच्या सत्ताकारणाचा परिणाम म्हणून सत्तेचा वापर सातत्याने विशिष्ठ वर्गांना राजकीय द्रुष्टीने प्रस्थापित करण्यासाठी झाला आहे,असं म्हटलं तर चुकीचे होणार नाही. महाराष्ट्रातील सत्ता स्थानिक पातळीपासून तर केंद्र पातळीपर्यंत, साखर कारखाने- दूध महासंघ पासून  तर पतसंस्था पर्यंत हे विशिष्ट जातींची मक्तेदारी होती, परिस्थिती पाहता अशी शंका येते. याचा अर्थ या महाराष्ट्रातील सत्ता विशिष्ट जातींनी विशिष्ट जातींकडे ठेवून काही उपेक्षित जाती-जमातींना हेतुपुरस्सर त्यापासून दूर लोटलेले आहे. हे सिद्ध होते. याचा परिणाम महाराष्ट्रात अनेक जाती जमाती संख्येने जरी बहुसंख्य असल्या तरी  राजकीय प्रवाहात येऊ शकलेल्या नाहीत. याच उत्तम उदाहरण म्हणून महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या मानाने बहुसंख्य असलेल्या धनगर जमातीचं देता येईल. गेल्या इ.स. २०१३ पासून चाललेली या जमातीची आंदोलने व आंदोलनामागची पार्श्वभूमी पाहीली तर महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष व सरकारांनी या जमातीला राजकीय प्रवाहापासून दूर ठेवण्यासाठी हेतू पूरस्सर संविधानद्रोह केल्याची गंभीर बाब लक्षात येते. हे केवळ धनगर जमातीच्याच बाबतीत नसून असा अनेक जमातवर अन्याय केलेला आहे. त्यामुळेच या जमाती आपलं राजकीय अस्तित्वच गमावून बसलेल्या आहेत.
       याचा अर्थ धनगर व कोळी, गोवारी, हलबा, व तत्सम जमातीमध्ये आतापर्यंत राजकीय नेते निर्माण झालेच नाही किंवा ते होऊ दिले नाही. तशा प्रकारची क्षमता जमातीच्या या पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाही असा आभास कदाचित पक्षश्रेष्ठीमध्ये निर्माण झाला असावा. किंवा आपल्यामध्ये असलेल्या क्षमता धनगर व इतर कार्यकर्त्यांनी/ नेत्यांनी दाखवल्याच/सिद्ध केल्याच नसाव्यात. सत्य काय ते अनुभवी नेते/ कार्यकर्ते सार्वजनिक करतीलच ही अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही. एवढं मात्र निश्चित की, या जमातीतील सोबतच इतर उपेक्षित समाज घटकातील नेतृत्व विकासास पोषक असं वातावरण आजपर्यंत महाराष्ट्रात उपलब्ध होवूच दिलं नाही.
 अशा या ऐतिहासिक महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती आज तरी फार बदललेली आहे असं दिसत नाही. त्यामुळे धनगर व तत्सम उपेक्षित जमात नेत्यांना महाराष्ट्रातील राजकारणात यश प्राप्त करणे सहज शक्य नसले तरी ते अशक्यप्राय नाही.
       कोणी माझ्या या राजकीय समिक्षण पर लेखांवर "जातीय नजरेतून लिहिलेला लेख"  असा शिक्का मारतील. चालेल!!!  त्यांनी फक्त महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या बाबी जातीधारित घडत नाही याची यादी तयार करावी. सर्वाच्या निदर्शनास आणून द्यावी. *"प्रस्थापितांच्या किंवा सत्तेच्या विरोधात बोलणारा कास्टवादी आणि सत्तेचा बाजूने बोलणारा राष्ट्रवादी* अशी भूमिका असलेल्या महाराष्ट्रीयन राजकारणात आजपर्यंत सर्वकाही जातीय समिकरणातूनच घडलेले आहे.हे मात्र नक्की! असा हा आजपर्यंतच्या महाराष्ट्रीयन राजकीय कारकिर्दीचा शुक्ष्म आढावा मिळेल.

 आतापर्यंत सत्ता उपभोगलेल्या सरकारच्या काळात जात आणि महाराष्ट्रातील राजकारण हे अतिशय जवळचे समीकरण असल्याचे सिद्ध होते. याचे अनेक वाईट परिणाम समाजावर दिसून येत असले व हा एक कलंक असला तरी धनगर सह प्रत्येक उपेक्षित घटकांनी अपरिहार्य पणे याच समिकरणाचा आधार घेऊन यापुढे सत्तेचा आस्वाद घेणे सहज शक्य आहे...  त्यासाठी उपेक्षित वर्गांच संघटन हाच एक पर्याय आहे.  आजपर्यंतच्या सत्ताधारी पक्षांच्या संकुचित व्रुत्तीला व त्यामधील जातीयवादी मक्तेदारीला संपविण्याची ताकद केवळ याच उपेक्षित जमातींमध्ये आहे.... *फक्त असू द्या.. आत्मभान!! आत्मविश्वास!! अन् आत्मरक्षण... मग पहा.. कसं होतं तुमच्या जमातीचं संरक्षण.......*

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

धनगर राजकीय नेत्रुत्व व जागृतीचा अभ्यासक
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर* ९६७३३८६९६३

No comments:

Post a Comment