Thursday, July 26, 2018

🤫🤫🤭🤫🤫🤭🤭🤭🤭🤫
*बीजेपी मधील धनगर नेत्यांनो! आता तुम्ही शांत बसणंच उत्तम..*
--------------------------------
            *डॉ.प्रभाकर लोंढे*

      महाराष्ट्राच्या विद्यमान राजकीय परिस्थितीतचे व त्यातही धनगर जमातीमध्ये चाललेल्या उपद्व्यापाचे अवलोकन केल्यास फार मोठी गंभीरता लक्षात येते. एकीकडे मराठ्यांना १६%आरक्षण देवून पदभरती करण्याची भाषा बोलली जात आहे. त्याचवेळी धनगरांच्या आरक्षण मुद्यावर सरकार स्थापन झाले असताना (मुख्यमंत्री यांच्या मते) पहील्याच कबीनेट बैठकीत धनगर आरक्षणावर निर्णय घेण्याची कसम खाणारे तत्कालिन मा. देवेंद्रजी फडणवीस आजचे मा. मुख्यमंत्री साहेब धनगर आरक्षणावर कोणतेही ठोस निर्णय घेत नाही.  ही बाब बीजेपी मधील सर्वच धनगर नेत्यांना कळून चुकलेली आहे. याशिवाय धनगर आरक्षणाच्या बाबतीत आम्ही प्रयत्नशील आहोत असं भासविणारं हे सरकार न्यायालयीन खटल्यात  आपली स्पष्ट धनगर विरोधी भूमिका मांडते.
                या सर्व बाबींचा विचार करता बीजेपी मध्ये कार्य करणाऱ्या धनगर नेते, कार्यकर्ते यांची मोठीच गोची झालेली आहे. कारण यांनीच बेंबीच्या देठापासून ओरडून सांगितले होते की, बीजेपी सरकारच धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करू शकते. म्हणूनच यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून धनगरांनी मतदान केले  व बीजेपीला सत्तेत बसविले आहे. परंतु आज या सरकारने त्यांना(धनगर नेत्यांन) उलट पाडलेलं आहे. या बीजेपी धनगर नेत्यांचे सामान्य धनगरांमध्ये जाण्याचे सर्वच रस्ते बंद केलेले आहे. सामान्य धनगरांनी आरक्षणासंदर्भात धनगर हिताचं काय केलं/ किंवा बीजेपी सरकारनं आम्हा धनगरांना काय दिलं? अशा  प्रश्नांसंदर्भात उत्तर देण्यासाठी धनगर नेत्यांना थोडीही जागा राहीलेली नाही किंवा या सरकारने निर्लज्जपणे त्यांच्यासाठी ठेवलेली नाही. म्हणून काहींना तर आपल्या संघटनांच्या नावातून *"आरक्षण"* हा शब्दच हटवावा लागला.
         एकूणच बीजेपीतील धनगर नेत्यांची हालत "धरलं तर चावते अन् सोडलं तर पळते" अशी झालेली आहे. यातून बाहेर निघण्यासाठी अयशस्वी धडपड(की नुसती वळवळ?)  करतांना बीजेपीतील जवळपास सर्वच धनगर नेते पहायला मिळते. कारण आज सामान्य धनगरांपर्यंत कोणत्या मुद्यावर जायचं हा मोठाच प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलेला आहे. आपल्या पक्षाकडून धनगरांचा फार मोठा विश्वासघात केल्यानंतर आज ते धनगरांचा विश्वास संपादनाचे मुद्दे शोधत आहे. त्यात ते किती यशस्वी होणार हे येणारा काळ व सामान्य धनगरच ठरविणार आहे.
                 कोणी मेंढ्या एकदम विमानाने निर्यात करण्याचा अयशस्वी देखावा करतो आहे. मात्र आरक्षणाच्या बाबतीत काय सांगावे समजत नाही आहे. मागे न झालेल्या नामांतराच्या श्रेयासाठी वाद चालू होता.राजमाता अहील्या स्मारकासाठी निधी मिळविण्याचा विक्रम केल्याच सांगितले जात आहे. असे अनेक उपक्रम पहायला मिळत आहे. कोणीे पक्षात राहूनच बीजेपीच्या विरोधात दंड ठोकण्याचा आव आणतो आहे, तो किती खरा?? याची सत्यता मात्र त्यांनाच माहीत आहे!!  आता म्हणे त्या आटपळीतून बीजेपीच्या धनगर नेत्यांनी बीजेपी सरकारलाच आरक्षणासाठी १०० दिवसांचा अल्टिमेटम दिला. चांगली गोष्ट आहे. पण सर्वांनी र्बीजेपीचा राजिनामा देवून जर हा उपक्रम केला असता तर काही थोडफार खरा  वाटण्याची दाट शक्यता वाटली असती​!
            कदाचित महाराष्ट्रातील बीजेपी सरकार केंद्राकडे धनगर आरक्षणासंदर्भात काही थातुरमातुर अहवाल पाठविणार असेल किंवा धनगर नेत्यांना पुन्हा सामान्य धनगरांनापर्यंत पोहचण्यासाठी मोठा रस्ता बनवून देणार असेल! याचा काहींना सुगावा लागला असावा, (नसेल तर काय अर्थ?) असं असेल तर श्रेयवाद व सामान्य धनगरांनापर्यंत पोहचण्यासाठी उत्तम व सोईचं राहणार आहे. दुसरीकडे धनगरांचे तुकडे करण्यासाठी सुध्दा बीजेपीला सोयीचं होणार आहे. एक दोन धनगर नेते मोठे बनणार आहे! *सत्य काय ते सगळं बिचारा सामान्य धनगर चुपचाप बघणार आहे, तो त्याचा ! त्याने निर्माण केलेल्या आंदोलनाचा!!. व भावी धनगर पिढ्यांचा धनगरांनीच केलेला सत्यानाश!!*          धनगरासाठी काही तरी मोठं नाटक करण्याचा मुहूर्त (२०१९ ची निवडणूक) बीजेपी साठी जवळ आला आहे. तो मुहूर्त लाभदायक ठरावा यासाठी बीजेपी पुन्हा काही देखावा करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहेच. परंतु  
गेल्या पंचवार्षिकमधील सत्ता धनगरांमुळे मिळालेल्या बीजेपीचा हिशोब करण्याची वेळ आली आहे. तो होणारच! या बीजेपी सरकारने धनगरांना काय काय दिलं याचा हिशोब प्रथम बीजेपीतील धनगर नेत्यांनी मांडावा. त्याची वाट सामान्य धनगर बघतो आहे....  तोपर्यंत सर्वांनी राबविलेले उपक्रम (भलेही सत्यवादी असेल) उपद्रवच वाटणार आहे, यात काही शंकाच नाही...
    तोपर्यंत बीजेपीतील धनगर नेते-कार्यकर्त्यांनी शक्य असल्यास सत्यता सार्वजनिक करावी.. जमात पुन्हा भ्रमित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. भ्रमित जमातीला आता योग्य दिशा मिळू द्यावी... तोपर्यंत आपण शांत बसल्यास जमातीवर फार मोठे उपकार होतील.... कारण लोकशाहीमध्ये आपल्या पक्षाच्या निर्णयावर प्रभाव पाडण्याची/कमांड निर्माण करण्याची क्षमता जेव्हा​ आपल्या कडे नसते. तेव्हा आपण शांत बसणेच उपयोगाचे असते. एकूण परिस्थिती पहाता ही जमातीच्या व सामान्य धनगर हितार्थ माझी सुचना आहे, सल्ला नाही. सुचना पाळलीच पाहिजे असा कुठलाही दंडक नाही..... याचं अर्थाने हा लेख वाचावा ... व दुसऱ्या कडे पाठवावा....

 *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*
स्व. रामाजी लोंढे स्मृती किसानरत्न पूरस्कारासाठी प्रस्ताव आमंञित.

कोंढाळा/ २७ जूलै

महाराष्ट्रातील आणि विशेषतः  विदर्भातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच अहोरात्र कष्ट करून जगाचा पोशिंदा म्हणून जीवन जगणाऱ्या शेतकऱ्याचा, ञिवेणी संस्कार सार्वजनिक वाचनालय, कोंढाळा द्वारा दरवर्षी दिला जाणारा स्व. रामाजी लोंढे स्मृती किसानरत्न पुरस्कार शेतीक्षेञात नवोपक्रम, संशोधन करणाऱ्या व शेतीक्षेञाच्या विकासासाठी विशेष योगदान देणाऱ्या शेतकऱ्यालाच दिला जात असतो.
हगामी वर्षे २०१७-१८ चा पुरस्कार प्रदान करण्याच्या दृष्टीने अशा शेतकऱ्यांकडून त्यांचे प्रस्ताव जाहीरात प्रकाशित झाल्यापासून २७/०९/२०१८ च्या आत मागविण्यात येत आहे.
    तरी इच्छुक शेतकऱ्यांनी  आपल्या संपूर्ण माहिती सह राबविलेल्या उपक्रमांची सचिञ माहीती असलेले प्रस्ताव ञिवेणीसंस्कार सार्वजनिक वाचनालय, कोंढाळा, ता. वरोरा जि.चंद्रपूर या पत्त्यावर पाठवावे. प्राप्त प्रस्तावातून पुरस्कार विजेत्या शेतकऱ्याची निवड केली जाईल. निवडीचे सर्व अधिकार निवड समितीला राहील. अधिक माहीतीसाठी सचिव अजय येडे 9764986644, अध्यक्ष पञुजी फुलभोगे, विकास लोंढे 7038333144,  प्रविण देवतळे, नितेश लोंढे  यांच्याशी संपर्क साधावा.

दि २७/७/२०१८                  डॉ . प्रभाकर लोंढे

Sunday, July 22, 2018

जातीविद्वेश
-------------

कोण म्हणतयं?
 तुमची जात आता संपवा.
संपविणारेच दिसताय आज
पेटवितांना जातीचा वनवा.

जाती धर्माच्या ठेकेदारानो!!
प्रथम तुमची ठेकेदारी थांबवा..
सर्व काही सोडून तुम्ही
माणूस स्वतःला बनवा.

जातीभेद मिटवायचा तर
खरच समतेनेच सर्वांना नांदवा.
जाती-धर्माच्या अहंकारावर
नको कधी कोणाला भांडवा.

थांबवा सर्वत्र उन्माद जातीचा,
मनुष्य जात सर्वांची नोंदवा.
मनुष्याच्या प्रत्येक पिल्यावर
फक्त मनुष्य प्रेम गोंदवा.

उधळून अथवा विझवुन टाका
येथील जातीभेदाचा वनवा.
मनुष्य वंशाचा अंश आपण
प्रथम मनुष्य स्वतःला बनवा.

शाळा, कॉलेज, विद्यापीठाच्या
दप्तरातील जात प्रकर्षाने हटवा.
कलूषित मनामध्ये दाटलेला
जातीद्वेश प्रथमतः घटवा.

समतेच राज्य हे
त्याला समताधिष्टित घडवा.
या व्यवस्थेतील उपेक्षित जे,
प्रथमतः मनुष्य त्यांना बनवा....

*****----**-------"******
  डॉ  प्रभाकर लोंढे
गोंदिया-चंद्रपूर  9673386963

*बी. के. च्या स्वप्नातील जमात जन्माला येऊ द्या!!!

🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹
*बी. के. च्या स्वप्नातील जमात जन्माला येऊ द्या!!!*
                    *डॉ प्रभाकर लोंढे*

          बी के कोकरे नावाचं वादळ धनगर जमातीमध्ये जन्माला आलं. हालाकीची कौटुंबिक परिस्थिती असताना जातीय अस्मिता व स्वाभिमानाची जाणीव यामुळे स्वाभिमानाची लाट निर्माण करणारं एक स्वाभिमानी व्यक्तित्व बी. के. कोकरे नावाने धनगर जमातीत नावारूपास आलं.  जमातीचा गौरवशाली इतिहास अभ्यासून, लयास गेलेल्या होळकरशाही चे वैभव पुनर्स्थापित करणाऱ्या राज राजेश्वर यशवंतराव होळकर यांच्या प्रेरणेने त्यांनी यशवंत सेनेची स्थापना केली. स्वाभिमान हाच या संघटनेचा आत्मा असल्यानेच संघटनेचं प्रत्येक पाऊल स्वाभिमानाच्या वाटेवर आपल्या राजकीय अस्मिता चोखायला लागले. अनेक स्वाभिमानी तरुण या प्रवाहात सामील होऊ लागले. जमातीवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार, घटनात्मक हक्कांपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हे ओळखून बी.के. नी राजकीय अस्मिता जागृत करण्याचा प्रयत्न केला. गावागावात वाड्या-वस्त्यांवर जाऊन तरुणांना जागृत करण्याचे व स्वाभिमानी लढाईत धनगर तरूणांना सामील करून घेण्याचे मोठे अभियान सुरू केले. त्यातूनच छोटी का होईना परंतु स्वाभिमानी यशवंत सेना उभी राहीली. स्वाभिमानाची लढाई सुरू झाली.
                    यशवंत सेनेची काम पाहून प्रस्थापितांना धडकी भरली. ज्यांच्या उरावर बसून, ज्यांचा सत्यानाश करून वर्षोंवर्षे आपण आपली राजकीय पोळी भाजत आलोत, ती आता बंद होणार. धनगर सारखी हक्काची ओट बँक आपल्या हातून जाणार, हे धनगर जर जागृत झाले तर आपल्याला जगणे मुश्कील होऊन जाणार, यांच्याच भरोशावर आपण महाराष्ट्रात राज करत आलो, आपली घराणेशाही जपत आलो, आता ही अघोषित घराणेशाही संपणार. आता धनगर जमात मल्हाररांव प्रमाणे राजकीय सत्तेसाठी स्पर्धेत उतरणार, राजकीय सत्तेत भागीदारी घेणार, ही भीती प्रस्थापितांना वाटू लागली. "मरता क्या नही करता" याप्रमाणे त्यांनी सर्वच मार्ग चोखाळण्यास सुरुवात केली. व त्यातून बी.के.कोकरे व जमातीच्या स्वाभिमानी आंदोलनाच्या सत्यानाशाची नांदी ठरली...... व पुढे अनर्थ.. बाकी काय??
       राजकीय सत्तेसाठी कोणत्याही कुनीतीवर जाण्याची तयारी असलेल्या, नैतिकतेच्या सीमाच नसलेल्या प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू बी. कें च्या झंझावातामुळे घसरली. आणि तिथून बी.कें च्या विरोधात कटकारस्थाने सुरू झाली. येनकेन प्रकारे बी.के. कोकरे व  त्याचा स्वाभिमानी धनगर झंझावात खतम करण्याचा जणू काही विडाच प्रस्थापितांनी उचलला. यामध्ये काट्यानेच काटा काढण्यासाठी विशेषत: धनगरांचाच वापर केला. यशवंत सेना कशी कशी खतम होईल यासाठी धनगरांच्याच काही मंडळींचा वापर त्यांनी केला. व बी.के नावाचं धशगर अस्मितेचं वादळ कशाप्रकारे शांत झालं व धनगरांची स्वाभिमानाची लढाई कशी लयास गेली, हे जमातीतील जागृत वर्ग जाणतोच आहे. याचा इतिहास मी  सांगण्याची गरज नाही. ज्यांना माहीत नाही त्यांनी नक्कीच अभ्यासावा...... बाकी काही नाही पण वाचणाऱ्याच्या स्वाभिमानाची लत्करे तरी वेशीवर टांगल्या जाणार नाही.   मात्र त्याचीच पुनरावृत्ती आज घडताना दिसत आहे हे वास्तव लक्षात आल्याशिवाय राहत नाही.
            यशवंतरावांच्या प्रेरणेतून धनगरांचा स्वाभिमान आणि तरुण आज जमातीमध्ये जन्माला आलेले आहे. त्यातून तशाप्रकारची स्वाभिमानाची लढाई उभी राहिलेली र आहे. सगळीकडे सर्वच प्रस्थापित पक्षांनी फसवणूक केली असताना याची चीड त्यांना शांत बसू देत नाही. ते आज या व्यवस्थेमध्ये आपले राजकीय अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र अशा धनगर तरुणांना हेरून त्यांना येनकेन प्रकारे  दडपण्याचाच  प्रयत्न प्रस्थापितांना मार्फत केला जातो आहे. त्यातील ज्वलंत उदाहरण म्हणजे चौंडी येथील कार्यक्रमामध्ये जमातीच्या फसवणुकीबद्दल/दिलेल्या आश्वासनासंबंधी जाब विचारणाऱ्या तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकण्याचा सपाटा लावला. डॉक्टर इंद्रकुमार भिसे सारखा स्वाभिमानी तरुण(विचारांने) अजूनही तुरुंगात ठेवला आहे.  महीनाभरानंतर जामीन झालेल्यांनाही जाचक अटी लावलेल्या आहे. यापुढे डॉक्टर भिसेंना जामीन मंजूर केला तरी त्यांच्यावर समाजात/जमातीत फिरता येणार नाही असे निर्बंध नक्कीच लावले जाणार आहे. यात काही शंकाच नाही. हे सर्व धनगर जमातीमध्ये दहशत निर्माण करण्याचे षडयंत्र असून पुन्हा कोणी धनगर तरुण प्रस्थापितांविरुद्ध आवाज उठवणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. यामध्ये धनगर नेत्यांचाच वापर केला जाण्याची दाट शक्यता आहे. व त्यातून हजारो बी.के. कोकरे नष्ट होतील व सामान्य धनगरांनी निर्माण केलेली धनगरांची स्वाभिमानाची लढाई समाप्त झाल्याशिवाय राहणार नाही.  जमात पुन्हा अस्तित्वहीन स्थितीमध्ये जातील. व आम्हाला स्वाभिमानी रक्ताच्या आमच्या राजकीय वारसाचे वारस असल्याचे सांगतानाही लाज वाटल्याशिवाय राहणार नाही.
               तेव्हा धनगर जमातीमध्ये आज जन्माला आलेले  बी के च्या स्वाभिमानी रक्ताचे तरुण जपणे अगत्याचे असून तेच संपूर्ण जमातीचं, सामान्य धनगर बांधवांचं हित साध्य करू शकतात. त्यातच  जमातीच्या अस्मितेचा उदय आहे. ज्या दिवशी या व्यवस्थेमध्ये धनगरांचे हजारो स्वाभिमानी तरुण नेते रस्त्यावर, संसदेत, विधिमंडळात, जिल्हा परिषदेत,  दिसतील. आई शपथ!! येथील निर्णय प्रक्रियेत धनगर असल्याशिवाय राहणार नाही. आरक्षण सारख्या घटनात्मक हक्कासाठी इतरांवर विसंबून राहण्याची गरज नाही किंवा भीक मागण्याची गरज राहणार नाही.  राजकीय सत्ता फक्त स्वाभिमानी तरुण धनगरांच्या हातात तर येवू द्या. किंवा धनगरांच्या नेत्यांनी निष्ठेने धनगर प्रश्नांवर काम करायला लागू द्या... तो दिवस धनगरांचा असेल.
          प्रस्थापितांकडून धनगर जमातीमध्ये घुसलेली घराणेशाहीची बिमारी केवळ धनगरांनाच नव्हे तर लोकशाही, मराठेशाहीला घातक आहे. तेव्हा कर्तृत्वाला प्राधान्य देणारी पिढी जन्माला घालण्यासाठी बी.के च्या स्वाभिमानी रक्ताचे तरुणांना​ जपणे जमातीसाठी, जमातीच्या राजकीय उत्थानासाठी व व जमातीचे सर्वच प्रश्न सोडवून जमातीला पूर्व वैभव प्राप्त करून देण्यासाठी केवळ बी.के कोकरे यांच्या स्वप्नातील धनगर तरुण व जमातीचे वैभव वास्तवात उतरु द्या!!!
  मग पहा!!!!

 *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*
*प्रस्थापितांतील धनगर नेत्यांनो!!*
*तुमच्या पक्षांना धनगरानी मतदानच का करावे??*
_______________________________
                 *डॉ.    प्रभाकर लोंढे*
------------------------------------------------

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना हे राजकीय पक्ष सातत्याने राजकीय सत्तेचा आस्वाद घेत आलेले आहेत. अशा या राजकीय सत्ता भोगवादी पक्षांनी आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी धनगर सारख्या बहुसंख्य, साध्या, भोळ्या जमातीचा बळी दिलेला आहे. या जमातीत कोणताही नेता हा सदासर्वकाळ सत्ताधीश राहणार नाही किंवा निर्माणच होणार नाही, याचा त्यांनी सातत्याने विचार सोबतच कसोशीने प्रयत्न केलेला आहे. व ही बाब आज धनगरांमधील सर्वांनाच कळून चुकलेली आहे.  याचे अनुभव या पक्षातून काम करणारे धनगर नेते, कार्यकर्ते चांगल्या प्रकारे सांगू शकतील. आजही सर्व प्रस्थापित पक्ष भावी काळात सुद्धा या धनगरांचा वापर करण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसून येत आहे.
          असे असताना अलीकडील काळात धनगर जमातीमध्ये विकसित झालेली स्वाभिमानाची, अस्मितेची भावना, अन्यायाविरुद्ध​ तरुणांमध्ये खदखद निर्माण करत आहे. यापुढे कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे मनसुबे या जमातींच्या तरुण वर्गामध्ये दिसून येत आहे. प्रस्थापित पक्षांनी केलेल्या अन्यायाचा प्रतिशोध घेऊन स्वतःचे राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न हा तरुण वर्ग करीत आहे. त्यातूनच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की, *काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी, शिवसेना, मनसे या प्रस्थापित पक्षांना धनगरानी मतदानच का करावे ??*      
           कोणी म्हणेल, याशिवाय दुसरे पक्ष तरी कोणते?? या प्रस्थापित पक्षांनी तुमचं एवढं काय बिघडवलं.? आम्ही स्वतः, याशिवाय आमचे कर्तेधार्ते (अन्नधान्य पुरविणारे) आदरनीय नेते त्या पक्षात आहे, (कोणी कोणत्या पक्षात राहायचं हा प्रत्येकाचा प्रश्न आहे) काही छाती फुगवून सांगतील, आमच्या दोन/तीन पिढ्यांपासून या पक्षात काम करीत आहे. आपण धनगरांनी या पक्षांना सोडून कधीच मतदान केलं नाही. (याचाच तर माजं या पक्षांना आलेला आहे) त्यामुळे आमच्याकडे पाहून तरी धनगरांनो या पक्षांना मतदान करा.  पण *प्रश्न येतो का??  कोणासाठी???  कशासाठी????*
       कोणत्याही पक्षातील सच्चा धनगर नेत्यांना(दलाल नाही) मतदान करणे, त्यांना जपणे भलेही आम्हा धनगरांचे आद्यकर्तव्य आहे व प्रत्येक धनगर नि:संदेह ते पार पाडेल, यात शंकाच नाही. परंतु कोणी म्हणेल,धनगर बांधवांनो!आमच्या या प्रस्थापित पक्षांना मतदान करा. तर  मी म्हणेन,ते तर शक्य नाही, कारण तो अधिकार या पक्षांनी गमावलेला आहे. हे माझं म्हणणं चुकीचे वाटत असेल तर ते सत्यतेच्या आधारे स्पष्ट (टिका नाही) करण्याचा अधिकार प्रत्येकालाच​ आहे.
                वास्तविक परिस्थिती पाहता लक्षात येते की, हे प्रस्थापित पक्ष आमच्या धनगर नेत्यांना उमेदवारीच देत नाहीत(इतिहास पहा). या पक्षांमधून आजपर्यंत आमचा कोणताही नेता मोठा होऊ दिला नाही (वैयक्तिक पातळीवर स्वतःला कोणी मोठा समजत असेल तर त्यांच स्वागत व आम्हाला नक्कीच अभिमान.) या प्रस्थापित पक्ष्यांमध्ये काम करणाऱे धनगर नेते सुद्धा धनगर प्रश्नावर आपली/ पक्षाची सार्वजनिक भूमिका सार्वत्रिकरित्या स्पष्ट करताना दिसत नाही. (केली असल्यास प्रसार होणे अत्यावश्यक) . या प्रस्थापित पक्षांचे अस्तित्वच *महाराष्ट्रातील धनगरांच्या सत्यानाशातूच बलशाली झालेलं आहे. त्यामुळे धनगरांना न्याय देवून हे पक्ष स्वःताच्या पायावर कुर्हाडी मारुन कधीही घेणार नाही हे  त्रिकालाबाधित सत्य!!!!*                     त्यामुळे या पक्षांच्या व्यतिरिक्त इतर राजकीय पर्याय शोधून स्वाभिमानाच्या​ भूमिकेत यापुढे निवडणूकी​त उतरण्याची मानसिकता धनगर तरुणांमध्ये दिसून येत आहे व येणे अत्यावश्यक आहे. त्याला विरोध करणारे सुध्दा फार थोडे आहे परंतु त्यांनी अजून पर्यंत आपली भूमिका(अजेंडा) स्पष्ट केलेली नाही. तात्विक दृष्टीकोनातून तरी अजून पर्यंतचा त्यांचा विरोध त्यांनी सार्वजनिक केलेला नाही. त्यानी तो विरोध तात्विक दृष्टीकोनातून मांडण्याचा प्रयत्न केला तरी तो या प्रस्थापित पक्षांच्या समर्थनाचा असूच शकत नाही.
        अशा परिस्थितीत या प्रस्थापित पक्षांमध्ये काम करणाऱ्या धनगर राजकीय नेते व कार्यकर्त्यांची फार मोठी गोची होतांना दिसून येत आहे.  त्यामुळे ते आज आपली नक्की भूमिका व्यक्त करीत नसले तरी  त्यांनी आपली जमाती संबंधी भावी काळासाठी भूमिका स्पष्ट करणे अत्यावश्यक आहे. त्याआधी जमातीच्या प्रश्नासंबंधी आपल्या पक्षाची भूमिका काय? हे प्रथमतः सार्वजनिक करणे आवश्यक आहे. तरच....................
            धनगरांच्या आरक्षणासारख्या घटनादत्त अधिकारासंबंधी हे राज्यघटनेचे रखवाले??? म्हणविणारे  हे राजकीय पक्ष कधीच सार्वजनिक भूमिका घेताना दिसत नाही. कधी रस्त्यावर उतरतांनाही दिसत नाही.
    त्यामुळे यापुढे 2019 या निवडणुकीमध्ये प्रस्थापित पक्षातील धनगर नेत्यांनी केवळ स्वतःच्या मतदारसंघात स्वतःला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे परंतु इतर मतदारसंघात जाऊन आपल्या पक्षाच्या गैरधनगर उमेदवारांसाठी मतदानाची अपेक्षा करू नये. पक्षश्रेष्ठींचा दबाव येत असेल तर पक्षश्रेष्ठींना सुद्धा आपल्या पक्षा संबंधात जमातीची भूमिका स्पष्ट करून सांगावी, जेणेकरून त्याचा परिणाम त्यांच्या लक्षात येईल. पक्षश्रेष्ठी त्यांच्या पक्षात असलेल्या धनगर नेत्यांना आपल्याकडे खेचून ठेवण्यासाठी  त्या पक्षातील  धनगर नेत्यांच्या मागण्या अवश्य मान्य करतील. कारण या प्रस्थापितांच्या पक्षातून हाकलून देण्याची भीती आज धनगर नेत्यांनी तरी बाळगू नये. कारण आज यापैकी प्रत्येक पक्षाला धनगर अस्मितेची कल्पना आलेली आहे. त्यामुळे धनगर नेत्यांना पक्षातून ढकलण्याचा निर्णय घेण्याची रिस्क आजतरी असा कोणताही पक्षश्रेष्ठीं घेणार नाही. घेतल्यास त्यांना महागात पडल्या शिवाय राहणार नाही. ही धनगर नेत्यांची दहशत बीजेपी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये व पक्षश्रेष्ठींपुढे निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.
            म्हणून या प्रस्थापित पक्षातील धनगर नेत्यांनी आपल्या पक्षाला 2019 निवडणुकीमध्ये धनगर मतदान मिळेल अशी आशाही बाळगू नये, अपेक्षाही करू नये, शक्य तो तसे प्रयत्नही करू नये. गरज पडल्यास प्रयत्नांचा आभास मात्र निर्माण करता येतील परंतु आपल्या पक्षातील अथवा इतर पक्षांतील धनगर नेतृत्व कसे निवडून येईल याचा विचार मात्र नक्की करावा. धनगर  कोणत्याही पक्षात का असेना, काही मतभेद, मनभेद का असेना परंतु त्याला 2019 या निवडणुकीमध्ये मतदान होईल यासाठी प्रयत्न करावा. यामुळे भलेही तुमच्या पक्षाचे उमेदवार पडतील पण धनगर जमातीचे उमेदवार निवडून येतील. विधिमंडळात धनगरांची संख्या वाढतील आणि ख-या अर्थाने धनगरी स्वाभिमान प्रस्थापितांना कळून चुकल्या शिवाय राहणार नाही........

धनगर एकता-- धनगर भाग्यविधाता !!!

*एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर* ९६७३३८६९६३

Tuesday, July 17, 2018

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻


*डॉ भिसे तुरुंगातच रहावे असं का वाटते?*
    _______________________      
                  *डॉ प्रभाकर लोंढे*
----------------------------------------

                 महाराष्ट्रातील धनगर जमातीमध्ये कधी नव्हे ती जागृती घडून आली असताना आजच्या प्रस्थापित सरकारने​ विश्वासघात केलेला आहे, ही बाब सर्वच धनगर नेते प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मान्य करीत आहे. घटनात्मक आरक्षण मिळालंच पाहीजे ही त्यांच्याच अंतररात्म्याची हाक? आता फक्त त्यांनाच ऐकायला येत आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक धनगर बांधव/नेता स्वतःला धनगर समजून समाज हितासाठी त्यातही घटनात्मक आरक्षणासाठी झटत असल्याचा खरा/खोटा प्रयत्न करीत आहे.
             या सर्व गोष्टी घडत असताना अनेक प्रश्न उपस्थित होत असले तरी त्यातील एक महत्वाचा प्रश्न म्हणजेच धनगर आरक्षणासाठी, सरकार द्वारा झालेल्या फसवणूकी विरोधात आवाज उठविणारे उच्च विद्या विभूषित धनगर बांधव डॉ इंद्रकुमार भिसे यांना सरकारने खोट्या गुन्ह्यांच्या आधारे दिड महिना झाला तरी तुरुंगात ठेवले आहे. तरी धनगर जमातीचे बहुतांश त्यातही मोठे समजणारे नेते अजूनही डॉ. भिसे यांना भेटायला का गेलेले नाहीत​?  हा मोठाच​ सामाजिक प्रश्न  मला पडलेला आहे. काहींच्या मते, तो नेत्यांचा तो खाजगी प्रश्न आहे. असे म्हणणाऱ्यांच्या मते, कदाचित ते अगदी बरोबरही असेल!
          परंतु प्रश्न निर्माण होतो की डा. इंद्रकुमार भिसें नी   चौंडीत आवाज उठवला होता, तो खाजगी होता की जमात हिताचा होता?? नक्कीच तो सर्व धनगर नेत्यांच्या हृदयातीलच प्रश्न तर उचलला होता. जमातीत धुमसत असलेल्या असंतोषालाच तर त्यांनी वाचा फोडली होती. असे असताना धनगर आरक्षण व जमातीवरील अन्याय हा प्रश्न जर डॉ भिसेंचा खाजगी प्रश्न असेल, तर यापुढे आम्हा सामान्य धनगरांना असेच नेते आवश्यक आहे., की जे जमातीचा प्रश्न खाजगी आत्मियतेने हाताळेल. अशां नेत्यांचाच सामान्य धनगरांनी स्वीकार करणे यापुढे त्यांच्या हिताचे असणार आहे. बाकी नेते तर प्रस्थापितांची हुजरेगिरी चार करतांना दिसत आहे.
       धनगर जमातीची आजची एकूण परिस्थिती दैयनिय आहे. धनगर जमातीच्या प्रत्येक नेत्यांकडे प्रस्थापितांचे विशेष लक्ष आहे. त्यापैकी डॉ. भिसे यांची धनगर प्रश्नांसंदर्भात निष्ठा पाहूनच त्यांच्यावर सरकारने खोटे गुन्हे दाखल केले आहे. यातून प्रस्थापितांना त्यांना हेतुपुरस्सर संपवायचंच आहे, हे जमातीसाठी गंभीर असलं तरी सत्य आहे, कारण या व्यवस्थेला धनगरांमधून असे नेते निर्माण होवूच​ द्यायचे नाही. आता डॉ​ भिसे चा स्व. बी.के.कोकरे होणार नाही याची काळजी घेणे, एवढंच सामान्य धनगरांच्या  हातात उरलं आहे.  कारण बी. के ना संपविण्यासाठी धनगर नेत्यांचा वापर कसा झाला? हा इतिहास संपूर्ण जमात आज जाणते आहे. आता डॉ. भिसे यांना संपविण्याची जबाबदारी प्रस्थापितांनी कोणकोणत्या धनगर नेत्यांवर सोपवली आहे व कोण कोण आपली जबाबदारी यथायोग्य पार पाडते, याकडेच जमातीचे संपूर्ण लक्ष लागले आहे .  
         धनगर जमातीच्या सर्वांना कळून चुकलं आहे की, विद्यमान सरकार धनगर विरोधात प्रत्येक निर्णय घेत आहे, जमातीवरील अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्यालाच जीवनातून उठविण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे.  सरकारी दहशत जमातीत पसरत आहे. असे असताना धनगर नेते कसे काय शांत? हा मोठाच अनाकलनीय प्रश्न आहे....
       डॉ भिसे साहेबांना, काही धनगर नेते आपला राजकीय स्पर्धक समजत असेल तर ते चुकीचे आहे. कारण धनगर जमातीची स्पर्धा/संघर्ष आपल्याच माणसाशी असूच शकत नाही. जमातीचा संपूर्ण सत्यानाश केलेल्या व करण्याची मानसिकता असलेल्या प्रवृत्तीशी लढणे गरजेचे आहे व त्यासाठी धनगरांना आता व्यवस्थेला घाबरविणारे (घाबरणारे नाही) धनगर कार्यकर्ते आवश्यक आहे, प्रस्थापितांचे मानसिक गुलाम, जमातींच्या प्रश्नाना बगल देणाऱ्या व्यवस्थेचे निमुटपणे वाहक असलेले नेते आज जमातीला कामाचे नाही.
     डॉ इंद्रकुमार भिसे एक सामान्य धनगर नसून वैद्यकीय क्षेत्रात असले तरी जमातीच्या प्रश्नांसंबंधी आत्मिक जाण असलेलं एक महत्त्वाचं आक्रमक नाव आहे. धनगर आरक्षण अमलबजावणीच्या नावावर, जमातीच्या जीवावर बसून, जमातीला दावणीला बांधून आपलं राजकीय सर्वस्व निर्माण करणारे डॉ. विकास महात्मे साहेब यांना तरी डॉ​. भिसेंच्या वैद्यकीय व सामाजिक बांधिलकीची जाणीव पाहिजे होती. ती नक्कीच असेलही, परंतु डॉ महात्मे साहेबांनी आजपर्यंत डॉ भिसे साहेबांची भेट घेतल्याची न्युज अजून मिळाली नाही.... याचा  सामाजिक स्तरावर काय अर्थ काढायचा??
       महाराष्ट्रातील प्रस्थापीत पक्ष व त्यांचे श्रेष्ठी  यांना धनगर नेत्यांची ताटाखालची मांजर हिच भूमिका अपेक्षित करतात. त्यामुळेच डॉ भिसे सारखे धनगर नेते त्यांना चालत नाही. त्यांच्या सारखे धनगर नेते त्यांना घातक आहेत, याची जाणीव त्यांना असल्यानेच त्यांनी जाणूनबुजून खोट्या गुन्ह्यांच्या आधारे डॉ. भिसे व टिमला तुरुंगात टाकलं.... आज दिड महिन्यापासून शेवटचे डॉ भिसे यांना जामीन व्हावा व त्यांना मुक्त करण्याची वाट सामान्य धनगर पाहत आहे. अनेकांनी तुरुंगात जावून त्यांची  प्रत्यक्ष  भेट घेतली आहेत परंतु प्रस्थापितांबरोबर  काम करणाऱ्या धनगर नेत्यांना डॉ भिसेची भेट घेण्याची गरज का वाटली नाही हाच मोठा प्रश्न आहे????

      याचं उत्तर यावं ही अपेक्षा!!!

 *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*