🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹
*बी. के. च्या स्वप्नातील जमात जन्माला येऊ द्या!!!*
*डॉ प्रभाकर लोंढे*
बी के कोकरे नावाचं वादळ धनगर जमातीमध्ये जन्माला आलं. हालाकीची कौटुंबिक परिस्थिती असताना जातीय अस्मिता व स्वाभिमानाची जाणीव यामुळे स्वाभिमानाची लाट निर्माण करणारं एक स्वाभिमानी व्यक्तित्व बी. के. कोकरे नावाने धनगर जमातीत नावारूपास आलं. जमातीचा गौरवशाली इतिहास अभ्यासून, लयास गेलेल्या होळकरशाही चे वैभव पुनर्स्थापित करणाऱ्या राज राजेश्वर यशवंतराव होळकर यांच्या प्रेरणेने त्यांनी यशवंत सेनेची स्थापना केली. स्वाभिमान हाच या संघटनेचा आत्मा असल्यानेच संघटनेचं प्रत्येक पाऊल स्वाभिमानाच्या वाटेवर आपल्या राजकीय अस्मिता चोखायला लागले. अनेक स्वाभिमानी तरुण या प्रवाहात सामील होऊ लागले. जमातीवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार, घटनात्मक हक्कांपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हे ओळखून बी.के. नी राजकीय अस्मिता जागृत करण्याचा प्रयत्न केला. गावागावात वाड्या-वस्त्यांवर जाऊन तरुणांना जागृत करण्याचे व स्वाभिमानी लढाईत धनगर तरूणांना सामील करून घेण्याचे मोठे अभियान सुरू केले. त्यातूनच छोटी का होईना परंतु स्वाभिमानी यशवंत सेना उभी राहीली. स्वाभिमानाची लढाई सुरू झाली.
यशवंत सेनेची काम पाहून प्रस्थापितांना धडकी भरली. ज्यांच्या उरावर बसून, ज्यांचा सत्यानाश करून वर्षोंवर्षे आपण आपली राजकीय पोळी भाजत आलोत, ती आता बंद होणार. धनगर सारखी हक्काची ओट बँक आपल्या हातून जाणार, हे धनगर जर जागृत झाले तर आपल्याला जगणे मुश्कील होऊन जाणार, यांच्याच भरोशावर आपण महाराष्ट्रात राज करत आलो, आपली घराणेशाही जपत आलो, आता ही अघोषित घराणेशाही संपणार. आता धनगर जमात मल्हाररांव प्रमाणे राजकीय सत्तेसाठी स्पर्धेत उतरणार, राजकीय सत्तेत भागीदारी घेणार, ही भीती प्रस्थापितांना वाटू लागली. "मरता क्या नही करता" याप्रमाणे त्यांनी सर्वच मार्ग चोखाळण्यास सुरुवात केली. व त्यातून बी.के.कोकरे व जमातीच्या स्वाभिमानी आंदोलनाच्या सत्यानाशाची नांदी ठरली...... व पुढे अनर्थ.. बाकी काय??
राजकीय सत्तेसाठी कोणत्याही कुनीतीवर जाण्याची तयारी असलेल्या, नैतिकतेच्या सीमाच नसलेल्या प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू बी. कें च्या झंझावातामुळे घसरली. आणि तिथून बी.कें च्या विरोधात कटकारस्थाने सुरू झाली. येनकेन प्रकारे बी.के. कोकरे व त्याचा स्वाभिमानी धनगर झंझावात खतम करण्याचा जणू काही विडाच प्रस्थापितांनी उचलला. यामध्ये काट्यानेच काटा काढण्यासाठी विशेषत: धनगरांचाच वापर केला. यशवंत सेना कशी कशी खतम होईल यासाठी धनगरांच्याच काही मंडळींचा वापर त्यांनी केला. व बी.के नावाचं धशगर अस्मितेचं वादळ कशाप्रकारे शांत झालं व धनगरांची स्वाभिमानाची लढाई कशी लयास गेली, हे जमातीतील जागृत वर्ग जाणतोच आहे. याचा इतिहास मी सांगण्याची गरज नाही. ज्यांना माहीत नाही त्यांनी नक्कीच अभ्यासावा...... बाकी काही नाही पण वाचणाऱ्याच्या स्वाभिमानाची लत्करे तरी वेशीवर टांगल्या जाणार नाही. मात्र त्याचीच पुनरावृत्ती आज घडताना दिसत आहे हे वास्तव लक्षात आल्याशिवाय राहत नाही.
यशवंतरावांच्या प्रेरणेतून धनगरांचा स्वाभिमान आणि तरुण आज जमातीमध्ये जन्माला आलेले आहे. त्यातून तशाप्रकारची स्वाभिमानाची लढाई उभी राहिलेली र आहे. सगळीकडे सर्वच प्रस्थापित पक्षांनी फसवणूक केली असताना याची चीड त्यांना शांत बसू देत नाही. ते आज या व्यवस्थेमध्ये आपले राजकीय अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र अशा धनगर तरुणांना हेरून त्यांना येनकेन प्रकारे दडपण्याचाच प्रयत्न प्रस्थापितांना मार्फत केला जातो आहे. त्यातील ज्वलंत उदाहरण म्हणजे चौंडी येथील कार्यक्रमामध्ये जमातीच्या फसवणुकीबद्दल/दिलेल्या आश्वासनासंबंधी जाब विचारणाऱ्या तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकण्याचा सपाटा लावला. डॉक्टर इंद्रकुमार भिसे सारखा स्वाभिमानी तरुण(विचारांने) अजूनही तुरुंगात ठेवला आहे. महीनाभरानंतर जामीन झालेल्यांनाही जाचक अटी लावलेल्या आहे. यापुढे डॉक्टर भिसेंना जामीन मंजूर केला तरी त्यांच्यावर समाजात/जमातीत फिरता येणार नाही असे निर्बंध नक्कीच लावले जाणार आहे. यात काही शंकाच नाही. हे सर्व धनगर जमातीमध्ये दहशत निर्माण करण्याचे षडयंत्र असून पुन्हा कोणी धनगर तरुण प्रस्थापितांविरुद्ध आवाज उठवणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. यामध्ये धनगर नेत्यांचाच वापर केला जाण्याची दाट शक्यता आहे. व त्यातून हजारो बी.के. कोकरे नष्ट होतील व सामान्य धनगरांनी निर्माण केलेली धनगरांची स्वाभिमानाची लढाई समाप्त झाल्याशिवाय राहणार नाही. जमात पुन्हा अस्तित्वहीन स्थितीमध्ये जातील. व आम्हाला स्वाभिमानी रक्ताच्या आमच्या राजकीय वारसाचे वारस असल्याचे सांगतानाही लाज वाटल्याशिवाय राहणार नाही.
तेव्हा धनगर जमातीमध्ये आज जन्माला आलेले बी के च्या स्वाभिमानी रक्ताचे तरुण जपणे अगत्याचे असून तेच संपूर्ण जमातीचं, सामान्य धनगर बांधवांचं हित साध्य करू शकतात. त्यातच जमातीच्या अस्मितेचा उदय आहे. ज्या दिवशी या व्यवस्थेमध्ये धनगरांचे हजारो स्वाभिमानी तरुण नेते रस्त्यावर, संसदेत, विधिमंडळात, जिल्हा परिषदेत, दिसतील. आई शपथ!! येथील निर्णय प्रक्रियेत धनगर असल्याशिवाय राहणार नाही. आरक्षण सारख्या घटनात्मक हक्कासाठी इतरांवर विसंबून राहण्याची गरज नाही किंवा भीक मागण्याची गरज राहणार नाही. राजकीय सत्ता फक्त स्वाभिमानी तरुण धनगरांच्या हातात तर येवू द्या. किंवा धनगरांच्या नेत्यांनी निष्ठेने धनगर प्रश्नांवर काम करायला लागू द्या... तो दिवस धनगरांचा असेल.
प्रस्थापितांकडून धनगर जमातीमध्ये घुसलेली घराणेशाहीची बिमारी केवळ धनगरांनाच नव्हे तर लोकशाही, मराठेशाहीला घातक आहे. तेव्हा कर्तृत्वाला प्राधान्य देणारी पिढी जन्माला घालण्यासाठी बी.के च्या स्वाभिमानी रक्ताचे तरुणांना जपणे जमातीसाठी, जमातीच्या राजकीय उत्थानासाठी व व जमातीचे सर्वच प्रश्न सोडवून जमातीला पूर्व वैभव प्राप्त करून देण्यासाठी केवळ बी.के कोकरे यांच्या स्वप्नातील धनगर तरुण व जमातीचे वैभव वास्तवात उतरु द्या!!!
मग पहा!!!!
*एकच ध्यास --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
*धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

No comments:
Post a Comment