🤫🤫🤭🤫🤫🤭🤭🤭🤭🤫
*बीजेपी मधील धनगर नेत्यांनो! आता तुम्ही शांत बसणंच उत्तम..*
--------------------------------
*डॉ.प्रभाकर लोंढे*
महाराष्ट्राच्या विद्यमान राजकीय परिस्थितीतचे व त्यातही धनगर जमातीमध्ये चाललेल्या उपद्व्यापाचे अवलोकन केल्यास फार मोठी गंभीरता लक्षात येते. एकीकडे मराठ्यांना १६%आरक्षण देवून पदभरती करण्याची भाषा बोलली जात आहे. त्याचवेळी धनगरांच्या आरक्षण मुद्यावर सरकार स्थापन झाले असताना (मुख्यमंत्री यांच्या मते) पहील्याच कबीनेट बैठकीत धनगर आरक्षणावर निर्णय घेण्याची कसम खाणारे तत्कालिन मा. देवेंद्रजी फडणवीस आजचे मा. मुख्यमंत्री साहेब धनगर आरक्षणावर कोणतेही ठोस निर्णय घेत नाही. ही बाब बीजेपी मधील सर्वच धनगर नेत्यांना कळून चुकलेली आहे. याशिवाय धनगर आरक्षणाच्या बाबतीत आम्ही प्रयत्नशील आहोत असं भासविणारं हे सरकार न्यायालयीन खटल्यात आपली स्पष्ट धनगर विरोधी भूमिका मांडते.
या सर्व बाबींचा विचार करता बीजेपी मध्ये कार्य करणाऱ्या धनगर नेते, कार्यकर्ते यांची मोठीच गोची झालेली आहे. कारण यांनीच बेंबीच्या देठापासून ओरडून सांगितले होते की, बीजेपी सरकारच धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करू शकते. म्हणूनच यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून धनगरांनी मतदान केले व बीजेपीला सत्तेत बसविले आहे. परंतु आज या सरकारने त्यांना(धनगर नेत्यांन) उलट पाडलेलं आहे. या बीजेपी धनगर नेत्यांचे सामान्य धनगरांमध्ये जाण्याचे सर्वच रस्ते बंद केलेले आहे. सामान्य धनगरांनी आरक्षणासंदर्भात धनगर हिताचं काय केलं/ किंवा बीजेपी सरकारनं आम्हा धनगरांना काय दिलं? अशा प्रश्नांसंदर्भात उत्तर देण्यासाठी धनगर नेत्यांना थोडीही जागा राहीलेली नाही किंवा या सरकारने निर्लज्जपणे त्यांच्यासाठी ठेवलेली नाही. म्हणून काहींना तर आपल्या संघटनांच्या नावातून *"आरक्षण"* हा शब्दच हटवावा लागला.
एकूणच बीजेपीतील धनगर नेत्यांची हालत "धरलं तर चावते अन् सोडलं तर पळते" अशी झालेली आहे. यातून बाहेर निघण्यासाठी अयशस्वी धडपड(की नुसती वळवळ?) करतांना बीजेपीतील जवळपास सर्वच धनगर नेते पहायला मिळते. कारण आज सामान्य धनगरांपर्यंत कोणत्या मुद्यावर जायचं हा मोठाच प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलेला आहे. आपल्या पक्षाकडून धनगरांचा फार मोठा विश्वासघात केल्यानंतर आज ते धनगरांचा विश्वास संपादनाचे मुद्दे शोधत आहे. त्यात ते किती यशस्वी होणार हे येणारा काळ व सामान्य धनगरच ठरविणार आहे.
कोणी मेंढ्या एकदम विमानाने निर्यात करण्याचा अयशस्वी देखावा करतो आहे. मात्र आरक्षणाच्या बाबतीत काय सांगावे समजत नाही आहे. मागे न झालेल्या नामांतराच्या श्रेयासाठी वाद चालू होता.राजमाता अहील्या स्मारकासाठी निधी मिळविण्याचा विक्रम केल्याच सांगितले जात आहे. असे अनेक उपक्रम पहायला मिळत आहे. कोणीे पक्षात राहूनच बीजेपीच्या विरोधात दंड ठोकण्याचा आव आणतो आहे, तो किती खरा?? याची सत्यता मात्र त्यांनाच माहीत आहे!! आता म्हणे त्या आटपळीतून बीजेपीच्या धनगर नेत्यांनी बीजेपी सरकारलाच आरक्षणासाठी १०० दिवसांचा अल्टिमेटम दिला. चांगली गोष्ट आहे. पण सर्वांनी र्बीजेपीचा राजिनामा देवून जर हा उपक्रम केला असता तर काही थोडफार खरा वाटण्याची दाट शक्यता वाटली असती!
कदाचित महाराष्ट्रातील बीजेपी सरकार केंद्राकडे धनगर आरक्षणासंदर्भात काही थातुरमातुर अहवाल पाठविणार असेल किंवा धनगर नेत्यांना पुन्हा सामान्य धनगरांनापर्यंत पोहचण्यासाठी मोठा रस्ता बनवून देणार असेल! याचा काहींना सुगावा लागला असावा, (नसेल तर काय अर्थ?) असं असेल तर श्रेयवाद व सामान्य धनगरांनापर्यंत पोहचण्यासाठी उत्तम व सोईचं राहणार आहे. दुसरीकडे धनगरांचे तुकडे करण्यासाठी सुध्दा बीजेपीला सोयीचं होणार आहे. एक दोन धनगर नेते मोठे बनणार आहे! *सत्य काय ते सगळं बिचारा सामान्य धनगर चुपचाप बघणार आहे, तो त्याचा ! त्याने निर्माण केलेल्या आंदोलनाचा!!. व भावी धनगर पिढ्यांचा धनगरांनीच केलेला सत्यानाश!!* धनगरासाठी काही तरी मोठं नाटक करण्याचा मुहूर्त (२०१९ ची निवडणूक) बीजेपी साठी जवळ आला आहे. तो मुहूर्त लाभदायक ठरावा यासाठी बीजेपी पुन्हा काही देखावा करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहेच. परंतु
गेल्या पंचवार्षिकमधील सत्ता धनगरांमुळे मिळालेल्या बीजेपीचा हिशोब करण्याची वेळ आली आहे. तो होणारच! या बीजेपी सरकारने धनगरांना काय काय दिलं याचा हिशोब प्रथम बीजेपीतील धनगर नेत्यांनी मांडावा. त्याची वाट सामान्य धनगर बघतो आहे.... तोपर्यंत सर्वांनी राबविलेले उपक्रम (भलेही सत्यवादी असेल) उपद्रवच वाटणार आहे, यात काही शंकाच नाही...
तोपर्यंत बीजेपीतील धनगर नेते-कार्यकर्त्यांनी शक्य असल्यास सत्यता सार्वजनिक करावी.. जमात पुन्हा भ्रमित होणार नाही, याची दक्षता घ्यावी. भ्रमित जमातीला आता योग्य दिशा मिळू द्यावी... तोपर्यंत आपण शांत बसल्यास जमातीवर फार मोठे उपकार होतील.... कारण लोकशाहीमध्ये आपल्या पक्षाच्या निर्णयावर प्रभाव पाडण्याची/कमांड निर्माण करण्याची क्षमता जेव्हा आपल्या कडे नसते. तेव्हा आपण शांत बसणेच उपयोगाचे असते. एकूण परिस्थिती पहाता ही जमातीच्या व सामान्य धनगर हितार्थ माझी सुचना आहे, सल्ला नाही. सुचना पाळलीच पाहिजे असा कुठलाही दंडक नाही..... याचं अर्थाने हा लेख वाचावा ... व दुसऱ्या कडे पाठवावा....
*एकच ध्यास --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
*धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

No comments:
Post a Comment