🇮🇳🇧🇦🇧🇦🇧🇦🇧🇦🇦🇹🇦🇹🇦🇹🇦🇹🇮🇳
*सु. मल्हाररावांच्या जीवनातील प्रसंग नेत्यांना मार्गदर्शक!!!!*
*डॉ. प्रभाकर लोंढे*
भारतातील सर्वांत समृद्ध संस्थान चे संस्थापक व मराठाशाहीचे आधारस्तंभ थोर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जीवनातील प्रसंग आजच्या काळातील धनगर नेत्यांना मार्गदर्शक असून निवडणूक काळात यशस्वी निर्णय घेण्यासाठी अतिशय प्रेरणादायी आहे. असा तो प्रसंग पुढीलप्रमाणे आहे.
छत्रपतीच्या आज्ञेनुसार बाळाजी विश्वनाथाने १९ जून १७१८ ला दिल्ली मोहीम सुरू केली होती. त्या मोहिम मध्ये मल्हारराव प्रथमच सामिल झाले होते. त्यांना पेंढारी च्या पथकासोबत कोणतीही रसद न देता सामिल करून घेण्यात आले होते. *(धनगरांची सामाजिक दुरावस्था)* त्यामुळे त्यांना स्वत:च्या वाटखर्चासाठी स्वत:च व्यवस्था करावी लागत होती.
अशा परिस्थितीत फौजा दिल्लीत पोहोचल्या. एका महालाच्या खंडणीचा ऐवज ठरविला गेला. पण अट फक्त एकच, महालाच्या परिसरातील गवत काडी, किंवा शेते यांची नासधूस करु नये. ही अट तशी मल्हारराव होळकरांकडून पालन होणे कठीण होते. शेवटी मल्हाररावांच्या स्वारांनी शेतातील पिके कापून आणून घोड्यांना खायला दिले. ही बातमी बाळाजी विश्वनाथ पेशवे कडे गेली. तोच त्यांचा सतरा वर्षं वयाचा मुलगा बाजीरावने रागात येवून मल्हाररावांच्या बारगीरास काठी मारली. हा प्रसंग पाहून मल्हाररावांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यावेळी संतापलेल्या मल्हाररावांनी हातात येईल ते *मातीचे ढेकूळ बाजीरावाच्या छाताडात हाणले.*
याचा परिणाम बाळाजी विश्वनाथाने मल्हाररावांचा गोट दुसरे दिवशी लुटून घेण्याचा विचार केला. ही बातमी मल्हाररावांना कळताच त्यांनी धाडसाने आपले बारगीरांना सांगितले *, जे माझ्या मरणाच्या सोबत असेल त्यांनी राहावे आणि नसेल त्यांनी निघून जावे.* शेवटी फक्त बाविस सहकारी जवळ शिल्लक राहिले. त्या सर्वांना सोबत घेऊन *मल्हारराव सर्व तयारीनिशी टेकडीवर ढाल तलवार घेऊन जावून बसले.*
या विषयीची माहिती मराठ्यांच्या सैन्यामध्ये असलेल्या *पांढरे नावाच्या धनगर सरदारास मिळताच तो मल्हाररावांना येऊन भेटला आणि मल्हाररावांना त्यांनी धीर दिला. हिम्मत सोडू नको. हाटकर- खुटेकर धनगराचे बीज ज्याचे असेल तो तुजला सामील आहे, तुझी वाट ती आमची वाट आहे.(पोटजाती विसरा)*
त्याच वेळी त्यांनी पेशव्याकडे जाऊन झाल्या प्रकाराचा निषेध केला व सांगितले, ठणकावले. सरदारी करू म्हणता आणि शिपायांची बरदास या प्रकारची!
*तुम्हास ढेकूळ मारले तो तुमचे हरिपाचा(शत्रुचा) प्राण घ्यावयास कसा चुकेल, कदाचित धनगर मात्र त्यास सामील झाल्यास कसे पडेल?*
ही बाब पांढरे सरदाराने पेशव्याच्या निदर्शनास आणून देताच पेशव्यानी मल्हाररावांना लुटण्याचा विचार सोडून दिला. व त्याच्याशी दिलजमाई करण्यासाठी बाजीरावला सोबत घेऊन बाळाजी विश्वनाथ मल्हाररावांकडे पहाडीवर गेले. *तेथे मल्हाररावांना वस्त्रे देऊन 20000 रुपये नगदी पदरी घालून त्यांची घोडे ज्या गोटात गेली होती ती परत स्वाधीन केली. पुढे मल्हाररावानी पंचवीस घोड्यांची सव्वाशे घोडी केली.( स्वकर्तृत्वावर विश्वास)*
काही दिवसांनी माघारी फिरताना *सिपरी कोल्हारस या ठिकाणी बाजीराव नाल्याच्या पाण्यात स्नान करीत असताना मल्हाररावानी बाजीरावास धडा शिकवण्याच्या दृष्टीने गराडा घातला आणि सरळ छातीला बाण लावला. तुझा वाली कोण? अशा शब्दांमध्ये त्याचा समाचार घेतला. त्यावर बाजीरावाने मल्हाररावांना भोजन करण्याचा आग्रह केला.( अपमानाचा बदला)*
परंतु मल्हाररावांनी नकार दिला. त्यावेळी बाजीराव बोलले. तुमची *आमची या अन्नाची क्रिया तूम्हाकडे स्वारी करणे समयी 5000 फौजेची सरदारी सांगू. (यशस्वी तडजोड)*
अशाप्रकारे मल्हाररावांच्या *सरदारकी संबंधाने बोलण्याचे वचन बाजीरावाने मल्हाररावांना दिले.*
हा प्रसंग मल्हाररावांना आदर्श मानणार्या प्रत्येक धनगर नेतृत्वाच्या स्वाभिमानी रक्ताला दिशा देणारा आहे. संपूर्ण प्रस्थापित व्यवस्था धनगर विरोधात असताना धनगर नेत्यांना राजकीय व्यवस्थेत आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यामधून खरंच खूप काही शिकण्यासारखे आहे. मात्र आम्ही आमच्या इतिहासापासून किती प्रेरणा घेतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
यापुढे आम्ही इतिहासापासून प्रेरणा घेतली तरच आमचा राजकीय उदय होणार आहे. *युद्ध तलवारीचे असो की मतपेटीचे असो. नीती कौशल्य, विजूगिशी वृत्ती, स्वाभिमानी बाणा, संकट समय एक दुसऱ्याला साथ देण्याची वृत्ती. एकात्मतेची भावना (पोटजातींचा विसर), शत्रूची अचूक ओळख, प्रसंगावधान, अचूक वेळ लक्षात घेऊन हीत साध्य करण्याची कला यासाठी मल्हाररावांच्या जीवनातील हा प्रसंग अतिशय मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे.*
धनगर नेत्यांनी या प्रसंगाचा सहसंबंध आजच्या काळातील *लोकशाही व्यवस्थेच्या संदर्भात समजून घेवून पोटजाती विसरून शत्रूच्या विरोधात संघटित होऊन लढण्यासाठी हा प्रसंग सर्वांसमक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला आहे* ...
जय मल्हार साहेब
एकच ध्यास --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
*धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

No comments:
Post a Comment