Friday, March 8, 2019

धनगरांनो! तुमची कितवी पिढी राजकारणात आहे??*

👨‍👦‍👦👩‍👦‍👦💥👩‍👧‍👧👨‍👦‍👦💥👨‍👧‍👧👩‍👦‍👦💥👩‍👦‍👦👨‍👧‍👦
*धनगरांनो! तुमची कितवी पिढी राजकारणात आहे??*

              *डॉ.प्रभाकर लोंढे*

भारतीय लोकशाहीच्या सत्तर वर्ष यशस्वी कालावधीत सत्तेच्या विकेंद्रीकरणा सोबतच अप्रत्यक्षपणे सत्तेचे केंद्रीकरण झाल्याचे निदर्शनास येते.  जातीय वर्चस्ववाद आणि त्यातून निर्माण झालेली घराणेशाही यामुळे अहंकाराधिष्ठित राजकारण व द्वेशाधिष्ठित प्रवृत्तीमुळे भारतीय लोकशाहीला भयंकर किड लागली आहे.
          ही किड इतकी भयंकर आहे की, त्यामुळे धनगर जमाती सारख्या अनेक जाती जमाती समुह सत्तेपासून कोसो दूर फेकले गेले आहे. तर दुसरीकडे विशिष्ट घराण्यांकडे सत्तेचे केंद्रीकरण  पिढ्यान् पिढ्या चालू आहे. या घराण्यांची दुसरी तिसरी, चवथी पिढी राजकारणात प्रवेश केलेली आहे. त्यांच्याकडे आर्थिक सत्तेचे सुध्दा केंद्रिकरण झालेले आहे. त्यावेळी येथील लोकशाही वर महाभयंकर प्रश्न निर्माण होतो.  येथे समताधिष्ठित लोकशाही, न्यायाधारित समाज केव्हा निर्माण होईल व कायदे सर्वांसाठी समान या मानसिकतेतून राज्यघटनेची संपूर्ण अंमलबजावणी होईल, अशी लोकशाही कधी प्रस्थापित होईल,? हा प्रश्र्न असतांनाच लोकशाही अंतर्गत  पोसली गेलेली घराणेशाही ही सुद्धा मोठी समस्या आहे. त्यापैकी उदाहरणार्थ
१) *नेहरू/गांधी- पंडित- इंदिरा- राजिव/सोनिया- राहूल/प्रियंका)*
२) *पवार - शरद- सुप्रिया/अजित- पार्थ,)*
३) *ठाकरे - बाबासाहेब- उध्दव/ राज- अमित)*
४) *महाजन - प्रमोद - पुनम*
५) *राणे -नारायण- नितेश/निलेश)*
 *६) मुंडे गोपीनाथ-पंकजा/प्रितम/धनंजय)*
७) *तटकरे - सुनील- मुलगा तटकरे)*
ही सर्वपरिचित उदाहरणे मी माहिती साठी घेतली आहे. आपणास माहीत असलेली अशी अनेक उदाहरणे लिहू शकता.
त्याचवेळी धनगर जमात बहुसंख्येने असतांना आपण या धनगर जमातीच्या किती घराण्यांची कोणती पिढी राजकारणात आहे, किती कायम टिकून आहे याचा आपण विचार करू...
१)शेंडगे- शिवाजीराव-प्रकाश/रमेश-????
२) डांगे- अण्णासाहेब- ?????????
३). देवकाते- आनंदराव----?????
४). जानकर- महादेव...??????
५) वडकुते - रामराव---??????
६) रूपनवर- रामहरी...????
७) भदे.- हरीदास----????
८)
९)
१०)
असे आपण आपल्या माहिती प्रमाणे नावे लिहू शकता. या सर्व नावांचा विचार केला तर त्यांची सर्वांची पहीलीच पिढी राजकारणात दिसते. किंवा काही राजकारणाच्या/सत्तेच्या बाहेर फेकल्या गेल्याचेही लक्षात येते. यांच्या पैकी बहूतांश लोकमताच्या आधारे निवडून आलेले नाही तर बहुतेक नेत्यांनी प्रस्थापितांच्या दयेवर म्हणजेच विधानपरिषदेत प्रतिनिधित्व मिळविलेले आहे/ नेतृत्व केलेले आहे. महाराष्ट्रातील घराणेशाही प्रमाणे त्यांची दुसरी पिढी प्रभावीपणे तर सोडा राजकारणात सक्रिय असायला हवी होती. परंतु तसे दिसत नाही. याचा अर्थ सर्व धनगर नेते कार्यकर्ता व सामान्य धनगर लोकांनी ही बाब समजून घेण्यासारखी आहे. मनाला लागण्यासारखी आहे.
परंतु कोण किती मनावर घेणार ही बाब धनगर तरूणांच्या संवेदनशीलतेवर अवलंबून आहे. त्यावरुनच पुढचे भवितव्य निश्चित होणार आहे.
       धनगर तरुणांनो! तुमचे भवितव्य, राजकीय अस्तित्व तुमच्या हातात आहे. तुमचा उज्वल राजकीय, सामाजिक भवितव्यासाठी आपली प्रथम पिढी राजकारणात उतरवा.  तुमच्या दहा पिढ्या सत्ता गाजवतील. ही बाब आपल्या ऐतिहासिक राजकीय वारसा वरून लक्षात येईल. आतापर्यंत आपल्या समस्या सोडविण्यासाठी दुसऱ्यांना विनंती केली. आंदोलने केली, प्रस्थापितांचे झेंडे, खुर्च्या उचलल्या.. परंतु आम्ही खुर्च्या मध्ये बसण्याचा विचारच केला नाही. आता आपण आपली पहिली पिढी सत्तेत बसवून *भारतीय लोकशाहीला धनगर रक्ताच्या राष्ट्रप्रेमाचा, सत्याधारित राजपटाचा वारसा देवू* ....  वारसा घडवू....
 *प्रस्थापितांवर टिका करत बसण्यापेक्षा आपणच प्रस्थापित होऊ....*

जय मल्हार!!!!!

 *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

No comments:

Post a Comment