Thursday, February 8, 2018

आधारमकस आयोजित काव्यस्पर्धा सहभाग
------------------------------------

अर्थ वैधव्याचा..
------------------

सांग तुझ्या वैधव्याचा
मी काय काढू अर्थ.
स्वप्न तुझे साकारतांना
जीवन गेलं काय माझं व्यर्थ ...

तुझ्याच साठी जगणे-मरणे,
होता काय कधी माझा स्वार्थ?
तुच समजू शकते सखे
माझ्या जीवनाचा सत्य परमार्थ.

समजून चुकली असेल तर
सखे, जगास सांग एकदा!
माझ्या जगण्याचा मतितार्थ.
तुझ्याच सुखाशिवाय शोधला का
माझ्या जीवनाचा सर्वार्थ.

आज मुडदा पडलो तरी
ऐक माझ्या आत्म्याची हाक आर्त.
प्रत्येक क्षण जगलो मी
जो कधीच नव्हता व्यर्थ .

सांग सखे! माझ्या मरणाचा
तू काय काढलास अर्थ.
मी जगलो असेल तुझ्याच साठी
तर आता का रडते व्यर्थ ?

-----------------------------

डॉ. प्रभाकर रामाजी लोंढे
गजानन कॉलनी, अंगूर बगीचा, रिंग रोड, गोंदिया ४४१६१४

dr.londhe25@gmail.com
mob no  9673386963

No comments:

Post a Comment