Friday, February 23, 2018

((कर्मयोगी गाडगे बाबा जयंती निमित्ताने त्यांच्या निष्काम कर्मसाधनेला व समाज सेवेला वंदन करुन त्यांच्या मार्गावर चालणाऱ्या संतांना माझा सलाम )


लज्जित संतपरंपरा


खूप झाले आता बाबा!
साधू, संत अन् बापू.
लागले दिसू त्यांच्यामध्ये
चोर, लुटेरे, खिसेकापू

जिकडे तिकडे दिसतात बाबा!
साधू साध्वी अन् महान बापू.
सत्संग, किर्तनाच्या नावावर
लागले अमाप पैसा छापू.

पैशाच्या गाद्यांवर बाबा
लागले संत आमचे झोपू.
घेतला आखून प्रत्येकानेच
हक्काचा आपला टापू.

प्रत्येकाच्या टापू मध्ये बाबा!
लागला भक्तगण रात्रंदिन खपू.
भक्तांच्या परीश्रमावर संतांचा
लागला व्यापार विश्व व्यापू.

सत्संगाच्या नावावर बाबा!
बनविले यांनी आपले कम्पू.
गोमुत्र, औषधच काय?
विकू लागले लिपस्टिक-शाम्पू .


संत नावाचा व्यापार पाहून बाबा!
वाटते कधी चांगले यांना झापू.
भिती ही वाटते बाबा यांची
काही बाळगतात धारदार चाकू.

महाराष्ट्राच्या संत परंपरेला
लागलेला कलंक पाहून,
डोकं माझंही लागलं तापू.
लाजही वाटते गाडगे बाबा
आधुनिक संत परंपरेत
तुमचं नाव कसं छापू.......

      डॉ. प्रभाकर लोंढे
           गोंदिया-चंद्रपूर 
              ९६६३३८६९६३ )



No comments:

Post a Comment