Wednesday, February 14, 2018

*धनगरानो! आता राजकीय सम्मेलने आयोजित करा..*
*************************


*धनगर बांधवानो!*  नुकतच धनगर साहित्य सम्मेलन पार पडलं ही अतिशय स्तुत्य बाब आहे.
आमचा साहित्यिक वारसा जपत स्वाभिमानी नवसाहित्य निर्मितीला प्रोत्साहन देणे या निष्कलंकित हेतूने अशी साहित्य सम्मेलने सपन्न होणे ही समाजाच्या प्रगल्भतेचे लक्षण आहे. त्यादृष्टीने धनगर साहित्य सम्मेलनाची वाटचाल व्हावी ही सर्व हितचिंतकांची अपेक्षा असणे हेही स्वाभाविक आहे. त्यानुसार धनगर साहित्य सम्मेलन यशस्वी रितीने पार पडतय खरंच ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.
        खरं  तर साहित्य हे सुखवस्तू समाजाची मिजास आहे. साहित्य पोट भरल्यानंतर दिलेला तृप्तीचा ढेकर आहे. साहित्यातून खरंच वेदनांविषयी नक्कीच संवेदना व्यक्त करता येत हेही सत्य आहे.साहित्यातून दुःखाला सार्वजनिक पातळीवर मांडता येतं. पण पोटासाठी लागणारा घास व जुलमांचा फास सोडविता येत नसतो. समाज विकासाला पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी आर्थिक सत्तेबरोबरच राजकीय सत्तेशिवाय पर्याय नसतो.  परंतु आज लोकशाही महाराष्ट्रात धनगरांची जेवढी राजकीय दुरावस्था आहे. ती इतिहासात कधीच नव्हती.  त्यामुळेच आजआम्ही आमच्या कर्तबगार राजकीय वारसा सांगण्याच्याही लायकीचे राहिलेलो नाही. स्वतःचे प्रश्न सोडविण्यासाठी भिक मागण्याशिवाय पर्याय नाही.
      रानोमाळ भटकणाऱ्या बहूसंख्य धनगर  बांधवांचे प्रश्न फक्त राजकीय सत्तेच्या माध्यमातूनच सोडवू शकतो. आपल्या माणसाच्या हिताला अपेक्षित धोरण राबविणं. सोबतच विविध योजना च्या माध्यमातून त्यांना संधी उपलब्ध करूण देण्यासाठी राजकीय सत्ता व प्रशासनातील सहभागच अत्यावश्यक असतो.
             आजचा धनगरांचा राजकीय सत्तेतील सहभाग नगण्य असल्यामुळे इतरांच्या दयेवर अवलंबून राहावे लागत आहे. ही राजकीय वारासा सांगणाऱ्या धनगर बांधवासाठी लाजिरवाणी बाब आहे.
          ऐतिहासिक दाखल्यांचा संदर्भ घेतला तर लक्षात येत की आपल्या पूर्वज वंशजांनी जगावर छाप पाडली ती राजकीय सत्ता हातात घेवूनच पाडलेली आहे.  त्यांनी कधी आरक्षण अथवा नामांतरासाठी व शेळ्या मेंढ्याच्या कुरण पास साठी भिक मागीतल्याचे दाखले मिळत नाही.
आपल्या पुर्वजांच्या दयेवर अनेक जगत होते. दानधर्मासाठी आपले पुर्वज जगप्रसिध्द होते.
(आपल्या पुर्वजांच्या दयेवर जगणाऱ्याचे वंशज आज सत्तेत आहे व आपल्याला सत्ता व हक्कापासून रोकत आहे.) ते त्यांना राजकीय सत्तेमुळे शक्य झालं ही वास्तविकता नाकारता येत नाही.
 त्यासाठी राजकीय सत्ता हस्तगत करणे याशिवाय आज आपल्या कडे दुसरा पर्याय नाही. राजकीय सत्तेचे पाठबळ असलेल्या इतर गैरधनगर साहित्य सम्मेलनांचा मिजासपुर्ण थाट संपूर्ण महाराष्ट्र बघतो आहे. त्यामुळे सत्तेचे स्वप्न पहाणे व त्यासाठी प्रयत्न करणे यासाठी प्रत्येक धनगर बांधवानी कार्यमग्न होणे गरजेचे आहे.
  ज्या दिवशी आपल्या हातात सत्ता असेल तो दिवस आपलाच नाही तर समाजव्यवस्थेचा सुवर्णकाळ (इतिहासाप्रमाणे) असेल.

*त्यासाठी धनगर बांधवानो!!!*

१) आपली राजकीय सम्मेलनने घ्या.

२) सम्मेलनातुन आपले छोटे- मोठे नेते, कार्यकर्ते  यांचे उद्बोधन वर्ग होवू द्या .

३) उद्बोधन वर्गातुन आपल्या राजकीय अस्मिता जागृत होईल. यासाठी उपक्रम राबवा.

४) प्रस्थापिताच्या नीती दुष्टनीतीवर समालोचन घडवून आणा.

५)धनगर राजकीय नेते कार्यकर्ते यांच्या मध्ये समन्वय साधला जाईल. यासाठी प्रयत्न करा.

६) धनगर नेत्यांनी परस्पर टिका करणे टाळावे यासाठी प्रयत्न करा.

७) आपले नेते कोणत्याही पक्षात काम केले तरी चालेल परंतु पडद्यामागून त्याच्यात विचार विनिमय झालाच पाहिजे यासाठी प्रयत्न कराच.

८) राजकारणातील धनगरांचे खरे शञु कोण याची सहपुरावा सार्वजनिक जाणीव करून द्या..

९) पक्षहितापेक्षा समाजहिताला प्राधान्य देण्याची वृत्ती नेत्यांमध्ये वृध्दिंगत होईल यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी अशा प्रयत्नाला साथ द्या .

१०) जमातीच्या राजकीय प्रश्नावर चर्चा घडवून आणा.

११) समाजातील नेते जमातबांधवाच्या समस्याशी कटीबध्द असल्याचा विश्वास  जनते मध्ये निर्माण करा.

१२) नेत्यांना सामाजिक समस्या संबंधात कटिबध्दतेची जाणिव व त्यासंबंधी जानतेशी सुसंवाद साधण्यासाठी बाध्य करा.

 १३) यासाठी सर्व नेत्यांना एकाच मल्हार पीठावर अभिव्यक्त होण्याची संधी द्या .

यासाठीच आज धनगराच्या राजकीय सम्मेलनाचे आयोजन करणे हाच धनगरांच्या राजकीय अभ्युदयाचा यशस्वी मार्ग ठरू शकतो.....

*धनगर राजकीय नेतृत्व व राजकीय जागृतीचा अभ्यासक*
------------------------------------
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर*
९६७३३८६९६३

No comments:

Post a Comment