Wednesday, October 17, 2018

धनगरानो! पुन्हा एखादा महान आत्मा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या..*

🇧🇦🇧🇦🇧🇦🇧🇦🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇦🇹🇦🇹
*धनगरानो! पुन्हा एखादा महान आत्मा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या..*
         
        *__ डॉ प्रभाकर लोंढे__*
________________________
          सर्वसाधारणतः​ धनगर समाज भावना प्रधान समाज आहे. त्यामुळे आपल्या जमातीला चिकित्सक विचार लवकर पटत नाही. *मात्र एखादा भावनिक मुद्दा/नेता आपल्या लोकांकडून लवकर डोक्यावर घेतला जातो. व त्यासंबंधी अंधभक्त म्हणून कामाला लागतो.* त्यामुळे या जमातीला लवकर फसवता येते, असा समज(गैर) महाराष्ट्रात सर्वत्र पहायला मिळतो. हा समज २०१४ मध्ये पुराव्यानिशी सिद्ध झालेला आहे. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात धनगरांच्या बाबतीत हे सातत्याने घडत आल्याचे पहायला मिळते. परंतु आता हे अंतिम असावं, यासाठीच हा लेखनप्रपंच....
           घटनात्मक आरक्षण मिळालंच पाहिजे ही आमची भावना. पण ते कसं मिळेल याचा तिळमात्र विचार न करता आपण समोरच्यावर अंधविश्वास ठेवून मोकळे होतो. आणि इथेच धनगरांचं घोड मारं खातं. *अशा अंधविश्वासाच्या संबंधाने कोणी चिकित्सक विचार मांडले तर त्याला आपण मुर्खात काढतो...त्याचा अवाजवी विरोध केला जातो. हा धनगरांचा सर्वात महाभयंकर महारोग.. की ज्या रोगामुळे  समाजरत्न बी. के. कोकरेंचा बळी गेला... यापुढे ही जाणार नाही हे सांगता येत नाही. जोपर्यंत आपल्या या प्रवृत्ती आपण बदलणार नाही तोपर्यंत धनगरांची फसवणूक होत आलेली आहे व होत राहणार आहे. म्हणून आमच्या वृत्ती मध्ये बदल होणै गरजेचे आहे*
         भावनेच्या भरात प्रस्थापितांवर किंवा त्यांच्या धनगर  तितरांवर आपण बिनधास्त विश्वास टाकतो. हा विश्वास  चिकित्सकपणे ठेवला तर आपण आपल्या अजेंड्यामध्ये नक्की यशस्वी होवू शकतो.. पण चिकित्सक विचार करणेच आम्हाला जमत नाही. त्यामुळे भावनेच्या भरोश्यावर घेतलेले निर्णय चुकीचे होण्याची दाट शक्यता असते. भावनेच्या भरोशावर तिच्या आहारी जाऊन आपण २०१४ च्या निवडणुकीत निर्णय घेतले. भाजपाला आपला हक्काचा पक्ष म्हणून विश्वास टाकला. परंतु भाजपा एवढ्या खालच्या पातळीवर जावून धनगरांशी भावनिक खेळ खेळेल, याचा आपण विचारही केला नाही. भावनेच्या भरात आपण बीजेपीला भरभरून मते दिली.
       त्याचवेळी आपण आपला नेता म्हणून स्विकारलेला अराजकीय सामाजिक, उच्च विद्या विभूषित व्यक्तीत्व म्हणून नेता पुढे केला....जीवनातील पैसा, वेळ त्यासाठी बिनधास्त खर्च केला. जिथे (मेळावे, मोर्चे,सभा) बोलावले तिथे आपण उपस्थित राहलो. फक्त समाज हीत याशिवाय कोणताही वैयक्तिक विचार केला नाही त्यावेळी नेतृत्वाच्या व्यक्तीत्वाच्या छुप्या अजेंड्यावर चिकित्सक पणे विचार मांडणाऱ्यांच्या विचाराला पायदळी तुडविला. त्याचवेळी धनगरांचा नेता धनगरांच्या भावना, विश्वास, हीत यापेक्षा एखाद्या राजकीय पक्षाला, त्याच्या ध्येय धोरणाला बांधील होईल,  समाजातील सामान्य माणसाच्या लोकमताची/लोकहीताची अवहेलना करून स्वार्थाला प्राधान्य देईल याचा सामाजिक स्तरावर आपण कधी विचार सुध्दा केला नाही. होता तो फक्त अंधविश्वास!!!!
     एक उच्च विद्या विभूषित व्यक्तित्व म्हणून आदराची भावना बाळगणारी ही जमात राजकीय बाबतीत नेतृत्व या अर्थाने भावनिक झाली. अशा प्रकारची भावना जपत असतानाच आपण बुद्धीचा वापर करून जर विचार केला असता तर आज फसवणूक झाल्याची खंत कदाचित आपल्यात दिसली नसती.  असो!  इतिहास उगळायचा नसतो, तो गिळायचा असतो.. एकदा झालेली चूक पुन्हा होणार नाही याची दक्षता घेण्यातच खरा शहाणपणा असतो.
           आज कोणी म्हणतात, धनगरांचं आंदोलन चिरडलं गेलं, धनगरांचं घटनात्मक आरक्षण अंमलबजावणीचं स्वप्न भंग झालं, धनगरांना देशोधडीला लावलं, टिसच्या अहवालाने धनगर पुर्णतः नाउमेद झाले.  ते कदाचित कोणाला खरंही वाटत असेल. परंतु ते मला खरं वाटणार नाही कारण सामान्य धनगर, खरे समाजहीतवादी, यांच्या अंतरात्म्याची आग मात्र अजूनही पेटतांंनी दिसत आहे. त्यांचा सत्याच्या विजयावरचा विश्वास आजही दृढ आहे.  त्याच आत्मविश्वासाने, त्याच ताकदीने तो लढायला तयार आहे. फक्त त्याने धनगर जमातीमधील तितरं ओळखायला शिकणे आवश्यक आहे... त्यांना खऱ्या नेत्याची गरज आहे. ते आजही त्या प्रतिक्षेत आहे.
         काही धनगर नेते कदाचित शांत झाले असेल, काही नेते इमानेइतबारे जमातीच्या भल्यासाठी काम करीत आहे. काहीं धनगर नेत्यांना स्वतः च्या राजकीय अस्तित्व निर्मिती साठी समाजाच्या भावनेचा वापर करण्याची ऊर्मी निर्माण झाली असेल. काहीतर प्रस्थापितांच्या इशऱ्यावर नाचत आहे (जमातीतील जानकार लोकांना हे लक्षात आलं आहे.) त्यामुळे धनगरांच्या भावनेशी खेळण्याची इच्छा, हिम्मतही ते करत असेल तर त्यातून खऱ्या नेत्याला ओळखण्याची गरज निर्माण झालेली आहे. व ते सहज शक्य आहे.
        प्रस्थापितांनी आपली पिलावळ धनगर जमातीत निर्माण केलेली आहे. पद, पदांची लालच, पैसा, छुपा अजेंडा देवून धनगरांना फसविण्यासाठी तयार केलं आहे, अशा या कामात आपली काही नेते मंडळी माहीर आहेत. धनगर जमातीमध्ये​ ते सक्रीयपणे काम सुध्दा करीत आहे. त्यांच्या सक्रियतेमुळे जमात विभाजित होते की काय अशी भीती वाटायला लागली आहे.असं असलं तरी धनगर निष्ठेपुढे मात्र प्रस्थापितांचे दलाल उघडे पडतील, हे निश्चित आहे. कारण सामान्य धनगर आता स्वाभिमानाला जागायला लागले आहेत.
           स्वाभिमानी लढाई तो जाणायला लागला आहे​. त्यामुळे प्रत्येक लढा तो स्वतःच्या हक्कासाठी लढतो आहे. लाचारी ची त्याला चिड आली आहे. तो गद्दारांना धडा शिकवायला तयार आहे. म्हणूनच तो स्वाभिमानाचे लढे उभारतो आहे. स्वाभिमानी नेतृत्व पुढे यावे, याचीच केवळ वाट तो पाहतो आहे....अशाच नेतृत्वानी समोर यावे, जमात त्या नेत्यांच्या पाठीमागे भक्कम पणे उभी राहायला तयार आहे. *फक्त पुन्हा एखादा महान आत्मा पुढे येणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे.*

कारण
दर पाच वर्षांनी धनगरांमध्ये
पुढे येतो एक नेता महान.
पाच वर्षांसाठी जमातीला
बिनधास्त ठेवून जातो गहान.

तेव्हा दक्ष राहून येवू द्या
सर्वांना याचे भान.
स्वाभिमानी धनगरानो!
आता पेटवा तुम्ही रान.

सत्तेशिवाय धनगरांना
मिळणार नाही कुठे सन्मान.
मात्र त्यासाठी झुकवू नका
आपली स्वाभिमानी मान.

संघटित होऊन तुम्ही
आता करा मतदान.
इतिहास लिहीलं तेव्हा
तुमचं ते सुवर्णाक्षरी पान.


                               जय मल्हार
             *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*

Sunday, October 14, 2018

धनगरांनो! दसरा मेळाव्यात कोणाचा बळी घेणार!

धनगरांनो! दसरा मेळाव्यात कोणाचा बळी घेणार!

                 भारतीय समाज हा उत्सव प्रिय समाज आहे. अनेक सण उत्सव येथे साजरे केले जातात. यापैकीच एक विविधांगी रुप प्राप्त झालेला दसरा सण हा समाज परिवर्तनाचा दिवस म्हणून अलीकडे मोठ्या प्रमाणात गाजत आलेला आहेत. या सणाच्या माध्यमातून परिवर्तनाचे वारे निर्माण होताना पाहिले आहे. डा बाबासाहेबांचा धर्म परिवर्तनाचा निर्णय असो, बाळासाहेब ठाकरे ने आयोजित केलेल्या दसरा मेळावा असो. भगवान गडावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेल्या दसरा मेळाव्याला पुढे आलेल्या राजकारणाचे स्वरूप असो. त्यामाध्यमातून झालेलं राजकारण असो. मात्र अलीकडे या दसरा मेळाव्यात महाराष्ट्रामध्ये राजकारणाचे अनेक आखाडे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दीक्षाभूमीवर जमा होणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी असो, किंवा सत्तेची आस ठेवून आयोजित धनगरांचा दसरा मेळावा मग तो आरेवाडी असो की जेजूरीचा असो, तो मात्र धनगरांच्या पर्यायाने महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी कलाटणी देणार हे निश्चित आहे.
      आज गेल्या चार-पाच वर्षांपासून चालू असलेल्या उपेक्षेचे व एकूण राजकारणाचे धक्के सहन करून धनगर जमातीला शहाणपण आल्यासारखं वाटायला लागलं आहे. ती आज स्वाभिमानी परिवर्तनाच्या मार्गावर वाटचाल करत आहे. मागील काळात झालेली फसवणूक आणि वापर टाळण्यासाठी धनगर जमात राजकीय सत्तेच्या दिशेने  मार्गक्रमण करीत आहे.
         आज अलीकडे धनगर जमातीतील अनेक नेते दसरा मेळाव्याच्या मुहूर्तावर स्वतःचे अजेंडे सार्वजनिक करण्याच्या विचारात आहेत. हे अजेंडे मात्र कुणाचा बळी तर घेणार नाही ना? हाच मोठा प्रश्न मला पडलेला आहे. मग आरेवाडीचा दसरा मेळावा असो वा, जेजुरी गडावरील​ दसरा मेळावा असो, जमातीला एका विशिष्ट राजकीय वळणावर नेण्याचं काम करणार आहे. त्यात मोठा प्रलय येणार आणि या प्रलयात अख्खा महाराष्ट्र ढवळून  निघणार आहे. मात्र यामध्ये हे निश्चित की, कुणाचा न कुणाचा बळी जाणार आहे.  मग तो प्रस्थापिताचा असो की धनगर जमातीचा असणार आहे. बळी जाणार हे मात्र निश्चित आहे.
      आता फक्त धनगरांनी  ठरवायचे आहे,  बळी घ्यायचा कोणाचा? धनगरांच्या पिढ्यानपिढ्यांचा बळी घेणारी प्रस्थापित व्यवस्था पोसायची की धनगरांचे अस्तित्व निर्माण करणारी राजकीय सत्ता हातात घ्यायची? याचा निर्णय या मेळाव्यात झालाच पाहिजे. सामान्य धनगरांनो! या मेळाव्यातून तुम्हाला तुमची पुढची दिशा काय हे ठरवायची आहे. पुढे काय करायचं? कोणाच्या पाठीमागे जायचं? कोणाला मतदान करायचं? कोणाला जिंकून आणायचं? हे निश्चित करायचे आहे.  कारण धनगरांनी ठरवायचं आहे की आम्ही प्रस्तावितांच्या मार्गाने जायचं की  बहुजन आघाडी ला सोबत घेऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचं!! स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला या दिवशी खऱ्या अर्थाने आम्हाला संधी प्राप्त होईल.
    दसरा मेळावा आरेवाडीचा असो वा जेजुरीचा असो या मेळाव्यामध्ये धनगरांचं राजकीय अस्तित्व निर्मितीच्या खूणा त्यात दिसणार आहे. त्यामुळे हे दोन्ही मेळावे एकत्र व्हावे हा आग्रह मी मुळीच करणार नाही. परंतु दोन्ही मेळावे हे धनगरांचा बळी घेणार नाही, ही अपेक्षा मात्र मी केल्याशिवाय राहणार नाही. दोन्ही मेळाव्यामध्ये धनगर एकता प्रदर्शित व्हावी, ही दक्षता घेण्याची सुचना केल्या शिवाय राहणार नाही. कोणाचेही पावलं प्रस्थापितांना पोषक किंवा इशऱ्यावर पडणार नाही, याची तंबी सुध्दा दिल्या शिवाय राहणार नाही.
           आरेवाडीच्या मेळाव्याचा अजेंडा,  स्वतः ला जपत, वंचित बहुजन आघाडी सोबत जाण्याचा असेल तर धनगरांसाठी दूधात साखर पडल्याचा आनंद होईल. त्यातून धनगर एकता प्रदर्शित होईल. अगदी खरंच सांगतो, धनगरांची ताकद एवढी मोठी निर्माण होईल की, प्रस्थापितांना धनगरांची भरलेली धडकीमध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही.. धनगरांची गोपीचंद पडळकर नावाची  मुलूख मैदानी तोफ  वंचितांच्या काफील्यात चमकल्या शिवाय राहणार नाही. मात्र ती प्रस्थापितांच्या आडोशाला जाऊन बसली तर स्वाभिमानी राणे बनल्याशिवाय राहणार नाही.
          सर्व दसरा मेळाव्यातील धनगरांच्या वेदना जर सारख्याच असेल तर  संवेदना सुध्दा सारख्याच असाव्यात, ही अपेक्षा करायला काहीच हरकत नसावी. कारण समान संवेदनेतून निर्माण झालेला अजेंडा हा वेदनेवर इलाज केल्याशिवाय राहणार नाही. यामुळे धनगरांच्या बाबतीत व्यवस्थेमध्ये असलेल्या सर्वच व्हायरसचा निकाल लावल्याशिवाय समस्त धनगर वंचित एकता थांबणार नाही.
           वंचित बहूजन आघाडी सोबत गेल्याने प्रत्येक धनगर नेत्यांचे सर्वांगीण मुल्य वाढल्याशिवाय राहणार नाही. कारण "स्वर्गातील कोतवालापेक्षा नर्कातील का होईना राजा कधीही महानच असतो." त्यामुळे धनगरांना राजा बनविण्याची ताकदच नव्हे तर संधी सोबतच नियत सुध्दा फक्त अन् फक्त वंचित बहुजन आघाडी मध्ये आहे.. तेव्हा संधीचा लाभ घेऊन सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रस्तापितांचा बळी घेण्याचा संकल्प दसरा मेळाव्यात एकमताने व्हावा, एवढी आशा बाळगायला कोणाचीही हरकत नसावी...

                एक धनगर भक्त.!!
                        मस्तक सशक्त!!


                               जय मल्हार
             एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
डॉ प्रभाकर लोंढे. गोंदिया चंद्रपूर
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

Saturday, October 13, 2018

बायो डेटा

बायोडेटा

संपूर्ण नाव   : डॉ प्रभाकर रामजी लोंढे
जन्मस्थान   : मु कोंढाळा तह वरोरा जिल्हा चंद्रपूर
जन्मदिनांक  : ०२/०५/१९७५
निवाशी पत्ता  : गजानन कॉलोनी अंगूर बगीचा रिंग रोड गोंदिया ४४१६१४
संपर्क क्रमांक : ९६७३३८६९६३ ८८०६२६१२३७
इमेल अद्द्रेस : dr.londhe25@gmail.com
शिक्षण      : एम ए बीएड बी लिब सायन्स , पीएचडी
नोकरी       : प्राचार्य, जिल्हा परिषद क महाविद्यालय परसवाडा जिल्हा गोंदिया
विशेष ओळख : शैक्षणिक अभ्यासक, प्रभावी वक्ता,कवी ,लेखक, संशोधक
विशेष ओळख : समाजसेवा,पर्यटन, काव्यलेखन
सदस्य :
Ø  महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम निर्मिती मंडळ
Ø  महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश नोंद्लेखक
Ø  जागतिक संसद व संविधान संघटना
Ø  झाडीबोली साहित्य मंडळ
पुरस्कार
·         कवी कुलगुरू रवींद्रनाथ सरस्वत पुरस्कार (कलकत्ता)
·         राज्यस्तरीय लोकमुद्रा पुरस्कार (पुणे)
·         भारत निर्माण साहित्य भूषण पुरस्कार (यवतमाळ)
·         राजे यशवंतराव होळकर विशेष कार्य पुरस्कार (बीड)
·         गुणवंत शिक्षक पुरस्कार (चंद्रपूर)
प्रकाशित पुस्तके
§  वेदना उपेक्षितांच्या (काव्यसंग्रह)
§  त्रीवेणाई (नाटय संग्रह)
§  आधुनिक नारीपुरण (हिंदी खंडकाव्य प्रकाशनाधीन)
§  कूरमार (संशोधनपर)
§  धनगरांची राजकीय दुरावस्था (संशोधनपर) 
इतर महत्वाचे लिखाण
ü  आंतरराष्टीय पातळीवर संशोधनपर लेखांचे प्रकाशन
ü  राष्टीय पातळीवर संशोधनपर लेखांचे प्रकाशन
ü  दैनिक वर्तमानपत्रातून संपादकीय लेखांचे प्रकाशन
ü  आकाशवाणी नागपूर साठी आलेख लेखन 
ü  आकाशवाणी नागपूर वरून विशेष मुलाखत
ü  राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत सहभाग
ü  राज्य स्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्रथम
संस्थापक
v  त्रिवेणी संस्कार सार्वजनिक वाचनालय, कोंढाळा तह वरोरा जिल्हा चंद्रपूर
v  अहिल्यादेवी भ.वि जमाती विकास संस्था कोंढाळा तह वरोरा जिल्हा चंद्रपूर
v  श्री रामजी लोंढे कृषी संशोधन केंद्र कोंढाळा तह वरोरा जिल्हा चंद्रपूर
v उन्नती नर्सरी अंड कोन्व्हेंट टेमुर्डा तह वरोरा जिल्हा चंद्रपूर
विशेष कार्य
§  शेती संशोधन, नवोपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी स्व.रामाजी लोंढे स्मृती किसानरत्न पुरस्काराची सुरवात
§  वडिलाच्या जयंती निमित्य दरवर्षी नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
विशेष अभियान
       भटक्या लोकांसाठी ‘सामाजिक समृद्धीसाठी राजकीय आर्थिक अभियान’ (PEASA)
विविध स्तरावरील इतर महत्वाचे कार्य
§  यु जी सी द्वारा आयोजित राष्ट्रीय सेमिनार मध्ये संशोधनपर लेखांचे प्रकाशन
§  राज्यस्तरीय मासिकांमधून संशोधनपर लेखांचे प्रकाशन
§  साप्तहीकांमधून शैक्षणिक लेखन
§  राज्यस्तरीय युवा संमेलनात कवी म्हणून सहभाग
§  राज्यस्तरीय शिक्षक संमेलनात प्रमुख मार्गदर्शक
§  महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम अमलबजावणी प्रक्रियेतील तज्ञ मार्गदर्शक
§  राष्ट्रीय हरित सेनेतर्गत पर्यावरण कार्य विषयक विशेष
§  विज्ञान प्रदर्शनी सहभाग व प्राविण्य
        ) सातवे जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत प्रथम क्रमांक
        ) आठवे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत प्रथम क्रमांक
        ) नववे जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत प्रथम क्रमांक
  विद्यार्थी कल्याण कार्यक्रम
v  सहकार्य वाचनालय प्रकल्प
v  अक्षर सुधार प्रकल्प
v  गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत
v  शैक्षणिक समस्या व उपाययोजनात्मक लेखन
       उपरोक्त सर्व माहिती सत्य असून खोटी आढळ्यास मी जबाबदार असेल

दि ११/१०/२०१८                                         आपला विश्वासू    गोंदिया                     
                                                 डॉ प्रभाकर रामजी लोंढे





Thursday, October 4, 2018

धनगर नेत्यांनो! स्वतःच स्वतःचे शिल्पकार व्हा!

अवश्य वाचा.......
धनगर नेत्यांनो! स्वतःच स्वतःचे शिल्पकार व्हा!
------------------------------------------------------------
                                   डॉ. प्रभाकर लोंढे
  ----------------------------------------------------------
      इतिहासामध्ये राजकीय सत्ता उपभोगणाऱ्या, राजकीय व्यवस्थेमध्ये वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या धनगर जमातीला आजच्या लोकशाहीमध्ये स्वतःचे नेतृत्व का करता आलं नाही हा एक मोठाच प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. याला कारण गेल्या सत्तर वर्षाच्या काळामध्ये ही जमात कधी काँग्रेसच्या आघाडी मागे, कधी बीजेपी प्रणित आघाडीसोबत इमानेइतबारे राहिलेली आहे. या आघाड्यांचा हक्काचा वाहक म्हणून सातत्याने या जमातीने मतदान केलेले आहे. मात्र यामधून धनगरांचे एखादे प्रभावी नेतृत्व कधीही विकसित होऊ शकले नाही किंवा या आघाड्यांच्या नेतृत्वस्थानी या जमातीचा एकही नेता दिसला नाही. त्यामुळे या आघाड्या कडून जमातीचा वापर केला, एवढं रडण्याशिवाय धनगरांच्या हातात काहीच मिळालेले नाही. प्रस्थापितांची गुलामगिरी व घटनात्मक अधिकारांपासून वंचित, अशा स्वतःच्या अनेक समस्या निर्माण करून या जमातीने आपल्या पायावर कुऱ्हाडच मारून घेतली आहे. यामध्ये त्या आघाड्यापेक्षा प्रथमता धनगर जमात व जमातीचा असंघटितपणा हा  दुर्गुण जबाबदार असल्याचे स्पष्ट होते.
         अलीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही सोबतच बीजेपी शिवसेनेच्या आघाड्यांचा किळस आलेली धनगर जमात नवीन राजकीय पर्याय च्या शोधात निघाली. अन्यायाचा प्रतिशोध घेते की काय अशी परिस्थिती पहायला मिळाली. मात्र हे करीत धनगरांनी आपल्या दुर्गुणाकडे  विशेष लक्ष दिले आहे, असे काही प्रसंगावरून वाटत नाही. त्यावर योग्य उपचारात्मक उपक्रम धनगर जमातीत दिसत नाही. तरी सुद्धा पडणारी पावलं चुकीची आहे असं ठामपणे म्हणता येत नाही.
         धनगरांमध्ये एक वेगळं राजकीय परिवर्तनवादी वातावरण निर्माण झालं असताना या परिवर्तनाला जो कोणी योग्य वळण देईल तो मात्र येथील सत्तेचा सत्ताधीश होईल हे सत्य आज कोणीही नाकारू शकत नाही. म्हणजेच २०१४ प्रमाणे यापुढे सुद्धा येथील सत्ता परिवर्तनामध्ये या जमातीचा मोठा वाटा राहणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.  हे जेवढं खरं आहे त्यापेक्षाही यापुढे जमातीचा कोणी वापर करून घेणार नाही याची दक्षता घेणे सुद्धा अत्यावश्यक आहे.
            अलीकडेच निर्माण झालेली व धनगरांच्या सहकार्याशिवाय अधुरी असलेली तिसरी भारिप बहुजन वंचित आघाडी, धनगरांना राजकीय सत्तेची दारं नक्कीच मोकळी करून देणार आहेत. यात काही शंकाच​ नाही. यापुर्वीच्या आघाड्यांनी धनगरांना सत्तेची दारं संपुर्णत: संकुचित करून ठेवली होती. (आता कदाचित जुण्या आघाड्या सुध्दा धनगरांना महत्व देईल)  परंतु ही बहूजन वंचित आघाडी कदापिही टाळू शकत नाही व ते करण्याची त्यांची क्षमता सुद्धा नाही.  अशावेळी आलेल्या संधीचा फायदा घेणे व त्या दृष्टीकोनातून धनगरांनी संघटित होऊन सत्ता संपादनासाठी काम करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी नियोजन पुर्वक कार्यक्रम राबविणयाची गरज आहे. परंतु अशी परीपक्व पावले पडताना दिसत नाही (असल्यास सहर्ष स्वागत) त्यादृष्टीने सामाजिक, राजकीय, वैचारिक मंथन सुद्धा घडताना दिसत नाही.
                     धनगरांना आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं असेल, तर हीच(२०१९) परफेक्ट वेळ आहे आणि याठिकाणी, अशावेळी झालेल्या चुका धनगरांना अतिशय महागात पडणार आहे.
त्यामुळे वंचित बहुजन आघाडी सोबत असलेले सर्वच धनगर, राजकीय नेते, राजकिय/सामाजिक दृष्ट्या संघटित होऊन "धनगर परीवर्तन आघाडी" अथवा एखादा "राजकीय पक्ष"  रुपात भारिप वंचित बहुजन आघाडी सोबत गेले तर आघाडीमध्ये असलेल्या इतर पक्षांवर, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर सुद्धा या धनगर एकतेचा मोठा प्रभाव/दबाव निर्माण होईल. त्यामुळे जुन्या आघाड्यांनी धनगरांशी केलेली फसवणूक करण्याची हिंमत ही आघाडी करणार नाही. वंचित बहुजन आघाडी सोबत सत्ता संपादनाचे कार्य करतांना धनगरांसाठी संघटित प्रयत्न होईल. अपरिहार्य पणे बाहेर पडताना सुद्धा संघटितपणे बाहेर पडता येतील. त्या दिवशी धनगर जमातीचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण झालेले असेल. त्या निर्माण झालेल्या अस्तित्वाला भारिप बहुजन महासंघ सुद्धा आव्हान देण्याची हिंमत करणार नाही.
         सत्तेचा माज कधी चढेल, कोणी नेता कधी गद्दार होईल, हे सांगता येत नाही. पुढे धनगरांच्या सहकार्याने भारिप ला सत्ता मिळाली,  तर धनगरांनी त्यांच्या बाबतीत बीजेपी सारखं गाफिल राहून चालणार नाही. तेव्हा धनगरांची संघटित ताकद उभी राहिली तर धनगर आघाडी संबंधीचा निर्णय घेताना  बहुजन महासंघाला सुद्धा विचार करावा लागेल. त्यामुळे धनगरांचा पुन्हा वापर करण्याची मानसिकता काय हिम्मत सुद्धा कोणामध्ये निर्माण होणार नाही. आज जरी इतरांच्या कुबड्यांचा आधार घेऊन स्वतःचे भवितव्य घडविण्याचा विचार करणाऱे धनगर नेते स्वतःच  स्वतःच्या भवितव्याचे सर्वेसर्वा व शिल्पकार झाल्याशिवाय राहणार नाही.
        यासाठी सर्वच धनगर बेस पक्ष, प्रस्थापित पक्षात घुसमट होत असलेले धनगर नेते,  ज्या धनगर नेत्यांचे प्रस्तापित पक्ष तिकीट कापण्याची भीती/शक्यता आहे त्या सर्वांनी एकत्र येऊन विचार विनिमयातून, धनगरांची एक मोट बांधली, हक्काच राजकीय विचारपीठ तयार केलं, धशगर नेतृत्वांची परस्परांशी बांधिलकी निर्माण होईल. त्यातून संपूर्ण महाराष्ट्रातील​ धनगरांना राजकीय सत्तेतील हक्काचा, स्वाभिमानी वाटा मिळाल्याशिवाय राहणार नाही...


                                  ___एक धनगर____

                               सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!

                                  जय मल्हार
             एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
डॉ प्रभाकर लोंढे. गोंदिया चंद्रपूर
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

धनगरांचा भविष्यकाळ निर्धारित करणारा हाच तो वर्तमान काळ!!*

⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
*धनगरांचा भविष्यकाळ निर्धारित करणारा हाच तो वर्तमान काळ!!*
-------------------------------------------
                         *डॉ. प्रभाकर लोंढे*
------------------------------------------
               हिंदी मध्ये एक म्हण आहे व सर्वत्र बोललं जातं "समय बलवान है!"  आणि ते खरंही आहे. प्रत्येक गोष्टीची विशिष्ट वेळ असते. वेळ आल्यानंतर संधी उपलब्ध होत असते. त्या वेळेचा/संधीचा प्रत्येकालाच फायदा घेता येतो आणि आलेल्या संधीचा/वेळेचा फायदा घेण्यात तो किती यशस्वी ठरतो, यावरून त्याचा भविष्यकाळ निश्चित होत असतो. म्हणूनच ती योग्य वेळ ओळखणे आवश्यक असते.  मग ती वेळ एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असो की एखाद्या समाज घटकाच्या बाबतीत असो, उपलब्ध परिस्थितीचा पुरेपूर विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच त्याचा भविष्यकाळ निर्धारित करीत असतो. मात्र यासाठी त्याला सतर्क राहून त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा उठवता येईल याचा विचार व त्यानुसार आचार करणे अत्यावश्यक असते. कारण त्यातूनच यशाचा मार्ग निश्चित होत असतो.
         एकदा हातात आलेली संधी गेली तर पश्चाताप करण्याशिवाय हातामध्ये काहीच नसतं. म्हणून आलेली संधी गमावली जाणार नाही, तिचा पुरेपूर फायदा घेऊन जास्तीत जास्त लाभ पदरात पाडून घेता येतील, यासाठी प्रयत्न करणं, यातचं खरा शहाणपणा असतो.  अशा प्रकारचा शहाणपणा धनगर जमातीमध्ये आता आला आहे. अस मत जर कोणी व्यक्त केलं तर ते चुकीचं होणार नाही. मात्र तो शहाणपणा प्रत्यक्ष आचरणात/ जीवनात उतरवणे, हे प्रत्येक धनगर नेता, कार्यकर्ता व सामान्य धनगरांच्या​ हातामध्ये आहे. मात्र किती टक्के शहाणपणा प्रत्येकाच्या वागण्यामध्ये प्रत्यक्ष दिसणार आहे, हा सुद्धा एक प्रश्नच आहे. परंतु यावरच जमातीचा भविष्यकाळ निर्धारित होणार आहे.
       त्याचवेळी आलेल्या संधीचा फायदा घेऊन समाजहित साधायचं की स्वहित साध्य करायचं? की स्वहितासाठी समाजाचा वापर करायचा? की समाजाचा छुप्या पद्धतीने लिलाव करायचा? यांचा निर्णय मात्र नेत्यांवर अवलंबून आहे. परंतु आता यापुढे हे होणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्या इतपत आजच्या धनगर नेत्यांनी आपली विश्वासार्हता वाढविली आहे, असं मी म्हटलं तर कोणत्याही धनगर नेत्यांची हरकत नसावी. ही आग्रहाची नम्र विनंती.
              महाराष्ट्रात बहुसंख्येने असलेल्या, राजकीय सामाजिक दृष्ट्या वंचित, उपेक्षित धनगर जमातीचा हा काळ अतिशय महत्त्वपूर्ण असून या जमातीच्या सर्वांगीण भल्याचा मार्ग शोधणारा हा काळ आहे. अशावेळी धनगर नेत्यांनी टाकलेली योग्य पावले ही
१) धनगरांचा राजकीय, सामाजिक, आर्थिक उद्धार
नक्कीच करू शकते.
२) महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तर धनगर आपली अतिशय महत्त्वाची पकड निर्माण करू शकते.
३) एवढेच नाही तर महाराष्ट्राची राजकीय सत्ता सुद्धा हातात घेऊ शकते.
४) येथील राजकीय व्यवस्थेवर स्वतःचे वर्चस्व निर्माण करू शकते.
५) जमातीला पुनर्वैभव प्राप्त करून देऊ शकते.
              परंतु आता जर  नियोजन चुकलं तर धनगर जमातीला पुन्हा मातीत सुद्धा घालू शकते. परंतु अशा प्रकारचे नियोजन चुकणार नाही एवढा विश्वास फक्त आपण व्यक्त करू शकतो.
         सध्या परिस्थितीत महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचा विचार करता प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये धनगर नेते, कार्यकर्ते सक्रियपणे काम करताना दिसून येत आहे. सर्वांना आपला पक्ष हा प्रिय असून ते पक्षनिष्ठेने काम करणारे निष्ठावंत असल्याचेही लक्षात येते. आणि ते अत्यावश्यक सुध्दा आहे. असे असताना त्यांची जमातनिष्ठा सुध्दा कायम आहे. यापुढे ते पक्षनिष्ठेला प्राधान्य देतात की समाजनिष्ठेला हाच एक मोठा प्रश्न आहे. परंतु पक्षहिताला प्राधान्य देत असताना समाजहित व स्वहित बाजूला ठेवून चालणार नाही. त्याही पलीकडे आम्ही जर जमात विकासाच्या, जमात अस्तित्वाच्या गोष्टी जर हृदयातून करीत असू तर समाजहिताला प्राधान्य देऊन स्व हिताकडे दुर्लक्ष झाले तरी चालेल अशा प्रकारची मानसिकता असलेले नेतेच आज धनगर जमातीचा भविष्यकाळ घडवू शकतात. व अशाच नेत्यांची धनगर जमातीला आज गरज आहे. सुदैवाने आज अशा नेत्यांचे प्रमाण धनगर जमातीत वाढले आहे. प्रत्येक नेता समाज हिताचा विचार सुध्दा करीत आहे.  धनगर जमातीच्या या संक्रमण काळामध्ये अशा प्रकारच्या धनगर नेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वरवर दिसून येत आहे, ही जमातीसाठी मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे परिस्थिती सापेक्ष धनगर हितवादी निर्णय परस्पर समन्वयाने धनगर नेते घेतील, असा विश्वास व्यक्त करण्यास कोणतीही हरकत नसावी असं सुद्धा वाटते आहे
              प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये धनगर नेते, कार्यकर्ते सक्रिय असतानाच दुसरीकडे त्यांच्या पक्षातच त्यांची घुसमट होताना सुद्धा दिसून येत आहे. धनगरांना उमेदवारीच न देण्याची मानसिकता असणाऱ्या आपल्या पक्षांकडून आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही याची सुद्धा चिंता काही धनगर नेत्यांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे अस्वस्थ मन असलेली धनगर नेते मंडळी पुर्ण ताकदीने स्वतःचे अस्तित्व अजमावण्याच्या प्रयत्नात​ सुद्धा दिसून येत आहे. स्वतःला. विविध पक्षांमधून अजमाविण्याचे धनगर नेत्यांचे प्रयत्न सुरू असले तरी काही अपवाद वगळता बहुतांश धनगर नेते परस्परांच्या संपर्कात आहेत. ही सुद्धा  धनगर नेत्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे अशा प्रकारे परस्पर संपर्कात राहून आपल्या समस्येवर धनगर नेते निश्चितपणे तोडगा काढू शकतात. ही धनगर नेते व समाजासाठी जमेची बाजू आहे. सर्वांनी विचार विनिमयातून काढलेला तोडगा अथवा विचार विनिमयातून केलेला स्वअस्तित्व निर्मितीचा प्रयत्न हा खऱ्या अर्थाने जमातीमध्ये स्वाभिमान निर्माण करण्याचा एक पहिला पायंडा असेल. त्यादृष्टीने सर्वांना खुप खुप शुभेच्छा!!!!!!

                         ___एक धनगर____

                           
                             जय मल्हार

     एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________

*धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
*डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३*