Thursday, October 4, 2018

धनगर नेत्यांनो! स्वतःच स्वतःचे शिल्पकार व्हा!

अवश्य वाचा.......
धनगर नेत्यांनो! स्वतःच स्वतःचे शिल्पकार व्हा!
------------------------------------------------------------
                                   डॉ. प्रभाकर लोंढे
  ----------------------------------------------------------
      इतिहासामध्ये राजकीय सत्ता उपभोगणाऱ्या, राजकीय व्यवस्थेमध्ये वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या धनगर जमातीला आजच्या लोकशाहीमध्ये स्वतःचे नेतृत्व का करता आलं नाही हा एक मोठाच प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. याला कारण गेल्या सत्तर वर्षाच्या काळामध्ये ही जमात कधी काँग्रेसच्या आघाडी मागे, कधी बीजेपी प्रणित आघाडीसोबत इमानेइतबारे राहिलेली आहे. या आघाड्यांचा हक्काचा वाहक म्हणून सातत्याने या जमातीने मतदान केलेले आहे. मात्र यामधून धनगरांचे एखादे प्रभावी नेतृत्व कधीही विकसित होऊ शकले नाही किंवा या आघाड्यांच्या नेतृत्वस्थानी या जमातीचा एकही नेता दिसला नाही. त्यामुळे या आघाड्या कडून जमातीचा वापर केला, एवढं रडण्याशिवाय धनगरांच्या हातात काहीच मिळालेले नाही. प्रस्थापितांची गुलामगिरी व घटनात्मक अधिकारांपासून वंचित, अशा स्वतःच्या अनेक समस्या निर्माण करून या जमातीने आपल्या पायावर कुऱ्हाडच मारून घेतली आहे. यामध्ये त्या आघाड्यापेक्षा प्रथमता धनगर जमात व जमातीचा असंघटितपणा हा  दुर्गुण जबाबदार असल्याचे स्पष्ट होते.
         अलीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही सोबतच बीजेपी शिवसेनेच्या आघाड्यांचा किळस आलेली धनगर जमात नवीन राजकीय पर्याय च्या शोधात निघाली. अन्यायाचा प्रतिशोध घेते की काय अशी परिस्थिती पहायला मिळाली. मात्र हे करीत धनगरांनी आपल्या दुर्गुणाकडे  विशेष लक्ष दिले आहे, असे काही प्रसंगावरून वाटत नाही. त्यावर योग्य उपचारात्मक उपक्रम धनगर जमातीत दिसत नाही. तरी सुद्धा पडणारी पावलं चुकीची आहे असं ठामपणे म्हणता येत नाही.
         धनगरांमध्ये एक वेगळं राजकीय परिवर्तनवादी वातावरण निर्माण झालं असताना या परिवर्तनाला जो कोणी योग्य वळण देईल तो मात्र येथील सत्तेचा सत्ताधीश होईल हे सत्य आज कोणीही नाकारू शकत नाही. म्हणजेच २०१४ प्रमाणे यापुढे सुद्धा येथील सत्ता परिवर्तनामध्ये या जमातीचा मोठा वाटा राहणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.  हे जेवढं खरं आहे त्यापेक्षाही यापुढे जमातीचा कोणी वापर करून घेणार नाही याची दक्षता घेणे सुद्धा अत्यावश्यक आहे.
            अलीकडेच निर्माण झालेली व धनगरांच्या सहकार्याशिवाय अधुरी असलेली तिसरी भारिप बहुजन वंचित आघाडी, धनगरांना राजकीय सत्तेची दारं नक्कीच मोकळी करून देणार आहेत. यात काही शंकाच​ नाही. यापुर्वीच्या आघाड्यांनी धनगरांना सत्तेची दारं संपुर्णत: संकुचित करून ठेवली होती. (आता कदाचित जुण्या आघाड्या सुध्दा धनगरांना महत्व देईल)  परंतु ही बहूजन वंचित आघाडी कदापिही टाळू शकत नाही व ते करण्याची त्यांची क्षमता सुद्धा नाही.  अशावेळी आलेल्या संधीचा फायदा घेणे व त्या दृष्टीकोनातून धनगरांनी संघटित होऊन सत्ता संपादनासाठी काम करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी नियोजन पुर्वक कार्यक्रम राबविणयाची गरज आहे. परंतु अशी परीपक्व पावले पडताना दिसत नाही (असल्यास सहर्ष स्वागत) त्यादृष्टीने सामाजिक, राजकीय, वैचारिक मंथन सुद्धा घडताना दिसत नाही.
                     धनगरांना आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं असेल, तर हीच(२०१९) परफेक्ट वेळ आहे आणि याठिकाणी, अशावेळी झालेल्या चुका धनगरांना अतिशय महागात पडणार आहे.
त्यामुळे वंचित बहुजन आघाडी सोबत असलेले सर्वच धनगर, राजकीय नेते, राजकिय/सामाजिक दृष्ट्या संघटित होऊन "धनगर परीवर्तन आघाडी" अथवा एखादा "राजकीय पक्ष"  रुपात भारिप वंचित बहुजन आघाडी सोबत गेले तर आघाडीमध्ये असलेल्या इतर पक्षांवर, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर सुद्धा या धनगर एकतेचा मोठा प्रभाव/दबाव निर्माण होईल. त्यामुळे जुन्या आघाड्यांनी धनगरांशी केलेली फसवणूक करण्याची हिंमत ही आघाडी करणार नाही. वंचित बहुजन आघाडी सोबत सत्ता संपादनाचे कार्य करतांना धनगरांसाठी संघटित प्रयत्न होईल. अपरिहार्य पणे बाहेर पडताना सुद्धा संघटितपणे बाहेर पडता येतील. त्या दिवशी धनगर जमातीचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण झालेले असेल. त्या निर्माण झालेल्या अस्तित्वाला भारिप बहुजन महासंघ सुद्धा आव्हान देण्याची हिंमत करणार नाही.
         सत्तेचा माज कधी चढेल, कोणी नेता कधी गद्दार होईल, हे सांगता येत नाही. पुढे धनगरांच्या सहकार्याने भारिप ला सत्ता मिळाली,  तर धनगरांनी त्यांच्या बाबतीत बीजेपी सारखं गाफिल राहून चालणार नाही. तेव्हा धनगरांची संघटित ताकद उभी राहिली तर धनगर आघाडी संबंधीचा निर्णय घेताना  बहुजन महासंघाला सुद्धा विचार करावा लागेल. त्यामुळे धनगरांचा पुन्हा वापर करण्याची मानसिकता काय हिम्मत सुद्धा कोणामध्ये निर्माण होणार नाही. आज जरी इतरांच्या कुबड्यांचा आधार घेऊन स्वतःचे भवितव्य घडविण्याचा विचार करणाऱे धनगर नेते स्वतःच  स्वतःच्या भवितव्याचे सर्वेसर्वा व शिल्पकार झाल्याशिवाय राहणार नाही.
        यासाठी सर्वच धनगर बेस पक्ष, प्रस्थापित पक्षात घुसमट होत असलेले धनगर नेते,  ज्या धनगर नेत्यांचे प्रस्तापित पक्ष तिकीट कापण्याची भीती/शक्यता आहे त्या सर्वांनी एकत्र येऊन विचार विनिमयातून, धनगरांची एक मोट बांधली, हक्काच राजकीय विचारपीठ तयार केलं, धशगर नेतृत्वांची परस्परांशी बांधिलकी निर्माण होईल. त्यातून संपूर्ण महाराष्ट्रातील​ धनगरांना राजकीय सत्तेतील हक्काचा, स्वाभिमानी वाटा मिळाल्याशिवाय राहणार नाही...


                                  ___एक धनगर____

                               सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!

                                  जय मल्हार
             एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
डॉ प्रभाकर लोंढे. गोंदिया चंद्रपूर
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

No comments:

Post a Comment