धनगरांनो! दसरा मेळाव्यात कोणाचा बळी घेणार!
भारतीय समाज हा उत्सव प्रिय समाज आहे. अनेक सण उत्सव येथे साजरे केले जातात. यापैकीच एक विविधांगी रुप प्राप्त झालेला दसरा सण हा समाज परिवर्तनाचा दिवस म्हणून अलीकडे मोठ्या प्रमाणात गाजत आलेला आहेत. या सणाच्या माध्यमातून परिवर्तनाचे वारे निर्माण होताना पाहिले आहे. डा बाबासाहेबांचा धर्म परिवर्तनाचा निर्णय असो, बाळासाहेब ठाकरे ने आयोजित केलेल्या दसरा मेळावा असो. भगवान गडावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेल्या दसरा मेळाव्याला पुढे आलेल्या राजकारणाचे स्वरूप असो. त्यामाध्यमातून झालेलं राजकारण असो. मात्र अलीकडे या दसरा मेळाव्यात महाराष्ट्रामध्ये राजकारणाचे अनेक आखाडे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दीक्षाभूमीवर जमा होणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी असो, किंवा सत्तेची आस ठेवून आयोजित धनगरांचा दसरा मेळावा मग तो आरेवाडी असो की जेजूरीचा असो, तो मात्र धनगरांच्या पर्यायाने महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी कलाटणी देणार हे निश्चित आहे.
आज गेल्या चार-पाच वर्षांपासून चालू असलेल्या उपेक्षेचे व एकूण राजकारणाचे धक्के सहन करून धनगर जमातीला शहाणपण आल्यासारखं वाटायला लागलं आहे. ती आज स्वाभिमानी परिवर्तनाच्या मार्गावर वाटचाल करत आहे. मागील काळात झालेली फसवणूक आणि वापर टाळण्यासाठी धनगर जमात राजकीय सत्तेच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.
आज अलीकडे धनगर जमातीतील अनेक नेते दसरा मेळाव्याच्या मुहूर्तावर स्वतःचे अजेंडे सार्वजनिक करण्याच्या विचारात आहेत. हे अजेंडे मात्र कुणाचा बळी तर घेणार नाही ना? हाच मोठा प्रश्न मला पडलेला आहे. मग आरेवाडीचा दसरा मेळावा असो वा, जेजुरी गडावरील दसरा मेळावा असो, जमातीला एका विशिष्ट राजकीय वळणावर नेण्याचं काम करणार आहे. त्यात मोठा प्रलय येणार आणि या प्रलयात अख्खा महाराष्ट्र ढवळून निघणार आहे. मात्र यामध्ये हे निश्चित की, कुणाचा न कुणाचा बळी जाणार आहे. मग तो प्रस्थापिताचा असो की धनगर जमातीचा असणार आहे. बळी जाणार हे मात्र निश्चित आहे.
आता फक्त धनगरांनी ठरवायचे आहे, बळी घ्यायचा कोणाचा? धनगरांच्या पिढ्यानपिढ्यांचा बळी घेणारी प्रस्थापित व्यवस्था पोसायची की धनगरांचे अस्तित्व निर्माण करणारी राजकीय सत्ता हातात घ्यायची? याचा निर्णय या मेळाव्यात झालाच पाहिजे. सामान्य धनगरांनो! या मेळाव्यातून तुम्हाला तुमची पुढची दिशा काय हे ठरवायची आहे. पुढे काय करायचं? कोणाच्या पाठीमागे जायचं? कोणाला मतदान करायचं? कोणाला जिंकून आणायचं? हे निश्चित करायचे आहे. कारण धनगरांनी ठरवायचं आहे की आम्ही प्रस्तावितांच्या मार्गाने जायचं की बहुजन आघाडी ला सोबत घेऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचं!! स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला या दिवशी खऱ्या अर्थाने आम्हाला संधी प्राप्त होईल.
दसरा मेळावा आरेवाडीचा असो वा जेजुरीचा असो या मेळाव्यामध्ये धनगरांचं राजकीय अस्तित्व निर्मितीच्या खूणा त्यात दिसणार आहे. त्यामुळे हे दोन्ही मेळावे एकत्र व्हावे हा आग्रह मी मुळीच करणार नाही. परंतु दोन्ही मेळावे हे धनगरांचा बळी घेणार नाही, ही अपेक्षा मात्र मी केल्याशिवाय राहणार नाही. दोन्ही मेळाव्यामध्ये धनगर एकता प्रदर्शित व्हावी, ही दक्षता घेण्याची सुचना केल्या शिवाय राहणार नाही. कोणाचेही पावलं प्रस्थापितांना पोषक किंवा इशऱ्यावर पडणार नाही, याची तंबी सुध्दा दिल्या शिवाय राहणार नाही.
आरेवाडीच्या मेळाव्याचा अजेंडा, स्वतः ला जपत, वंचित बहुजन आघाडी सोबत जाण्याचा असेल तर धनगरांसाठी दूधात साखर पडल्याचा आनंद होईल. त्यातून धनगर एकता प्रदर्शित होईल. अगदी खरंच सांगतो, धनगरांची ताकद एवढी मोठी निर्माण होईल की, प्रस्थापितांना धनगरांची भरलेली धडकीमध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही.. धनगरांची गोपीचंद पडळकर नावाची मुलूख मैदानी तोफ वंचितांच्या काफील्यात चमकल्या शिवाय राहणार नाही. मात्र ती प्रस्थापितांच्या आडोशाला जाऊन बसली तर स्वाभिमानी राणे बनल्याशिवाय राहणार नाही.
सर्व दसरा मेळाव्यातील धनगरांच्या वेदना जर सारख्याच असेल तर संवेदना सुध्दा सारख्याच असाव्यात, ही अपेक्षा करायला काहीच हरकत नसावी. कारण समान संवेदनेतून निर्माण झालेला अजेंडा हा वेदनेवर इलाज केल्याशिवाय राहणार नाही. यामुळे धनगरांच्या बाबतीत व्यवस्थेमध्ये असलेल्या सर्वच व्हायरसचा निकाल लावल्याशिवाय समस्त धनगर वंचित एकता थांबणार नाही.
वंचित बहूजन आघाडी सोबत गेल्याने प्रत्येक धनगर नेत्यांचे सर्वांगीण मुल्य वाढल्याशिवाय राहणार नाही. कारण "स्वर्गातील कोतवालापेक्षा नर्कातील का होईना राजा कधीही महानच असतो." त्यामुळे धनगरांना राजा बनविण्याची ताकदच नव्हे तर संधी सोबतच नियत सुध्दा फक्त अन् फक्त वंचित बहुजन आघाडी मध्ये आहे.. तेव्हा संधीचा लाभ घेऊन सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रस्तापितांचा बळी घेण्याचा संकल्प दसरा मेळाव्यात एकमताने व्हावा, एवढी आशा बाळगायला कोणाचीही हरकत नसावी...
एक धनगर भक्त.!!
मस्तक सशक्त!!
जय मल्हार
एकच ध्यास --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
डॉ प्रभाकर लोंढे. गोंदिया चंद्रपूर
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

No comments:
Post a Comment