धनगरांच्या दुर्गतीचे कर्तेधार्ते धनगरच!
डॉ प्रभाकर लोंढे
वर्तमानात धनगरांची जेवढी राजकीय दुर्गती झाली आहे अशी दुर्गती इतिहासामध्ये कदाचित प्रथम झाली असेल. या दुर्गतीचे, आतापर्यंत झालेल्या अन्यायाचे दोषारोप ही जमात जरी इतर धूर्त माणसावर करीत असली तरी या आरोपात तथ्य नसल्याचे आज धनगरांनीच सिद्ध करून दाखवले आहे. "2014 मध्ये आरक्षणाच्या नावावर धनगरांची मते घेतली" "विश्र्वासघात केला," असा आरोप माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला जातो आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस ने धनगरांना सत्तेपासून वंचित ठेवून धनगरांच्या सवलती मिळू दिल्या नाही. किंवा धनगरांचा राजकीय नेता निर्माण होऊ दिला नाही, अशा प्रकारचा आरोप शरद पवार साहेबांवर केला जातो.( ते कदाचित खरे असावे) परंतु त्यामध्ये सुद्धा तथ्य नाही असे आज वाटायला लागले आहे. कारण धनगरांच्या नसा नसा त्यांनी ओळखल्या आहे.
हिंदी मध्ये एक म्हण आहे, "जब तक मुर्ख जिंदा है, तब तक अकलमंद मरता नहीं!" धनगरांवर अन्याय करून या धुर्त लोकांनी आपला राजकीय जिवंतपणा टिकवून ठेवला, यांचा अर्थ ते अकलमंद आहे. धनगरांवर त्यांनी राज केलं, अन्याय केला तेव्हा मी धनगरांना "मुर्ख" ठरवणार नाही पण त्यांचं त्यांनी ठरवावं. ते अकलमंद की मुर्ख...??? पण ते आज शाहण्या सारखे वागतांना सुध्दा दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या वरील अन्याय भविष्यात संपुष्टात येईल, असे म्हणता येत नाही.
अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो. समूहातील एखादा फितूर झाल्याशिवाय समुहावर अट्याक करता येत नसतो. धनगरांमध्ये फितूरांची संख्या तर काही कमी नाही. इकडे त्याने अन्याय केला म्हणून बोंबलायचं आणि पुन्हा ज्याच्या बोंबाबोंब केल्या, त्याचेच भांडे चाटायचे. ही धनगर विचित्र प्रवृत्ती येथील धुर्तांनी ओळखली. म्हणून चाटू धोरणाचे पायिक धनगर त्यांनी ओळखले व आपल्या पाठीशी लावले. निसर्ग नियम आपणांस माहीत आहेच, भांडे चाटणारं जनावर मालकावर कधीच गुर्रावत नसतं. कारण ते खावून तृप्त झालेल असतं आणि त्याच्या एवढं दुसरं लाचार नसतं.
शिवसेना-बीजेपी प्रणित फडणवीस साहेबांचं सरकार गठित झाल्यानंतर अनेक धनगरांनी निर्णायक मेळावे घेतले. अक्षरशः या सरकारवर अनेकांनी तोंडसुख घेतले. आरक्षण अंमलबजावणी केली नाही तर या सरकारला जगू देणार नाही. अशा प्रकारच्या घोषणा सुद्धा दिल्या. "या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय!" अशा प्रकारच्या महापराक्रमी निर्णायक घोषणा सुध्दा देण्यात आल्या. परंतु त्याच सरकारने धनगरांपैकीच आपल्या शुभचिंतकाच्या सहकार्याने पाच वर्ष बिंधास्त काढून घेतले. हे सरकार पुन्हा स्थापन व्हावे हे म्हणणारा एकही धनगर मिळणार नाही असं वाटत होते. परंतु तसं दिसत नाही.
या सरकारच्या आशीर्वादाने जगणारी काही धनगर मंडळी उघड उघड जरी काम करीत नसले तरी शिवसेना- बीजेपी सरकार पुन्हा प्रस्थापित व्हावे, या भावनेतून धनगर मतसंख्या बीजेपी शिवसेना पक्षाकडे जावी, यासाठी अतोनात प्रयत्न करीत आहे. आरक्षण सोडले तर धनगरांना खूप काही या सरकारने दिलं, हे धनगर जनमानसामध्ये बिंबवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहे. "आदिवासी प्रमाणे कोणत्या? सवलती" हा मोठाच प्रश्न असतांना त्या निवडणूक काळात?? कशाप्रकारे?? या सर्व बाबी बाजूला सारून बीजेपी सरकारच्या
दातृत्वाच्या कहाण्या.. सामान्य धनगर माणसांना ऐकविल्या जात आहे. मात्र आरक्षण अंमलबजावणीची मुळ मागणी संबंधी यांची वाचा बंद पडलेली आहे.
धनगर जमातीला राजकीय दृष्ट्या सक्षम करण्यासाठी बीजेपीकडून राजकीय दृष्ट्या उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्नात आहे असे धनगर नेते लक्षात आले नाही. जे प्रयत्न करीत आहेत, त्यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत पण दिसत नाही. याचे कारण धनगरांमधून जनपाठींब्यावर नेता विकसित होणे कोणत्याही प्रस्थापित पक्षाला न आवडणारी सत्य बाब आहे.
आरक्षणासह सामान्य धनगरांना काय काय मिळालं? हा खूप मोठा प्रश्न असला तरी काही विशिष्ट धनगर लोकांना कदाचित खूप काही मिळालं असेल, म्हणून ते पक्षानिष्ठेशी इतके बांधील आहेत की, त्यांना त्यांचे शब्द सुद्धा आठवत नाही. समाज गेला खड्ड्यात, आरक्षण जाऊ दे गड्ड्यात पण कसाही करून धनगर मत हे बीजेपी शिवसेनेला मिळालेच पाहिजे, याचा काहींनी चंगच बांधलेला दिसतो आहे. अशी भिष्म प्रतिज्ञा घेणारे कार्यकर्ते धनगर जमाती मध्येच मिळू शकतात. हे या पाच वर्षांत सरकारने ओळखलं आहे. हे झालं मागील पाच वर्षातील अन्यायाचं धनगर जमातीच फलित.
दुसरीकडे शरद पवार साहेब व प्रियंका गांधी धनगर मेळाव्याला मार्गदर्शन करायला येणार आहे म्हणे. तेही धनगर नेत्यांच्या बोलावण्यावरून !! वाह, पराक्रमी धनगर नेत्यांनो.. जेवढं तुमचं ...... करावं तेवढं कमीच आहे.
कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व त्यांच्या नेत्यांना शिव्या देत देत बीजेपी शिवसेनेला सत्तेत बसवलं. आणि आता हा "मार्गदर्शन सोहळा" लय अजब वाटला बा..
पवार साहेबांचे कोणते मार्ग अन् कुठले दर्शन घ्यायचं राहीलं राव!! आयोजक धनगर नेते कोणती गुरुदक्षिणा देणार आहे की गुरूदिक्षा घेणार आहे हे अजून समलेलं नाही. एखाद्या हिंस्त्र प्राण्यांनी धनगरांच्या पिढ्या खावून फस्त केल्या, त्यांचं मार्गदर्शन या देशात केवळ धनगरच घेवू शकतात. त्यामुळेच कदाचित धनगरांना "येडे धनगर" म्हणत असावे.
प्रियंका गांधी वड्राचं मार्गदर्शन ज्या धनगर नेत्यांना महत्त्वाचे वाटते, त्यांनी आपला राजकारणाचा व वयाचा अनुभव, महाराष्ट्रातील सत्ताकारण तपासून पाहिलं तर खूप बरं होईल. काही चूका होत असेल तर दुरूस्त करता येईल. असो काहीही पण या सर्व प्रकरणांनी काही धनगर नेत्यांचे छुपे अजेंड्यावर सर्वांचे लक्ष वेधले आहे हे नक्की. काहींना तर या महाराष्ट्रात धनगरांवर एवढे अन्याय का होतात. याचे उत्तर सापडले. "घर का भेदी लंका ढाये" ही हिंदी मध्ये म्हण आहे..... अशा घरभेद्यांनीच धनगरावर अन्यायासाठी प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष पोषक परिस्थिती निर्माण करण्याचे कार्य वेळोवेळी केलेले आहे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, धनगरांवरील अन्यायाचे कर्तेधार्ते केवळ धनगरच आहेत..... हे समजून घेत नाही तोपर्यंत बाकीच्यांना दोष देणे निरर्थक आहे.
जय मल्हार!!
एकच ध्यास --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

No comments:
Post a Comment