Saturday, August 3, 2019

धनगरांनो! हे घ्या स्पष्ट दिशानिर्देश..*

🔜🔜🔜🔜🔜🔜🔜🔜🔜
*धनगरांनो! हे घ्या स्पष्ट दिशानिर्देश..*
                 *डॉ प्रभाकर लोंढे*

                नुकताच माझा *"धनगरांच्या दुर्गतीचे कर्तेधार्ते धनगरच!"* हा लेख प्रसिद्ध झाला. त्यामध्ये मूल्यमापनात्मक दृष्टिकोनातून विद्यमान धनगर सामाजिक - राजकीय परिस्थितीचे विवेचन करण्याचा प्रयत्न केला.  त्या लेखात भुतकाळासह वर्तमान परिस्थितीचे विवेचन करीत असतांनाच धनगरानी यापुढे काय केलं पाहिजे याचे अप्रत्यक्ष स्पष्टपणे दिशानिर्देश करण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी सामान्यातील सामान्य धनगराला ते समजावे यासाठी माझे मित्र *सोमनाथ गायकवाड (नाशिक)* यांनी त्यामध्ये सरळसरळ अधिक स्पष्टता आणण्याच्या प्रयत्न  करावा हा आग्रह केला त्यावरून हा लेखन प्रपंच करतो आहे.
              महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांच्या निर्णय प्रक्रियेत कोणताही धनगर नेता दिसत नाही. तसा नेता झाला नाही किंवा होऊ दिला गेला नाही असा सातत्याने आरोप आहे व तो सत्य आहे. याचा अर्थ आमच्या नेत्यांची *या पक्षांमध्ये केवळ वाहक हीच भूमिका राहिलेली दिसून येते.* हे वाहक नेते केवळ धनगर मतसंख्या या पक्षाकडे वळवण्याचे काम सतत करीत आलेले आहे. *त्याबदल्यात छोटे मोठे पद, आर्थिक लाभ मिळत गेले,* यामध्ये जमातीचे दिवस वाया गेले.  आज धनगर जमातीचं यापेक्षा वेगळं चित्र आहे, असे दिसत नाही. खोटी आश्वासने, फसव्या योजना,  यांच्या माध्यमातून धनगरांना खुष करण्याचा प्रयत्न सुरू आहे. व त्यातून सदा लाचार धनगर निर्माण करण्याचे कार्य केले जात आहे. व या प्रस्थापित पक्षांना हेच अपेक्षित आहे.
        त्या ऐवजी या प्रस्थापित पक्षांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. सत्तेचे मार्ग  चोखाळण्याचे प्रयत्न दिसत नाही. प्रस्थापित पक्षांपैकी कोणताही राजकीय पक्ष धनगराना २५ उमेदवार देतो, ५० देतो किंवा ७५ धनगर उमेदवार देतो, असं म्हणतानाही दिसत नाही.  *या पक्षांकडून जे धनगर नेते उमेदवारीची अपेक्षा करीत आहेत. त्यांना तरी उमेदवारी भेटेल की नाही ही शंका आहे. असो....  *हे प्रस्थापित पक्ष राजकीय सत्ता व सत्तेचे मार्ग(आरक्षण) सोडून तुम्हा धनगरांना सर्वच (सवलती, पैसा, हायमास्ट लाईट, समाज मंदिर) द्यायला तयार आहेत..  पुढे तशी परिस्थिती निर्माण झालीच तर ते आरक्षण(सवलती) (राजकीय सोडून) सुद्धा लागू करतील . पण सत्ता आपल्याकडेच ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करतील.* आणि वास्तविकता आहे की ही खरी बिमारी प्रस्थापित पक्षातील धनगर नेता समजून घ्यायला व सामान्य धनगरांना सांगायला तयार नाही. आणि सर्वांना हे माझं मत पटत असेल, खरं वाटत असेल तर कशाला आपण आपला वापर होवू देता?.  _*स्वर्गातल्या कोतवाला पेक्षा नर्कातला का होईना, राजा कधीही महानच असतो.*_
           वंचित बहुजन आघाडीने जशा १०० धनगरांना उमेद्वारी देण्याचे घोषित केले. _तशी घोषणा बि जे पी ने करावी. शिवसेनेने करावी, राष्ट्रवादीने, काँग्रेस ने करावी. त्यासाठी त्या पक्षातील धनगर नेतृत्वाने प्रयत्न करावे._ पण या राजकीय पक्षांमधून असं कधीही होणार नाही. झालं तर ते उत्तम व धनगरांच खूप मोठ यश राहणार आहे.  *धनगर कोणत्याही पक्षाकडून का असेना सत्तेत गेला पाहिजे. राजकीय  सत्तेचे मार्ग त्याला खुले झाले पाहिजे. त्याचे हक्क त्याला मिळाले पाहिजे. सामान्य धनगरांचे जगण्याचे प्रश्न सुटले पाहिजे,  धनगरांवरील अन्याय  थांबले पाहिजे.* आणि त्याआधी ``` ``` *आपल्याच माणसांकडून जमातीशी धोकाधडी थांबली पाहिजे.* एवढीच माझ्या सारख्याची अपेक्षा... *माझ्या सारख्या धनगरांच्या अपेक्षेप्रमाणे योग्य दिशानिर्देश....* ते तुम्हाला किती पटतात तो तुमचा प्रश्र्न..
?????????????????????

 *घ्या ना तिसरा पर्याय..... (वंचित - बहुजन)*

 *_जेणेकरून_*

१) धनगरांचा स्वाभिमान टिकून राहील.

२) प्रस्थापितांना तुम्हा धनगरांची जाणीव पण होईल

३) तुमच्याशी धोकाधडी करणारा सुध्दा आवश्यक ते  समजून जाईल.

४) हक्काची उमेदवारी पण मिळेल.... त्यासाठी मागत बसण्याची गरज नाही.

५) धनगर वेगळा राजकीय पर्याय निर्माण करू शकतो, अशी धनगरांची ताकद व्यवस्थेला समजून येईल.....

६) धनगर समाजाला इतरांचे नेतृत्व करता येईल.( मोठी जमात म्हणून)

७)  महाराष्ट्रातील अप्रत्यक्ष असलेल्या जातीय बेस राजकीय समिकरणात धनगर जमातीला दखलपात्र बनविण्यासाठी.

८) धनगर सारख्या राजकीय दारिद्र्य असलेल्या वंचित उपेक्षित जमातीची मोट बांधून सत्तेमध्ये त्यांचे नेतृत्व करण्याच्या संधी चा लाभ घेण्यासाठी.

९) धनगरांमधील तरूण नेतृत्व विकास व त्यांना तशाप्रकारची संधी उपलब्ध करून देण्यासाठी.

१०) बहूसंख्य असलेल्या धनगर जमातीला बहूसंख्य उमेदवारी मिळवून आपली बहूसंख्या सिद्ध करणे. त्याआधारे सत्तेत जाणे, सत्तेत जावून जमातीचे प्रश्र्न सोडविणे, आरक्षण अंमलबजावणी संबंधात न्यायालयीन लढाईत सरकारचे सकारात्मक सहकार्य मिळावे, सरकारवर धनगर जमातीचा दबाव राहतील, या करीता महाराष्ट्रातील सरकार निर्मिती प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणे.....

             उपरोक्त सर्व मुद्दे हे धनगर जमातीच्या राजकीय उध्दारासाठी माझा दृष्टिकोन व  सोमनाथ गायकवाड यांच्या अपेक्षेप्रमाणे स्पष्ट दिशानिर्देश करण्यासाठी आहे....  ते कोणावर बंधनकारक आहे असं कोणीही समजू नये.  इतरांचे यापेक्षा वेगळे दृष्टिकोन व दिशानिर्देश असू शकतात....  *_मात्र सर्वोत्तम दृष्टिकोनातून धनगर जमातीने आपली राजकीय वाटचाल करावी, राजकीय दरिद्रता संपुष्टात आणावी , एवढीच अपेक्षा.....*_


जय मल्हार!!

 *एकच ध्यास  --- धनगरांचा राजकीय विकास*
___________&_____________________
 *धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक*
 ~डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३~

No comments:

Post a Comment