Saturday, August 24, 2019

लक्षवेध

लक्षवेध

पाजळ तुझी शस्त्रास्त्र
अन् येऊ दे त्यास धार.
एकवटून सारं बळ
नेम धरून अचूक कर वार.
होवू दे आर या पार.
चालेल एकदाची व्यवस्था
झालेली थंडगार.
पुन्हा एकदा सांगतो,
असेल तुझ्यात हिम्मत
तर न चुकता
तो कोथळा बाहेर काढ.
येथील विकारग्रस्त व्यवस्थेचा.
जिथे अनेक मुखवटे
पोसले आहेत खाण्यासाठी भाड.
मात्र हे करताना
एकच लक्षात ठेव,
तुला ते करायचं आहे
तर ते केवळ
निर्विकार समाज अन्
निष्कलंकित मानवी मनासाठी.

   डॉ प्रभाकर लोंढे

No comments:

Post a Comment