धनगरांनो, असीरगड हिंदुस्थानचाच नाही धनगरांचा जिब्राल्टर
डॉ प्रभाकर लोंढे
"असीरगड" नावाचा किल्ला अनेकांना माहित असेल किंवा नसेल, काहींनी तो प्रत्यक्ष पाहिला असेल किंवा नसेल, परंतु या किल्ल्यापासून काय घ्यावं? हा अनेकांचा मोठा प्रश्न असेल. काहींना तो महत्त्वाचा सुद्धा वाटत नसेल, तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र मी जेव्हा नुकतीच प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा एवढं नक्की लक्षात आलं की "असीरगड" धनगरांच्या कर्तुत्व, स्वाभीमान आणि गौरवशाली ऐतिहासिक परंपरांचा अप्रतिम वारसा आहे.
"असीरगड" महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील रावेर पासून सीमेलगत मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथून वीस किलोमीटर अंतरावर आहे. प्रचंड तटबंदी आणि समुद्रसपाटीपासून २५० फुट उंचीवर सह्याद्री पर्वत रांगांवर असलेला हा किल्ला "हिंदुस्थानचा जिब्राल्टर" म्हणून ओळखला जातो.
प्रचंड दरवाजा, तटबंदी तसेच तेथील पाण्याचे व्यवस्थापन व शत्रूपासून सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आलेली काळजी या सर्व गोष्टी ने परिपूर्ण असलेला हा किल्ला "आसा अहिर" नावाच्या पशुपालकांने बांधला होता असा उल्लेख ऐतिहासिक पुरावे तसेच भारतीय पुरातत्व विभागाच्या दस्तऐवजावरून लक्षात येते.
कोण होता हा आसा अहिर? तो असा व्यक्ती होता ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणात पशुधन होते, त्या पशुधनाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने पंधराव्या शतकामध्ये त्याने या गडावर तटबंदी केली. तो तिथे राहू लागला. याशिवाय आसा अहिर हा धनगर होता हे सिद्ध होते कारण धनगरांमध्ये अहिर नावाची पोटजमात आहे. (आज प्रत्येक पोटजमात विसरली पाहिजे व केवळ धनगर म्हणून आपली ओळख जपली पाहिजे) आणि ती महाराष्ट्रातील जळगाव तसेच मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर या भागामध्ये प्रामुख्याने आढळून येते. पूर्वी भारतात प्रत्येकाला जातीच्या नावाने ओळखले जात होते. यावरून असीरगड चा निर्माता आसा आहिर व धनगर जमातीचा अगदी जवळचा संबंध आहे. त्यामुळे आशिरगड धनगरांच्या स्वाभिमानाचा व आत्मीयतेचा प्रश्न आहे.
आसा अहिरच्या काळात या गडाचा विकास झाला. त्यामुळेच त्या गडाची कीर्ती सर्वदूर पसरली होती. त्यामुळेच त्याच्या नावावरून पुढे (आसा + आहिर + गड = असीरगड) अशा प्रकारे हा गड पुढे असीरगड नावाने ओळखला जावू लागला. किल्ल्याच्या विकासामुळे तो इतका नावारूपास आला की, सर्वांच्या आकर्षणाचा विषय बनला. त्याचे भौगोलिक स्थान सुद्धा एक महत्त्वपूर्ण असून त्याच्यामुळे उत्तर भारतातून दक्षिण भारतात राज करण्यास सोईस्कर होते.
अतिशय मजबूत आणि विशालकाय म्हणून ओळख असलेला हा असीरगड किल्ला जगातील निवडक सुप्रसिध्द किल्ल्यांपैकी एक म्हणून ओळखला जात होता. हा किल्ला सहजपणे जिंकणे खूप कठीण होते. त्यामुळेच या किल्ल्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कोणत्याही कर्तबगार व्यक्तीने स्वबळावर जिंकलेला नाही. ज्यांनी ज्यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्यांनी त्यांनी फंद फितुरी, पैसा, धोकेबाजी अशा मार्गानेच ताब्यात घेतलेला आहे. एवढा अपराजित कठीण गड "आसा अहिर" नावाच्या एका धनगराने बांधला. व नावारूपास आणला.
पुढे या किल्ल्याचे महत्व एवढे वाढले की, हा किल्ला ताब्यात घेतल्या शिवाय कोणालाही दक्षिणेवर राज्य करता येणे शक्य नव्हते. म्हणून इतिहासकार या किल्ल्याला "बाब ए दख्खन" (दक्षिण द्वार) आणि "कलोदर ए दख्खन" (दक्षिण ची किल्ली) असा उल्लेख करतात.
पुढे या गडाची कीर्ती इतकी पसरली की तो किल्ला म्हणजेच सर्वांच्या आकर्षणाचा व अधिपत्याखाली आणण्याची लालसा निर्माण करणारा ठरला. त्यातूनच सर्वप्रथम फिरोजशहा तुघलकाचा शिपाई मलिकचा पुत्र नासिर खा फारुकी ने आसा अहिर शी धोकाधडी करून हा किल्ला ताब्यात घेतला. त्यासाठी त्याने आसा अहिरच्या स्वभावाचा गैरफायदा उचलला कारण आसा अहिर उदार व्यक्तिमत्त्वाचा पराक्रमी पुरुष होता. दयाभाव हा त्याचा स्थायीभाव होता. ही बाब लक्षात घेऊन नासीर खा फारुकी ने कट रचला. व आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगून मला व माझ्या कुटुंबाला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून किल्ल्यामध्ये आश्रय द्यावा, अशी विनंती आसा अहिरला केली. या विनंतीस आसा अहिर ने आपल्या स्वभाव गुणांनुसार परवानगी दिली. मात्र जेव्हा तो किल्ल्यामध्ये राहण्यास आला तेव्हा आसा आहिर व त्याची मुले नासीर खा फारुकीच्या स्वागतासाठी आली असता नासिर खा फारुकी च्या सहकाऱ्यांनी आसा अहीर व त्याच्या मुलांवर जोरदार हमला केला व मारून टाकले. अशाप्रकारे नसीर खा फारुकी ने फंदफितुरी व धोकाधडीने किल्ला आपल्या ताब्यात घेतला. त्याच्यानंतर आदिलशहा फारूखीने आपला कब्जा कायम ठेवला परंतु त्याच्या मृत्यूनंतर किल्ला निष्क्रीय अशा बहादूरशहा च्या ताब्यात गेला.
तोपर्यंत मोगल सम्राट अकबराला सुद्धा या किल्ल्यासंबंधी आस निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी या किल्ल्याला सैन्यानिशी संपूर्णता वेढा दिला. सर्वत्र नाकेबंदी केली. परंतु सतत दहा वर्षे वेढा देऊन सुद्धा त्याला स्वतःच्या ताकदीवर तो किल्ला जिंकता आला नाही. तर दुसरीकडे त्या दहा वर्षात गडावर कोणतीही बाबीची कमतरता भासली नाही. यावरून आपल्याला गडाच्या समृद्धतेची कल्पना येते. शेवटी अकबराला सुद्धा हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी शूराला अशोभनीय बाबींचाच सहारा घ्यावा लागला व धोका धडी करून अकबराने बहादूरशहाला जखमी केले. त्याच्या मुलांसह त्याला बंदी बनवले व १७ जानेवारी १६०१ ला किल्ला आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर तो मराठ्यांच्या ताब्यात राहिला. नंतर इंग्रज व आता भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असल्याचे लक्षात येते.
मराठेशाहीच्या काळामध्ये या किल्ल्यावर होळकरांचा ताबा असण्याची दाट शक्यता आहे. कारण येथे जे शिवमंदिर आहे त्या शिव मंदिराचे बांधकाम हे मराठेशाहीच्या काळातील वाटते. आणि होळकर हे शिव भक्त असल्याने या शिव मंदिराची स्थापना/ निर्माण होळकरशाहीच्या काळात झाली असावी असे त्या मंदिराचा कळस व एकूण बांधकामावरून मला वाटते. त्यासाठी पुन्हा संशोधन होण्याची गरज असून तोपर्यंत असीरगड किल्ला धनगर व्यक्तीला प्रेरणादायी असून प्रत्येक हरहुन्नरी व्यक्तिला कार्य करण्यास प्रवृत्त करणारा आहे. असतो पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली असला तरी त्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने कातून प्रयत्न करणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य ठरते.
(बाकी पुढील भागात)
जय मल्हार!!
एकच ध्यास --- धनगरांचा राजकीय विकास
___________&_____________________
धनगर राजकीय नेतृत्व आणि जागृतीचा अभ्यासक
डॉ. प्रभाकर लोंढे गोंदिया चंद्रपूर ९६७३३८६९६३

No comments:
Post a Comment