Thursday, October 6, 2016

 बिनपगारी व्यथा


काय सांगू भाऊ आता
शिक्षकाची बिनपगारी व्यथा
फुकटामंदी दिवस चालले
खाता खाता लाथा..

शाळा,संस्था,  मंञालयात
आता चाले त्याच्याच बाता
बिनपगारी करायची आहे का
घरी जाता आत्ताच्या आता...

दिवसा मागून दिवस चालले
झिजलाय पायातला ज्युता.
तरी हरामखोर संस्थापक म्हणे
अजून दिला नाही चवथा हप्ता....

केस झाले पांढरे शुभ्र
किड लागली दाता.
बिनपगारी जीवन चाललय
संपल्या नाही व्यथा....

बायको  गेली माहेरी
विचारी तिला तिची माता
जावयाले पगार नाही
भाकर कशासोबत खाता..

बायको बिचारी परेशान झाली
ठनकलाय तिचा माथा
चला धनी मरु दोघ बी
संपवु सारी कथा .... संपवु सारी कथा...

हिम्मत नका हारु मालकीन
आहे शिक्षकी बाना
समजून घ्या सावित्री स्वतःला
आता मला ज्योतिबा माना.....

सोबत रहा तुम्ही तरी
घडवुया राष्ट्राचा कना
आपण मेल्याने वांझ व्यवस्थेला
कधी फुटणार नाही  पान्हा.....

जिवंत राहू मरेपर्यंत
शिक्षणाचा चालवु कारखाना
नसावी कधी शब्दांत लाचारी
दाखवू शिक्षकी बानेदारपणा

---+-++++++++++
  डाँ प्रभाकर  लोंढे    गोंदिया-चंद्रपूर
---------------------------

No comments:

Post a Comment