Saturday, October 15, 2016

*आदरानिय महादेव जानकर साहेबांना जपणे यातच धनगर जमातीचं भलं.......*


धनगर बांधवानो!! शिर्षक वाचल्याबरोबर माझ्या संबंधात काही तर्क वितर्क काढू नका. ... मी रा.स.पा चा किंवा जानकर साहेबांचा कार्यकर्ता नाही. माञ धनगरांच स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करण्याची ताकद फक्त मान. महादेव जानकर साहेबांच्या राजकीय  खेळीमध्ये मला नक्कीच लक्षात येते.. व ती प्रत्येकाने समजून घ्यावी हीच यामागची *अपेक्षा !!!!!*

         सर्वच नेते कार्य करतात.. पण हे कार्य करीत असताना अचूक शञू ओळखून त्याच्यावर वार करण्याची  अचूक संधी शोधणे.,  त्यादृष्टीने नीती आखणे व ती आमलात आणणे हेच युद्ध असो की राजकारण......त्यात अत्यावश्यक असते. आणि यामध्ये  आधुनिक मल्हारराव महादेव जानकर साहेबांना साध्य झालं आहे असं मी म्हटल्यास कोणाला आश्चर्य वाटण्याची आवश्यकता नसावी. कारण जाणकर साहेबांची जेवढी दखल येथील व्यवस्थेने घेतली  आहे तेवढी दखल स्वातञ्योत्तर महाराष्ट्रात  इतर धनगर नेत्यांची घेतली आहे असं तरी मला *धनगरांच्या राजकीय नेतृत्वाचा अभ्यासक* म्हणून निदर्शनास  आलेले  नाही...

    आजच्या महाराष्ट्रात  सर्वाना  लक्षात आलं असेलच मराठ्यांनी (बारामतीकरांनी) स्वतःचं साम्राज्य  धनगर व इतर बहुजनांचा सत्यानाश करुनच निर्माण केलेले आहे. हे आज डोळस धनगरांना व बहुजनांना सांगण्याची गरज नाही. ते कोणत्याही क्षणाला आधुनिक मराठेशाहीचं व बारामतीकरांचं समर्थन करुच शकत नाही..  तरी राजकारणात वावरतांना  प्रश्न राहीला आपल्या निष्ठांचा!!! कोणी आपली निष्ठा कुठे ठेवायची हा प्रत्येकाचाच प्रश्न आहे....   प्रत्येक धनगर बांधवाची मान. जाणकर साहेबांवर निष्ठा असावी हा कोणाचाही आग्रह नसावा. माझा तर नाहीच नाही. माञ आपल्या निष्ठा जपत असतांना मान. जाणकर साहेबांना व त्याच्या पक्षाला हानी होणारा नाही याची दक्षता घेणे धनगर राक्ताच्या माणसाचे व प्रत्येक बहुजन माणसाचे प्रथम कर्तव्य ठरते...व ते सर्वांच्या हितावह ठरेल हे माञ मी नक्कीच सांगेल.....
          आता कोणी म्हणेल सर! तुम्ही आम्हाला आमची कर्तव्य सांगायला लागले ...  होय दादा!!!!!  आज पर्यत या महाराष्ट्रात धनगराना व बहुजनाना कुञ्या मांजरांप्रमाणे समजणार्या व वागविणार्या विशेषतः मराठ्यांना व बारामतीकरांना आज धनगरांची भीती वाटायला लागली आहे.... हे सत्य सर्वांनी स्विकारलच पाहीजे..

कोणी म्हणेल सर! आमच्या घराण्याची बारामतीकरांनी चांगली इज्जत केली. आमचं खुप भलं केल. खुप उपकार आहेत आमच्यावर पवारांचे !!!!  सर्व मान्य आहे दादानो... ते सर्व तुमच्यासाठी नाही.. त्यांचं साम्राज्य टिकविण्यासाठी ....
       आपले पण उपकार असतात आपल्या शेळ्या मेंढ्यांवर, कुञे घोड्यांवर !!!! किती उपकार करतो आपण त्यांच्यावर !!!  किती काळजी घेतो आपण त्यांची !!! ती केवळ आपल्या उदरनिर्वाहासाठी!!! आपले ओझे वाहण्यासाठी!!!!  किती प्रेम करतो आपण त्यांच्या वर पण वेळ आली तर विकतो.. कापतो !!!!! ते केवळ आपल्या सोईसाठी  !!!!!!!       या महाराष्ट्रात पुरोगामी पवारनीतीच सुञ यांच्या शिवाय दुसर नाही...... ती समस्त मराठा लॉबीने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वापरलेली आहे...

  धनगरांच्याच नाही तर समस्त उपेक्षित वर्गातील लोकांना सत्तैतील वाटा मिळण्यासाठी ती नीती महाराष्ट्रातून नष्ट होणे अत्यावश्यक आहे...  आज जानकर साहेबानी तर सरळ मराठ्यांच्या सत्तेचा केंद्रबिंदू (बारामती)लाच प्रहाराच केंद्रबिंदू बनविलं आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात  धनगरेत्तर बहुजनांची साथ मिळविण्याची ताकद, यंञणा आजतरी धनगर नेत्यांमध्ये एकट्या मान. जानकर साहेबांकडे आहे हे सर्व धनगर नेते व बांधवांना मान्य करावच लागेल.. ही बाब कदाचित  पवार परीवाराचे लाभार्थी, किंवा जानकर साहेंबाचे विरोधक यांना पटणार नाही...  पण कधी कधी स्वकियांच्या हितासाठी व सत्य स्विकारण्यासाठी ते पटवून घेतलेले बरे असते..

    याचा अर्थ जानकर साहेब इतरांनी स्विकारावे असा याचा मुळीच अर्थ काढू नये... तो प्रत्येकाचा प्रश्न आहे.... सांगण एवढेच आहे की, धनगर नेत्यांना स्वतःच्या अस्तित्वाला जर टिकवून ठेवायचं असेल तर मान. जानकर साहेब व त्यांचा पक्ष जिवंत राहणे धनगरांसाठी राजकीय स्वास आहे........
   
*डॉ प्रभाकर आर लोंढे*
*(धनगरांच्या राजकीय नेतृत्वाचा अभ्यासक*)
 गोंदिया-चंद्रपूर

No comments:

Post a Comment