राजमाता अहिल्या
अहिल्या नावाची माय माझी
कीर्ती तिची लय गोड.!! धृ!!
लेक शिंद्यांची लय गुणाची
सासर त्यांच होळ
मल्हाररावांची सून ती
कशी करेल तडजोड !!१!!
वीर खंडेराव पराक्रमी तो
हिरावला त्यांचा जोड
अर्ध्यावरती डाव मोडला
नाही कुठे तडजोड !!!२!!!!
अठ्ठावीस वर्ष राजसत्तेची
प्रजेचीच त्यांना ओढ
विधवा असुनी कर्माला त्यांच्या
नाही कोणाची तोड !!!३!!!
वीर विरांगना भारी रनांगना
रनकौशल्यास त्यांच्या मोड
हलकट मेला राघोबा दादा
जिरवली त्याची खोड !!!४!!!
इतिहासाच्या पानोपानी
कीर्ती वर्णीली परकीयांनी
भारतातच इथे घोळ ..
अहिल्यामातेच्या सन्मानार्थ
कवी प्रभाकर लिहिते ओळ ...
कवी... डाँ प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर __________________
सर, कसलाय नवरा असावा बाबा बायको नसावी मोठी ' या चालीवर म्हणून पहा नाही तर दुसरी चाल लावा...
अहिल्या नावाची माय माझी
कीर्ती तिची लय गोड.!! धृ!!
लेक शिंद्यांची लय गुणाची
सासर त्यांच होळ
मल्हाररावांची सून ती
कशी करेल तडजोड !!१!!
वीर खंडेराव पराक्रमी तो
हिरावला त्यांचा जोड
अर्ध्यावरती डाव मोडला
नाही कुठे तडजोड !!!२!!!!
अठ्ठावीस वर्ष राजसत्तेची
प्रजेचीच त्यांना ओढ
विधवा असुनी कर्माला त्यांच्या
नाही कोणाची तोड !!!३!!!
वीर विरांगना भारी रनांगना
रनकौशल्यास त्यांच्या मोड
हलकट मेला राघोबा दादा
जिरवली त्याची खोड !!!४!!!
इतिहासाच्या पानोपानी
कीर्ती वर्णीली परकीयांनी
भारतातच इथे घोळ ..
अहिल्यामातेच्या सन्मानार्थ
कवी प्रभाकर लिहिते ओळ ...
कवी... डाँ प्रभाकर लोंढे गोंदिया-चंद्रपूर __________________
सर, कसलाय नवरा असावा बाबा बायको नसावी मोठी ' या चालीवर म्हणून पहा नाही तर दुसरी चाल लावा...
No comments:
Post a Comment